हिरव्या मुगाचे अप्पे

Submitted by MSL on 30 July, 2021 - 11:34
hirvya mugache aape
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

2 वाटी हिरवे मूग
1 कांदा
10 लसूण पाकळ्या
आल्याचा तुकडा
5 हिरवी मिरची
कोथिंबीर
तेल
2 चमचे रवा
2चमचे तांदूळ पीठ
मीठ हळद चवीपुरते
खायचा सोडा चिमुटभर / इनो

क्रमवार पाककृती: 

1. मूग 6ते 8 तास भिजवून घ्यावे..
2. हे मग मिक्सर मध्ये वाटून घ्या वे...
3. ह्या मिश्रणात बारीक चिरून कांदा, आले कोथिंबीर. + +लसूण+ मिरची अशी पेस्ट, मीठ,हळद , रवा,तांदूळ पीठ हे मिक्स करून घ्यावे..
4. मिश्रण दाटसर करावे...जास्त पातळ नको..
5. अप्पे करायच्या आधी सोडा / eno घालावे...
6.लगेच अप्पे करण्यास घ्यावे..
7. झाकण घालून ठेवावे.. 3 ते 4 मिनटात अप्पे बघून , उलटून पुन्हा ठेवावे...अजून 2 ते 3 मिनिटांनी अप्पे तयार होतील..
8. टोमॅटो सॉस / चटणी/ दही सोंबत खावे...

वाढणी/प्रमाण: 
4 ते 5
अधिक टिपा: 

गरमच खावे..

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

हेच सगळे पदार्थ वापरून हिरव्या मुगाचे छोटे छोटे डोसे / धिरडी केली जातात. पण हे आप्पे करणं जास्त सोपं आणि चटचट होईल. अवडलीच रेसीपी.

छान