BYJU'S वा तत्सम ऑनलाईन शिक्षण कंपन्यांचा तुम्हाला अनुभव आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 August, 2021 - 22:27

BYJU'S वा तत्सम ऑनलाईन शिक्षण कंपन्यांचा तुम्हाला अनुभव आहे का?

मुलगा पावणेचार वर्षांचा आहे आणि मुलगी दुसरीत आहे. दोन मुलांचे तीन वर्षांचे मिळून एक लाख रुपये सांगितले आहेत. जे बारा महिन्यांच्या ईन्स्टॉलमेंटमध्ये भरायचे आहेत. ज्यात ते दोन्ही मुलांना पर्सनल टॅब देणार. त्यांच्या वर्कशीट असणार. ऑनलाईन तर असणारच, पण लिहायची प्रॅक्टीस व्हायला पेनने लिहायच्या वर्कशीट देखील देणार ज्यात पेनने वर्कशीटवर लिहिताच स्कॅन होत समोर स्क्रीनवर दिसणार. तसेच दिवसभरात सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत कधीही ऑनलाईन आलात तर तुम्हाला नेमून दिलेला शिक्षक तुम्हाला त्या वर्कशीट सोडवायला आणि समजून घ्यायला मदत करणार. तुम्ही मराठी आहात तर तुम्हाला मराठी बोलणारा शिक्षक मिळायची सोय आहे. मुले आईसीएसई वा सीबीएसई बोर्डला आहेत त्यानुसार त्यांचा अभ्यासक्रम फॉलो होणार. ऑलिम्पियाड वगैरे बाहेरच्या एक्झामचाही सिलॅबस त्यात कव्हर करणार वा त्यात मदत करणार. जे मुले स्क्रीनवर करताहेत ते सारे त्यांच्या नेमून दिलेल्या शिक्षकांनाही दिसणार, त्याचा वीकली रेकॉर्ड ते पालकांना देणार, पालकही मुले काय करत आहेत हे अ‍ॅपमार्फत बघू शकतात, मॉनिटरींग करू शकतात वगैरे वगैरे..

थोडक्यात ऑनलाईन ट्युशन घेतल्यासारखेच आहे हे. मी हिशोब लावला तर दोन्ही मुलांचे तीन वर्षे मिळून ३६ गुणिले २ = ७२ महिन्यांचे लाखभर रुपये म्हणजे १४०० रुपये दर डोई दर महिना झाले.

तुर्तास रजिस्ट्रेशन करून १५ मिनिटांचा ट्रायल पिरीअड घेतला आहे. तो घ्यावाच लागला कारण त्यांच्या सुंदर आणि स्मार्ट मॅडमने घरी येऊन चारपाच तास आमच्याशी गप्पा मारून, मुलीची चाचणी घेऊन, तिचे प्लसमायनस सांगून आम्हाला ईम्प्रेस केल्यानंतर नकाराचा पर्यायच माझ्याकडे शिल्लक राहिला नाही.

पण त्याहून महत्वाचे कारण म्हणजे मोठ्या मुलीपेक्षा छोट्या मुलाची चिंता जास्त आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्लेग्रूप नर्सरी वगैरे प्रत्यक्ष शाळा तर त्याच्या नशीबातच नव्हती आणि त्याचे ऑनलाईन क्लास असे कधी सुरूच झाले नाहीत. म्हणजे त्याच्या फी चे सुरुवातीचे ईन्स्टॉलमेंट भरले आहेत पण शाळा सुरू झाल्यापासून गेल्या चार महिन्यात तो फक्त दोनदाच क्लासला बसला आहे. ते सुद्धा काही लक्ष न देता, बसायचे म्हणून बसला. तयारच होत नाही स्क्रीनसमोर बसून शिकायला. बिल्डींगमध्येच ट्यूशन लावून पाहिले पण तिथेही तो थांबला नाही. आमच्याकडूनही काही शिकून घेत नाही. त्यामुळे शाळेचे पुढचे इन्स्टॉलमेंट न भरता, जोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही तोपर्यंत, आधीच्या ईन्स्टॉलमेंटचे जे पैसे गेले ते अक्कलखाती समजून, त्याची शाळाच बंद करावी या निष्कर्शापर्यंत मी आलो होतो. हे झाले पैश्यांचे, पण मुलाला काहीतरी शिकवायला हवेच ना. तर आता बायकोने हा पर्याय आणलाय.

१५ दिवसांच्या ट्रायल पिरीअडमध्ये बघूया आता ते BYJU'S वाले काय किती इम्प्रेस करताहेत. त्यावरून पुढे ठरवले जाईलच. पण ईथे कोणाला अश्या ऑनलाईन ट्युशन क्लासेसचा अनुभव असल्यास तो शेअर केल्यास माहितीचा फायदा सर्वांनाच.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद स्वाती2.
माझंच टाइम मॅनेजमेंट होत नव्हतं. आता करते.

मी माझ्या मुलासाथी बाय्जु घेतले आहे आणि मला आणि मुलाला काहीच तक्रार नाही. मला त्यांची पध्द्त आवडते. दुसर्य टिचरची गरज पडत नाही

फायनली एक प्रतिसाद बायजूच्या बाजूने Happy

अमि आपण आपले अनुभव शेअर करू शकाल का? आय मीन शिकवण्याच्या पद्धतीबद्दल ..

चांगला धागा आणि प्रतिसाद
मुलगा सातवी ला गेल्यावर विचार केलेला
पण मुलगाच नको म्हणाला
इथले वाचून बरे झाले त्याला फोर्स नाही केला ते

BYJU'S वा तत्सम ऑनलाईन शिक्षण कंपन्यांचा तुम्हाला अनुभव आहे का?
हो आहे ना ! माझ्या घरी जेव्हा हे लोक आले तेव्हा त्यांना मी तोंडावर सांगीतले की तुम्ही माझा पैसा घेणार आणी तो शारुक खान ला देणार, तिकडे आयपीएल प्रायोजित करणार आणि त्यांची पोटे भरण्यासाठी आमच्या कडून पैसे उकळणार. त्यापेक्षा हे महागडे धंदे बंद करुन मुलांना डिस्काऊंट द्या. तर तोंड वाकडे करुन निघून गेल्या बाई. परत काय फोन मेसेज नाही. बहुतेक माझा नंबर ब्लॉक केला असनार.

दुसऱ्यांच्या मुलांना BYJU'S ची शिकवणी लावण्यात व्यस्त असल्यामुळे माझ्या मुलाकडे दुर्लक्ष झाले. - SRK

यावर मी वेगळा धागा काढतो हवे तर. ईथे या पोस्टने वेगळे वळण नको.
तरी धागा वर आणलेबद्दल धन्यवाद. मला आमच्या बायजू प्रकरणाचे लेटेस्ट अपडेट द्यायचे होतेच Happy

बायजूतर्फे दोन मुलांची दोन मोठाली पुडके घरी आली. प्रत्येक पुडक्यात त्यांचा स्पेशल टॅब, बूक्स, स्टडी मटेरीअल, गेम्स वगैरे बराच मालमसाला भरलेला.
मी हे सगळे रिटर्न करायच्या विचारात होतो. पण मुलांनी पुडके फोडून विल्हेवाटही लावली. मी कसेबसे टॅब वाचवले.
पुढे हळूहळू मी बायकोला पटवून देण्यात यशस्वी ठरलो की हे आपल्या कामाचे नाही. तिलाही पटले कारण समोरून कोण शिकवणारे नव्हते, जवळपास सेल्फ स्टडीसारखे होते आणि फक्त मूल्यमापन करणारे मेंटर होते.
कॅन्सल करायला फोन केला तेव्हा त्यांना हेच कारण सांगितले. समोरून म्हणाले की तुम्हाला आधी याची कल्पना दिली नव्हती का? आम्ही म्हटले, मिसकम्युनिकेशन झाले असावे, वा आमचे समजून घेण्यात चुकले असावे, पण आम्हाला हे कामाचे नाही.
अर्थात मुलीची फार ईच्च्छा होती ते कंटिन्यू करायची, पण लहान पोरासाठी खरेच कामाचे नव्हते.
कॅन्सल करण्याआधी त्यांनी मुलांशी आम्हाला बोलायचे आहे असे सांगितले. मग मुलीला पटवून द्यायला लागले की बाबा त्यांना सांग मला ईंटरेस्ट नाही. तिने तसे सांगितले. वर जास्तीची दोन वाक्येही सांगितली की आमची शाळाच मस्त शिकवते आणि मला स्पोर्ट्समध्ये ईंटरेस्ट आहे वगैरे. मग केले त्यांनी कॅन्सल.
पण एक बांबू मात्र लागलाय. २० हजार अ‍ॅडवान्स परत करत नाहीयेत आणि म्हणताहेत टॅब ठेवा दोन्ही + जे ईतर स्टडी मटेरीअल बूक्स वगैरे पाठवलेत ते ठेवा तुमच्याकडेच. आम्ही नाही म्हटलेय. ते ही ऐकत नाहीयेत. बघूया आता काय होतेय.

हम्म
पाठवलेल्या मटेरियल ची किंमत 20000 होत असेल तर राहुद्या.त्यांना आठवण करून ऍडव्हान्स मिळवणे बरेच कटकटीचे जाईल.

वीस हजाराच्या आसपास माल असूही शकेल. कारण एकूणात जे आलेले त्याची क्वालिटी छान वाटली. पण बरेचदा ती क्वालिटी गरजेचीही नसते म्हणा. असो, तरी वीस गेले पण पुढचे ऐंशी वाचले असे समजून मी खुश आहे. टॅब आता बघायला हवेत खरेच किती कामाचे आहेत. सोबत स्टँड आणि स्कॅनर वगैरेही काहीतरी आहे. पेपरवर लिहिलेले स्क्रीनवर दिसते म्हणे. वापरून पाहिले नाही अजून ते टॅब प्रकरण. आल्याआल्या कपाटात टाकलेले. नंतर काढून चेक करतो. झाल्यास ईथे फोटोही टाकतो.

टॅब व स्टडी मटेरिअल ठेवुन द्या थोडी मोठी झाल्यावर नक्की वापरतात येइल. इतर नेट सर्फिन्ग करता येत असेल तर बारकी गेम खेळतील पुढे. अर्थात तुमच्या रूल्स नुसार.

हो, टॅब तसा फुकट जाणार नाही. मुलीकडे आहे तसाही स्वतःचा ऑनलाईन क्लाससाठी घेतलेला. मुलगा ऑनलाईन क्लासला बसतच नाही म्हणून गरजच पडली नाही पर्सनल टॅबची. पण टाईमपासला आज्जीचा मोबाईला घेऊन असतोच. ते आता स्वतःचा वापरू शकतो.

फक्त मोठ्या अपत्यासाठीच विचार करतोय असे स्पष्ट सांगायला हवे होते, धाग्याचा, ईथल्या माहितीचा उपयोग नाही केलात तुम्ही..
असो..प्रकरण २० हजारा वर शेकलं असं समजा.

BYJU's हे अपत्यांची व्यसनमुक्ती किंवा संस्कारवर्गाचे ऍप आहे का? असेल तर ठीक. नसेल तर शाहरुखचा प्रौढ मुलगा ड्रग कडे वळला याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

शाहरूख हा केवळ जाहीरातीचा हिस्सा आहे. जाहीरातीचा हेतू प्रॉडक्ट सर्वदूर पोहोचवणे हा असतो. त्यासाठी त्यात लोकप्रिय चेहरा घेतात. त्यामुळे मुळातच प्रॉडक्टची आणि जाहीरातीत काम करणार्‍या व्यक्तीची सांगड घालू नका. आणि शाहरूखला या धाग्यावर आणूही नका.

@ आशू,
धाग्याचा, ईथल्या माहितीचा उपयोग नाही केलात तुम्ही..
>>>>>>
धागा काढला तेव्हा आधीच २० हजार भरून मोकळा झालो होतो Happy

सौंदर्य म्हणजे काय या सौंदर्यतज्ञ सर्वज्ञ ऋन्मेष यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आवडेलच.

आपण काही त्यांच्या इतके हुषार नाहीत. पण जे जे भुरळ घालते ते खरे सौंदर्य असे मला वाटते. राखीला मी नेहमी प्रौढ, स्थूल अभिनेत्री म्हणून बघत आलेलो. पण जेव्हां शर्मिली हा तिच्या तरूणपणातला चित्रपट माझ्या कोवळ्या वयात पाहिला तेव्हां निळ्या डोळ्यांच्या राखीच्या प्रेमातच पडलो.

हेमामालिनी ही खरीखुरी सौंदर्यवती. पण अ‍ॅक्टींग बोंब. तिच्या सौंदर्यावर कितीही लुब्ध व्हायचे म्हटले तरी कण्हत म्हटलेले संवाद ऐकायला पण पेशन्स लागतातच. गुलजारच्या काही चित्रपटात मात्र हेमामालिनी जितकी सुंदर दिसली त्याच्या इतकाच सुसह्य अभिनय पण आहे तिचा.

सारिका ही एके काळी आघाडीच्या नायिकांमधे समावेश होऊ शकणारी अभिनेत्री. घार्‍या / निळ्या डोळ्यांची. तितकीच मादक. हेमामालिनी, राखी या सभ्य वाटणार्‍या. थोडक्यात देवी या आपल्या आवडत्या प्रतिमेत फिट्ट बसणार्‍या. सारीका असल्या भानगडीत अडकली नाही. विधाता मधे तिने बोल्ड भूमिकाही केली. गीत गाता चल मधे पारंपरिक मुलीचीही केली. तिची खरी कहाणी ही एखाद्या सिनेमाची कहाणी होऊ शकते.

सायरा बानूला आपण कसे विसरू शकतो ?
इग्लंडहून दिलीपकुमारच्या प्रेमात असल्याने हिंदी चित्रपटात काम करायला ती आली. आजच्या नायिकांमधे निमुळत्या, लहान चेहर्‍याचे प्रस्थ आहे. पूर्वीच्या मोठ्या चेहर्‍याच्या नायिकांमधे सायरा बानू वेगळी उठून दिसायची.

वहिदा रेहमान - खानदानी / नबाबी सौंदर्य. कृष्णधवल फ्रेममधले तिचे फोटो आजही आकर्षित करतात. कागज के फूल मधले वक्त ने किया या गाण्यातले छायाप्रकाशाचे खेळ आणि वहिदाचे त्यात खुललेले सौंदर्य पाहताना हरवून जायला होते. भंवरा बडा नादान है असो किंवा गाईड मधले कांटो से खींच के मै आंचल म्हणत रंगवलेली बंडखोर नायिका असो. वहिदा ऑलराउंडर अभिनेत्री होती. पण तिचे नाव सौंदर्यवर्तीच्या चर्चेत अग्रक्रमाने लक्षात येत नाही कधी.

मधुबाला - आजही मधुबालाची क्रेझ आहे. आजही रस्त्याच्या कडेला तिचे पोस्टर्स विकायला ठेवले जातात. एखाद्या देवीचे चित्र विकले जावे तसे आता मधुबाला म्हणजे सौंदर्याची देवी असल्याप्रमाणे झाले आहे. ती काही वर्षांनी दंतकथा वाटू लागेल असे वलय तिच्या भोवती जाणवते.

माधुरी दीक्षित स- सुरूवातीला मधुबालाची तिने आठवण करून दिली. तिच्यातला फ्रेशनेस, उस्फूर्तता, नृत्यनिपुणता यामुळे पहिली काही वर्षे माधुरी दीक्षित नक्कीच नंबर वन अभिनेत्री होती. रेखानंतर त्या पद्धतीची कामे करू शकणारी अभिनेत्री. अनिल कपूरबरोबर जास्त सिनेमे केल्याने तिच्यावर शिक्काही बसला. तसेच अनिल कपूरचे नायकप्रधान सिनेमे असल्याने वाव कमी होता. पण रेखाप्रमाणेच तिच्यामुळे तारून गेलेले सिनेमे सुद्धा आहेत. सैलाब हा सिनेम माधुरीच्या एका गाण्यामुळेच तर लक्षात आहे.

ऐश्वर्या - ऐश्वर्या विश्वसुंदरी या पदाला न्याय देते. तिच्या डोळ्यातले व्याकुळ भाव ठाव घेतात. जोश सारख्या सिनेमात ती अभिनयात कमी पडली. पण ती असलेली प्रत्येक फ्रेम देखणी झालेली आहे. ताल मधे तिने तिच्यातली क्षमता दाखवून दिली. पण दुर्दैवाने तिची करीअर पडद्यामागच्या घडामोडींमुळे लवकर संपत आली. आजही ती सौंदर्यवतींच्या रांगेत आहे.

सोनाली बेंद्रे - बंद्योपाध्याय नावाचे एक संशोधन क्षेत्रातले व्यक्ती तिचा उल्लेख सेक्सी बेब असा करायचे. बंद्योपध्याय यांच्याबद्दल आदर होता. त्यांच्यासारख्या वयस्कर व्यक्तीलाही ती सेक्स अपील वाटू शकायची त्याच वेळी माझ्यासारख्यांना सौंदर्याने घायाळ करायची. तिने अ‍ॅक्टींग केली कि न केली याकडे लक्ष जायचं नाही. अ त्यंत ग्लॅमरस बाहुली असेच तिचे वर्णन करावे लागेल.

बर्‍याच सौंदर्यवती अन्जिनेत्र्या राहून गेल्या आहेत. त्यावर पण आपण बोलूच.
त्यानंतर शाहरूख खान बद्दल बरं वाईट बोलू.

टीप - बायजूच्या जाहीरातीत यातले बरेच तारे / तारका असतात त्यामुळे विषयाला धरून आहे.

पुर्ण बातनी वाचली नाही. पण मथळा कळला. आर्थिकदृष्ट्या. परवडत नसणारे पालक जर या बायजूच्या नादाला फसले अस्स्तील तर खरेच वाईट झाले.
आम्हालाही थोडा चुना लागला. तरी नंतर मी फर्म स्टॅंड घेतल्याने बरेपैकी वाचलो.

मी बाय्जू वापरते.......म्हणाजे मुलासाठी घेतले आहे. त्याचा कंटेंट खुपच चांगला आहे. मला आजपर्यंत कोणी त्रास दिलेल नाही. मला या बातमीत तथ्या वाटत नाही.

मुले काय अभ्यास करतात बाय्जु अ‍ॅप वर ते ट्रॅक करतात. त्याचा रीपोर्ट पाठवतात. टिचर फोन करतात. याला त्रास देणॅ म्हणू शकत नाहि

Pages