अफगाणिस्तान - एक शोकांतिका ( भाग ०२ )

Submitted by Theurbannomad on 16 August, 2021 - 20:16

भाग ०१ - https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...

अफगाणिस्तान.
भारताच्या नैऋत्येला पाकिस्तानच्या पुढे स्थित एक देश. चहूबाजूंनी जमिनीने वेढलेला. सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाकिस्तान, चीन, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान,ताजिकीस्तान आणि इराण या देशांना अफगाणिस्तानची सीमा लागून आहे. भारताच्या पाकव्याप्त काश्मिरची सीमाही अफगाणिस्तानला लागून आहे आणि त्या अर्थाने हा देश आपलाही शेजारी आहे.

या देशाचा इतिहास अतिशय समृद्ध. इथे सापडलेल्या अवशेषांच्या कार्बन डेटिंगवरून या भागात पालिओलिथिक काळात मनुष्यवस्ती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. हा काळ थेट अश्मयुगीन, म्हणजे तीन लाख ते तीस हजार वर्षं जुना. इथे इतकी जुनी मनुष्यवस्ती होतीच, पण या प्रांताचा पुढे भारताशीही घनिष्ठ संबंध आलेला होता. महाभारताच्या काळात या प्रांताचा - ज्याला गांधार म्हणून ओळखलं जाई - व्यापार भारतात तेव्हा अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या साम्राज्यांशी होत असे. त्यातल्या बलशाली साम्राज्याशी - हस्तीनापुराशी - रोटीबेटी संबंध जुळेपर्यंत तत्कालीन गांधार राज्याची मजल पोचलेली होती. धृतराष्ट्र पत्नी गांधारी ही याच देशाची राजकन्या. भीष्माने तिच्या पित्याशी - सुबल राजाशी - उभा दावा मांडून आपल्या सामर्थ्याने कुरु वंशीय राजपुत्र धृतराष्ट्र याचा विवाह गांधारी हिच्याशी लावून दिला होता. असं म्हणतात, की तिचे भाऊ तुरुंगात डांबले गेले तेव्हा त्यांना अन्नपाणी न देता भीष्माने त्यांना मृत्यूच्या वाटेवर सोडून दिलं होतं, पण त्यांनी आपल्या एका भावाला - शकुनी याला आपल्या या अपमानाचा बदला घेण्याची शपथ देऊन त्याला भीष्माशी तोंडदेखला सलोखा करायचा सल्ला दिला होता. पुढे कुरु वंशाचा पूर्ण विनाश होण्यामागे शकुनीचा मोठा वाटा होता.

अफगाणिस्तानमध्ये अनेक साम्राज्य जन्माला आली आणि लयास गेली. आजच्या माहितीनुसार या भागात राहणाऱ्या टोळ्यांना नेस्तनाबूत करून सुसूत्र असं पहिलं साम्राज्य इथे ग्रीक लोकांनी आणलं. ग्रीको - बाक्त्रियन म्हणून ओळखलं जाणारं हे साम्राज्य हेलेनिस्टिक काळात प्रस्थापित झालेलं. हा काळ अलेक्झांडर द ग्रेट याच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्य स्थापन होईपर्यंतचा, म्हणजे ३२३ बीसी ते ३१ बीसी हा. पहिला दिओदोतस हा ग्रीक बक्त्रिया प्रांताचा राजा. हा बाक्त्रिया प्रांत म्हणजेच आजच्या हिंदुकुश पर्वतरांगांच्या आसपासचा म्हणजेच आजचा अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान देशांचा प्रदेश. दिओदोतस याने ज्या राजाचा पराभव केला, तो होता अर्सासेस. हा तत्कालीन इराणच्या पर्थियन साम्राज्याचा सर्वेसर्वा होता. हिंदुकुश भागातल्या याच्या वर्चस्वाला चाप लावून दिओदोतस याने इथे ग्रीक वर्चस्व निर्माण केलं.

अलेक्झांडर याने स्थापन केलेल्या प्रचंड मॅसिडोनियन साम्राज्याचा एके काळच्या भाग असलेलं सेल्युसिड उपसम्राज्य पुढे वेगळं झालं ते सेलेऊकस पहिला याच्या नेतृत्वाखाली. ३२१ बीसी या काळात मेसोपोटेमिया ( आजचा इराक ) भागातून त्याने आपला वारू उधळला थेट पश्चिमेला आणि आजच्या इराण, इराक, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विस्तीर्ण भागावर आपला अंमल बसवला. अर्सासेस याने याच सेल्युसिड साम्राज्यातून आपली वेगळी चूल मांडली होती, आणि पुढे दिओदोतस याने त्याचा पराभव करून पुन्हा तिथे ग्रीक वर्चस्व आणल होतं.

पुढे ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकाच्या काळात इथे इंडो - स्कायथियन साम्राज्याचा उदय झाला. मोगा नावाच्या शूर योध्याने साका वंशाच्या लोकांना हाताशी धरून गांधार प्रांतापासून ते इंडस खोऱ्यापर्यंत आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यांना पुढे कुशाण साम्राज्याने नेस्तनाबूत केलं आणि बराच काळ अफगाणिस्तानच्या भागात त्यांचं वर्चस्व राहिलं. या काळात वेदिक धर्माचा खोलवर प्रभाव पडून अफगाणिस्तानमध्ये वेदिक चालीरीती आचरणात आल्या होत्या.

पुढे चौथ्या आणि पाचव्या शतकात हूण सम्राटांनी या भागात हातपाय पसरले. तक्षशिला स्थापन करणारे हे लोक अल्ताई डोंगरांच्या भागातले शूर योद्धे होते. त्यांच्यात युरोप, मोंगोल आणि इराणी संस्कृती आणि शारीरिक रचनांचा संगम झालेला होता. त्यांच्या काळातल्या नाण्यांवर त्यांच्या प्रतिमा साफ दाढी कोरलेल्या, गोल चेहऱ्याच्या आणि मोठ्या डोळ्यांच्या अशा आहेत. त्यांच्यानंतर ' गोरे हूण ' म्हणून ओळखले जाणारे मध्या आशियाई ' हेफथलाईट ' इथे अवतरले आणि राज्य करू लागले. त्यांच्यातल्या अल्कोन, नेझाक या उपपंथियांनी आळीपाळीने अफगाणिस्तानच्या भागावर राज्य केलं...पण पुढे सहाव्या शतकाच्या शेवटी इथे थेट तुर्कीक झुनबिल लोक आले.

ऋतबिल नावाच्या शूर योद्ध्याने ' तुर्कीक खागानेत ' साम्राज्यातून आपली चूल मांडली अफगाणिस्तानच्या भागात. हे साम्राज्य मोंगोल भागातल्या अशीना टोळ्यांच्या लोकांनी स्थापन केलेलं. मध्य आशिया भागात तुर्किक भाषा बोलणाऱ्या अनेक टोळ्या होत्या, त्यातली ही एक बलाढ्य टोळी. ऋतबिल याने आत्ताच्या कबूल ते कंदहार भागात आपलं झुनबिल राज्य स्थापन केलं ' झबुलिस्तान ' या नावाने. त्याने स्वतःला ' खोरासान तेगिन शाह ' हे बिरूद चिकटवून घेतलं. गझनी हे आजच्या अफगाणिस्तानच्या मध्य भागातलं शहर ही त्याची राजधानी.

या काळापर्यंत अफगाणिस्तानात इस्लाम धर्म विशेष प्रस्थापित झालेला नव्हता. इथे बऱ्या प्रमाणात वेगवेगळे धर्म आणि पंथ एकत्र नांदत होते. या भागात शांतता अशी नव्हती, पण त्याचं कारण होतं वेगवेगळ्या साम्राज्याच्या आपापसात चाललेल्या लढाया. अफगाणिस्तानचा भाग नेमका भारत, अरबस्तान, चीन आणि इराण यांच्या मधोमध असल्यामुळे हा भाग या प्रांतांच्या महसत्तांची रणभूमी झालेला होता. सिल्क रूट या नावाने प्रसिद्ध असलेला व्यापारी मार्ग अफगाणिस्तानमधून जात असल्यामुळे या व्यापार मार्गावर वर्चस्व प्रस्थापित करणं प्रत्येकाला आवश्यक वाटत होतं....पण आठव्या शतकात या भागात ' हिंदूशाही ' अवतरली आणि या भागात पुढे बरेच धार्मिक बदल घडले.

झालं असं, की खलिफा अल मामून याच्या नेतृत्वाखाली अब्बासिद आठव्या शतकाच्या सुरुवातीला इथे आले आणि त्यांनी तुर्कशाही संपवली. तुर्कीक शाह अब्बासीदांचे मांडलिक झाले आणि त्यांना बळजबरीने इस्लाम स्विकारावा लागला. सन ८२१ या वर्षी काबूल शाह लगतूर्मान याला त्याच्याच एका मंत्र्याने - कल्लार याने पदच्युत केलं आणि सत्ता बळकावली. त्याच्या या काबूलशाहीला अरब ' हिंदूशाही ' म्हणून संबोधू लागले.

पुढे याचेही सुन्नी पर्शियन लोकांशी खटके उडायला लागल्यावर त्याने आपल्या हिंदूशाहीचे केंद्र काबूलहून थेट उदभांदपुरा ( सध्याच्या पेशावर शहराच्या पूर्वेला ८० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे ) येथे नेलं. या काळात भारताच्या हिंदू संस्कृतीचा प्रभाव पडून या भागात हिंदू धर्माचा प्रसार व्हायला लागलेला होता. तेव्हाच्या इराणी संशोधकाने - अल बिरूनी याने - या भागात ब्राह्मण विपुल संख्येने होते आणि इथे वेदिक विचारांचा खोलवर प्रसार झालेला होता असं नमूद करून ठेवलं आहे. काबूल, मझार - ए - शरीफ, पेशावर, इस्लामाबाद, तक्षशीला या आजच्या भागात तेव्हा हिंदू संस्कृती ही अशी रुजलेली होती.

पुढे लाविक, सफारीड, समानिड अशा सुन्नी ईराणी साम्राज्यान्नी अफगाणिस्तान आळीपाळीने आपल्या अंमलाखाली आणला, पण या सगळ्यांवर वरचढ ठरले दूर पूर्वेकडून आलेले मामलुक तुर्की. एके काळचे गुलाम असलेले हे मामलुक अतिशय लढाऊ आणि शूर. अबू मन्सूर नासीर अल् दिन सबुक्तिगिन हा तुर्की मामलुक ' गझनवी ' साम्राज्याचा पहिला सम्राट. याचाच मुलगा म्हणजे ' गझनीचा महमूद ' म्हणून प्रसिद्ध असलेला महमूद गझनवी, ज्याने आपल्या तुर्की गझनवी साम्राज्याचे एका प्रबळ आणि विस्तीर्ण साम्राज्यात रूपांतर केलं. गुजराथच्या सोमनाथ मंदिराचा विध्वंस करणारा आणि उत्तर भारतावर सतत स्वाऱ्या करून अपरिमित रक्तपात करणारा हा महमूद भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा खलनायक ठरतो. याने आत्ताच्या लाहोर शहरात आपली राजधानी थाटली होती.

११८६ साल उजाडलं ते या गझनवी साम्राज्याच्या मुळावर आलं. मोहम्मद घोरी या गझनीचा महमूद संत वाटावा अशा क्रूर स्वभावाच्या सम्राटाने आपल्या घोर साम्राज्याला गझनवी साम्राज्य जोडून घेतलं. आजच्या पश्तून लोकांमध्ये तेव्हा बुद्धिस्ट विचारांचा प्रचंड प्रभाव होता.( पाचव्या शतकात गांधार साम्राज्याच्या काळात मध्य अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतात ' बामियान बुद्ध ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाप्रचंड बुद्धाच्या मूर्त्या अखंड डोंगराच्या उभ्या भागावर कोरून तयार केलेल्या होत्या.... बौद्ध धर्म तेव्हापासूनच इथे रुजलेला होता ) घोरी साम्राज्य सुरुवातीला बौद्ध विचार मानणारं, पण गझनीच्या महमूदने १०११ साली घोरी साम्राज्यावर आक्रमण करून त्यांना सुन्नी मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला.....इतिहासाने पुढे जरी गझनवी साम्राज्याचा अंत याच घोरी साम्राज्याकडून करवून आणला असला तरी घोरी पुढे सुन्नी इस्लामधर्मीयच राहिले.

पुढे अनुष्टेगिन घरचाई नावाचा सेलजुक तुर्की सम्राटांच्या पदरी नोकरीला असलेला आणि त्यांच्यासाठी आजच्या इराणमधल्या अमु दर्या नदीच्या भागावर देखरेख करणारा मामलुक गुलाम आपल्या मालकांपासून वेगळा झाला. त्याच्या वंशजांनी बाराव्या शतकात मध्या आशियात ' अनुष्टेगिन साम्राज्य ' प्रस्थापित केलं...पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्यावर चालून आले मंगोल. आग्यावेताळ बरा वाटावा अशी ख्याती असलेला गेंघिस खान आपल्या क्रूर मंगोल सैन्यासह मध्य आशियात आला तो प्रस्थापित साम्राज्याची धूळधाण उडवून स्थिरावला. त्याचा नातू हुलागू खान यानेही आपल्या आजोबांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या काळात मध्या आशिया, इराण ते थेट कॅस्पियन समुद्राचा पूर्वेकडच्या भाग अशा सगळ्या भागावर मोंगोल साम्राज्य प्रस्थापित झालं. याच काळात इथे इस्लाम घट्ट पाय रोवून प्रस्थापित झाला.

साल १२९०.
या वर्षी खिलजी साम्राज्याने अफगाणिस्तान ते भारत अशा सगळ्या भागावर आपला अंमल आणला आणि थेट दिल्लीला आपली गादी स्थापन केली. जलाल उद् दिन फिरुझ खिलजी हा या साम्राज्याचा संस्थापक. त्याचा वारसदार होता अल्लाउद्दीन खिलजी. अर्थात त्याने हा वारसा मिळवलेला होता बंड करून. भिलसा, अवध, देवगिरी अशा अनेक समृद्ध आणि संपन्न प्रांतांवर वरवंटा फिरवून या अल्लाउद्दिनने या भागात अपरिमित रक्तपात केला. या भागातून लुटलेल्या संपत्तीच्या जोरावर त्याने महत्त्वाच्या लोकांना आपल्या बाजूला वळवून घातपाताने जलालुद्दिनचा काटा काढला आणि खिलजी साम्राज्याचा तो अनभिषिक्त सम्राट झाला. पद्मावतीच्या गोष्टीतला अल्लाउद्दीन खिलजी हाच.

या खिलजी साम्राज्याला अफगाणिस्तानात शह दिला मूळच्या अफगाणी असलेल्या बहलोल खान लोदी याने. हा सरहिंद प्रांताचा प्रमुख मलिक सुलतान शाह लोदी याचा जावई. त्याने दिल्लीच्या गादीवरही आपला हक्क प्रस्थापित केला आणि खिलजी साम्राज्याचा भूभाग आपल्या अंमलाखाली आणला. त्याचे पुढचे वंशज सिकंदर लोदी आणि इब्राहिम लोदी यांनी लोदी साम्राज्य सांभाळलं, पण इब्राहिम लोदी याचा पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने पराभव करून सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोदी साम्राज्याचा अस्त घडवून आणला.

बाबराने मुघल साम्राज्याचा विस्तार उत्तर भारतापासून थेट पूर्वेकडे बिहार भागापर्यंत केला. वायव्येकडे अफगाणिस्तानात त्याने शेरशाह सुरी या शूर अफगाणी सेनापतीला आपल्या साम्राज्याचा त्या भागातला प्रशासक म्हणून नेमला. या सुरी घराण्याच्या पुढच्या कुलदीपकांनी पुढे मुघलांशी गद्दारी करून वेगळी चूल मांडली, पण १५५६ साली मुघलांनी त्यांचा निर्णायक पराभव केला. मुघलांनी त्यानंतर अफगाणिस्तानवर आपलं राज्य आणलं.

पुढे अफगाणिस्तानच्याच होटाक जमातीच्या मिरवैज होटाक याने सतराव्या शतकात अफगाणिस्तानात आपल्या कबील्याची सत्ता आणली. हे होटाक लोक अतिशय शूर आणि टणक होते. मुल्ला ओमर या कुप्रसिद्ध दहशतवादी तालिबानी नेत्याची जमात होटाक हीच आहे. पुढे १७२२ साली अहमद शाह दुर्राणी याने दुर्राणी साम्राज्याची स्थापना करून अफगाणिस्तानची धुरा आपल्या हाती घेतली. आज जे अफगाणिस्तान आपल्याला माहीत आहे, त्याची स्थापना करणारा हाच तो अहमद शाह दुर्राणी. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा साम्राज्याला भिडलेला अहमद शाह अब्दाली हाच. याने अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतल्यावर आपल्या मूळच्या अब्दाली नावाऐवजी ' दुर्राणी ' हे नाव लावायला सुरुवात केली. ( दुर - ई - दुर्रान म्हणजे मोत्यांच्या राशीतला सर्वश्रेष्ठ मोती...स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणवण्याचा हेतूने त्याने हे विशेषण चिकटवून घेतलं होतं.) खरं तर हा होटाक राज्याच्या तुरुंगातच सडत पडला असता, कारण त्याच्या तीर्थरूपांची बंडखोर लक्षणं बघून त्यांना या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या मुलासह तुरुंगात डांबलं गेलं होतं...पण इराणच्या नादर शाहने होटाक राज्यावर चाल करून त्यांना पराभूत केलं आणि अहमद शाहला मुक्तता मिळाली.

याचा १७७२ साली मृत्यू झाल्यावर त्याच्या मुलाने - तीमुर शाह याने सत्ता सांभाळली. त्यानेच कंदहार येथून आपली राजधानी काबूल येथे आणली आणि पेशावर ही हिवाळी राजधानी म्हणून घोषित केली. त्याची मुलं पुढे दोन दशकं अफगाणिस्तानवर राज्य करत होती.

आधुनिक काळातल्या अफगाणिस्तानच्या इतिहासावर नजर टाकू, पण ते पुढच्या भागात. तोवर अलविदा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<आयुष्यात एकदा अंदमानला जा, त्या कोठडीत एक तास काढा आणि मग आधीची मतं बाजूला ठेवून सावरकर वाचा. त्यानंतर आपण वस्तुनिष्ठ पद्धतीने बोलू.>

हे वाक्य वस्तुनिष्ठतेचा उत्तम दाखला म्हणून देता येईल.

ऐकीव माहितीच्या आधारे मत बनवणारा अन ते इथं ठसवून सांगणारा धागा लेखक प्रश्नकर्त्यांच्या दुबईला येण्या-जाण्याचा खर्च कर्णार हे ऐकून गुदुगुदु झालं.

Theurbannomad, झापडबंदांच्या कमेंटस कडे दुर्लक्ष करुन पुढे माहिती द्या या माथेफिरुंविषयी. काल टिव्हीवर पाहीले, माकडे सुद्धा लाजतील असा गोंधळ घालत होते.

राज यांनी सांगीतलेले करा. पाहीजे तर वेगळा धागा काढा त्या स्वातंत्र्यासाठी देह ठेऊन अजरामर झालेल्या लोकांसाठी. ही मालिका अफगणिस्तान साठी ठेवा.

<< @ filmy
बाष्कळ विधान ?
मला वाटतं, तुम्ही थोडे कष्ट घेऊन इतिहास ' वाचा ' आणि ' समजून घ्या ' . आपल्याकडे काँग्रेस आणि डावे पक्ष यांनी आजवर इतिहासाचे असंख्य दाखले सोयीस्करपणे गढूळ करून लोकांना खरा इतिहास म्हणून सांगितलेले आहेत, पण आज ते शक्य नाहीये. आज माहिती दडवून ठेवता येत नाही आणि म्हणूनच सत्य समजून घेता येतं. >>

------ बरोबर आहे, आज माहिती दडवून ठेवता येत नाही. अंदमानात पाय ठेवल्यावर केवळ दोन महिन्यात पहिला माफीनामा लिहीणारे सावरकर....
अंदमान येथिल कार्यकाळात पुढे ७ का ९ माफीनामे सावरकरांनी लिहीले...
शेवटचा आणि यशस्वी ठरलेला माफीनामा तर अलंकारांनी भरलेला आहे.
काँग्रेसने हे सर्व लपविले होते.

<< नेहरू, गांधी, सावरकर, बोस, भगत सिंघ, सरदार पटेल हे सगळे स्वातंत्र्यासाठी लढले आहेत. प्रत्येकाचे विचार आहेत आणि प्रत्येक जण वेळोवेळी व्यक्त झाला आहे....पण आपल्याकडे या सगळ्यांचं ' दैविकरण ' होतं आणि इतिहास डागाळून जातो. काही नेत्यांच्या विरोधात विचार मांडले तर ते थेट देशद्रोह समजले जातात...आणि खरोखर देशघातकी चुका करणारे केवळ लोकांच्या अंध भक्तीमुळे तरून जातात.
नाव घेऊन स्पष्ट बोलतो -
गांधीजी अस्पृश्यांसाठी काम करायचे, त्यांनी त्या लोकांना हरिजन म्हणून आपल्या आश्रमात जागा दिली, म्हणून ते महान ठरत असतील तर पतीत पावन मंदिरात दलित माणूस बरोबर घेऊन शेकडो सवर्ण लोकांमधून थेट मंदिरात प्रवेश करणारे सावरकर कोण? पाकिस्तान जर मुस्लिम राष्ट्र म्हणून जन्माला घालायची जिन्ना यांची आगळीक काँग्रेस मान्य करत असेल तर उर्वरित भारत फक्त हिंदू राष्ट्र का ओळखलं न जावं या सावरकरांच्या सडेतोड प्रश्नाला कोणत्या नेत्याने आजवर उत्तर दिलंय? उत्तर नाही म्हणून सावरकर हिंदू जातीयवादी आणि फाळणीचा खेळखंडोबा होऊ देऊनही नेहरू - गांधी उदारमतवादी सेक्युलर ?
प्रत्येक नेता महान आहेच, त्यांचा देशासाठीचा त्याग मोठा आहेच पण जिथे ते चुकले आहेत तिथे त्यांना दोष द्यायची बुद्धी शाबूत असायला हवी, आणि त्याला तुम्ही बाष्कळ म्हणाल तर ठीक आहे, मी आहे बाष्कळ. कमीत कमी माझी बुद्धी स्वतंत्र आणि डोळस तरी आहे ! >>

------ महात्मा गांधी आणि आंबेडकर या दोन महान व्यक्तींनी लोकांना सोबत घेतले, विशेषत: तळागाळातल्या लोकांना.

सावरकरांनी मंदिर पतित पावन मंदिर " स्थापन " केले..... पण अस्तित्वात आहे त्या मंदिरांत प्रवेश मिळवून देण्यासाठी किती प्रयत्न केलेत ? "सर्वांना सोबत नेणे आणि त्यांच्यासाठी " वेगळे मंदिर " स्थापन करणे यांत फार मोठा फरक आहे.

धार्मिक आधारावर देशाची फाळणी झाली असे पाक आणि भारतातले त्यांचे समविचारी तालीबानी मानतात. पाकने स्वत: ला मुस्लीम राष्ट्र म्हटले , याचा अर्थ भारताने हिंदू राष्ट्र बनायला हवे असे होत नाही. "धार्मिक आधारावर " जमिन विभागली आहे हेच भारताला मान्य नव्हते / नाही. आणि म्हणून काश्मीर सारखे मुस्लीम बहुल राज्य हे धर्मनिरपेक्ष भारताचा अविभाज्य भाग आहे हे पाकच्या डोळ्यात खुपते , सतत सलत आहे.

१९४७ मधे भारताने हिंदू राष्ट्र घोषित केले नाही याचा मला आज विशेष अभिमान वाटतो. Thanks to Nehru.

ज्यांना मुस्लिमांचा वेगळा देश हवा होता असे लोक पाकिस्तानात गेले. यात सगळे मुस्लिमही येत नाहीत.
धर्माधिष्ठित पाकिस्तानची काय शोकांतिका होते आहे हे पाहूनही भारत धर्माधिष्ठित असायला हवा म्हणणारे नक्की भारताचे हितचिंतक आहेत का?

धागालेखक अरबस्तान, अफगाणिस्तान यांच्या आडून मनात गांधी, नेहरुंविषयी शाळेत ऑप्शन्ला टाकलेला इतिहास विषय आता विकिपिडिया (जे कोणीही अपडेट करू शकतो), व्हॉट्सप युनिव्हर्सिटीच्या आणि सांगोवांगीच्या आधारे ताडून वाचकांच्या गळी उतरवण्याचं काम करत आहेत की काय अशी शंका येऊ लागली आहे. शिवाय माबोवरील प्रसिद्ध झीलकर्‍यांनी साथ द्यायला सुरुवातही केली आहेच.

<< समजून घ्या, सावरकरांचा प्रश्न ' हिंदू राष्ट्र हवं ' यासाठी नव्हता, अनिभे त्यांनीच नाही तर अनेक सावरकर समर्थकांनी स्पष्ट केलं आहे. त्यांचा प्रश्न हा होता, की फाळणी धर्माच्या आधारे का आणि ती देशाच्या वतीने मान्य करण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाचा का? आंबेडकर सुद्धा फाळणीच्या विरोधात होते. >>
-------- फाळणीच्या विरोधात गांधी तसेच नेहरु, पटेल, आंबेडकर सर्वच होते. नेहरु , पटेल आणि काँग्रेसने हिंसाचार बघून मान्य केले. तो काही आनंदाने घेतलेला निर्णय नव्हता.
मोदी कसे धादांत खोटे बोलतात - " चीन आलाच नाही, आमच्या हद्दीत एकही चौकीवर चीनचा कब्जा नाही... ऑक्सिजन न मिळाल्याने एकाचाही मृत्यु नाही " असे चतुर राजकरणी नव्हते त्या काळात.

<< हेच मी सांगतो, इतिहास वाचून तो समजून घ्यावा लागतो. बरेचदा इतिहासाचे कंगोरे सरळ दिसत नसले तरी त्यात बराच अर्थ भरलेला असतो. नेहरूंना पंतप्रधान फक्त गांधींच्या आग्रहामुळे केलं गेलं, अन्यथा सरदार पटेल सर्वमान्य उमेदवार होते....ही लोकशाही आहे का? बोस यांच्या आझाद हिंद सेनेने देशभक्ती चेतवल्यावर भारतीय सेनेने जो उठाव केला तो शेवटी ब्रिटिशांच्या हाताबाहेर जाऊन त्यांनी काढता पाय घ्यायचा निर्णय घेतला हे खुद्द ब्रिटिश पंतप्रधान Atlee बोलून गेले असूनही आपण नेहरू - गांधींना ( च) फक्त श्रेय का द्यायचं? हे आणि असे अनेक प्रश्न जोवर आपण आपल्याला विचारणार नाही तोवर इतिहास आपल्याला कळणार नाही. >>
------- अ‍ॅटली असे म्हणाले त्याचे संदर्भ अगोदरच येथे मागितले आहेत.
नेहरु यांना पंतप्रधान का केले आणि तो निर्णय किती योग्य होता या संदर्भात लिहीतो.... तुर्तास लेखक महाशयांनी त्यांचाच स्वत: चा सल्ला ( वर बोल्ड केला आहे) अमलांत आणावा.

गांधी आणि नेहरु ( न उल्लेख केले आंबेडकर ) यांच्या बद्दल द्वेष दिसतो आहे... अफगाण / तालीबान केवळ निमीत्त आहे.

गांधी आणि नेहरु ( न उल्लेख केले आंबेडकर ) यांच्या बद्दल द्वेष दिसतो आहे... अफगाण / तालीबान केवळ निमीत्त आहे.>==+++१११११ . हेच मलाही जाणवलं म्हणुन काल मी एक प्रश्न काय विचारला तर त्यावर "धाग्याची वाट लावू नका", "मदरशातून शिकून आला काय..?" असे शाखेत शिकवलेले ठेवणीतले प्रश्न विचारून धागा गांधी,नेहरू यांच्यावर दुगाण्या झाडत एवढं रामायण वाचायला मिळालं. असो. जे जाणवलं ते समोर आणावसं वाटलं अन ते आलं.

aljazeera dot com चानेल आणि साईटवर बरीच ताजी माहिती आणि विश्लेषण ,लेख आहेत. तर त्यापेक्षा काही अधिक आहे का?

युनो सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मोदींना दिले आहे
आता उगाच गांधी नेहरू बडबड नको.

<<
@ blackcat
नाही, ते इतकं सोपं नाही.
तेव्हा दिल्लीला मुघल तख्त इतकं डळमळीत झालेलं होतं, की मराठ्यांनी त्वरेने हालचाल केली नसती तर ते अफगाण किंवा तुर्की आक्रमकांच्या हाती गेलं असतं. तेव्हा लष्करी मोहीम गरजेची होती. खर्चाचं म्हणाल, तर या जिंकलेल्या प्रांतांतून चौथाई वसूल करून आर्थिक बाजू सावरता येईल असा पेशव्यांचा कयास होता.
चूक म्हणाल तर हीच झालेली होती, की मराठ्यांनी शत्रूच्या मुलुखातही लुटालूट करण्याचा मार्ग अवलंबला नाही आणि जाट - राजपूत यांनी त्यांना गोड शब्दांमध्ये झुलवत ठेवून प्रत्यक्षात काहीही मदत केली नाही. अटकेपार झेंडे लागल्याच्या दुसऱ्याच वर्षी अब्दाली चालून आल्यामुळे जिंकलेल्या प्रांतांतून त्यांना काही मिळेपर्यंत नवी लष्करी मोहीम हाती घ्यावी लागली आणि त्यातही नवाब शुजा , सूरजमल जाट अशांनी मराठ्यांचा विश्वासघात केला.
आजच्या नोटबंदीसारखी परिस्थिती तेव्हा नक्कीच नव्हती, कारण ती परिस्थितीच युद्धाने पेटलेली होती... पुढे पानिपत घडूनही मराठा साम्राज्याचे पतन न होता उलट ते पुन्हा उभं राहिलं हेही महत्वाचं ! >>

-------
अपयशाचे खापर दुसर्‍यांवर फोडण्यापेक्षा थोडे कठोर आत्मपरिक्षण करायची तयारी ठेवा...
एखादा प्रदेश जिंकणे आणि तो टिकविणे यांत मोठा फरक आहे , नुसतेच अटकेला झेंडे लावून काही उपयोग नाही. लगिबगीने पुण्यात कुठले काम खोळंबले होते?
मराठ्यांनी शत्रूच्या मुलखांत लुट केली नाही यावर दुमत आहे.
मराठ्यांची लढणार्‍यांची संख्या कमी होती, लहान मुले/ बायका यांचीच संख्या लढणार्‍या सैनिकांपेक्षा जास्त होती. त्या निमीत्ताने धार्मिक स्थळांना भेटी. ३००,००० पैकी केवळ ५०,००० लढणारे (combatant/ non-combatant ) असतील तर?
हल्ला करण्याची वेळ ( हिवाळा / उन्हाळा)
रसद मिळत नव्हती. फौजेची / तसेच जवानांची प्रचंड उपासमार सुरु होती, सैन्य उपाशी राहुन मरण्यापेक्षा लढून मरणे पसंत करेल अशी निर्वाणीची भाषा. नियोजनांत अनुभव कमी पडला आणि फाजिल आत्मविश्वास नडला असे झाले का?

(तुका म्हणे त्यातल्या त्यात) अटकेपार झेंडे लावलेले, युद्धाचा आणि त्या भागाचा अनुभव राघोबा / राघोभरारी/ रघुनाथराव पुण्यात रिकामेच होते... असे असतांना सदाशिवरावांना / लहानग्या विश्वासरावांना मोहिमेवर पाठविण्याचा "सेनापती बाजीराव " (अरे यांना नानासाहेब म्हणारे) यांचा निर्णय कितपत योग्य होता?

Theurbannomad

प्रत्येक नेता महान आहेच, त्यांचा देशासाठीचा त्याग मोठा आहेच पण जिथे ते चुकले आहेत तिथे त्यांना दोष द्यायची बुद्धी शाबूत असायला हवी >>>>
ह्याला अनुमोदन. इन्सान खुदा नही होते|

कदाचित या लेखमालेत आधीसारखे पटापट लेख टाकणं मला जमणार नाही, कारण हा विषय अगदी दोन-तीन दिवसांपासून मी हातात घेतलेला आहे आणि मित्रांकडून हाती पडलेले संदर्भ इतके आहेत, की त्यांच्या वाचनातच रोजचे काही तास जात आहेत.... >>>>>

तुमच्या पहिल्या भागात लिहिलेले हे वाक्य बघता माझी एक विनंती आहे की Before you argue with someone, ask yourself, is that person even mentally mature enough to grasp the concept of different perspectives? Because if not, there's absolutely no point. (हे मी कुठेतरी वाचलेले वाक्य आहे ) ह्याला अनुसरून प्रतिसाद लिहिण्यामधे वेळ न दवडता प्रत्यक्ष लिखाणावर अथवा त्याकरता कराव्या लागणार्‍या वाचन चिंतन मननावर लक्ष केंद्रीत करावे.

कृपया धन्यवाद.

<< माणुस खुशाल म्हणतोय ( मला कायप्पावर पण आलाय हा, त्यात कुठलाही एडिटिंग नाही ) की हिंदुंना मारा. अफगाण मालिकेशी संबंधीत आहे हा म्हणून ही लिंक दिली.
जिथे स्वतःच्या धर्माच्याच लोकांना, बायका मुलांना मारले जाते तिथे इतर धर्म काय चीज आहेत? >>
------ महात्मा गांधी, दाभोलकर, पानसारे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांना मारणारे कुठल्या धर्माचे होते?

महिला अत्याचाराच्या बाबतीत.... हाथरस , उनाव , कथुआ, दिल्ली येथे झालेले अत्यंत घृणास्पद अत्याचार , पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत पिडितेच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट (तिच्या कुटुंबाच्या परवानगी शिवाय ) लावण्याचे प्रकार हे राम-राज्याचे लक्षण मानायचे का ?

अगदी मागच्याच आढवड्यात जंतर मंतर येथे " इस देश मे रहेना है तो... " चे नारे दाखविले... पर धर्माचा कित्ती आदर दिसतो आहे. फडतुस कम कलमे लावायची कि २४ तासांत सुटका....

@ उदय

तुमचे मुद्दे १००% मान्य. मराठ्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे खूप काही घडलं हे खरं आहे....पण ही परिस्थिती तेव्हा सगळ्यांचीच होती. खुद्द अब्दाली तरी कुठे स्थिर होता? अफगाणिस्तानात त्यालाही सतत छोट्यामोठ्या कुरबुरी शांत करण्यात शक्ती खर्च करावी लागत होती. राजपूत दुभंगलेले होते. आदिलशाही, कुतुबशाही , मुघल आणि निजामशाही अशाच अंतर्गत सुंदोपसुंदी मुळे विकल अवस्थेत होती....

एक लक्षात घ्या, तत्कालीन परिस्थितीच अशी होती, की सतत लढाया, एकमेकांचे मुलुख जिंकण्यासाठी चढाओढ, गादीवर कोण बसेल याची रस्सीखेच यामुळे सगळंच वातावरण गढूळ झालं होतं.

राघोबा दादा मोहिमेवर न जाण्यामागे पेशव्यांच्या घरातल्या महत्त्वाकांक्षी बायकांचं राजकारण कारणीभूत होतं हे सर्वश्रुत आहेच....शिवाय राघोबा पेशवे पदासाठी इतके आसुसलेले होते की तेच बंडाळी करतील की काय अशी भीती खुद्द पेशव्यांना वाटत होती. पुढे या सगळ्याचा काय परिणाम झाला हे आपण जाणतोच !

हर्पेन, उत्तम सल्ला. लेखकांनी त्यांचा अमुल्य वेळ वाया घालवू नये.

------ महात्मा गांधी, दाभोलकर, पानसारे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांना मारणारे कुठल्या धर्माचे होते?

महिला अत्याचाराच्या बाबतीत.... हाथरस , उनाव , कथुआ, दिल्ली येथे झालेले अत्यंत घृणास्पद अत्याचार , पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत पिडितेच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट (तिच्या कुटुंबाच्या परवानगी शिवाय ) लावण्याचे प्रकार हे राम-राज्याचे लक्षण मानायचे का ?>>>>> सनातनी आणी तालीबानी यांच्यात विशेष फरक नाहीच. फक्त धर्म वेगळे. तुमचे मुद्दे पटलेत. पण याचा अर्थ हा नाही की फक्त सनातनींनाच दोषी ठरवायचे, आणी तालीबानींना , जाऊ दे त्यांच्या धर्माचा मामला, त्यांची बायका पोरे नी ते बघतील काय ते असे म्हणून सोडुन द्यायचे.

सनातनी व तालीबानी दोन्ही प्रवृत्तींपासुन भारत व अफगणिस्तान दोघांना धोका आहे. एर्‍हवी सतत टिवटिव करणारी जावेद अख्तर सारखी माणसे अश्या वेळी चूप बसतात हेच या के आर के ने सांगीतलेय.

टीवटीव म्हणजे

जगात 150 देश आहेत , रोज प्रत्येकाचे टीवटीव करत बसायचे का ? ते रोज करतात ते आपल्या देशाबाबत असते.

मोदी शहा भागवत ह्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ?
मोदी तर सुरक्षा समितीचे अध्यक्ष बनले आहेत , भक्ताडे गावभर नाचत होते. (आणि लगेच युनोलापण पनवती लागली)

सनातनी व तालीबानी दोन्ही प्रवृत्तींपासुन भारत व अफगणिस्तान दोघांना धोका आहे.
आपण भारतात रहातो की नै. मग सध्या तथाकथीत सनातनी लोकांपासून आपल्या देशाला असलेल्या धोक्याची काळजी करूया.

खरंय

सनातनी च्या समर्थनार्थ इथे कोणीही लिहीत नाही , पण देश ताब्यात घेतल्या पासून क्रूर तालिबानी बद्दल काही लिहिलं की काही लोकांना उगीचच वाटतं आपल्यालाच टार्गेट करून लिहलय
चोर की दाढी मे तिनके ही तिनके दुसरं काय Happy

नम्र विनंती: विषय "अफगाणिस्तान - एक शोकांतिका" आहे. लेखमालेची शोकांतिका करु नका.

आता सगळेच तोंडावर पडलेत. लेखकाने मालिका बंद केली आहे.

जुने अफगाणी असोत अथवा तालिबानी. त्यांना भारताचा पाठिंबा हवा आहे. सार्कमधले देश आहेत. इकडून फोन गेल्यावर तालीबानी सैनिकांनी आपल्या उरलेल्या लोकांना संरक्षण देऊन विमानतळावर सोडलं.
बामियाचे बुद्ध पुन्हा उभे करतील .

महात्मा गांधी, दाभोलकर, पानसारे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांना मारणारे कुठल्या धर्माचे होते? >>

(इकडे तो 'रुको जरा सबर करो' वाला हिंदुस्थानी भाऊ चा मीम हवाय. जिद्दू प्लीज हेल्प)

दाभोलकर, पानसारे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांचे मारेकरी म्हणून पकडलेले लोक गुन्हा सिद्ध होईतोवर आरोपी ह्या सदरात मोडतील ना .

की खटला पुर्ण होऊन झाली त्यांना शिक्षा?
की मला माहीत नसलेले अजून काही आहे? (सध्या वर्तमान पत्र आणि दूरदर्शन बंद आहे त्यामुळे खरोखर असे असू शकते)

खटला पुर्ण होऊन झाली असेल शिक्षा तर तो वरचाच मीम मला परत Proud

रश्मी, तुम्ही पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे तोंडावर पडलात.>>>>>> भरत धन्यवाद ! मी ट्विटर वर नाही. ट्विटर वर काय येतं व कोण लिहीतं हे मला न्युज पेपर्स मधून कळत कारण ते लोक त्यात त्याची लिंक देतात. तेव्हा समजते कोण काय कुठला मुद्दा मांडत आहे. जावेद अख्तर यांचेही धन्यवाद की त्यांनी लिहीले. धन्यवाद वन्स अगेन.

जशी मायबोली तसं ट्विटर. तिथे येणं इतकं कठीण नाही. ट्विटरवर नसलात तरी गुगल करून एखाद्याचं अकाउंट आणि ट्वीट पाहता येतं;
जसं सभासद नसलेल्यांना मायबोली वाचता येतं.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/salute-you-spokesman-for-the-a...>>>>>> भारतातलेच लोक असे काहीतरी वादग्रस्त व्यक्तव्य करुन लोकांचा रोष ओढवुन घेतात आणी निर्दोष व निष्पाप यात भरडले जातात. या माणसा ने दुसरी बाजू बघीतलीच नाही का? इस्लामी शरीया कायदा बहुतेक दुबई मध्ये सुद्धा आहे, पण तिथे सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, ते ही कायदा व्यवस्थीत पाळुन. अफाट प्रगती करुन, पर्यटनाला वाव देऊन दुबई आज जगात पुढे आहे.

या लोकांना हे कधीच कळले नाही का , की आपल्या देशात इतरांनी पर्यटक म्हणून यावे अशी सुंदर ठिकाणे असतांना देखील त्याचा विकास केला गेला नाही. काश्मीर इतकेच सुंदर असे भुभाग अफगाण व पाकी बॉर्डर वर आहेत. बर्‍याच वेळा मी ते नेटवर बघीतलेत. पण केवळ आणी केवळ हिंसाचार व सत्तेची आसुरी महत्वाकांक्षा यातुन त्या कडे दुर्लक्ष केले गेलेय. काय म्हणावे या दुर्दैवाला?

Pages