कैरीची उडदा मेथी...

Submitted by MSL on 27 May, 2021 - 09:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1 कैरी मध्यम,
उडीद डाळ 2 चमचे,
मेथी दाणे पाव चमचा
ओले खोबरे 1 वाटी
गूळ 1 ते 2 चमचे,
लाल.सुक्या मिरची 5
हिंग, मीठ ,हळद,तिखट, तेल चवीनुसार ..

क्रमवार पाककृती: 

1. कैरी साल काढून कापून बारीक तुकडे करावे..
2. एका कढईत थोडेसे तेल गरम करत ठेवाव..त्यात उडीद डाळ घालून चांगली परतून घ्यावी...पिवळसर डार्क रंग आला की त्यात खोबरे ,हिंग, लाल सुक्या मिरच्या हे पण घालावे...अजून जरा परतून खमंग वास आला की गॅस बंद करा...
3. हे मिश्रण थोडेसे गार झाले की वाटून घ्यावे..
4. पुन्हा काढई मध्ये फोडणीसाठी तेल घ्यावे..त्यात जिरे मोहरी हिंग हळद घालून कैरी चे तुकडे घालावे...परतून घ्यावे...त्यात गूळ घालावा..त्यात 1 वाटीभर कोमट पाणी घालून कैरी शिजे पर्यंत उकळून घ्यावे..
5. त्यानंतर त्यात वाटप घालून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यावे...
6. गरज वाटल्यास पाणी घाला...एकूणच मिश्रणाची कन्सिस्टन्सी पिठल्या सारखी हवी...दाटसर...
7. गरम भात / भाकरी यासोबत छान चविष्ट तोंडीलावणे...

वाढणी/प्रमाण: 
4 ते 5
अधिक टिपा: 

## माझ्या माहेरी ( सिंधुदुर्ग ) मध्ये , अंबाडे नावाची ,एकदम आंबट चवीची लहान फळे मिळतात...ती अळूची भाजी,कंदमुळे, खत खते यासारख्या भाज्या मध्ये वापरतात
.त्याचीच उडादा मेथी करतात..भारी लागते..
पण इथे ते अंबाडे फारच क्वचित मिळतात,मग कैरीची करते मी...

माहितीचा स्रोत: 
आई आणि आईची आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यम्मी. आवडता पदार्थ.
मी कधी कधी अननसाची पण करते. तेव्हा खोबर्याचं प्रमाण कमी करते.

माझी आणि माझ्या फॅमिलीची फेव्हरिट रेसिपी. रावी, मी फोडणी करताना मेथीचे दाणे घालते. MSV तुम्ही सुध्दा तसेच घालता ना?

. MSL तुम्ही सुध्दा तसेच घालता ना?
.... उडीद डाळ तेलात भाजून घेतो,तेव्हाच मेथी दाणे पण टाकायचे...तेलात परतून घ्याचे