महेश काळे फॅन क्लब

Submitted by आस्वाद on 11 June, 2021 - 00:27

सुमारे महिन्याभरापूर्वी मला महेश काळे कोण हे नक्की सांगता आलं नसतं. मुळात शास्त्रीय संगीतात काही विशेष रुची नाहीये.
पण एक दिवस अचानक youtube वर एक विडिओ दिसला.
विडिओ मध्ये महेशला बघून त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटलं आणि जी माहिती मिळाली ती ऐकून/ वाचून चकित झाले. त्यानंतर वेड्यासारखे सगळे interviews, व्हिडिओ मिळेल ते बघत सुटले. ‘अरुणी किरणी’ तर रिपीट मोड वर ऐकतेय महिन्याभरापासून. कट्यार चे सगळेच गाणे डाउनलोड केले आणि ऐकतच राहिले. कितीदा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनावर जणू महेश काळेचं गारुड झालंय. अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रयोग करायचेच असतील तर स्वनिर्मित गाण्यांवर करावे. जनमानसात मेरुदंड म्हणून स्थापित कलाकृतींना हात घालू नये हीच अपेक्षा
>>>>>

हे राहुल देशपांडे यांनीही केले आहे असे वरील काही प्रतिसादांवरून वाटते.
सर्वांना एकच न्याय हवा.

राहुल देशपांडे ऐकायचा प्रयत्न केला... किशोर चे इस मोड से जाते है.. अजिबात आवडले नाही...
लोक खोटी स्तुती फार करतायत पण कमेंट मध्ये...
>>>>

जनमानसात स्थापित कलाकृतीला हात घातलेला तुम्हाला रुचले नसावे Happy

जोक्स द अपार्ट, मी अजून राहुल यांना ऐकले नाही. वा ऐकलेही असेल पण हे राहुल आहेत हे कळले नसेल. पण हुमायुन नेचरला पाहता साधारण जेव्हा दोघांमध्ये तुलना होते आणि आपल्याला एकाला झुकते माप द्यायचे असल्यास त्याच्या गुणांवरच बोट ठेवणे आणि दुसरयाच्या दोषांवरच बोट ठेवणे हे स्वाभाविक आहे Happy

ईथे मला महेश यांची वकिली करायची नाही पण महेश काळे फॅन क्लब नावाचा धागा आहे आणि अपवाद वगळता एकही पोस्ट त्याला अनुसरून नाही.

वत्सला, थँक्यू! मला वाटायला लागलं होतं की मी एकटीच आहे का राहुल देशपांडेचे युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ न आवडणारी. महेश काळे पेक्षा राहुल देशपांडे खूपच सरस आहे. पण त्याने unplugged version म्हणजे संथ गतीने ते गाणे गाणे असे काहीसे समीकरण करून घेतले आहे का असे त्याचे काही व्हिडिओ पाहून वाटले. उगीच संथ लयीत गाणी गायल्याने रसभंग होतो असे मावैम. त्याचे कसबा गणपती समोरचे प्रथम तुला वंदितो मात्र आवडले मला.

करू देत च्रप्स, तुम्ही खरी करा. असाही तुमचा प्रत्येक प्रतिसाद बाकी सगळ्यांमध्ये ऑड मॅन आऊट च असतो, तर खराच असेल,, Happy
>>अवांतर होतेय पण...येस...उगाच मराठी आहे म्हणून फार भारी म्हणा वगैरे मला जमत नाही...
माझा प्रतिसाद ऑड मॅन आउट नसतो... इथेही माझ्या मताची लोकं आहेत की...
उदाहरण- संदीप आणि पिंकी, वेलकम होम असे चित्रपट मला आवडले... लोकांना हे ऑड वाटले... नंतर बऱ्याच जणांना आवडले..
बर्फी, ऑक्टोबर मला अत्यंत बोरिंग चित्रपट वाटले.. उगाच खोटे कशाला...
बाकी शास्त्रीय संगीतातले काहीही कळत नाही.. पण ज्याला शास्त्रीय संगीत कळत नाही त्यालाही ऐकावे वाटायला लागणे अशी गायकी हवी...
राहुल देशपांडे चे युट्युब वरचे व्हिडीओ आणखी पाहिले... ते व्युज मिळतात म्हणून ढीग टाकलाय असा प्रकार वाटतोय...

पैश्यासाठी, पोटापाण्यासाठी, कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी कोणी व्यावसायिक मार्गाला जात असेल तर त्यात काही गैर नाही असे मला वाटते. तिथे जे जास्त लोकांना आवडते ते द्यावे लागते. दिले जाते.
एखादा उत्तम अभिनेताही व्यावसायिक चित्रपट करतो. पैसा कमावतो. पण त्याचवेळी मध्येच एखादा आपली अभिनयाची भूक भागवणारा सकस चित्रपटही करतो.
आपण जसे पोटापाण्यासाठी नोकरीधंदा करतो तसेच कलाकारांनीही हा विचार करण्यात काही गैर नाही असे मला वाटते.
किंबहुना एकीकडे एखादा सूरतालातला ओ की ठो कळत नसणारया गायकाने मसाला अल्बम करून पैसे छापायचे आणि दुसरीकडे गोड गळ्याची दैवी देणगी लाभलेल्याने मात्र कठोर परीश्रम करत टाळ्या मिळवण्यासाठीच गायचे, पैश्याच्या मागे धावायचे नाही या आपल्या अपेक्षा आपण कोणावर लादू शकत नाही. वा कोणी तसे केले तर त्यांना नावे ठेवणे चुकीचे असे मला वाटते.

थोडेसे अवांतर, पण सहज सांगावेसे वाटले Happy

तसेच कलाकारांनीही हा विचार करण्यात काही गैर नाही असे मला वाटते.... बरोबर आहे.एरवी कलाकारांनी जरूर व्यवहार बघावा.
पण स्वतच्या गाण्यात मुलीचे कौतुक बोअर होते.दहावेळा पाप्या घेणे कंटाळवाणे वाटते.

एकीकडे एखादा सूरतालातला ओ की ठो कळत नसणारया गायकाने मसाला अल्बम करून पैसे छापायचे आणि दुसरीकडे गोड गळ्याची दैवी देणगी लाभलेल्याने मात्र कठोर परीश्रम करत टाळ्या मिळवण्यासाठीच गायचे, पैश्याच्या मागे धावायचे नाही या आपल्या अपेक्षा आपण कोणावर लादू शकत नाही. >>
+100
महेश काळे म्हणा की राहुल देशपांडे, पैसा महत्वाचा आहेच.
(fan clubs तर टोनी कक्कडचे पण असतात.)

माझ्यासारखे रा दे ला unfollow करणारे इतरही काही जण आहेत हे वाचून मला पण बरे वाटले...
बर मी अवाच्या सव्वा पैसे देऊन या कलाकारांना ऐकायला गेलो असे लिहिले आहे. पण तो afterthought होता. तिकीट घेताना पैशाचा विचार केला नव्हता.
कलाकारांना संपूर्ण वेळ गाणं शक्य नाही आणि तशी अपेक्षाही नाही. पण फिलर म्हणून कलाकार घेताना त्यांनी जरा विचारपूर्वक निवड करावी किंवा एक तासभर गाऊन कार्यक्रम संपवावा.

शास्त्रीय संगीत ज्यांना आवडतं त्याच्याबद्दल माझ्या मनात एक आदरयुक्त भावना आहे. भर दुपारी उन्हात चालून आकडी आल्यासारखे तोंड करणे, पॅन्ट शर्टात लाल मुंग्या शिरल्यासारखे शरीर झटकणे, कोणीतरी गरम सळईचा चटका दिल्यासारखे मधूनच अचानक केकटणे ही यां शास्त्रीय गायकांची वैशिष्ट्य आहेत. त्यांना गाताना पाहून वाटतं की भरपूर त्रास सहन करत ते गाताहेत. मला खूप वाईट वाटतं त्यांना गाताना पाहून. लहान होतो तेव्हा मी टीव्हीवर एकदा एकाला गाताना ऐकलं होतं तेव्हा मी खूप रडलो होतो.

शास्त्रीय गायन हे समजायला किंवा पेलायला अवघड आहे असं मत जनसामान्यांचं झालंय खरं. फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यातल्याच काही जाणकारांनीही हे संगीत समजावयास कठीण म्हणून फक्त बुद्धीवंतांनाच समजू शकतं असं काहीसं मत बनवायला आणि टिकवायलाही मदतही केली आहे.

खरं तर जुन्या मातब्बर गायकांच्या बंदीशींमधूनच आजची काही पाॅप्युलर गाणी जन्मास आली आहेत....हळू हळू फुलाची एक एक पाकळी उलगडत जावी, रात्रीच्या अंधाराकडून हळू हळू एक प्रसन्न पहाट आपल्यासमोर येत जावी तसा एक एक स्वर शांतपणे, हळुवारपणे येऊन आपल्यासमोर त्या त्या रागाचं चित्र आपल्यापुढे उलगडत नेतो आणि शेवटी लय वाढून एका खूप खूप उत्कट व बेभान क्षणी, स्वर सुखाच्या बरसातीत आपल्याल चिंब भिजवून, श्रोत्याला एक विलक्षण आनंदानुभव देत ते गाणं गायकाकडून थांबतं ..आणि तरीही पुढे खूप काळ ते ऐकणा-याच्या मनात रेंगाळत रहातं...पुन्हा पुन्हा मनात सुखाच्या लहरी उत्पन्न करत रहातं.. ही अफलातून अनुभूती असते. खरं तर ही संपूर्ण प्रोसेस अनुभवता येणं, त्याचा रसास्वाद घेता येणं हे शिकण्याची आणि शिकवण्याची गरज आहे. पण त्यासाठी आवश्यक असा ठहरावच नाही राहिला आपल्या आयुष्यात. आणि मग फक्त द्रुत बंदीशी, ताना आणि टाळ्या ह्याच्यामागे कलाकार धावतात आणि विचार मनन, चिंतन न करता फक्त कार्यक्रम पाडू लागतात.

भारतीय शास्त्रीय संगीताची मजा अशी आहे की त्यात आवजाची तयारी, ताना, लयकारी हे सगळं तयारीचं झालं की पुढे कलाकाराच्या वाढत्या वयानुसार आणि विचारांच्या परिपक्वतेनुसार त्याचं गाणं आणिकाणीक समृद्ध होत जातं. त्याला वयाचं बंधन रहात नाही कारण गायक हा स्वतःच त्याचा संगीतकार असतो. त्याच्या आवाजाच्या मर्यादेनुसार, त्याच्या आवाजाच्या असेल त्या पट्टीतही तो त्याचे विचार मांडू शकतो. भीमसेनजी शेवटपर्यंत गात होते पण लताबाईंना आता आवाज साथ देत नाही.

असो...मकाचं गाणं कधी चुकून ऐकायला लागलं किंवा रादे चं ऐकलं तरी घरी आल्यावर अॅन्टीडोट म्हणून अभिषेकीबुवांचं आणि वसंतरावांचं ऐकायचं असा प्रघात आहे आमच्याकडे.

रादे बरा आहे पण कधीकधी पूर्वार्धात जे छान रागसंगीत गातो त्याची उत्तरार्धात अभंग आणि कट्यारीतली गाणी गाऊन स्वतःच माती करतो.

>> खरं तर ही संपूर्ण प्रोसेस अनुभवता येणं, त्याचा रसास्वाद घेता येणं हे शिकण्याची आणि शिकवण्याची गरज आहे. पण त्यासाठी आवश्यक असा ठहरावच नाही राहिला आपल्या आयुष्यात. आणि मग फक्त द्रुत बंदीशी, ताना आणि टाळ्या ह्याच्यामागे कलाकार धावतात आणि मग विचार मनन, चिंतन न करता कार्यक्रम पाडू लागतात.

+१११
अगदी नेमकं!

मेधावि, छान लिहीले आहे. शास्त्रीय संगीतावर बेतलेली चित्रपटगीते ऐकताना जाणवते की यात काही जागा अशा असतात की त्या पुन्हा पुन्हा ऐकाव्याश्या वाटतात. मदनमोहनच्या दोन गाण्यांचे उदाहरण कारण नुकतीच ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकली - नैनोंमे बदरा छाये मधली लताची ओळ आहे "शरमाके देंगी तोहे, मदिरा के प्याले" - या एका ओळीकरता मी हे गाणे अनेकदा ऐकले आहे. मिलों न तुम तो गाण्याच्या कड्व्यांचेही असेच. काहीतरी मॅजिकल तेथे निर्माण केले गेले आहे असे वाटते ऐकताना. तसा अनुभव शास्त्रीय गाण्यांमधून आणखी जास्त येत असावा असा एक अंदाज. पण तो यायला किमान जुजबी माहिती हवी. ती मला अजिबात नाही. ही गाणी ऐकायला आवडतात, पण पूर्ण फोकस ने ऐकण्याइतका पेशन्स व आता अटेन्शन स्पॅनही नाही.

महेश काळेची कट्यार मधली गाणी आवडतात. त्यापलीकडे माहिती नाही. तो बे एरियात शिकवत असे असे ऐकले होते. राहुल देशपांडेचे एकही गाणे आवर्जून ऐकलेले नाही - कधी कानावर पडले असेल तर माहीत नाही. पण त्याचे कारण या गायकांबद्दल काही नावड वगैरे नसून एकूणच शास्त्रीय संगीत कमीच ऐकणे हे आहे.

अमा - सचिनचा "अष्टविनायक" चित्रपट पाहिला नाहीत का? तुम्ही उल्लेख केलेली वसंतराव देशपांड्यांची ती दोन गाणी त्यात आहे.

बाय द वे, लोकहो - फेबुवर "एक करोड चंद्र झालेल्या सुरांचा ग्रूप" आहे. इच्छुकांनी लाभ घ्या Happy

>>>>काहीतरी मॅजिकल तेथे निर्माण केले गेले आहे असे वाटते ऐकताना. तसा अनुभव शास्त्रीय गाण्यांमधून आणखी जास्त येत असावा असा एक अंदाज.
वाह!! अगदी हाच विचार आज माझ्या मनात आला. नेहमीच 'दिल ढुंढता है फिर वही...' गाणे मला खूप हाँटिंग वाटते. स्मृती-विस्मृतीच्या सीमारेषेवर ये जा येजा होत रहाते. काहीतरी आठवता आठवता हातून निसटतं. एक विलक्षण हुरहूर लागते. मला वाटतं हे असे अशरीरी अनुभव बहुतेक शास्त्रिय गाण्यात अधिक येत असावे.

पण त्यासाठी आवश्यक असा ठहरावच नाही राहिला आपल्या आयुष्यात>>>>

हा ठहराव कोणाच्याही आयुष्यात राहिलेला नाही, ना गायकाच्या आणि ना श्रोत्यांच्या.

आधीच्या दोन तीन पिढ्यात गायक मैफिलींच्या सुरवातीचा पाऊण तास विलंबित तालात बडा ख्यालाचे सावकाश आलाप घेत त्यांचा रागविचार मांडत, श्रोतेही त्यावरून पुढे काय सादर होणार याचा अंदाज घेत सरसावून बसत. घाई कोणालाच नव्हती. आजच्या जमान्यात हे शक्य नाही. वर जे भरमसाठ फी देऊन कार्यक्रम पाहिले गेले त्यात रागविचार मांडायला तासभर गेला असता तरीही त्याच प्रकारची टीका झाली असती. अर्थात टीकाकार चूक नाहीत तर काळ बदलला आहे.

राहुल unplugged मध्ये राहुल त्याला अमुक गाणे कसे दिसले ते मांडत असतो असे मला वाटले. केवळ अमुक्तमुकाचे गाणे मी परत गातोय असे नाहीये. ज्यांना निवांत बसून ऐकायला आवडते ते ऐकतात, ज्यांना मूळ गाण्याबरहुकूम हे गाणे असावे असे वाटते ते कंटाळणे स्वाभाविक आहे.

भरत, मी मेरुदंड हा शब्द वापरायला नको होता बहुतेक. दुसरा योग्य शब्द तिथे यायला हवा होता.

साधना, बरोबर आहे पण प्रत्येक गाण्यात संगीतकाराने तालाचा काही तरी विचार केलेला असतो आणि ते गाणे एका लयीत बांधलेले असते त्यामुळे ती चाल खुलते, शब्दांना न्याय मिळतो. सुगम संगीतातल्या गाण्यांची unplugged versions बरेचदा त्यातली तालाची मजा गेल्यामुळे नीरस होऊन जातात. ज्याला भावगीत explore करायचे आहे त्याने मूळ गाण्याच्या लयीचा आणि तालाचा मान ठेवून explore करावे. माझं काही म्हणणं नाही. अर्थात हे सगळं एक amateur श्रोता म्हणून मावैम!

Unplugged हे केवळ स्वतःचे ज्ञान दाखवणे व रिकाम्या वेळेचे काय करायचे , म्हणून केलेले असते

मुळात महेश काळे हा शास्त्रीय संगीत गातो का? मी mahesh kale indian classical असे गूगल केले तर अरुणी किरणी, कानडा राजा पंढरीचा वगैरे गाणी आली पण एकही राग दिसला नाही. ही गाणी जरी कुठल्यातरी रागांवर आधारित असली, तरी ते काही शास्त्रीय संगीत नाही म्हणता येणार. त्यामुळे वर ज्यांनी 'मला शा सं आवडत नाही, पण म का चं गाणं ऐकल्यावर आवडायला लागलं' हे म्हटलंय, ते काही मला कळलं नाही. रागांवर आधारित गाणी त्यांनी आधी कधीच ऐकली नाहीत का? हजारो चित्रपट गीते रागांवर आधारित आहेत. अगदी 'तू चीज बडी है मस्त मस्त' हे भीमपलास रागात आहे. ते आवडलं म्हणजे काही शास्त्रीय संगीत आवडलं असं होत नाही, हे मा वै म.

अरुणी किरणी, कानडा राजा पंढरीचा वगैरे गाणी आली पण एकही राग दिसला नाही. ही गाणी जरी कुठल्यातरी रागांवर आधारित असली, तरी ते काही शास्त्रीय संगीत नाही म्हणता येणार.
>>>>>

हि माहिती नवीन आहे
मी गेले दोन दिवस हिच गाणी ऐकून आपण शास्त्रीय संगीत आवडीने ऐकत असल्याचा आव आणत होतो Happy

गम संगीतातल्या गाण्यांची unplugged versions बरेचदा त्यातली तालाची मजा गेल्यामुळे नीरस होऊन जातात. ज्याला भावगीत explore करायचे आहे त्याने मूळ गाण्याच्या लयीचा आणि तालाचा मान ठेवून explore करावे>> गाण्याचा कार्यक्रम करायचा किंवा रियाज करायचा तर पियानो स्वतः वाजवता येइल तंबोर्‍या चे पण मशीन येते रेडिमेड बॅक अप. पण तबला ढोलकी असे काही हवे असले तर जो माणूस यायला लागतो ते लॉक डाउन मुळे शक्य नसेल झाले. तालाचे पण मशीन मिळते पण तबल जी ची मजा नाही. ह्या कला कारांनाही त्यांचा तासावारी मेहनताना द्यावा लागतो.

मुलगी व्हिडीओत यायला लागल्ती तेव्हा पासून मी पण बघणे बंद केले पण वेगळ्या कारणाने. पण माझे त्याला ऑब्जेक्षन असे नाही. मुलंकधी कधी घसरतात व्हिडीओत. हा काही फॉर्मल कार्यक्रम नव्हे. अजूनही सजे शन मध्ये येतात त्याची गाणी गाणे आव्डते असले तर ऐकते. एक प्रयोग म्हणून छान आहे हे.

हि माहिती नवीन आहे >> हा हा हा. हरकत नाही. माझीही पूर्वी अशीच समजूत होती.

आत्ता जरा आणखी शोध घेतल्यावर म का चे राग बिहाग, मालकंस वगैरे दिसले. वेळ मिळाल्यास ते ऐकून मग सांगा तुम्हाला ते शा सं आवडलं का.

अमा - सचिनचा "अष्टविनायक" चित्रपट पाहिला नाहीत का? तुम्ही उल्लेख केलेली वसंतराव देशपांड्यांची ती दोन गाणी त्यात आहे.>> अय्या अहो मी तर रिलीज झालाय नवा सिनेमा म्हणून थेट्रात जाउन बघितलेला मैत्रीणींबरोबर. ते तर उमलत्या तारुण्याचे दिवस. ती वंदना मला फार आव्डते .
मराठी उद्योग पतींच्या स्टाइलचे चित्रण व्यवस्थित च केले आहे. दिसते मजला सुख चित्र नवे , प्रथम तुला वंदितो ही माझ्या रिपीट प्ले लिस्ट मध्ये आहेत.

हरचंद पालव अनुमोदन. मका गातो ते शास्त्रीय संगीत म्हणजे भेळ खाउन इंडिअन क्वीझिन समजले म्हटल्या सारखे आहे.

हरचंद पालव अनुमोदन. मका गातो ते शास्त्रीय संगीत म्हणजे भेळ खाउन इंडिअन क्वीझिन समजले म्हटल्या सारखे आहे. > +१००

Pages