अतृप्त वासना (गूढकथा)

Submitted by करभकर्ण on 3 July, 2021 - 13:05

अतृप्त वासना (गूढकथा)

तो त्या झोपडीत, अर्धवट तुटलेल्या आरशात नेहमीप्रमाणे स्वतःला बघण्यात गुंग होता. ही त्याची नित्यानेमाची सवय होती. काही वेळ आरशात पाहिल्याशिवाय त्याला स्वस्थता लाभत नसे. पण एक गोष्ट होती. अगदी नित्य व्यवहारापेक्षा अगदी उलट होती. माणूस स्वतःचे सौंदर्य पाहायला आरशात स्वतःला न्याहळतो, पण हा मात्र स्वतःचा तो कमालीचा कुरूप चेहरा आरशात, दिवसातून एकदा तरी मन लावून बघत असे. एक प्रकारचे स्वतःचे अघोरी समाधान करून घेत असे.
                       तो अतिशय बेढब दिसे. वरच्या मस्तकासून ते तळपयापर्यंत एकही अवयव सुडौल असा नव्हताच. जन्मतःच डावा डोळा अधू होता. त्या ठिकाणची खोबणी खोल गेलेली होती. जणू कोणीतरी मोठ्या ताकदीने त्यावर ठोस मारला असावा. आणि त्याच्या दाबाने ती आतापर्यंत गेलेली असावी. चेंदामेंदा झाल्यासारखा तो डावा डोळा अतिशय बीभत्स दिसायचा. त्याच्यात भर म्हणून की काय, त्या डोळ्यावरची भुवई पार नाहीशी झालेली होती. त्यामुळे त्या कुरुपतेत अजुन भर पडली होती. वर्ण काहीसा सावळा. पण तो सामान्य त्वचेसारखा सावळा जाणवत नव्हता. त्यात काहीसे हिरवेपण जाणवत होते. अगदी काळया हिरव्याचे मिश्रण केल्यासारखी त्याची त्वचा नजरेस पडत असे. शरीर काहीसे स्थूल. पोटाचा घेर वाढलेला. चालताना तो भाग लदालदा हलायचा. आणि अशातच तो काहीसा लंगडत चालायचा. पायाला हिसका देऊन प्रत्येक पाऊल टाकायचा. बहुदा हे लंगडेपण जन्मल्यानंतर, काहीतरी अपघाताने आले असावे. आणि ते आता कायमचेच त्याच्या वाट्याला आले असावे.
                         अंगात भगवी कफनी असल्याने तो अती विचित्र दिसायचा. डाव्या खांद्यावर त्याच रंगाची झोळी असल्याने त्याच्या कपड्यात ती झोळी बेमालूमपणे मिसळून जायची. ती झोळी त्याच्या पोटा पाण्याची साधन होती. रोजचे चार घरे मागून तो आपली भूक भागवायचा. आणि रात्र झाली, की आपल्या या झोपडीत विश्रांती घ्यायचा.
                         त्याला विशेष असा कुठला नाद नव्हता. पण या तुटक्या आरशासमोर काही वेळ स्वतःला बघण्यात त्याला कदाचित आनंद वाटत असावा. त्याने ते स्वतःचे कुरूपपण स्वीकारले असावे. म्हणून तर तो असा रोज रोज स्वतःला आरशासमोर उभा करत असेल. तासनतास स्वतःच्या त्या अंगाकडे बघत असेल. त्याला त्याने समाधान लाभत असेल. तो त्याच्या त्या रुपावर नाराज मुळीच नव्हता. पण एक खंत मात्र त्याला नेहमी जाणवायची. त्याच एका गोष्टीचा त्याला त्रास व्हायचा.
                   त्याच्या त्या कुरूप दिसल्यामुळे त्याला नेहमी मनस्ताप भोगावा लागे. कोणी त्याला जवळ उभा करत नसे. तो समोर दिसला की, माणसे वाट बदलत. कधी कोणाच्या घरी भाकरी मागायला गेला की, माणसे त्याला हाकलून लावत. किंवा, मग पटकन काहीतरी देऊन त्याची त्वरित बोळवण करत. त्यामुळे तो एकटा पडत असे. त्यावेळी त्याला स्वतःच्या कुरूपपणाचा भलताच राग यायचा.
                      तो स्वभावाने शांत असला तरी, कधी कधी स्वतःवरचा ताबा सुटून जायचा. कधीतरी मनस्ताप एवढ्या टोकाला जायचा की, तो ढसाढसा रडायचा. स्वतःला अपराधी समजायचा. पण या गोष्टींपुढे काही इलाज नाही, हे समजले की मग पुन्हा शांत होऊन, आपल्या उद्योगाला लागायचा.
                       वयाची तीस वर्षे पूर्ण झाली होती. पोटाच्या भुकेबरोबर कधी कधी शरीराची भूकही वर उफाळून यायची. ती कधी सहनशक्तीच्या पलीकडे जायची. पोटाची भूक भागायची, पण शरीराची मात्र कधीच भागली नाही. त्याचमुळे कधी कधी तो हापापलेल्या नजरेने इकडे तिकडे बघे. गावात कधी झोळी घेऊन मागायला गेला की, घरातील तरुण स्त्रियांकडे तो हपापलेल्या नजरेने बघे. त्याचे सर्वांग शहारून उठत असे. स्त्री सुखाची लालसा मनात उत्पन्न होत असे. पण त्याला कोठून ते सुख मिळणार? त्याला कोणी साधा जवळ पण उभा करत नसे, मग त्याला बाहुपाशात घेण्याचा विचार कोण करेल? त्याने प्रत्येकवेळी ती भूक आतल्या आत दाबली होती. तिला कधी स्वैरपणे उधळू दिले नव्हते.
                             आज सकाळपासूनच त्याला उदास वाटत होते. वातावरणात भकासपणा जाणवत होता. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. पण झोळी घेऊन बाहेर पडावे, असे त्याला मुळीच वाटेना. झोपडीतून बाहेर जाण्याची इच्छाच होत नव्हती. अंग काहीसे गरम जाणवायला लागले होते. पण त्याचा अर्थ अंगात ताप होता असे नाही. ते दुसऱ्याच कारणाने गरम झाले होते हे त्याला माहीत होते. त्याचा हात अनाहूतपणे झोळीत गेला. काल रस्त्याच्या कडेला सापडलेला कागद त्याने बाहेर काढला. कालपासून याच कागदाकडे त्याने शंभरवेळा तरी पाहिले असेल. कागद हातात पडल्यापासून त्याची अन्नावरची वासना उडाली होती. कशातच मन लागत नव्हते. लक्ष सतत त्या कागदावरील त्या उन्नत नग्न स्त्रीकडे जात होते. तिचा एक एक अवयव त्याच्या मनात वासनेचे धक्के देऊन जात होता. तिचे ते निर्जीव  वक्षस्थळ त्याची नजर कैद करत होते.  त्याने कितीतरी वेळा त्यावरून हात फिरवला होता. डोळे बंद करून तो स्पर्श मांसल लागावा, अशी मनोमन प्रार्थना केली होती. पण नेहमी फक्त कोरडी भावना शरीरभर उमटून जात होती. प्रत्येक वेळी त्याला पाहताना सर्वांग ताठरून जात होते.
                                 त्याने आताही तो कागद बाहेर काढला. ते कागदावरचे चित्र डोळ्यासमोर धरले. रात्रीसारखीच पुन्हा ती संवेदना सर्व शरीरभर पसरून गेली. त्याला कसेतरी झाले. तो बराच वेळ त्या चित्राकडे बघत राहिला. शेवटी भावनांचा जोर ओसरल्यावर त्याने ते चित्र पुन्हा झोळीत ठेऊन दिले. तो काहीसा पूर्वपदावर आला. तसाच तो आरशासमोरूनही बाजूला झाला.
                    सूर्य डोक्यावर आला होता. या वेळेला तो गावातून भिक्षा मागून झोपडीत आलेला असतो. पण आज तो झोपडीबाहेर पडलाच नव्हता. आता भुकेची जाणीव होऊ लागली. रात्रीपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. शरीराच्या भुकेसमोर पोटाची भूक काही काळ दबली होती, पण शरीराची भूक आता मागे सारली होती. आणि पोटाची भूक वेगाने पुढे आली होती. खाण्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार होता. पण त्यासाठी एकच पर्याय होता. झोळी घेऊन चार घरे मागणे. मिळेल ते पोटात घालणे.  आता वेळ घालवण्यात काही अर्थ नव्हता.
                      त्याने झोळी एकवार ठीकठाक केली. झोपडीचे दार ओढून घेतले आणि तो आपल्या लंगड्या चालीत गावात निघाला. त्याची झोपडी गावापासून थोडी दूर होती. सूर्य माथ्यावर आला होता. ढळढळीत दुपार जाणवत होती. उन्हाने वातावरणात प्रवेश केलेला होता. तो संथ चालत असल्याने त्याला उन्हाचे चटके चांगलेच जाणवत होते. त्याने चालण्याचा वेग थोडा वाढवला. आता भूक वाढली होती. 
                        तो गावात आलं दुपारची वेळ असल्याने बऱ्याच घरांची दारे बंद होती. तो एका बंद दाराजवळ आला. बाहेरूनच मोठ्याने आवाज दिला,
                       “बाई, काहीतरी खायला दे!
                         सकाळपासून भुकेला आहे.”
बहुदा त्याची हाक घरातल्या व्यक्तींना ऐकू गेली नसावी. त्याने पुन्हा चढ्या आवाजात हाक दिली. तरीही कोणी दरवाजा उघडून बाहेर आले नाही. त्याला याची सवय असावी. त्याला काही विशेष वाटले नाही. तो तसाच पुढे होत, पुढच्या दाराजवळ गेला. तिथेही पुन्हा तशीच हाक दिली. पण तिथेही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आता त्याला राग येऊ लागला. चिडचिड होऊ लागली. वरच्या उन्हाचा चटकाही वाढू लागला. उशीर केल्याचा त्याला पश्चात्ताप होऊ लागला.
                       तो पुन्हा थोडासा पुढे आला. पुढच्या घराचे दार उघडे दिसले. थोडेसे ओढून घेतलेले होते. त्याला हायसे वाटले. येथे काहीतरी मिळेल, असे त्याला वाटले. त्याने आशाळभूतपणे ती हाक दिली.
                      “ बाई, काहीतरी खायला दे!
                         सकाळपासून भुकेला आहे.”
थोडा वेळ गेला. घरातून कोणीतरी येत आहे, असे वाटले. त्याच्या डोळ्यात चमक आली होती. दारात एक स्त्री हातात भाकरी घेऊन उभी होती. त्याचे लक्ष तिच्याकडे गेले. भाकरी पाहून त्याला आनंद झाला. आणि त्याचवेळी थोडे वरती पाहिल्यावर त्याला भाकरीपेक्षा जास्त तिच्या चेहऱ्याचा मोह अधिक झाला. एकाच वेळी त्याच्या मनात त्या दोन भावनांनी दाऊद केली. सरसर करत त्या दोन भावना वर उचंबळून आल्या. पण पोटाच्या भुकेपेक्षा शरीराची भूक वरचढ ठरली. तो आसुसल्या नजरेने त्या तरुण स्त्रीकडे बघू लागला. त्या चित्रातली नग्न स्त्री त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेली. त्याची ती नजर त्या स्त्रीला जाणवली असावी. त्याला येथून लवकर घालवावे म्हणून तिने गडबडीने त्याच्यापुढे ती भाकरी केली. तो तिच्या त्या कृतीने भानावर आला. तो पुढे झाला. तिच्या हातातील भाकरी घेऊ लागला. आता त्याच्या डोळ्यांसमोर केवळ तो उन्नत, नग्न देह होता. त्याच्या अंगात वेगाने एक वखवखलेली भावना उमटून गेली. स्वतःवरचा ताबा काही क्षणासाठी बाजूला झाला. आणि त्याच भरात त्याने तिचा पुढे केलेला हात कधी पकडला हेच त्याला समजले नाही.
                  ती स्त्री जोरजोरात ओरडू लागली. तेव्हा तो भानावर आला. त्याला आपण केलेल्या त्या कृतीचा बोध झाला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. जवळच्या पारावरचे सात आठ माणसे, तरुण तेथे जमा झाले होते. आणि त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली होती. तो धडपडून त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाऊ लागला. झोळी तुटली होती, कपडे फाटले होते, पण तरीही तो पुढे पळत होता. ती माणसे पाठीमागून त्याच्यावर दगड भिरकावत होते. ते दगड चुकवत तो पुढे पळत होता, पण एक दगड वेगाने येत त्याच्या पाठीवर आदळला होता. त्याची वेदना वेगाने मेंदूपर्यंत गेली होती. तरी ती वेदना तशीच दाबत तो झोपडीकडे पळत होता.
                            मागचा जमाव दिसेनासा झाल्यावर तो थोडासा थांबला. एका झाडाच्या आडोशाला त्याने बस्तान मांडले. अंग चांगलेच चोपले होते. ते ठणकत होते. पण त्या अंगाच्या वेदनेपेक्षा, त्याला त्या मनास्तापाची वेदना जास्त छळू लागली. त्याची स्वत:वरच चरफड होऊ लागली. कुठलेतरी जुने पाप घेऊन आपण जन्माला आलो आहोत. त्यामुळेच असे प्रसंग आपल्या वाट्याला येत आहेत, ही जाणीव त्याला सतावू लागली.
                       तो कसातरी आपल्या झोपडी पर्यंत आला. तो प्रचंड थकलेला होतं पोटात भुकेचा डोंब उसळला होता. डोक्यात तीव्र राग दाटून आला होता. स्वतःच्या हतबलतेचा त्याला तिरस्कार वाटू लागला. पण एक गोष्ट त्याला माहित होती, आपण कितीही क्रोधाने पेटून उठलो तरी काय करू शकणार होतो? काहीच नाही. तो तसाच अंथरुणात पडून राहिला. विचार करून करून मेंदूला ग्लानी आली होती. त्याच भरात कधी झोप लागली कळालच नाही.
                      पोटात भुक जास्तच जाणवत होती. आता रात्रही झाली होती. त्यामुळे आपल्याला कोणी पाहणार नाही, घडलेला प्रसंग लोक विसरले असतील. गाव मोठा असल्याने गावाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन काहीतरी मागू, असा विचार करत तो पुन्हा गावात निघाला. गावचा पसारा चांगला मोठा होता. तालुक्याचे ठिकाण असल्याने लोक झालेल्या गोष्टी विसरून कामात दंग होते. दोन तीन घरातून त्याला काही काही खायला मिळाले. एका ओट्यावर बसून त्याने ते अधाशीपणे खाऊन टाकले. मन काहीसे शांत झाले होते. त्याला बरे वाटले. दुपारचा क्रोध, मनस्ताप, तिरस्कार कमी झाल्यासारखा वाटला. त्याला उगीचच स्वतःवर हसायला आले. माणसे एवढीही वाईट नाहीत, जेवढी आपण समजत होतो. समाज आपल्याला उपाशी मरू देत नाही. म्हणून उगीच माणसांचा तिरस्कार का करायचा? तो जरा अशा चांगल्या विचारात हरवून गेला. 
                         रात्र काहीशी वर आली होती. सामसूम सगळीकडे पसरली जात होती. रस्ते रिकामे झाले होते. अंधाराचा काळा पडदा हळू हळू सगळीकडे पसरला होता. एका गल्लीतून तो आपल्या संथ चालीत पुढे जात होता. मनात नाना विचार पिंगा घालत होते. आणि तेवढ्यात ती हालचाल त्याला जाणवली. स्वतःच्या पलीकडच्या पायवाटेने कोणीतरी चालत आहे, असा काहीसा त्याला भास झाला. त्याला भीती वाटली. दुपारचा प्रसंग डोळ्यांसमोर आला. पुन्हा कोणीतरी मारायला तर येत नाही ना? असा प्रश्न मनात उमटून गेला. तो काहीवेळ जागेवरच उभा राहिला. श्वास रोखून धरला.
                     त्या पायवाटेची तो चाहूल घेऊ लागला. पायवाटेवरून खरेच कोणीतरी चालत होते. त्याची उत्सुकता चाळवली गेली. या अशा वेळी या आडमार्गाच्या पायवाटेवरून कोण चालत असेल? तो थोडासा पुढे झाला. पायवाटेकडे नजर टाकू लागला. मंदसा अंधार पायवाटेवरून गेला होता. परंतु अंधुक दिसत होते. पायवाटेवरून कोणीतरी चालत होते, हे नक्की! तो अजुन पुढे झाला. त्याला नवल वाटले. सोबतच थोडीशी भीतीही जाणवली. एक स्त्री त्या पायवाटेवरून पुढे जात होती. तरुण असावी ती. तिच्या हालचालींवरून ते लक्षात येत होते. ती कदाचित हुंदके देत असावी. सारखा तोंडाला पदर लावत होती. हो! हो!! ती हुंदकेच देत होती. रडत होती. त्याला आश्चर्य वाटले. या अशा अंधाऱ्या रात्री कोण स्त्री अशा आडवाटेने जात असेल? तेही रानाच्या दिशेने! पुढे सगळे रान पसरलेले होते. त्याला नवल, भीती, उत्सुकता एकच वेळी वाटल्या. तो हळू पावलांनी तिचा पाठलाग करू लागला. प्रथम तर त्याला वेगळीच शंका आली. काही अमानवीय प्रकार वाटला. पण तसे नसेल. कारण, त्या गोष्टीचं त्याला मान्य नव्हत्या.
                  तो विचारच करत चालला होता. आणि अचानक ते घडले. प्रथम धपकन असा आवाज आला. मग पाणी उडल्याचापघोपत आवाज आला. आणि तो खाडकन विचारातून जागा झाला. तो दुडक्या चालीने त्या विहिरीकडे धावू लागला. पण चालायला वेग येत नव्हता. पावलांना लांगड्यापणाच्या मर्यादा येऊ लागल्या. त्याला आता त्या अधुपणाचा संताप येऊ लागला. त्याला विहिरीजवळ पोहोचायला थोडा कालावधी लागलाच. पण तोपर्यंत ती पाण्यात गटांगळ्या खात होती. विहिरीला पायऱ्या होत्या. त्याने काही विचार केला नाही. तो एक एक पायरी खाली उतरत होता. पण इथेही वेळ लागत होता. त्याची तडफड  होऊ लागली. पण त्या तडफडीचा काही फायदा झाला नाही. तिची हालचाल शांत झाली होती. तिची धडपड संपली होती. तो शेवटच्या पायारीपर्यंत आला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याला कसेतरी झाले. तिचा देह वर पाण्यावर तरंगू लागला. तिने जीव दिला होता. तो देह हळू हळू पाण्यावर तरंगत पायऱ्यांच्या दिशेने येऊ लागला. तो अगदी त्याच्या पायाजवळ आला. त्याने हळूच तिच्या हाताला धरले. जोर लावून तिला वर पायरीवर खेचून घेतले. तसेच अलगद तो देह उचलून तो हळूहळू विहिरीच्या वाद येऊ लागला. त्याला अशा वाटत होती. त्याने तिला वर आणले. विहिरीच्या काठावर तिला ठेवले.
                    त्याने तिला मित पाहिले. तिचा श्वास बंद झाला होता. ती मृत झाली आहे हे त्याला कळून चुकले.  त्याला वाईट वाटले. तो हळहळला. आणि प्रथमच त्याची नजर तिच्या त्या मृत देहावरून शांतपणे फिरू लागली. ती पंचविशीची असावी. विवाहित वाटत होती. दिसायला आकर्षक असेल. मृत झाली तरी शरीर अजूनही आकर्षक दिसत होते. सगळे अंग ओले झाल्याने तिचे वस्त्र अंगाला चिकटले होते. त्यातून सगळे अवयव ठळकपणे नजरेसमोर येत होते. नेमकी मृत झाल्याने त्यांचे आकुंचन झाले नव्हते. त्याने खूप प्रयास केले, तिला तो असा पाहू शकत नव्हता. त्याची सदसद्विवेकबुद्धी अजूनही शाबूत होती. तो मनाला आवर घालत होता. स्वतःला परावृत्त करत होता. पण नजर पुन्हा पुन्हा तिच्या त्या ओल्या देहावरुन फिरत होती. ती समोर निपचित पडली होती. तिची हालचाल तरी कुठून होणार?
              मनात नाना विचार पिंग घालत होते. मनात द्विधा माजली होती. आता त्याला त्याच्या नजरेसमोर तो कागद आला, त्या कागदावरील ती  नग्न स्त्री आली. दुपारची ती भाकरी वाढणारी बाई आली. त्याची सदसद्विवेकबुद्धी ढासळू लागली. मनाचा विरोध तोकडा पडू लागला. त्याची वासना शरीरभर जोरजोरात धडका मारू लागली.
          “तू कुरूप आहेस. बेढब आहेस. बीभत्स आहेस. तुला कोणी स्पर्श करू देणार नाही. तुझी वासना कधीच शमणार नाही. तुला आयुष्यभर स्त्री स्पर्श लाभणार नाही. हे ध्यानात ठेव. तुझा निर्णय आता तुलाच घ्यायचा आहे. “ मनात आता विकृत विचार डोकावूं लागले. त्यांनी मन, मेंदू काबीज करायला सुरुवात केली. आणि काही कळायच्या आत तो खाली वाकला. त्या स्त्रीच्या देहावर झुकला.
                       कितीतरी वर्षांपासूनची त्याची वासना शमली होती. भावनाना वाट सैल झाली होती. शरीर हलके झाले होते. मनाला, अवयवाला तृप्तता लाभली होती. तो कमालीचा शांत झाला होता. अघोरी मार्गाने का असेना पण शांतता तर लाभली होती ना?
                     तो तृप्त मनाने आपल्या झोपडीकडे जाऊ लागला. शरीर तृप्त झाले याचा आनंद मानावा की ते शरीर टोकाच्या अघोरी मार्गाने तृप्त झाले आहे याचा खेद वाटावा या द्विधा अवस्थेतून तो आता बाहेर आला होता. त्याला एका गोष्टीची जाणीव झाली होती, आपली शारीरिक भूक अशाच कुठल्यातरी आडवाटेने पूर्ण झाली असती. सरळ मार्गाने स्त्री देह आपल्या नशिबात कुठे होता? त्याला नशीब बलवत्तर लागते. आपल्या सारख्या भगवी झोळी घेऊन फिरणाऱ्या कंगाल माणसाला कसले आलेय स्त्री चे सुख? त्यामुळे जे आज मिळाले, त्याचा आनंद मानावा. कशाला नसता खेद करत बसावे? कित्येक वर्षांपासूनची ही शरीराची भुक आतल्या आत आपण मारणार होतो. कधी त्याचा आंतरिक स्फोट झाला असता तर? वेडे झालो असतो आपण! कदाचित दैवयोगाने च गे असे आपल्या सोबत घडले असेल.
                     आज दुपारचा तो अपमानजनक प्रसंग. त्या सकाळच्या नग्न फोटोमुळे आपली चाळवलेली वासना. त्या वासनेपायी दुपारी त्या स्त्रीच्या हाताला केलेला तो हपापलेला स्पर्श, त्यानंतर शरीराला आणि मनाला प्रचंड वेदना देणारा तो लोकांचा मार. या सगळ्या घडामोडींनी सर्व मनोव्यापार ढवळून निघाला होता. सगळे जग आपल्या विरोधी असल्यासारखे वाटत होते. पोटासाठी, शरीरासाठी नुसता झगडा करावा लागत होता. साध्या पोटासाठी वणवण भटकावे लागत होते. शरीराचा तर विचार सोडून द्यावा लागत होता. आत्तापर्यंत केवळ पोटाच्या आणि शरीराच्या द्वंद्वात वेळ निघून जायचा. क्षणाक्षणाला पोटासोबतच शरीराची भूक उफाळून वर यायची. शरीरभर ती धडक द्यायची. शेवटी कित्येक धडका मारून ती मलूल होऊन माघार घ्यायची. पण आता या क्षणी तसे वाटतं नव्हते. ती शारीरिक भुक आता एका तृप्त अनुभूतीने शांत झाली होती. गेल्या कित्येक वर्षांची ती घुसमट बाहेर पडली होती.
                तो तिचा समोर पडलेला ओलसर देह, नुकताच तो पाण्यातून काढला असल्याने तो कमालीचा आकर्षक दिसत होता. तिचे एक एक अवयव ठळकपणे नजरेसमोर येत होते. तिच्या ओल्या अंगावर खाली झुकलो तेव्हा तिच्या अंगाचा तो ओळ गार स्पर्श, हो! तो ओला गारच होता. अगदी थंड.  शरीरभर असलेली ती गार अनुभूती सरसर करत पसरली गेली होती. ती अनुभूती हाडे गोठविणारी निश्चित नव्हती. पण अंगाचे तापमान मात्र निश्चित खाली आणणारी जाणवली. अगदी हळूहळू खाली आणणारी. पण तो प्रश्न अजूनही त्याला सतावत होता. तिच्या त्या अंगाचा ओला गार स्पर्श तिच्या त्या ओलसर देहाचाच होता का? की अंगातील चैतन्य नाहीसे झाल्याने निपचित पडलेल्या मृत देहाचा होता? पण त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात त्याला काही स्वारस्य नव्हते. जे झाले ते त्याच्या मनासारखे झाले होते.
             त्याला आता तो ओला गार स्पर्श कमालीचा आवडला होतं त्याची ती थंड शिरशिरी त्याला प्रचंड भावली होती. ती निपचित असल्याने, कुठला विरोध नसल्याने त्याला मनसोक्त तृप्त होता आले होते. तिच्या देहाचा तो निपचितपणा, निश्चितपणाही त्याला कमालीचे सुखावणारा भासला होता.भले हालचालींनी आवेग कित्येक पटींनी वाढत असला तरी, इथे मात्र त्याच निश्चितपणाने तो बेभान झालेला होता. ते सगळे समीकरण त्याच्या मेंदूत आता ठळकपणे साठवले गेले होते. तो ओला गार स्पर्श, तो निपचितपणा, तो मृत देह या गोष्टी मेंदूत घट्ट झाल्या होत्या. आता त्या हव्या हव्याशा जाणवत होत्या. त्यांची पुनरावृत्ती करण्याचे संकेत मेंदूतून बाहेर पडत होते. त्याने ते सगळे डोक्यातून हटवले आणि झपाझप चालत तो झोपडी जवळ करू लागला.  आज कितीतरी दिवसानंतर तो निवांत झोपला असेल. सकाळी उठण्याची त्याने अजिबात घाई केली नव्हती. रात्रीच्या त्या तृप्तीची अनुभूती अजूनही शरीरात संचारत होती. नेहमीप्रमाणे तो उठला. आरशासमोर उभा राहिला. त्या आरशात आपले बेढब शरीर न्याहाळत राहिला. त्याला मोठा आनंद वाटू लागला. बराच वेळ त्याचा तो उद्योग सुरू राहिला. हळूहळू दिवस वर जात होता.
                 ढळढळीत दुपार झाली होती. तो अजूनही आपल्या झोपदिबही पडला नव्हता. हळूहळू भुकेचा डोंब पोटात पडत होता. त्याला आता भुकेची जाणीव व्हायला लागली होती. रात्रीचा तो जोर आता ओस पडत चालला होता. ती अनुभूती कमी होत होती. परिस्थिती पहिल्यासारखी पुर्वावत होऊ लागली. त्याला स्वतःच्या कंगाल पणाची जाणिव होत होती. त्याला कसेतरी झाले. पुन्हा आता पहिल्यासारखे अनुभव वाट्याला येणार आहेत, ही जाणीव च त्याला दुःख देऊन गेली. गावात जाऊन पुन्हा चार घरी खायला मागणे, त्याला जिकिरीचे वाटू लागले. कालपासून त्याच्या मानसिकतेत कमालीचा बदल झाला होता. पण त्या बदलाला काही अर्थ होता का? काहीच अर्थ नव्हता. कालची गोष्ट अपघाताने त्याला भेटली होती. ती पुन्हा वाट्याला येईल, याची शक्यता नव्हती. त्यामुळे तशा गोष्टींचा अती लोभ धरणे मूर्खपणाचे ठरणार होते.
                 अनेक विचार त्याच्या मनात रेंगाळत होते. भूक आता असह्य होत चालली होती. त्याने झोळी उचलली आणि तो गावात निघाला. उत्तरेकडच्या एका मोठ्या गल्लीत शिरून त्याने चार घरी भाकरी तुकडा मागितला. तेथेच एका ओट्यावर बसून त्याने तो भाकरी तुकडा खाल्ला. त्याला बरे वाटले. मन काहीसे शांत झाले.
               एका. ओट्याच्या मागच्या झाडाच्या खोडावर डोके ठेऊन त्याने डोळे मिटले. त्याला स्वस्थता वाटली. आणि मनात तो रात्रीचा प्रसंग रेंगाळत आलातिचा तो ओला देह सरसर करत नजरेसमोर आला. सोबतच वासना वर उफाळून आली. आता त्याला त्याची एक एक कृती आठवू लागली. तिचा एक एक मांसल अवयव ठळकपणे त्याला पुढे दिसू लागला. त्याच्या त्या हालचाली, तेव्हाचा त्याचा तो अधाशीपणा सगळा काही आता मनात स्पष्टपणे जाणवू लागला. त्याची वासना चेकाळून गेली. त्याला कसेतरी होऊ लागले. सगळे अंग टाठरून गेले होते. तो काहीसा सैरभैर झाला होता. त्याचे चित्त हरवल्यासारखे झाले. त्याला स्वस्थता लाभेना.  तो ताडकन जागेवरून उठला. आता पोटाची झाली, पण शरीराच्या भुकेचे काय? तो तसाच उठून त्या भर उन्हात गावात निघाला. वर उन चांगलेच तापले होते. दुपारची वेळ असल्याने रस्ते, गल्ल्या एकदम सूनसान जाणवत होत्या. आणि तशा उन्हात तो रस्त्यावरून फिरत होता. एक एक गल्ली फिरत होता. खरेतर त्या वरच्या उन्हाचा त्याला बराच त्रास जाणवत होता. अंग चांगलेच तापले होते. पण त्याला त्याची पर्वा वाटत नव्हती. वरच्या अंगापेक्षा त्याचे आंतरिक शरीर कितीतरी पट तापले होतें तो सैरावैरा झाला होता. वासनेचा डोंब सर्व शरीरभर वेगाने दौडत होता. तो नेमके काय शोधत होता हे त्याला माहीत नव्हते. पण तो रस्त्यावरून, गल्ल्यातून नुसताच फिरत होता. त्याला आता वासनेने ग्रासले होते. कालच्या सारखा अपघात आजही होईल, कदाचित हीच आशा त्याला वाटत असावी.
            आता तो थकला होता. उन्हाने सगळे अंग तापले होते. घामाच्या धरा सर्व अंगावर पसरल्या होत्या. पण तरीही तो इकडून तिकडे, या रस्त्यावरून त्या रस्त्यावर फिरत होता.
            एक मोठी गल्ली ओलांडून तो मुख्य रस्त्यावर आला. या रस्त्यावर तुरळक गर्दी होती. काही वाहने रस्त्यावरून इकडून तिकडे वेगाने जात होती. दूरपर्यंत ररस्त्यावर भकासपणा जाणवत होता. तो त्या मुख्य रस्त्यावर आला. आशाळभूत नजरेने जाणाऱ्या मोठ्या वाहनांकडे बघू लागला. आणि अचानक ते दृश्य त्याला दिसले. एक तरुणी सायकलवरून जात होती. अचानक काहीतरी झाले आणि ती सायकलवरून खाली पडली. पडल्यामुळे डोक्याला लागले असावे. ती त्यामुळे बहुधा बेशुद्ध पडली असावी. रस्त्यावर वर्दळ नसल्याने तिच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाहीं
               त्याच्या डोळ्यात चमक आली. तो लगबगीने आपल्या दूडक्या चालीत ती तरुणी पडली त्या जागेकडे गेला. तरुणी खाली पडली होती. उन्हाने सगळ्या अंगभर घाम पसरला होता. तिच्या त्या घामाने भिजलेल्या अंगाकडे तो आशाळभूत नजरेने बघू लागला. डोळ्यात लालसा दाटून आली त्याच्या. हापापलेल्या नजरेने तो तिच्या सर्वांगावरुन नजर फिरवू लागला. त्याची काम वासना डोळ्यातून स्पष्ट दिसू लागली.  त्याने इकडे तिकडे नजर टाकली. रस्ता सुनसान होता. त्याला बरे वाटले. आसुरी आनंद मनात वाटून गेला. तो तिच्या शरीराला स्पर्श करण्यासाठी खाली वाकला च होता की, काही गलका त्याच्या कानावर आला. नऊ – दहा  माणसे त्याच्याकडेच येत होते. कोणीतरी जोरजोरात बोलत होते.
                      “ अपघात झालाय. ती तरुणी बहुधा सायकलवरून पडली आहे.” असे म्हणत तो सगळा घोळका त्याच्या आणि त्या तरुणीच्या दिशेने येऊ लागला. घोळका अगदी जवळ आला. तो जरासा मागे सरकला. घोळक्यातील एकाने तिच्या तोंडावर पाणी मारून तिला उठवायचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळानंतर ती तरुणी शुद्धीवर आली.
                          हा तसाच त्या गर्दीपासून मागे सरकला. त्याची तडफड होऊ लागली. तो चरफडत त्या गर्दीकडे बघू लागला. दैवयोगाने आजही त्याला ती सांधी भेटणार होती. पण या हरामखोर लोकांमुळे ती सांधी हुकली होती. तो मनातल्या मनात प्रचंड संतापला होता. क्रोधाने तो त्या गर्दीतल्या माणसांकडे बघू लागला. वासनेने सर्व शरीर कधीच काबीज झाले होते. त्यात आत्ताचा हा प्रचंड संताप. त्याचे सर्व शरीर थरथर करू लागले. त्या गर्दीच्या आरपार जात त्याची ती नजर त्या तरुणीवर खिळली होती. त्याला तिचे ते शरीर खुणावत होते. पण त्याला काहीच करता येत नव्हते. केवळ हताशपणे तो तिच्याकडे बघत होता.
दिवसभर ज्या एका गोष्टीसाठी तो फिरत होता, ती गोष्ट अशी हातातून निसटल्याने  त्याला कसेतरी होत होते. हात तोंडाशी आलेला घास असा निसटून गेला होता. त्याची वासना आता त्याच्या डोक्यात जमा होऊ लागली. त्याला काय करावे काही कळेना.
                  ती तरुणी उठली होती. सायकल घेऊन पुढे निघून गेली होती. तिच्याभोवती होती ती गर्दीही आता पांगली होती. हा मत्र्क्ट्या तरुणीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत स्वतःला दोष देत होता.
                  एव्हाना दिवस मावळतीकडे झुकायला लागला होतं अंधाराच्या छटा वातावरणात हळूहळू प्रवेश करत होत्या वातावरणात बदल होत होता. पण याच्या मनात मात्र त्याच त्या संतापाच्या, वासनेच्या भावना घट्ट टमृतून बसल्या होत्या. त्या सारख्या त्याला सळत होत्या. लाल तांबूस प्रकाशही आता मागे सरला होतं काळा रांग आसपास पसरू लागला होता. वातावरणातील गरमी काहीशी कमी झाली होती. रात्रीचा गार वारा आता अवतीभोवती वाढू लागला . हळूहळू सगळीकडे शांतता पसरायला लागली होती.
                     एका घराच्या आडोशाला अंगाचे मुटकुळे मारून तो बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव जाणवत नसले तरी त्याचे अंग अजूनही गरम होते. आजूबाजूचा गार वारा वाहत असला तरी तो त्याला सुखावत नव्हता. त्याला स्वतःलाच आपल्याला काय होत आहे, याचा मेळ लागत नव्हता. एखाद्या भावनेच्या आहारी माणूस किती जाऊ शकतो? हे त्याला आता कळतं होते. पण त्याला काहीच करता येत नव्हते. कित्येक वर्षांपासूनची ती भावना, अशी सहज सहजी दबली जाणार नव्हतीच. पण त्यामुळे त्याचा त्रागा मात्र वाढत होता.
                   जशी जशी रात्र चढू लागली, तशी तशी त्याच्या मनाची, शरीराची अस्वस्थता वाढायला लागली होती. सगळे जग या रात्री रती सुखात बुडालेले असेल. आपण मात्र हे अशा अंधारात एका कोनाड्यात निपचित पडलेले आहोत. काय करावे काहीच काळात नव्हते त्याला!
                  रात्र बरीच गर्दी झाली होती. पिवळे लाईट आपले मलूल उजेड आजूबाजूला टाकत होते. त्यांचा तो रोगट उजेड कमालीचा भकास जाणवत होता. स्पष्ट अस्पष्ट उजेडात तो रस्त्याने आपल्या झोपडीकडे जात होता. गेल्या एक दोन दिवसांच्या घडामोडींनी त्याची घालमेल वाढलेली होती. दैनंदिन व्यवहार पार कोसळून गेलेले होते. त्या मृत स्त्रीच्या प्रणयाने त्याला प्रचंड अस्वस्थ केलेले होते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्याचा मनोव्यापार पार ढवळून गेला होताडोक्यात केवळ आणि केवळ स्त्री सुखाचेच विचार घोंघावत होते.
                    समोरचा रस्ता निपचित होता. मात्र त्याच्या मनात प्रचंड रहदारी माजलेली होती. त्याला तो आता कंटाळला होता. विचारांचे चक्र असेच सुरू होते की, तेवढ्यात त्याला कोणाची तरी चाहूल लागली.
                    त्याच्यापुढे शंभर – दीडशे मीटरवर कोणीतरी चालत आहे असे त्याला वाटले. पिवळ्या लाईटच्या उजेडात ती अस्पष्ट आकृती त्याला दिसू लागली. त्याने डोळे मोठे करून पुढे निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. त्याला एक गोष्ट ठळकपणे जाणवली. समोर कोणीतरी साडी घातलेली व्यक्ती दिसत आहे.
                     पुन्हा एकदा ती  जाणीव वेगाने वर उफाळून आली. मोठ्या प्रयासाने त्याने आपल्या वासनेला आवर घातला होता. पण आता ते आवरण झटक्यात बाजूला सारून त्याची वासना चेकाळली होती. साडी घातलेली आहे म्हणजे ही स्त्री आहे, ही जाणीवच त्याला पुरेशी ठरली. त्याला क्षणात मोह झाला. सगळी आजूबाजूची परिस्थिती त्याला अनुकूल दिसत होती. गर्द रात्र पडलेली होती. रस्त्यावर एकही सजीव दिसत नव्हता. त्या निर्जीव रस्त्यावर केवळ तो आणि ती साडीवाली दोघेच होते. याच्या सारखी अनुकूल परिस्थिती कोणती असणार आहे? आणि आता तो कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवणार होतं अनुकूल संधी स्वतः निर्माण करणार होता.
                     आपल्या दुडक्या  चालीत तो वेगाने पुढे सरकू लागला. पुढच्या त्या साडीवालीला आपली चाहूल लागतं कामा नये. याची काळजी घेऊन तो पुढे चालू लागला. रस्त्याच्या अंधाऱ्या बाजूने तो पुढे जात होता. रस्त्यावर आता वाहनांची वर्दळ नव्हती अजिबात. सगळीकडे केवळ घनघोर अंधार. आणि पिवळ्या लाईट चे ते मंदसे उजेडाचे वर्तुळे याशिवाय कसलाच आवाज, हालचाल नव्हती.
                    जसा जसा तो त्या साडी वालीच्या जवळ जाऊ लागला, तशी तशी त्याची अस्थिरता वाढू लागली. हृदयाची स्पंदने जलद होऊ लागली. शरीराचा ताठरपणा वाढू लागला. लालसेचे विचार मनात घोळू लागले. प्रथिने शरीरात स्त्रवू लागले. धमण्यांतून रक्त वेगाने वाहू लागले. तो कमालीचा उत्तेजीत झाला होता.
                    तिच्या जवळ जाताना त्याला आता तिची आकृती स्पष्ट होऊ लागली. गडद रंगाची साडी घातलेली कोणीतरी स्त्री आता त्याच्या नजरेसमोर होती. तिची पाठमोरी बाजू आता त्याच्या नजरेच्या कक्षेत आली होती. तो एकटक तिच्या त्या पाठमोऱ्या भागाकडे बघू लागला. तिच्या उठावदार पाठमोऱ्या अवयावांकडे बघून आता तो कमालीचा उत्तेजीत झाला होता. मनात केवळ वासानाच संचारू लागली होती. बाकी भावनांचा कधीच निचरा झाला होता. आता केवळ तो वासनेचा ताबेदार असलेला एक पुरुष उरला होता.
                   त्याच्या हालचाली आता वेगाने होऊ लागल्या होत्या. त्याच्या कृतीत भलताच वेग आला होता. त्याने एकदा रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरवर नजर टाकली. एकदा सावधतेने चाहूल घेतली. रस्त्यावर कोणीही नव्हते. तो तसाच सावध होत आजूबाजूला बघू लागला. काही कामाची वस्तू मिळते का? याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर त्याला तीन चार फूट दोरीचा तुकडा पडलेला दिसला. त्याने ती दोरी उचलली. या दोरीने काम भागणार होते.
                   तो सावधतेने त्या साडीवालीच्या पाठीमागे आला.  पावलांना आवाज त्याने अजिबात केला नाही. हातात आलेली ही सांधी छोट्या गल्लतीने त्याला घालवायची नव्हती.
                  ती साडीवाली  आरामात पुढे चालली होती. तिला कशाचीच जाणीव नव्हती. आणि अतिशय चपळाईने त्याने पाठीमागून त्या बाईच्या गळ्यात ती दोरी टाकली. त्या दोरीचे दोन्ही टोके दोन हातात धरले. आणि मोठ्या ताकदीने त्याने ती दोरी आवळली.
                   अचानक अशी दोरी गळ्यात पडल्याने ती साडीवाली स्त्री प्रथम एकदम गडबडून गेली. नंतर जसजसा त्याच्या दोरीचा दाब वाढू लागला, तसतशी तिची धडपड वाढू लागली. ती मोठ्या प्रयासाने ती गळ्यातील दोरी बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला जमेना, कारण त्याचा दोरीवरचा दाब प्रचंड होता. अंगातील वासनेने त्याची ताकद कित्येक पटींनी वाढली होती. तिच्या गळ्यातून सारखा घरघर आवाज येत होता. तिला काहीतरी बोलायचे असावे, पण गळ्यावरील दाबाने बोलता येत नसावे. गळ्यातून नुसता घरघर आवाज येत होता.
                 दोन मिनिटांनी ती सगळी झटापट शांत झाली. त्या स्त्री ची हालचाल शांत झाली. ती मृत झाली होती. याने तशीच पाठीमागून तिच्या गळ्यातली दोरी बाजूला केली. रस्त्याच्या कडेला ती फेकून देऊन त्याने तशीच पाठीमागून तिच्या दोन्ही काखेत हात घालून, रस्त्याच्या बाजूला आत झाडीत तिला घेऊन जाऊ लागला. तिच्या त्या  स्पर्शाने त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. तो अतिशय उत्तेजीत झाला. शरीरातील रक्त आता गरम होऊ लागले.
                       तो तसाच झाडीत आला. झाडीत अंधार होता. अंधारात काही दिसत नव्हते. त्याने तिचा तो देह तसाच खाली ठेवला. आता अंधार काळा कुट्ट भासत होता.सगळा सभोवताल एका अंमिक जाणिवांनी भरून जात होता. सर्व हालचाली स्तब्ध झाल्या होत्या. सगळ्या सजीव जाणीवा एकदम स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. हजारो श्वास एकच वेळी कोणीतरी रोखून धरल्याचा आभास आसपास जाणवत होता. सर्व मानवी भावना कुठल्यातरी कुपीत डांबून पडल्या आहेत आणि केवळ आणि केवळ वासनेची ती एकमेव भावना सगळीकडे संचारात आहे, अशा संवेदना आता आसपास उमटायला सुरुवात झाली होती. तो आता केवळ नारपुरूष उरला होता. सदसद्विवेकबुद्धी मनाच्या आत केवळ छोटासा बिंदू बनून गोठून बसलेली होती.
                     एकदा अपघाताने भेटलेला तो मृत स्त्री देह, आताही अगदी त्याच्या समोरच होता. फरक फक्त एवढाच होता, तो पाण्याने थंड, ओला गार झालेला देह होता. तर इथे तो अचेतन अवस्थेतील थंड गार देह पडलेला होता.
                      तीव्र गतीने त्याची ती वासना डोक्यात शिरलिम सर्व अंगभर त्या वासनेचे तरंग उमटायला सुरुवात झाली. एका उच्च टोकापर्यंत त्या वासनेच्या भावना पोहोचू लागल्या. तो टोकाचा अधीर होऊन, त्या देहाचे कपडे काढू लागला.  त्याला ते कपडे काढण्यापूरता अवधी सुद्धा, मोठ्या काळासारखा वाटू लागला. त्याची अधीरता शेकडो मैलाच्या गतीने वर मेंदूपर्यंत धावत होती. हृदयाचे ठोके धडाधड पडत होते. हात नुसते थरथर करत होते.
                       तो समोरचा नग्न देह त्याच्या नजरेस पडत नव्हता. अंधारामुळे तो ते बघू शकत नसला, तरी त्याची अनुभूती त्याला मात्र तीव्रतेने जाणवत होती. त्या अनुभूतीपुढे कितीही काळाकुट्ट अंधार असला तरी, त्याची फिकीर करण्याची त्याला गरज नव्हती. आणि तो क्षण आलl. तो त्या नग्न मृतदेहावर खाली झुकला. काळया गर्द अंधाराच्या साक्षीने पुन्हा एकदा त्याने ते पातक केले होते.
                       क्षणभरच अवधी ओलांडला असेल फक्त. हो! केवळ क्षणभराचाच. त्याच्या सर्व हालचाली एकदम ठप्प झाल्या. मेलो वेगाने धावणारी रक्त जागीच गोठले. उच्च टोकापर्यंत पोहोचलेली वासनेची भावना, क्षणार्धात मिटून गेली. मेंदूपर्यंत गेलेली ती वेगवान अधीरता, अचानक झटदिशी लोप पावली. सगळे काही ते एकदम च झाले. वासना, अधीरता, कामुकता, प्रणय, भोग, सुख अशा अनेक वर उफाळून आलेल्या भावना क्षणार्धात मिटून गेल्या होत्या. आणि त्या भावनांसोबतच त्याचा प्राणही त्या क्षणात कसा निघून गेला, हे त्या वरच्या ईश्र्वरालाच माहीत!
                      मी केवळ एवढेच सांगू शकेल की, समोरचा पडलेला देह त्याने ज्या अधिरतेने नग्न केला होता, ती अधीरता क्षणार्धात फोल ठरल्याने तो असा अल्पावधीत निष्प्राण झाला असेल. समोर पडलेला देह रूपवान मांसल स्त्री ऐवजी एका निष्पाप किन्नराचा असल्यावर, तो तसाच निष्प्राण होणार नव्हता का? तीस वर्षांची अशी शरीराची भुक भागवताना असे अनपेक्षित घडल्यावर दुसरे काय होणार होते?
                      आता त्या झाडीत दोन निष्प्राण देह होते. एक साडी घातलेला किन्नर आणि दुसरा भगवी कफनी घातलेला कंगाल माणूस!

टीप- टायपिंग मध्ये काही व्याकरणाच्या चुका झालेल्या आहेत. तेवढ्या बद्ल क्षमस्व!

-वैभव देशमुख
9757902283

.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मुरारी,
डायरेक्ट पोलीस टाईम.
Haaaaaaaaaa.
जरा जास्त नाही वाटत का?