बाजरीचे चविष्ट डोसे

Submitted by mrunali.samad on 24 May, 2021 - 08:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1. बाजरी-२ वाटी
2. उडिद डाळ-पाव वाटी
3. मेथी दाणे-पाव चमचा
4. शिजलेला भात-एक चमचा किंवा पंधरा मिनटं भिजवलेले पोहे

क्रमवार पाककृती: 

● बाजरी आणि मेथी दाणे+उडिद डाळ वेगवेगळे स्वच्छ धुवून
चार तास भिजत घातले.
● चार तासानंतर मिक्सरमध्ये भात/पोहे टाकून ग्राईंड केले.
● मिश्रण सहा-सात तास फरमेन्टेशनसाठी झाकून ठेवले.
● मी दुपारी एक वाजता भिजवले,पाच वाजता ग्राईंड
केले,बारा वाजेपर्यंत फरमेंट केले मग फ्रिजमधे ठेवले.
● सकाळी फ्रिजमधुन बाहेर काढून मीठ,थोडं पाणी घातले
आणि डोसे बनवले............
IMG_20210524_165826.JPG

लगेहाथ चटणीची रेसिपी पण सांगून टाकते.
खोबरे+कोथिंबीर चटणी सोपी आहे
मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरे,तीन-चार हिरव्या मिरच्या, दोन लसूण पाकळ्या ,मुठभर कोथिंबीर, मिठ टाकून फिरवले.
वरून मोहरी, कडिपत्त्याची फोडणी.

पौष्टिक, चविष्ट आणि पोटभरीचा नाष्टा तयार.....

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात 12-14 डोसे होतात. नेहमीच्या डोश्यापेक्षा एक डोसा एक्स्ट्रा खाल्ला जातो.
अधिक टिपा: 

खोबर्याच्या चटणीत भाजकी चणा डाळ/पंढरपुरी डाळ घालु शकता आवडत असल्यास. मी कधी कधी घालते ती चव पण छान लागते.

माहितीचा स्रोत: 
मी आणि युट्यूब.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

Wow!!
जबरी दिसायला आहेत डोसे . बघूनच भूक लागली.

सगळ्यांचे आभार.

रानभुली- हो, भाकरीपेक्षा चवदार लागतात

rmd- फक्त बाजरी पीठाचे इन्स्टंट असे कधी केले नाहीत पण नॉर्मल डोश्याचे पीठ कमी उरले असेल तर त्या पीठात कधी बाजरीचे कधी नाचणीचे कधी गव्हाचे पीठ मिक्स करून डोसे असे प्रकार केले आहेत.छान होतात.

वावे- गोडसर लागत नाहीत अजिबात.

तसं करून पहायला हरकत नाही. मी जमलं तर पीठाचे करून पाहते कारण माझ्याकडे ते आहे. केले आणि चांगले झाले तर सांगते इथे Happy