BYJU'S वा तत्सम ऑनलाईन शिक्षण कंपन्यांचा तुम्हाला अनुभव आहे का?
मुलगा पावणेचार वर्षांचा आहे आणि मुलगी दुसरीत आहे. दोन मुलांचे तीन वर्षांचे मिळून एक लाख रुपये सांगितले आहेत. जे बारा महिन्यांच्या ईन्स्टॉलमेंटमध्ये भरायचे आहेत. ज्यात ते दोन्ही मुलांना पर्सनल टॅब देणार. त्यांच्या वर्कशीट असणार. ऑनलाईन तर असणारच, पण लिहायची प्रॅक्टीस व्हायला पेनने लिहायच्या वर्कशीट देखील देणार ज्यात पेनने वर्कशीटवर लिहिताच स्कॅन होत समोर स्क्रीनवर दिसणार. तसेच दिवसभरात सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत कधीही ऑनलाईन आलात तर तुम्हाला नेमून दिलेला शिक्षक तुम्हाला त्या वर्कशीट सोडवायला आणि समजून घ्यायला मदत करणार. तुम्ही मराठी आहात तर तुम्हाला मराठी बोलणारा शिक्षक मिळायची सोय आहे. मुले आईसीएसई वा सीबीएसई बोर्डला आहेत त्यानुसार त्यांचा अभ्यासक्रम फॉलो होणार. ऑलिम्पियाड वगैरे बाहेरच्या एक्झामचाही सिलॅबस त्यात कव्हर करणार वा त्यात मदत करणार. जे मुले स्क्रीनवर करताहेत ते सारे त्यांच्या नेमून दिलेल्या शिक्षकांनाही दिसणार, त्याचा वीकली रेकॉर्ड ते पालकांना देणार, पालकही मुले काय करत आहेत हे अॅपमार्फत बघू शकतात, मॉनिटरींग करू शकतात वगैरे वगैरे..
थोडक्यात ऑनलाईन ट्युशन घेतल्यासारखेच आहे हे. मी हिशोब लावला तर दोन्ही मुलांचे तीन वर्षे मिळून ३६ गुणिले २ = ७२ महिन्यांचे लाखभर रुपये म्हणजे १४०० रुपये दर डोई दर महिना झाले.
तुर्तास रजिस्ट्रेशन करून १५ मिनिटांचा ट्रायल पिरीअड घेतला आहे. तो घ्यावाच लागला कारण त्यांच्या सुंदर आणि स्मार्ट मॅडमने घरी येऊन चारपाच तास आमच्याशी गप्पा मारून, मुलीची चाचणी घेऊन, तिचे प्लसमायनस सांगून आम्हाला ईम्प्रेस केल्यानंतर नकाराचा पर्यायच माझ्याकडे शिल्लक राहिला नाही.
पण त्याहून महत्वाचे कारण म्हणजे मोठ्या मुलीपेक्षा छोट्या मुलाची चिंता जास्त आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्लेग्रूप नर्सरी वगैरे प्रत्यक्ष शाळा तर त्याच्या नशीबातच नव्हती आणि त्याचे ऑनलाईन क्लास असे कधी सुरूच झाले नाहीत. म्हणजे त्याच्या फी चे सुरुवातीचे ईन्स्टॉलमेंट भरले आहेत पण शाळा सुरू झाल्यापासून गेल्या चार महिन्यात तो फक्त दोनदाच क्लासला बसला आहे. ते सुद्धा काही लक्ष न देता, बसायचे म्हणून बसला. तयारच होत नाही स्क्रीनसमोर बसून शिकायला. बिल्डींगमध्येच ट्यूशन लावून पाहिले पण तिथेही तो थांबला नाही. आमच्याकडूनही काही शिकून घेत नाही. त्यामुळे शाळेचे पुढचे इन्स्टॉलमेंट न भरता, जोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही तोपर्यंत, आधीच्या ईन्स्टॉलमेंटचे जे पैसे गेले ते अक्कलखाती समजून, त्याची शाळाच बंद करावी या निष्कर्शापर्यंत मी आलो होतो. हे झाले पैश्यांचे, पण मुलाला काहीतरी शिकवायला हवेच ना. तर आता बायकोने हा पर्याय आणलाय.
१५ दिवसांच्या ट्रायल पिरीअडमध्ये बघूया आता ते BYJU'S वाले काय किती इम्प्रेस करताहेत. त्यावरून पुढे ठरवले जाईलच. पण ईथे कोणाला अश्या ऑनलाईन ट्युशन क्लासेसचा अनुभव असल्यास तो शेअर केल्यास माहितीचा फायदा सर्वांनाच.
Hअगदी अगदी. हे बायजू
Hअगदी अगदी. हे बायजू वालेआमच्याकडे पण आले होते. सध्या मी माझ्या मुलाच्या अकरावी आणि बारावी साठी ट्युशन शोधते आहे. प्लीज मदत करा आणि मला कोणाला याबाबत एक्सपिरीयन्स असेल तर शेअर करा. कारण आम्ही इतके प्रभावित झालो त्या सरांबद्दल की ऑलमोस्ट फिक्स केलं होतं पण आज हा रिप्लाय रिप्लाय वाचून हिम्मत होत नाही मुलाला बायजू म्मध्ये जॉईन करायची प्लीज प्लीज रिप्लाय करा. त्यांचं खूप महत्त्वाचं वर्ष आहे.
आम्ही व्हाईट हॅट आणि बायजु
आम्ही व्हाईट हॅट आणि बायजु वाल्याना फोन नंबर देत नाही.एकदा दिला आणि ते घरी आले की ते व्हॅम्पायर ला घरात आमंत्रित केल्यासारखे.तिथून मागे फिरणे नाही.
असेच आम्ही शाळेत असताना
असेच आम्ही शाळेत असताना पुर्वी chate क्लास वाले घरी यायचे आणी 2 3 तास बडबड करायचे. त्यांच्या फक्त notes आणी टेस्ट होत होत्या ते फक्त चांगले होते. बाकी शिकवणे इतके काही खास नव्हते. त्याची आठवण झाली. पण ते 8वी 9 वी 10 वीत यायचे . आता तर इतक्या लवकर क्लास वाले घरी येऊ लागले
मी नववीत असताना एकलव्य
मी नववीत असताना एकलव्य क्लासेसवाला असाच घरी आला होता. मला विचारलं मोठा होऊन कोण बनायचं आहे तूला. मी घरच्यांना अपेक्षित उत्तर दिलं डॉक्टर बनायचं आहे म्हणून. तर तो चाटच पडला, डॉक्टर बनणे माझ्यासाठी एकदम अशक्यप्राय गोष्ट असल्यासारखी लेक्चर द्यायला लागला. त्याच्या मते डॉक्टर व्हायला 95 टक्के लागतात आणि मी 80 च्या आसपास असायचो. तर त्याने खूपच इन्सल्ट केला माझा. एव्हडा इन्सल्ट केला की विचारू नका, आपल्याकडे बोलतात ना गोड बोलून मारणे तसला इन्सल्ट. मला आता आश्चर्य वाटतं आई बाबानी ऐकून कसं घेतलं. तो स्वतः मला दहावी बारावी पास वाटत होता. बोलताना नुसता तत् फफ करत होता. मी मोठा असतो तर त्याला नक्कीच घरातून हकलवला असता. त्याचा चेहरा आजूनपण माझ्या चांगलाच लक्षात आहे. कुठे दिसला तर मी डॉक्टर नाही बनलो पण त्याला नक्कीच डॉक्टरकडे पाठवीन.
इतके सर्व प्रतिसाद वाचून
इतके सर्व प्रतिसाद वाचून खात्री पटली, मीच एकटी नाही. मला पण फोन आला होता, दोन तास मस्त पटवून देत होता, मी इतके छान ऎकुन सरळ नाही म्हणणार हे त्याला बहुदा कळले असावी, माझ्या मुलांवर घसरला, म्हणे मूल पालकांच्या अपरोक्ष काय करतं ते पालकांना कधीच कळत नाही. मग माझी पण सटकली, त्याला लेफ्ट राईट घेतल मस्त, नंतर वाईट वाटलं की तो तर त्याच्या पोटासाठी करतोय त्यात त्याचा काय दोष
Mi..Deep तुमच्या मुलाचा ज्या
Mi..Deep तुमच्या मुलाचा ज्या अभ्यासक्रमात रस आहे, त्यासाठी तुमच्या जवळपास जे क्लास आहेत त्यांची चौकशी करा, आजूबाजूला जे विद्यार्थी शिकले आहेत, शिकत आहेत, त्यांना विचारा. नेटवर सर्च तर करायलाच हवा, पेमेंट टर्म चेक करा. मुलाने त्याच्या मित्रमंडळीत काही चर्चा केली असेल तर ती विचारात घ्या, इतर पालकांशी बोला. इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर अशा अभ्यासक्रमाकरता अनेक प्रथितयश क्लासेस आहेत, त्यांची शिकवण्याची गती आणि पद्धत आपल्या मुलासाठी योग्य आहे का ते प्रामुख्याने तपासून घ्या. बऱ्याच वेळा त्यांचा कल अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करण्यात असतो जे सर्व मुलांना समान प्रकारे जमत नाही आणि क्लासेस पुश करत राहतात. याकडे कृपया लक्ष द्या. शुभेच्छा!
मुलांचे वय पाहता त्यांना
मुलांचे वय पाहता त्यांना कोणतेही क्लासेस लावू नयेत असे सुचवेन.
स्वाती2, लिंक चालत नाही
स्वाती2, लिंक चालत नाही
सस्मित - लिंक नाही उघडत, pdf
सस्मित - लिंक नाही उघडत, pdf download होते.
ईथली चर्चा वाचून माझे मत तरी
ईथली चर्चा वाचून माझे मत तरी फायनल झालेय. नकोच ते !
पण बायकोचा कल घेण्याकडे आहे. तिनेही ऑनलाईन कुठेतरी रिव्यू वाचलेत. त्यात बायजुचे कौतुक आहे. आता ते कुठे वाचले ठाऊक नाही. ते पेड रिव्यू असू शकतातच.
ट्रायल पिरीअड अजून सुरू झाला नाही. कारण टॅब अजून आला नाही. आणि तो टॅब आल्यावर २० दिवस म्हणालेत. तो संपायच्या आत काय ते ठरवून निर्णय घेऊ.
अरे हो, वीस हजार रुपये भरले आहेत. ट्रायल पिरीअडमध्ये नाही जमले तर ते रिटर्न होतील असे म्हणालेत. जर त्यात दगाफटका झाला तर ते देखील ईथे सांगेन. भले आपले पैसे अक्कलखाती गेले आणि आपला पोपट झाला, तरी ते न लपवता सांगितल्याने निदान दुसरे सावध होतील. जसे की पंधरासोळा हजारांचा वॅक्युम क्लीनर अक्कलखाती गेला आहे.
ईथली चर्चा मात्र चालू राहू द्या. फार छान होतेय. काही प्रतिसादांना उत्तरे द्यायची होती. सध्या दुसर्या कामात असल्याने नंतर वा उद्या देतो. तुर्तास धागा वाचतोय आणि ऊपयुक्त ठरतोय याची पोच द्यायला आणि धन्यवाद म्हणायला ही पोस्ट.
सस्मित,
सस्मित,
माझ्याकडे क्रोममधे लिंक उघडतेय. पिडीएफ फाईल आहे. प्रिंट आउट घेता येइल. त्या शिवाय युट्युबवर saxon phonics म्हणून शोधल्यास शिक्षकांनी तयार केलेले भरपूर धडे आहेत. त्यातला कुणाचा चॅनल आवडतोय ते बघा. मातृभाषा इंग्रजी नसेल तर मूल आणि पालक दोघांसाठीही उपयुक्त अशी picturee dictionary आवर्जून घ्यावी. अगदी ३ वर्ष प्रीस्कूल पासून ५-६ वी पर्यंत उपयोग होतो. रंगीत चित्रांमुळे मुलांना कुतुहल वाटते आणि शब्द लक्षात राहाण्यास मदतही होते.
20000 परत मिळत असतील. पण
20000 परत मिळत असतील. पण कोणत्याही कंपनीचे(यात सरकार पण आलं) तुमच्याकडून पैसे घ्यायचे नियम अत्यंत युजर फ्रेंडली, लवचिक,कोणीही घ्यायला आले तरी चालेल, तुमच्या घरी येऊन घेऊन जाऊ इतके सोपे आणि गोड असतात.पण याच कंपन्यांचे तुम्हाला तुमचे पैसे परत देण्याचे नियम 100 फोन कॉल्स, ऍप्लिकेशन्स, तुम्हाला पटवायच्या अजून 1-2 मीटिंग, कधी कधी रोख पैसे परत देण्याऐवजी ते डिस्काउंट या स्वरूपात देऊन तो मिळवण्या साठी अजून कसले तरी सबस्क्रिप्शन या स्वरूपात असतात.
व्हॅक्युम क्लिनर olx वर विकता येईल.
स्वाती2 यांचे सगळे प्रतिसाद
स्वाती2 यांचे सगळे प्रतिसाद +७८६.
कुठे दिसला तर मी डॉक्टर नाही बनलो पण त्याला नक्कीच डॉक्टरकडे पाठवीन.>>
वर बऱ्याच जणांनी लिहिलंय तेच.
वर बऱ्याच जणांनी लिहिलंय तेच. ऑनलाईन क्लासेस नकोतच लहान वयात. बसत नाही, थोडी बसायची सवय म्हणून घरात कोणी घ्यावे किंवा जमत नसेल तर आजूबाजूला ऑफलाईन जाऊन बसावे थोडा वेळ.
शक्यतो सातवी पर्यँत ट्युशन्स मारा नको.
मला आता नाव आठवत नाही पण असच लोकल कुणीतरी सिडी घ्या, पेपर्स तपासून मिळतील म्हणून मुलगा आठवीत असताना मागे लागलेले. शाळेतून बाहेर पडल्यावर मुलांकडून परस्पर नंबर्स घेऊन. मग एकदा बघा तरी म्हणून व्हिजिट ला आलेले. मी आपलं करेल ओ त्याच तो , करतोय तेवढं बस आहे. अशा मोड मध्ये होते तर त्यांनी मला तुमचा मुलगा कित्ती कित्ती हुशार आहे आणि तुम्ही त्याची हुशारी वाया घालवताय असं लेक्चर दिलेलं. जणू काही लेक आता ह्यांचे पैसे भरल्यावर कुठलातरी शोध बिध लावणार होता. मी बघते, कळवते असं मोघम बोलून नन्तर त्यांचा नम्बर च ब्लॉक केला.
https://restofworld.org/2021
https://restofworld.org/2021/inside-india-edtech-byjus/
Hard sells and ‘toxic’ targets: How Indian edtech giant Byju’s fuels its meteoric rise
Former salespeople say the company pushes its products on parents who can’t afford them.
ओके. बघते.
ओके. बघते.
फुरसतीत येते नंतर. धन्यवाद.
माझ्या जवळच्या नात्यातला
माझ्या जवळच्या नात्यातला मुलगा
)
वय वर्षे ४
पोद्दार जम्बो kids ला admission घेतलंय
त्याला ipad घेऊन दिलाय (का? इतक्यात गरज नव्हती असं माझं मत, आम्ही engg ला laptop नाही म्हणून clg lab मध्ये अभ्यास करणाऱ्या category मधले लोक, पण आमच्या काळात असं होतं असं तुणतुणं वाजवलं नाही त्यांच्या घरी जाऊन
तर, हे पिल्लू अजिबात बसत नाही online क्लास ला, त्याची आई अटेंड करते सगळं आणि नंतर त्याच्या कलाने घेऊन त्याला शिकवण्याचा प्रयत्न करते
हे साहेब क्लास minimize करून game खेळणे, आणि cartoon बघणे इत्यादी महत्वाची कामे करतात
त्याचं वय आणि संयम दोन्ही online learninगं पद्धती साठी too early to start आहे असा निष्कर्ष निघाला आहे
अभ्या, परीसाठी बायजू कोर्स
अभ्या, परीसाठी बायजू कोर्स ठिक आहे पण रुन्मेशसाठी कोर्स काही कामाचा नाही.
या धाग्यांवरून आठवले. माझी
या धाग्यांवरून आठवले. माझी मुले शाळेत असताना असच अबॅकस क्लास लावण्याचे फॅड आले होते. प्रचंड जाहिरात करायचे, सेमिनार वगैरे असायचे त्यात एका मुलाला आणायचे जो अबॅकस वापरून फटाफट गणिताची उदाहरणे सोडवायचा. सिंगापूर व तत्सम ठिकाणी त्याच्या कॉम्पिटीशन मध्ये गेलेला वगैरे. अशीच तुमची मुले अबॅकस वापरून गणितात जिनिअस होतील,वगैरेचा इमोशनल अत्याचार असायचा.
मैत्रिणींची मुले जायची क्लास ला. पीअर प्रेशर खूप होते,पण मी नाही टाकले. कारण तो अबॅकस कुठे घेऊन फिरणार असे मनात आले. प्लस माझी मुले असल्या क्लास मध्ये ढिम्म इंटरेस्टेड असत.
हळूहळू कमी झाले त्याचे फॅड. आजकाल काही ऐकू येत नाही त्या अबॅकस बद्दल. क्लास केलेल्या मुलांना त्याचा खरंच काही फायदा झाला का आयुष्यात कोण जाणे ?
अबॅकस ची फॅशन अजूनही आहे.फक्त
अबॅकस ची फॅशन अजूनही आहे.फक्त इतर खूप गोष्टी आल्याने थोडी मागे पडलीय इतकंच.
अबॅकस पण जास्त कळत्या वयात(12 प्लस वगैरे) केल्यास अपेक्षित फायदे होतील.लहान वयात केल्यास नेहमीच्या गणित तासाला टीचर च्या पद्धतीशी टक्कर होऊन गोंधळाची शक्यता.
प्राथमिक शाळेतील पालकांसाठी
प्राथमिक शाळेतील पालकांसाठी https://www.k5learning.com/ इथे इंग्रजी भाषा आणि गणित यासाठी वर्कशीट्स, फ्लॅशकार्डस वगैरे उपलब्ध आहेत. हे फ्री आहे, लॉगिन करायची गरज नाही. यातल्या वोकॅबुलरी सेक्शनमधे साईट वर्डस, फोनिक्स साठी फ्लॅशकार्डस आहेत. प्रिंट करुन वापरता येतील किंवा अशीच फ्लॅश कार्ड्स इंडेक्स कार्ड्सवर लिहून तयारही करता येतील.
साधं पाटी पेणसिल अंकलिपी
साधं पाटी पेणसिल अंकलिपी बाराखडी सुरेखा पाटी अप्पा बळवंत चौकात मिळून जाईल व आई बापांनी एक एक तास काढला तर बारक्या बरोबर क्वालिटी टाइम पण होईल. ह्या जनरेशनला ऑफलाइन वेळ कसा स्पेंड करायचा कसे जगायचे नेट व स्क्रीन शिवाय हे ट्रेनिन्ग गरजेचे आहे. तो ही विचार करा. मुलांना साध्या साध्या कामांना बाहेर बरोबर घेउन जा व काय करतो ते समजावून सांगा. मास्क लावुन न्या.
https://www.business-standard.com/article/companies/edtech-decacorn-byju...'s%2C%20the%20world's%20most%20valuable,from%20the%20previous%20financial%20year.
बैजू चा प्रॉफिट बद्दल ही बातमी वाचून घ्या. हार्ड सेल केल्या शिवाय असे प्रोफिट होत नाहीत. प्रश्न पैशाचा नाही आहे मुलांचे बालपण हरवू नये व निकोप निरोगी वा ढ व्हावी हा मेन उद्देश आहे. ती हुषार कलाकार चाणाक्ष आहेतच पण त्यांचा हुषार सर्जन शील आत्मा व कोमल मन स्ट्रक्चर्ड शिक्षणाच्या रेट्या खाली हरवू नये हीच सदिच्छा.
हाय स्कूल आठ वी पासून पुढे क्लासेस लागले तर लावा. पण मुलीची चित्रकला चांगली आहे तर तिला ते शिक्षण घ्यायचे असेल तर त्याच्या
परीक्षा देउद्या स्वतःचे एक्स्प्रेशन तिला पेंट करू द्या. त्यातील अनेक पद्धती तिला एक्स्प्लोअर करू द्या. इलस्ट्रेशन वॉटर कलर पेन्स अॅक्र्लिक आणून द्या. कोणी टॅब देउन आपले पालक म्हणून निर्णय स्वातंत्र्य हिरावून घेत नाही ना तो कावा लक्षात घ्या.
बारक्याचे तर अजून खेळायचे दिवस आहेत.
माझी मुलगी अगदी लहान प्णा पासून मला जमेल तस्या कथा बनवून सांगायची लिहायची. तेव्हा तिला मी तिच्या चॉइसच्या वह्या आणून दिलेल्या आहेत. शेक्स पीअर ची नाटकातली वाक्ये दर पानावर असलेली वही तेव्हा तीनशे रु. ला घेतली होती. कुलूप असलेल्या डाय र्या हँडमेड पेपर च्या वह्या अश्या माझ्या नजरेतून महाग वह्या मी घेतलेल्या आहेत व ती एक एक पान लिहून विसरून द्यायची. त्या मी आfunction at() { [native code] } आता वापरून संपवल्या आहेत. एका त चित्रे चिकटवली आहेत.
आता ती सिनेमाची स्क्रिप्ट लिहिते व लोकांची अॅप्रुव्ह करते. माझी एक ही इच्छा तिच्यावर लादलेली नाही व शिक्षणही सीबी एस सी/ लिबरल आर्ट्स तिनेच सर्व सिलेक्ट केले आहे. ती फिल्म बनवण्यात ग्रॅजुएट झाली तेव्हा मला एकांनी " आप ने कैसे सोच लिया की उसे ब्रेक मिलेगा ? कोई है पहचान वाला बॉलिवूड मधे?!" असे अगदी काय ही वेडी म्हातारी बाई आहे असा कटाक्ष फेकत विचारले होते. तेव्हा मी कसनुसे हसले पण मनात म्ह टले की मैने सोचा ही नही. उसे जो करना था खाली वो पॉसिबल कर दिया. ( मानेवर ख्डा ठेवून नोकरी!!)
ऑनलाईन .org साईट्स वर maths,
ऑनलाईन .org साईट्स वर maths, english या विषयांच्या भरपूर worksheets उपलब्ध आहेत. काही काही उत्तरांसकट. प्रिंट्स काढून सोडवायला द्यायच्या आपण आपल्याला वेळ असेल तेव्हा तपासून द्यायच्या. मी हे सातवीपर्यंत केलेलं . बाह्य स्पर्धा परीक्षा ही सोप्या जातात.
अमा तुमचा प्रतिसाद आवडला.
अमा ++++++
अमा ++++++
माझ्या मुलाला वाचनाची फार आवड होती. आम्ही त्याला दर वर्षी सुंदराबाई हॉलमध्ये Strand bookstall च्या प्रदर्शनात न्यायचो आणि हवी तेव्हढी पुस्तकं घेऊ द्यायचो.पहील्या वर्षी 5हजाराला फटका पडला म्हणून लगेच 500 रू चा RD सुरू केलेला. छान चित्रं असलेली, हार्डबाऊंड आणि जाड पानांची पुस्तकं असायची. ही पुस्तकं त्याचबरोबर वाचताना आणि फोनिक्स शिकवताना आम्हाला जे मिळालं ते अमूल्य आहे. हीच पुस्तकं पुढे माझ्या भाच्यांनी देखील वापरली आणि शेवटी आम्ही एका संस्थेला दिली.
या पिढीतील मुलांबरोबर ऑफ स्क्रीन वेळ जेवढा काढता येईल तेव्हढा काढा. वर्क फ्रॉम होमने ऑफिस आणि घर यातली सीमारेषा कितीही धूसर केली तरी फ्लेक्सिबिलिटी दिली आहे. दोघांनी आलटून पालटून मुलांचा अभ्यास घेणे, फिरायला नेणे, जेवणे या गोष्टी केल्या तर नक्कीच फायदा होईल.
स्वाती2, पीडीएफ उघडली नाही.
स्वाती2, पीडीएफ उघडली नाही.
युट्युबवर मुलाने आणि मी 2 विडीओ बघितले.
काही ईमेजेस बघितल्या. सुरूवात केलीय. करावीच लागणार आहे. नवनीतची फोनिक प्रायमर ची 2 पुस्तकं आणलीत.
मी वर्वकशीट्रस प्रिंटेबल्स घेते. तो मजेत सोडवतो. वर दिलेल्या साइटवर पण चांगल्या वर्कशीट्स आहेत.ते पण सुरु करेन.
त्याच्या कलाने घेत रोज थोडा वेळ वाचनासाठी द्यायचाच हे ठरवलंय.
धन्यवाद.
abc mouse.com
abc mouse.com
starfall
ixl
hooked on phonics
या काही चान्गल्या वेबसाइट आहेत ,मुलाना वाचनाची गोडी लागण्यासाठी आवडिची पुस्तक आणुन लहान असताना पासुन त्याच्याबरोबर वाचायची
काहिवेळेस तेच पुस्तक वाचाव लागत पण चालत ते
४ वर्श वयोगटातल्या मुला स ३ शब्दाच एक वाक्य असलेली ,मोठी प्रिन्ट अशी पुस्तक आणावी
यात स्टोरी लाइन छोटी असत्, रायमिन्ग असलेले शब्द असतात.
Byjus is the next Arindham
Byjus is the next Arindham Chowdhary ... just marketing nothing else
सस्मित,
सस्मित,
सॉरी तुम्हाला लिंक अॅक्सेस करायला अडचण येत आहे. कोडिंगमुळे नियम पक्के व्हायला मदत होते इतकेच मात्र त्या शिवायही शिकता येतेच. बरेचदा मुलांना लिहायचा कंटाळाही येतो. सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे सरावासाठी स्क्रॅबलच्या टाईल्स वापरायच्या.
उदा. ai diagraphचा सराव करताना टाईल्स वापरुन main तयार करायचे. m काढून तिथे r लावून rain, p लावून pain असे करत गेल्यास लक्षात रहायला मदत होते. काही वेळा diagraph मधील एक अक्षर हे सायलेंट असते. अशावेळी त्या अक्षराच्या टाईलवर हात ठेवून शब्दाचा उच्चार जसे की glue, blue, clue, true यात e वर हात किंवा kn , gn वाल्या शब्दात त्यातल्या फक्त n चा उच्चार होतो हे लक्षात रहावे म्हणून k/g वरती हात असे करत सराव करुन घ्यायचा. syllable division लक्षात येण्यासाठी टाईल्सच्या मधे टुथपिक ठेवायच्या.
https://www.youtube.com/channel/UC1HVo7ocxToHwWOwull5FHA या चॅनलवर चित्र आणि आवाज यातून स्टेप बाय स्टेप फोनिक्स छान शिकवले आहे.
लवकरच तुमचे लेकरु आनंदाने वाचायला लागो.
सस्मित,
सस्मित,
सॉरी तुम्हाला लिंक अॅक्सेस करायला अडचण येत आहे. कोडिंगमुळे नियम पक्के व्हायला मदत होते इतकेच मात्र त्या शिवायही शिकता येतेच. बरेचदा मुलांना लिहायचा कंटाळाही येतो. सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे सरावासाठी स्क्रॅबलच्या टाईल्स वापरायच्या.
उदा. ai diagraphचा सराव करताना टाईल्स वापरुन main तयार करायचे. m काढून तिथे r लावून rain, p लावून pain असे करत गेल्यास लक्षात रहायला मदत होते. काही वेळा diagraph मधील एक अक्षर हे सायलेंट असते. अशावेळी त्या अक्षराच्या टाईलवर हात ठेवून शब्दाचा उच्चार जसे की glue, blue, clue, true यात e वर हात किंवा kn , gn वाल्या शब्दात त्यातल्या फक्त n चा उच्चार होतो हे लक्षात रहावे म्हणून k/g वरती हात असे करत सराव करुन घ्यायचा. syllable division लक्षात येण्यासाठी टाईल्सच्या मधे टुथपिक ठेवायच्या.
https://www.youtube.com/channel/UC1HVo7ocxToHwWOwull5FHA या चॅनलवर चित्र आणि आवाज यातून स्टेप बाय स्टेप फोनिक्स छान शिकवले आहे.
लवकरच तुमचे लेकरु आनंदाने वाचायला लागो.>> ह्यचा वेगळा धागा करा ना. इथे बाइजू शी ह्याचा काही संबंध नाही.
ह्यचा वेगळा धागा करा ना. इथे
ह्यचा वेगळा धागा करा ना. इथे बाइजू शी ह्याचा काही संबंध नाही.
>>
अमा,
बाईजूशी नाही पण रिडिंग - वेदांतू (ऑनलाईन शिक्षण) याच्याशी आहे. सस्मित यांनी रिडिंगसाठी बाइजू पेक्षा थोडे वेगळ्या वेदांतूचा विचार करत आहेत असे लिहिले , त्या हा धागा वाचत आहेत म्हणून रिडिंगसाठी उपलब्ध असलेल्या फ्री रिसोर्सेस बाबत इथे माहिती दिली.
Pages