कसं पटवावं पोरीला ?

Submitted by सिद्धेश्वर विला... on 3 June, 2021 - 04:34

कसं पटवावं पोरीला ?

शोधत होतो लवगुरु

अथक प्रयत्नांनी एक मिळाला

ज्याची लफडी होती सुरु

माग काढुनी भेट घेतली

पण वाटला तो थकलेला

प्रेमरसात तो न्हाउनी डुंबुनी

असेल कदाचित पिकलेला

मी पण होतो आसुसलेलो

एक पोरगी पटवण्यासाठी

सांगेल ते मी करणार होतो

माझ्या मधल्या काठीपोटी

पदस्पर्श करून मी त्याला म्हणालो

मलापण प्रेम करायचंय

तुमच्यावानी रुबाबात पार

पोरींना घेऊन फिरायचंय

ऐकून माझा उद्देश गुरुचे , हरपले सारे भान

जुन्या आठवणींनी रडू कोसळले, कंठाशी आले प्राण

रडू आवरून मला म्हणाला

यात अवघड नसते काही

वायफळ बडबड केली म्हणजे

पोरी पटतात कशाही

अक्कल यांची गुडघ्यात आणि दिडबुद्धी असतात

वायफळ बडबड करणाऱ्यावर जीव ओवाळून टाकतात

बडबडीने का कधी कुणाचे पोट भरत असते

खरे द्वंदव तर तेव्हा होते जेव्हा प्रेम खिशाशी येते

खिसा रिकामा पाहुनी मग त्या अद्वातद्वा बोलतात

हीन पातळी गाठून हळूहळू रक्ताशी पोहोचतात

निर्लज्ज होऊनि पचवावे ते धारधार प्रहार

ती जाता मग दुसरीसाठी पुन्हा व्हावे तयार

असेच माझे जगणे मित्रा , इथवर झाला माझा प्रवास

तू ठरव आता तुला हवं का , भोगायचाय का हा त्रास ?

=======================================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जर हेच शब्द घेत कविता न लिहिता ललित लेख लिहिला असता तर आतापर्यंत ईथे धुमाकूळ झाला असता Happy