अफगाणिस्तान - एक शोकांतिका ( भाग ०२ )

Submitted by Theurbannomad on 16 August, 2021 - 20:16

भाग ०१ - https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...

अफगाणिस्तान.
भारताच्या नैऋत्येला पाकिस्तानच्या पुढे स्थित एक देश. चहूबाजूंनी जमिनीने वेढलेला. सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाकिस्तान, चीन, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान,ताजिकीस्तान आणि इराण या देशांना अफगाणिस्तानची सीमा लागून आहे. भारताच्या पाकव्याप्त काश्मिरची सीमाही अफगाणिस्तानला लागून आहे आणि त्या अर्थाने हा देश आपलाही शेजारी आहे.

या देशाचा इतिहास अतिशय समृद्ध. इथे सापडलेल्या अवशेषांच्या कार्बन डेटिंगवरून या भागात पालिओलिथिक काळात मनुष्यवस्ती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. हा काळ थेट अश्मयुगीन, म्हणजे तीन लाख ते तीस हजार वर्षं जुना. इथे इतकी जुनी मनुष्यवस्ती होतीच, पण या प्रांताचा पुढे भारताशीही घनिष्ठ संबंध आलेला होता. महाभारताच्या काळात या प्रांताचा - ज्याला गांधार म्हणून ओळखलं जाई - व्यापार भारतात तेव्हा अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या साम्राज्यांशी होत असे. त्यातल्या बलशाली साम्राज्याशी - हस्तीनापुराशी - रोटीबेटी संबंध जुळेपर्यंत तत्कालीन गांधार राज्याची मजल पोचलेली होती. धृतराष्ट्र पत्नी गांधारी ही याच देशाची राजकन्या. भीष्माने तिच्या पित्याशी - सुबल राजाशी - उभा दावा मांडून आपल्या सामर्थ्याने कुरु वंशीय राजपुत्र धृतराष्ट्र याचा विवाह गांधारी हिच्याशी लावून दिला होता. असं म्हणतात, की तिचे भाऊ तुरुंगात डांबले गेले तेव्हा त्यांना अन्नपाणी न देता भीष्माने त्यांना मृत्यूच्या वाटेवर सोडून दिलं होतं, पण त्यांनी आपल्या एका भावाला - शकुनी याला आपल्या या अपमानाचा बदला घेण्याची शपथ देऊन त्याला भीष्माशी तोंडदेखला सलोखा करायचा सल्ला दिला होता. पुढे कुरु वंशाचा पूर्ण विनाश होण्यामागे शकुनीचा मोठा वाटा होता.

अफगाणिस्तानमध्ये अनेक साम्राज्य जन्माला आली आणि लयास गेली. आजच्या माहितीनुसार या भागात राहणाऱ्या टोळ्यांना नेस्तनाबूत करून सुसूत्र असं पहिलं साम्राज्य इथे ग्रीक लोकांनी आणलं. ग्रीको - बाक्त्रियन म्हणून ओळखलं जाणारं हे साम्राज्य हेलेनिस्टिक काळात प्रस्थापित झालेलं. हा काळ अलेक्झांडर द ग्रेट याच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्य स्थापन होईपर्यंतचा, म्हणजे ३२३ बीसी ते ३१ बीसी हा. पहिला दिओदोतस हा ग्रीक बक्त्रिया प्रांताचा राजा. हा बाक्त्रिया प्रांत म्हणजेच आजच्या हिंदुकुश पर्वतरांगांच्या आसपासचा म्हणजेच आजचा अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान देशांचा प्रदेश. दिओदोतस याने ज्या राजाचा पराभव केला, तो होता अर्सासेस. हा तत्कालीन इराणच्या पर्थियन साम्राज्याचा सर्वेसर्वा होता. हिंदुकुश भागातल्या याच्या वर्चस्वाला चाप लावून दिओदोतस याने इथे ग्रीक वर्चस्व निर्माण केलं.

अलेक्झांडर याने स्थापन केलेल्या प्रचंड मॅसिडोनियन साम्राज्याचा एके काळच्या भाग असलेलं सेल्युसिड उपसम्राज्य पुढे वेगळं झालं ते सेलेऊकस पहिला याच्या नेतृत्वाखाली. ३२१ बीसी या काळात मेसोपोटेमिया ( आजचा इराक ) भागातून त्याने आपला वारू उधळला थेट पश्चिमेला आणि आजच्या इराण, इराक, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विस्तीर्ण भागावर आपला अंमल बसवला. अर्सासेस याने याच सेल्युसिड साम्राज्यातून आपली वेगळी चूल मांडली होती, आणि पुढे दिओदोतस याने त्याचा पराभव करून पुन्हा तिथे ग्रीक वर्चस्व आणल होतं.

पुढे ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकाच्या काळात इथे इंडो - स्कायथियन साम्राज्याचा उदय झाला. मोगा नावाच्या शूर योध्याने साका वंशाच्या लोकांना हाताशी धरून गांधार प्रांतापासून ते इंडस खोऱ्यापर्यंत आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यांना पुढे कुशाण साम्राज्याने नेस्तनाबूत केलं आणि बराच काळ अफगाणिस्तानच्या भागात त्यांचं वर्चस्व राहिलं. या काळात वेदिक धर्माचा खोलवर प्रभाव पडून अफगाणिस्तानमध्ये वेदिक चालीरीती आचरणात आल्या होत्या.

पुढे चौथ्या आणि पाचव्या शतकात हूण सम्राटांनी या भागात हातपाय पसरले. तक्षशिला स्थापन करणारे हे लोक अल्ताई डोंगरांच्या भागातले शूर योद्धे होते. त्यांच्यात युरोप, मोंगोल आणि इराणी संस्कृती आणि शारीरिक रचनांचा संगम झालेला होता. त्यांच्या काळातल्या नाण्यांवर त्यांच्या प्रतिमा साफ दाढी कोरलेल्या, गोल चेहऱ्याच्या आणि मोठ्या डोळ्यांच्या अशा आहेत. त्यांच्यानंतर ' गोरे हूण ' म्हणून ओळखले जाणारे मध्या आशियाई ' हेफथलाईट ' इथे अवतरले आणि राज्य करू लागले. त्यांच्यातल्या अल्कोन, नेझाक या उपपंथियांनी आळीपाळीने अफगाणिस्तानच्या भागावर राज्य केलं...पण पुढे सहाव्या शतकाच्या शेवटी इथे थेट तुर्कीक झुनबिल लोक आले.

ऋतबिल नावाच्या शूर योद्ध्याने ' तुर्कीक खागानेत ' साम्राज्यातून आपली चूल मांडली अफगाणिस्तानच्या भागात. हे साम्राज्य मोंगोल भागातल्या अशीना टोळ्यांच्या लोकांनी स्थापन केलेलं. मध्य आशिया भागात तुर्किक भाषा बोलणाऱ्या अनेक टोळ्या होत्या, त्यातली ही एक बलाढ्य टोळी. ऋतबिल याने आत्ताच्या कबूल ते कंदहार भागात आपलं झुनबिल राज्य स्थापन केलं ' झबुलिस्तान ' या नावाने. त्याने स्वतःला ' खोरासान तेगिन शाह ' हे बिरूद चिकटवून घेतलं. गझनी हे आजच्या अफगाणिस्तानच्या मध्य भागातलं शहर ही त्याची राजधानी.

या काळापर्यंत अफगाणिस्तानात इस्लाम धर्म विशेष प्रस्थापित झालेला नव्हता. इथे बऱ्या प्रमाणात वेगवेगळे धर्म आणि पंथ एकत्र नांदत होते. या भागात शांतता अशी नव्हती, पण त्याचं कारण होतं वेगवेगळ्या साम्राज्याच्या आपापसात चाललेल्या लढाया. अफगाणिस्तानचा भाग नेमका भारत, अरबस्तान, चीन आणि इराण यांच्या मधोमध असल्यामुळे हा भाग या प्रांतांच्या महसत्तांची रणभूमी झालेला होता. सिल्क रूट या नावाने प्रसिद्ध असलेला व्यापारी मार्ग अफगाणिस्तानमधून जात असल्यामुळे या व्यापार मार्गावर वर्चस्व प्रस्थापित करणं प्रत्येकाला आवश्यक वाटत होतं....पण आठव्या शतकात या भागात ' हिंदूशाही ' अवतरली आणि या भागात पुढे बरेच धार्मिक बदल घडले.

झालं असं, की खलिफा अल मामून याच्या नेतृत्वाखाली अब्बासिद आठव्या शतकाच्या सुरुवातीला इथे आले आणि त्यांनी तुर्कशाही संपवली. तुर्कीक शाह अब्बासीदांचे मांडलिक झाले आणि त्यांना बळजबरीने इस्लाम स्विकारावा लागला. सन ८२१ या वर्षी काबूल शाह लगतूर्मान याला त्याच्याच एका मंत्र्याने - कल्लार याने पदच्युत केलं आणि सत्ता बळकावली. त्याच्या या काबूलशाहीला अरब ' हिंदूशाही ' म्हणून संबोधू लागले.

पुढे याचेही सुन्नी पर्शियन लोकांशी खटके उडायला लागल्यावर त्याने आपल्या हिंदूशाहीचे केंद्र काबूलहून थेट उदभांदपुरा ( सध्याच्या पेशावर शहराच्या पूर्वेला ८० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे ) येथे नेलं. या काळात भारताच्या हिंदू संस्कृतीचा प्रभाव पडून या भागात हिंदू धर्माचा प्रसार व्हायला लागलेला होता. तेव्हाच्या इराणी संशोधकाने - अल बिरूनी याने - या भागात ब्राह्मण विपुल संख्येने होते आणि इथे वेदिक विचारांचा खोलवर प्रसार झालेला होता असं नमूद करून ठेवलं आहे. काबूल, मझार - ए - शरीफ, पेशावर, इस्लामाबाद, तक्षशीला या आजच्या भागात तेव्हा हिंदू संस्कृती ही अशी रुजलेली होती.

पुढे लाविक, सफारीड, समानिड अशा सुन्नी ईराणी साम्राज्यान्नी अफगाणिस्तान आळीपाळीने आपल्या अंमलाखाली आणला, पण या सगळ्यांवर वरचढ ठरले दूर पूर्वेकडून आलेले मामलुक तुर्की. एके काळचे गुलाम असलेले हे मामलुक अतिशय लढाऊ आणि शूर. अबू मन्सूर नासीर अल् दिन सबुक्तिगिन हा तुर्की मामलुक ' गझनवी ' साम्राज्याचा पहिला सम्राट. याचाच मुलगा म्हणजे ' गझनीचा महमूद ' म्हणून प्रसिद्ध असलेला महमूद गझनवी, ज्याने आपल्या तुर्की गझनवी साम्राज्याचे एका प्रबळ आणि विस्तीर्ण साम्राज्यात रूपांतर केलं. गुजराथच्या सोमनाथ मंदिराचा विध्वंस करणारा आणि उत्तर भारतावर सतत स्वाऱ्या करून अपरिमित रक्तपात करणारा हा महमूद भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा खलनायक ठरतो. याने आत्ताच्या लाहोर शहरात आपली राजधानी थाटली होती.

११८६ साल उजाडलं ते या गझनवी साम्राज्याच्या मुळावर आलं. मोहम्मद घोरी या गझनीचा महमूद संत वाटावा अशा क्रूर स्वभावाच्या सम्राटाने आपल्या घोर साम्राज्याला गझनवी साम्राज्य जोडून घेतलं. आजच्या पश्तून लोकांमध्ये तेव्हा बुद्धिस्ट विचारांचा प्रचंड प्रभाव होता.( पाचव्या शतकात गांधार साम्राज्याच्या काळात मध्य अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतात ' बामियान बुद्ध ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाप्रचंड बुद्धाच्या मूर्त्या अखंड डोंगराच्या उभ्या भागावर कोरून तयार केलेल्या होत्या.... बौद्ध धर्म तेव्हापासूनच इथे रुजलेला होता ) घोरी साम्राज्य सुरुवातीला बौद्ध विचार मानणारं, पण गझनीच्या महमूदने १०११ साली घोरी साम्राज्यावर आक्रमण करून त्यांना सुन्नी मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला.....इतिहासाने पुढे जरी गझनवी साम्राज्याचा अंत याच घोरी साम्राज्याकडून करवून आणला असला तरी घोरी पुढे सुन्नी इस्लामधर्मीयच राहिले.

पुढे अनुष्टेगिन घरचाई नावाचा सेलजुक तुर्की सम्राटांच्या पदरी नोकरीला असलेला आणि त्यांच्यासाठी आजच्या इराणमधल्या अमु दर्या नदीच्या भागावर देखरेख करणारा मामलुक गुलाम आपल्या मालकांपासून वेगळा झाला. त्याच्या वंशजांनी बाराव्या शतकात मध्या आशियात ' अनुष्टेगिन साम्राज्य ' प्रस्थापित केलं...पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्यावर चालून आले मंगोल. आग्यावेताळ बरा वाटावा अशी ख्याती असलेला गेंघिस खान आपल्या क्रूर मंगोल सैन्यासह मध्य आशियात आला तो प्रस्थापित साम्राज्याची धूळधाण उडवून स्थिरावला. त्याचा नातू हुलागू खान यानेही आपल्या आजोबांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या काळात मध्या आशिया, इराण ते थेट कॅस्पियन समुद्राचा पूर्वेकडच्या भाग अशा सगळ्या भागावर मोंगोल साम्राज्य प्रस्थापित झालं. याच काळात इथे इस्लाम घट्ट पाय रोवून प्रस्थापित झाला.

साल १२९०.
या वर्षी खिलजी साम्राज्याने अफगाणिस्तान ते भारत अशा सगळ्या भागावर आपला अंमल आणला आणि थेट दिल्लीला आपली गादी स्थापन केली. जलाल उद् दिन फिरुझ खिलजी हा या साम्राज्याचा संस्थापक. त्याचा वारसदार होता अल्लाउद्दीन खिलजी. अर्थात त्याने हा वारसा मिळवलेला होता बंड करून. भिलसा, अवध, देवगिरी अशा अनेक समृद्ध आणि संपन्न प्रांतांवर वरवंटा फिरवून या अल्लाउद्दिनने या भागात अपरिमित रक्तपात केला. या भागातून लुटलेल्या संपत्तीच्या जोरावर त्याने महत्त्वाच्या लोकांना आपल्या बाजूला वळवून घातपाताने जलालुद्दिनचा काटा काढला आणि खिलजी साम्राज्याचा तो अनभिषिक्त सम्राट झाला. पद्मावतीच्या गोष्टीतला अल्लाउद्दीन खिलजी हाच.

या खिलजी साम्राज्याला अफगाणिस्तानात शह दिला मूळच्या अफगाणी असलेल्या बहलोल खान लोदी याने. हा सरहिंद प्रांताचा प्रमुख मलिक सुलतान शाह लोदी याचा जावई. त्याने दिल्लीच्या गादीवरही आपला हक्क प्रस्थापित केला आणि खिलजी साम्राज्याचा भूभाग आपल्या अंमलाखाली आणला. त्याचे पुढचे वंशज सिकंदर लोदी आणि इब्राहिम लोदी यांनी लोदी साम्राज्य सांभाळलं, पण इब्राहिम लोदी याचा पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने पराभव करून सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोदी साम्राज्याचा अस्त घडवून आणला.

बाबराने मुघल साम्राज्याचा विस्तार उत्तर भारतापासून थेट पूर्वेकडे बिहार भागापर्यंत केला. वायव्येकडे अफगाणिस्तानात त्याने शेरशाह सुरी या शूर अफगाणी सेनापतीला आपल्या साम्राज्याचा त्या भागातला प्रशासक म्हणून नेमला. या सुरी घराण्याच्या पुढच्या कुलदीपकांनी पुढे मुघलांशी गद्दारी करून वेगळी चूल मांडली, पण १५५६ साली मुघलांनी त्यांचा निर्णायक पराभव केला. मुघलांनी त्यानंतर अफगाणिस्तानवर आपलं राज्य आणलं.

पुढे अफगाणिस्तानच्याच होटाक जमातीच्या मिरवैज होटाक याने सतराव्या शतकात अफगाणिस्तानात आपल्या कबील्याची सत्ता आणली. हे होटाक लोक अतिशय शूर आणि टणक होते. मुल्ला ओमर या कुप्रसिद्ध दहशतवादी तालिबानी नेत्याची जमात होटाक हीच आहे. पुढे १७२२ साली अहमद शाह दुर्राणी याने दुर्राणी साम्राज्याची स्थापना करून अफगाणिस्तानची धुरा आपल्या हाती घेतली. आज जे अफगाणिस्तान आपल्याला माहीत आहे, त्याची स्थापना करणारा हाच तो अहमद शाह दुर्राणी. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा साम्राज्याला भिडलेला अहमद शाह अब्दाली हाच. याने अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतल्यावर आपल्या मूळच्या अब्दाली नावाऐवजी ' दुर्राणी ' हे नाव लावायला सुरुवात केली. ( दुर - ई - दुर्रान म्हणजे मोत्यांच्या राशीतला सर्वश्रेष्ठ मोती...स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणवण्याचा हेतूने त्याने हे विशेषण चिकटवून घेतलं होतं.) खरं तर हा होटाक राज्याच्या तुरुंगातच सडत पडला असता, कारण त्याच्या तीर्थरूपांची बंडखोर लक्षणं बघून त्यांना या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या मुलासह तुरुंगात डांबलं गेलं होतं...पण इराणच्या नादर शाहने होटाक राज्यावर चाल करून त्यांना पराभूत केलं आणि अहमद शाहला मुक्तता मिळाली.

याचा १७७२ साली मृत्यू झाल्यावर त्याच्या मुलाने - तीमुर शाह याने सत्ता सांभाळली. त्यानेच कंदहार येथून आपली राजधानी काबूल येथे आणली आणि पेशावर ही हिवाळी राजधानी म्हणून घोषित केली. त्याची मुलं पुढे दोन दशकं अफगाणिस्तानवर राज्य करत होती.

आधुनिक काळातल्या अफगाणिस्तानच्या इतिहासावर नजर टाकू, पण ते पुढच्या भागात. तोवर अलविदा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माहिती . खिलजी नंतर तुघलक आले आणि त्यांना बहलोल खान लोदी याने शह दिला.

फार सखोल माहिती मिळत आहे. एकूणात या देशाचा इतिहास नेहमीच रक्तरंजित होता असं दिसतंय. इतक्या वर्षांत देशाच्या आधुनिक प्रगतीसाठी प्रयत्न करणारा, तशी दृष्टी बाळगणारा एकही पुरुष उपजू नये हे केवळ दुर्दैव. अशी स्त्री देखिल असू शकते पण इतिहास बघता या देशात तशी शक्यता कमीच. निदान पुरुषतरी असायला हवा.

सध्याची या देशातली परिस्थिती फारच विदारक आहे. सामान्य नागरीक किती भयानक जीवन जगत असतील याची कल्पनादेखिल करता येत नाही. काल टिव्हीवर तालिबानींपैकी एकजण एका नागरिकाला 'तुम्हाला आता कसं वाटतंय?' टाईप प्रश्न विचारत होता. तो नागरीक बोलत असताना आजूबाजूला चारपाच रायफल, मिसाईलधारी उभे होते. काय बोलणार तो बिचारा? "खूप सुरक्षित आणि शांत वाटतंय. मी खूप खुश आहे "असं सांगताना त्याच्या चेहर्‍यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. यातून लवकरच मार्ग मिळो आणि अफगाणिस्तानाला पुन्हा मोकळा श्वास घेता येवो.

पुढे १७२२ साली अहमद शाह दुर्राणी याने दुर्राणी साम्राज्याची स्थापना करून अफगाणिस्तानची धुरा आपल्या हाती घेतली.

नादिर शाहने मयूरसिंहासनासह दिल्ली धुतली आणि परत गेला. जाताना हत्ती घोड्यांसह संपत्ती होती. वाटेत खैबर खिंड आणि टेकड्यांतून प्रवास करताना कितीएक गळाले. गायब झाले उंट घोड्यांसह. नंतर उरलेली जपण्यासाठी या अफगाणाच्या तुकडीला पाचारण केले. नादिर मेल्यावर संपत्ती हडप झाली. त्याचा उपयोग करून ज्या अनेक अफगाणी टोळ्या होत्या त्यांचा तो मुख्य झाला.

Rofl

वाचतोय.

भारताच्या नैऋत्येला पाकिस्तानच्या पुढे स्थित एक देश>>> वायव्य दिशेला आहे ना?

बोकलत ++++११११११

नैऋत्य म्हणजे केरळ साईडला.

भारताच्या नैऋत्येला पाकिस्तानच्या पुढे स्थित एक देश>>> वायव्य दिशेला आहे ना? >>>> हो ना!

तेव्हाच्या इराणी संशोधकाने - अल बिरूनी याने - या भागात ब्राह्मण विपुल संख्येने होते आणि इथे वेदिक विचारांचा खोलवर प्रसार झालेला होता असं नमूद करून ठेवलं आहे.>> अरे बापरे. कुठे कुठे विस्थापित होतात हे... एका जागी स्थिरपणा कसला तो नाहीच.

जन्मजात आणि बाळकडूत आंदण मिळालेली विकृती बघायची असेल तर "मला पडलेले काही प्रश्न" या धाग्यावर जाऊन बघा हो बन्याबापू.

वीरू, मी कुठं धाग्याची वाट लावायला आलो आहे. मी तर इथं लिहिलेल्या नैऋत्य, इशान्य, वायव्य, अग्नेय या दिशांसहित इतरही मौलिक माहिती मिळाली ते वाचून अचंबित झालो इतकंच.

पु.भा.प्र.

@DJ

विस्थापित नव्हे, प्रस्थापित. तेव्हाच्या काळात वैदिक संस्कृती अफगाणिस्तान पर्यंत पोचलेली होती. बौद्ध धर्म सुद्धा तिथे चांगला विस्तारला होता. पुढे शीख या भागात मोठ्या संख्येने राहू लागलेले होते.

या सगळ्यांचं झालेलं विस्थापन हाच तर काळजीचा मुद्दा आहे....आणि तुम्हाला तिथे ' ब्राह्मण ' सुद्धा होते हे टोचत असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, अटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठा साम्राज्याचा सेनापती बाजीराव पेशवा ब्राम्हण होता आणि आजही जाणकार अफगाण लोक बाजीरावांना ' शेर का बच्चा ' म्हणून संबोधतात. अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमेपाशी आहे....तेव्हा अंदाज करा की ब्राह्मण सेनापतीच्या नेतृत्वाखाली मराठा आणि मराठेतर सैन्याने कुठवर झेंडे रोवले होते.

इतिहास वाचायचा असेल तर पूर्वग्रह दूर करून वाचायची सवय हवी, अन्यथा पूर्वग्रह मनात ठेवून लोक ' माझी राख देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात विसर्जित करा ' सांगणाऱ्या व्यक्तीला आपण ' धर्मनिरपेक्ष ' समजायला लागतात आणि ' माझं शरीर अग्निमध्ये झोकून द्या , कोणतेही अंतिम विधी करू नका आणि कासल्याही अंत्ययात्रा काढू नका ' असं स्पष्ट सांगणाऱ्या व्यक्तीला ' कट्टर हिंदुत्ववादी ' हे विशेषण चिकटवतात !

जाणकार अफगाण लोक म्हणजे नेमके कोण?
त्यांची नावे कशी कळतील..??
ते जाणकारच होते का ते ताडून बघायला कोण गेलं होतं???
कोण किती जाणकार आहे हे कळायला मृतभाषेतील कोर्स वगैरे करावा लागतो का..????

विस्थापित नव्हे, प्रस्थापित. तेव्हाच्या काळात वैदिक संस्कृती अफगाणिस्तान पर्यंत पोचलेली होती.>> प्रत्येक ठिकाणाहून ठराविक प्रस्थापितांनाच विस्थापित व्हावं लागते या मागे नेमकं काय कारण आहे..???

@ DJ

असं असेल तर हा प्रश्न तुम्ही कोणत्या अधिकाराने विचारलाय? तुम्ही नक्की कोण? जाणकार कशावरून ठरवणार हे जसं तुम्ही विचारताय, तसं मी सुद्धा तुम्हाला विचारतो, की तुमचे एखाद्या व्यक्तीला ' जाणकार ' ठरवायचे निकष काय आहेत? आणि ते निकष कशावरून योग्य आहेत? प्रश्न विचारायचं ठरवलं तर दोन्ही बाजूंना तो अधिकार असतो.

तुमच्या माहितीसाठी सांगतो, की जेव्हा एखाद्या जागी जबरदस्ती न करता एखादा धर्म व पंथ स्विकारला जातो आणि वाढतो, तेव्हा तो त्या भागात ' प्रस्थापित ' होत असतो. हिंदू, शीख किंवा बौद्ध या भागात कधीच धाकधपटशा करून विस्तारला नाही. साम्राज्यविस्तार या एकाच कारणामुळे इथले जुने टोळीवाले आणि भारताच्या बाजूने तिथे गेलेले इतर यांच्यात संघर्ष झाले. पानिपतच्या लढाईत मराठे हरले असेल तरी अब्दाली पुन्हा भारताच्या वाटेला आला नाही तो याच कारणासाठी, की त्यालासुद्धा इथे मुस्लिम धर्म विस्तारायची इच्छा नव्हती.

मागच्या दोन - अडीचशे वर्षात या भागात जे काही राजकारण झालं त्यामुळे इथून इतर धर्मीय बळजबरीने बाटवले तरी गेले किंवा त्यांना ' विस्थापित ' तरी व्हावं लागलं. माझ्या मते, इतकी माहिती पुरेशी आहे तुमच्या शंका ( की कुशंका ) शमवायला, पण तरीही तुम्ही तुमचाच धोशा चालवणार असाल तर खुशाल हा धागा वाचणं थांबवा, त्यामुळे तुमची मनःशांती नक्कीच विस्थापित होणार नाही आणि इतर वाचकांची मनःशांती प्रस्थापित व्हायला तरी मदत होईल!

Theurbannomad , दुर्लक्ष करा असल्या प्रवृत्तींकडे. तुम्ही उत्तम लिहीताय, आम्ही वाचतोय.

आम्ही पण वाचतोय म्हटलं वैनी.

आणि धागाकर्त्यांना नक्की कोणता प्रश्न डाचला हे मला कळालं नाही. कुठेही गेलं तरी म. गांधिजींचेच पुतळे का दिसतात अन इतरांचे नाही दिसत यावरून जो चांगल्या हेतूने कार्य करतो त्याला सगळीकडे आपलंच मानलं जातं (उदा. सद्ध्याचे राज्यकर्ते देखिल म. गांधींना 'आपलं' मानु लागले आहेत तसं..! ) अन अशा चांगल्या स्वभावाच्या व्यक्तींना कुठेही विस्थापित व्हावं लागत नाही असं मला वाटतं. खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे अशा प्रयत्नात मग तोल सुटतो अन मग कुणाचीही भलामण करत आम्ही कसे ग्रेट होतो हेच सिद्ध करण्याची अहमहमिका उद्भवते.

लिहा तुम्ही. वाचकांचे प्रश्न डाचुन घ्यायचे नसतात. उत्तर असतील तर द्यावीत नसतील तर इतर कुणाला माहित असेल ते देतिल. नाही दिली उत्तरं तरी इथे काय कोण मार्क्स द्यायला बसलेलं नाही.

डिजे, एका वाक्यात लिहीते. पहिले आणी शेवटचे. पाहीजे तर दुसर्‍या धाग्यावर वाद घालता येतील. पेशव्यांनी इतर नातेवाईक व ब्राह्मणांना पुणे व आसपासच्या जमिनी वाटुन टाकल्या, हे भिकारडे असे म्हणतांना आताचे साखर कारखाने कोणत्या समाजाच्या व कोणाच्या नातेवाईकांच्या हातात आहेत हे मात्र तुम्ही सोयीस्कर रित्या विसरता, आणी मग आम्ही उत्तर दिले की आम्ही जातियवादी ठरतो.

प्रश्न जरुर विचारा, पण उपहास डोकावतोय त्यात. छद्मीपणा बाजूला ठेऊन मन मोकळे करुन विचारा. उलट लेखक व शिक्षक यांना ज्ञान वाटायला नक्कीच आवडते.

मी अगदी मन मोकळेपणानेच विचारलं होतं वैनी. मला देखिल मध्यपुर्वेतील इतिहास मराठीतून जाणुन घ्यायला आवडेल. एवढा आभ्यास करून लिखाण करणं सोप्पं काम नाही. माझ्या कुठल्या वाक्यात काही छद्मिपणा डोकावला असेल तर कृपया नि:संकोच सांगा. तसं काही छद्मी लिहिण्याचा माझा उद्देश नव्हता अन नाही. असेल तर सांगा मी एडिट करेन.

काही प्रश्न विचारला की "धाग्याची वाट लाऊ नका", "मदरशात कोर्स केलात का" असे प्रश्न विचारल्यावर काय बोलणार.

असो. पु.भा.प्र.

@ DJ

तुम्ही आधी किमान वाचक तरी व्हा...आणि प्रश्न विचारायची पद्धत तपासा, आपोआप उत्तर मिळेल तुम्हाला तुमच्याच प्रश्नाचं.

बामियान बुद्धाच्या पुतळ्याचा काय प्रकार झाला तो पाहिलात ना? बुद्ध गांधीजींच्या कित्येक वरचे महापुरुष होते, ज्यांना हजारोंनी देवाचा दर्जा दिलेला आहे. शिखांच्या गुरूंचे पुतळे फोडले गेले..आत्ता मागच्याच आठवड्यात पाकिस्तानात रणजित सिंहांचा पुतळा फोडला गेला. हे सगळं काय आहे?

वाद घाला पण किमान logic तरी वापरा ना!

मला नाही वादावादी करायला आवडत. फक्त छुपे अजेंडे घेऊन लिखाण केलं की मग एका प्रश्नात सगळं उघडं पडतं हे मात्र खरं.

बुद्ध काय, महाविर काय, येशु काय किंवा मो. पैगंबर काय. प्रत्येकाला मानणारा वर्ग आहे. दुसर्‍यांची रेघ पुसुन आपली रेघ कधीच मोठी होत नसते (बुद्धांच्या मुर्ती फोडून किंवा बुद्धांचे विहार अतिक्रमित करून मंदिरांत परावर्तित करून किंवा मंदिरांवर आक्रमण करून तिथं मशिदी बनवून किंवा मशिदींना चर्च मधे परावर्तित करून कोणताच धर्म वाढत नाही) हे सत्य जेव्हा लक्षात येतं तेव्हा श्रेष्ठत्त्वाच्या गप्पा फोल ठरतात.

अटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठा साम्राज्याचा सेनापती बाजीराव पेशवा ब्राम्हण होता आणि आजही जाणकार अफगाण लोक बाजीरावांना ' शेर का बच्चा ' म्हणून संबोधतात.
बाजीराव कधी गेला होता अटकेपार झेंडे रोवयला? तो तर रघुनाथराव होता ना? रघुनाथराव म्हणजे तोच ज्याने पुढे पुतण्याचा खून करवला. आणि "शेर का बच्चा" ला काही संदर्भ? की नवीन मनाचे श्लोक?

पानिपतच्या लढाईत मराठे हरले असेल तरी अब्दाली पुन्हा भारताच्या वाटेला आला नाही तो याच कारणासाठी, की त्यालासुद्धा इथे मुस्लिम धर्म विस्तारायची इच्छा नव्हती.
अतिशय चुकीची माहिती. इतिहास(खरा) परत वाचा. अब्दालीच्या पाचव्या खेपेस पानिपत युद्ध झालं. त्यानंतर तो तीन वेळा भारत दौऱ्यावर आला. म्हणजे टोटल आठ वेळा भारतावर आक्रमण केले.

https://en.wikipedia.org/wiki/Indian_campaign_of_Ahmad_Shah_Durrani

तुम्ही कुठल्या शाळेत मास्तर आहात का ओ? इतकी चुकीची माहिती इतक्या आत्मविश्वासने कशी काय देऊ शकता?

DJ.......
जाऊ द्या ना !
असतील आवडत टिंबं तुम्हाला पण आता आहेत तितकी बास की कशाला वाढवायचा अट्टाहास Wink Light 1
एस्टीचा धागा मिळेना झाला ह्या तुमच्या वाढीव टिंबांमुळे. मला नोड क्रमांक कळवाल का? जसा ह्या धाग्याचा ७९७७८ आहे.

असतील आवडत टिंबं तुम्हाला पण आता आहेत तितकी बास की कशाला वाढवायचा अट्टाहास >> नाही हो हर्पेन. मी नाही वाढवत टिंबं. वैनींनी अगदी लक्षपुर्वक माझ्या आयडीचे ग्रुमिंग केले आहे.. त्यांना धन्यवाद Biggrin

एसटीचा नोड शोधावा लगेल. सापडला की विपू करतो. Bw

@ झंपू दामलू

नीट वाचा, बाजीराव ' सेनापती ' होते असं मी लिहिलंय, ते स्वतः अटकेपार गेले अस नाही. रघुनाथ राव, शिंदे, होळकर, शमशेर बहादूर, गंगाधर तात्या, सखाराम बापू आणि नारो शंकर अशा मातब्बर सेनानींच्या समोर दिल्लीला अफगाण आणि रोहिले टिकू शकले नाहीत आणि अफगाण सैन्य अटक नदीच्या पलीकडे पळून गेलं हा इतिहास आहे.

बाळाजी बाजीराव हे छत्रपतींचे पेशवे होते, मराठा सैन्याचे ' सेनापती ' होते आणि मराठा साम्राज्यावर चहूबाजूंनी होत असलेल्या परकीय हल्ल्यांना थोपवून आपली जरब बसविणारे राजकारणी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वरील मोहीम आखली गेली आणि रघुनाथराव प्रत्यक्ष मोहिमेचे प्रमुख झाले.

आता राहिला प्रश्न अब्दालीचा...तिथेही मी काय लिहिलंय ते नीट वाचा. इतिहास असा आहे, की पानिपतच्या युद्धात अब्दालीला नवाब नजीब - उद - दौला आणि शुजा उद दौला या दोघा नवाबांनी ओढलं ते इस्लामच्या नावाखाली. मराठे दिल्लीवर चालून येत आहेत आणि बिगर - इस्लामी शक्ती दिल्लीच्या तख्तावर आरूढ होईल अशा पद्धतीने या दोघांनी अब्दालीला फूस लावली, पण प्रत्यक्ष लढाईत मराठ्यांचा पराक्रम आणि या दोघा लबाड नवाबांचा संधीसाधूपणा याचा अब्दालीला अतिशय चांगला अनुभव आला. त्या लढाईनंतर त्याने ' मुस्लिम धर्माचा विस्तार आणि प्रसार ' या कारणासाठी कधीही भारताच्या दिशेला चाल केली नाही. केवळ पंजाब आणि आसपासचा भाग आपल्या हातून निसटून न जावा म्हणून त्याने साम्राज्याच्या रक्षणासाठी पुढच्या लष्करी मोहिमा आखल्या, ज्या आखण्यामागे शीख साम्राज्याचा उदय हाही एक महत्त्वाचा भाग होता. अब्दालीच्या पुढच्या मोहिमा आत्ता पाकिस्तानचा जो भाग आहे, तिथपर्यंत सीमित होत्या. शेवटच्या मोहिमेत त्याने मथुरा भागापर्यंत मुसंडी मारलीय पण ती अल्पजीवी ठरली.

पानिपताच्या युद्धानंतर त्याने मराठ्यांना लिहिलेलं पत्र -
" There is no reason to have animosity amongst us. Your son Vishwasrao and your brother Sadashivrao died in battle, was unfortunate. Bhau started the battle, so I had to fight back unwillingly. Yet I feel sorry for his death. Please continue your guardianship of Delhi as before, to that I have no opposition. Only let Punjab until Sutlaj remain with us. Reinstate Shah Alam on Delhi's throne as you did before and let there be peace and friendship between us, this is my ardent desire. Grant me that desire "

कृपा करून वाचा आणि मग ठरवा की लिखाण चांगलं आहे की वाईट!

बाजीराव कधी गेला होता अटकेपार झेंडे रोवयला? तो तर रघुनाथराव होता ना? रघुनाथराव म्हणजे तोच ज्याने पुढे पुतण्याचा खून करवला. आणि "शेर का बच्चा" ला काही संदर्भ? की नवीन मनाचे श्लोक?>>>>> झंपुकल्या तुझे बरोबर आहे. राघोबादादांनी अटकेपार झेंडे लावले. ते अटक आजही पाक- अफगाण सीमेवर आहे. मला वाटत मागे काही पत्रकारांनी तिथे भेट दिली होती.

Pages