चविष्ट - यू ट्युब चॅनेल

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 July, 2021 - 05:28

नमस्कार मायबोलीकर.
आज एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत.
आज मायबोलीवर हे टाकताना खुप आपलेपणा वाटत आहे कारण माझ्या ब-याच रेसिपींना मायबोलीच्या वाचकांनी प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिले. एक नविन ओळख मायबोलीने दिली. मासे आणि रानभाजी दिसली की आम्हाला जागू आठवते हे अजूनही काही मायबोलीकर म्हणतात व त्याच्या रेसिपीबद्दल विचारायला फोन करतात तेव्हा जो आनंद होतो तो शब्दात नाही मांडता येणार. याच सगळ श्रेय मायबोलीला आहे. असेच प्रोत्साहन आमच्या चविष्ट चॅनेललाही मायबोली श्रोत्यांकडून मिळेल यात शंकाच नाही. सगळ्यांनी जरुर आमच्या चविष्ट चॅनेलला सब्सक्राईब करा तसेच येणा-या नविन रेसिपींवरही लाईक, कमेंट करा व आपल्या इतर मित्र परीवार, कुटुंबातील व्यक्तिंनाही शेयर करा. खाली आत्ता पर्यंत केलेल्या रेसिपीजच्या लिंक देत आहे.
चविष्ट - https://youtube.com/channel/UCZUKXjMnkZaGDrLSFRU3naQ

मटार पॅटीस - https://youtu.be/OLv5iyQwX68
आंब्याची कढी - https://youtu.be/aFv7F4aA_RE
Blue lagoon mojito - https://youtube.com/shorts/JuxoKbYEa0c?feature=share
रानभाजी कुर्डू - https://youtu.be/u5iXgtqu_9
व्हेज स्प्रिंग रोल - https://youtu.be/B8pFLgXcNl4
बोंबिल फ्राय - https://youtu.be/MNaQIABvkSY
रानभाजी - कुलू/फोडशी - https://youtu.be/TT2Xr9tERoo
कांदा भजी - https://youtu.be/eeGljj7MjgE
सेजवान पोटॅटो - https://youtu.be/MIjqz2KKufk
शेवळाची आमटी - https://youtu.be/mdmiKhKSkQA
करंदी - https://youtu.be/afzyEvjHIQg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त शुभेच्छा !
एक बोंबील फ्रायचा विडिओ पाहिलेला. छानच होता. बाकीचेही म्हणजे सर्व नाही तर माझ्या आवडीच्या पदार्थांचे बघेन आता निवांत.. Happy

अभिनंदन....
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हांला...!!

चैत्राली, विनिता, सुमित्रा, ऋन्मेष, रुपाली, धन्वन्ती, मामी, धनुडी, निर्मल, किट्टु सगळ्यांना मनापासून खुप खुप धन्यवाद.

खूप शुभेच्छा, जागु
तुला माबोलिवर बघुन छान वाट्ले, नक्कि सब्स्क्राइब करणार.

अभिनंदन
कांदा भजी वर reply दिलाय
इतरही video पाहते Happy

आसा, सतिश, मनिम्याऊ, अन्जू, प्राजक्ता, फिल्मी, सामो, अमा, च्यवनप्राश, सीमंतिनी, अमुपरी, रश्मी, जिज्ञासा, मनी, किल्ली सगळ्यांना खुप खुप धन्यवाद.
रश्मी :))
सिमंतोनी - नक्की विचार करु तुमच्या सजेशनचा.

अभिनंदन!
कांदाभजीचा व्हिडियो पाहिला. अजिबात फापटपसारा , नमनाला घडाभर तेल असणारी कॉमेंट्री नाही हे आवडलं.
इंग्लिश सबटायटल्स आणखी चांगले होऊ शकले असते.
उदा : मिश्रण थोडे थोडे कढईत सोडा Leave the mixture in oil in small quantities
ऐवजी Drop small portions of the mixture in hot oil
पुढच्या फ्रेममध्येही.
तसंच सगळ्या जिन्नसांची आणि पदार्थांची नावं इंग्लिशमध्ये हवीत.

हर्पेन धन्यवाद.
भरत धन्यवाद. पुढच्या व्हिडिओच्यावेळी ही टीप नक्की लक्षात ठेऊ.

अभिननंदन जागूकाकी Bw

या सगळ्या लिंक्स वर जाऊन अप्रतिम चवीच्या डिशेस बनवताना बघणं म्हणजे पोटात भुकेने खड्डा पाडुन घेणं हा नवीन अनुभव मिळाला Biggrin

हार्दिक अभिनंदन!!!
मी चॅनेल सब्सक्राईब केलं आहे.
चॅनेलला अगणित सब्सक्राईबर आणि लाईक्स मीळोत ह्यासाठी शुभेच्छा !!!!

देवकी, ssj, DJ, king of net तुमच्या अशाच्या शुभेच्छा कायम राहोत. खुप खुप धन्यवाद.

खुप खुप अभिनंदन !!!
मी चॅनेल सब्सक्राईब केलं आहे, अन इतरांना शेअर ही करत आहे.
सर्व मास्टर शेफना शुभेच्छा.

अरे वा
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
लवकरच 10k सबस्क्राईबर होऊ देत

चॅनल ला सबस्क्राईब केलं आहे.

व्हिडीओ बघतेय, रानभाजी किंवा पालेभाजी कशी ओळखायची ते पण सांगा. बऱ्याचदा ओळख पटवणे कठीण होते

Pages