महेश काळे फॅन क्लब

Submitted by आस्वाद on 11 June, 2021 - 00:27

सुमारे महिन्याभरापूर्वी मला महेश काळे कोण हे नक्की सांगता आलं नसतं. मुळात शास्त्रीय संगीतात काही विशेष रुची नाहीये.
पण एक दिवस अचानक youtube वर एक विडिओ दिसला.
विडिओ मध्ये महेशला बघून त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटलं आणि जी माहिती मिळाली ती ऐकून/ वाचून चकित झाले. त्यानंतर वेड्यासारखे सगळे interviews, व्हिडिओ मिळेल ते बघत सुटले. ‘अरुणी किरणी’ तर रिपीट मोड वर ऐकतेय महिन्याभरापासून. कट्यार चे सगळेच गाणे डाउनलोड केले आणि ऐकतच राहिले. कितीदा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनावर जणू महेश काळेचं गारुड झालंय. अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईथे महेश काळे सतत टाईप्स करून असेल वा त्याची गाणी यूट्यूबवर शोधून ऐकली म्हणून असेल. पण मला फेसबूकवर महेश काळे संदर्भात बरेच काही काही सजेस्ट होऊ लागलेय गेल्या दोन चार दिवसात.
त्या मटेरीअलमध्ये काही मीम्स सुद्धा मिळत आहेत. हे सुरांनो चंद्र व्हा हा नक्की काय प्रकार आहे त्याच्याशी संबंधित बरेच मीम्स त्यावरच आधारीत होते. म्हणजे त्याने गायलेले गाणेच असणार, पण विशेष काय आहे त्यात?
लोकांना एखादा कलाकार आवडणे नावडणे असू शकते, पण त्यावरून मीम्स बनवून त्याची टिंगल का करतात? स्पेशली मराठी कलाकार कोणी जास्त प्रसिद्ध होऊ लागला की त्याबाबत हे हमखास आढळते असे एक निरीक्षण आहे. मुद्दाम उदाहरणे देत नाही, कारण धागा त्यांच्यावर जायला नको. महेश काळेवरच राहू दे..

माफ करा. ती link फक्त भारताबाहेर वापरता येते. तुमच्याकडे VPN असल्यास बाहेरील servers ना connect करून बघता येऊ शकेल.
अजून कुठे सापडल्यास इथे माहिती देईन.

ओके Happy

चुकीचे उत्तर द्या:

मेरुदंड म्हणजे काय? >> कॅब ड्रायव्हर ला झालेला फाईन Lol

Pages