शशक पूर्ण करा-बुंदीचा लाडू-अस्मिता

Submitted by अस्मिता. on 10 September, 2021 - 09:41

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....

       आई म्हणाली होती बरं की या खोलीत झोपू नको पण ही वाड्याच्या एका बाजूला , सज्जात लावलेला जुईचा वेल, कसं शांत शांत वाटत होतं पण ........

    किंकाळी......

    घाबरू नकोस, दर अमावस्येला या नळातून पाणी ठिबकतं.  तुझे खापरपणजोबा रघोत्तमराव त्यांनी बांधलायं हा वाडा, त्यांचे भाऊ माधवराव यांचा मी मुलगा, शिक्षणासाठी पाठवलं होतं मला. याच वाड्यात, माझी मुंजही झाली होती. भली मोठी इस्टेट होती. सगळं आलबेल होतं. एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर खूप भूक लागली होती. रघूतात्याने मायेने बुंदीचे दोन लाडू भरवले फक्त मलाच....मलाच !!मगं इस्टेटीचे दोनंच वारस राहिले.  तेव्हापासून या दिवशी मला तहान लागते आणि मी या खोलीत येतो, पाणी दे , पाणी.........

©अस्मिता.
गणेशोत्सव २०२१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

आधी डेंजर वाटली. आणि मग हसू यायला लागलं.
याच दिवशी तहान का लागते? बुंदीचे लाडू खाल्ले आणि पाणी प्यायच्या आधीच... राम नाम... झालं. म्हणून मग तहान.
का... ती तहान कशाची वेगळीच आहे?!!!!!
आता परत भिती वाटू लागली आहे!
मस्त!

विषबाधा झालेल्या व्यक्तीला तहान लागते असे ऐकून आहे म्हणून पाण्याचा आवाज वगैरेशी कनेक्ट केले.

सर्वांचे आभार.

ओह्ह ओके.
माझं डोकं फार शिरेली बघुन... खून का बदला खून... खून की प्यासी वर गेलं. Lol हर चतुर्थी को प्यास बुझाने एक घोट चैयेईच! Wink

>>>>>विषबाधा झालेल्या व्यक्तीला तहान लागते असे ऐकून आहे म्हणून पाण्याचा आवाज वगैरेशी कनेक्ट केले.

अगं बाई!!! आत्ता कळलं. मस्त आहे मग ट्विस्ट. काय तरी आत्याबाई बुंदीच्या लाडवांतून वीष घातलय Sad

भारी!

Pages