जीने नही दूंगा

Submitted by पायस on 20 May, 2021 - 02:15

'द अदर कोहली' उर्फ राज कोहलीचे हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान मोजमापापलीकडचे आहे. त्याच्या शिखर वर्षातील राज तिलकचा रसास्वाद घेतल्यानंतर साहजिकच त्या वर्षातील दुसर्‍या कोहलीपटाचा, जीने नही दूंगाचाही आढावा घेणे भाग आहे. योडाने हा चित्रपट बघितल्यानंतर घोषणा केली की 'द फोर्स इज स्ट्राँग विथ धिस वन'. समीक्षकांनी नावाजलेले अळणी, नीरस, कंटाळवाणे चित्रपट बघून झालेल्या अजीर्णावर हा चित्रपट उतारा आहे. या चित्रपटाची थोडक्यात पूर्वपीठिका सांगायची तर १९७९ च्या सुप्रसिद्ध पाकिस्तानी चित्रपट मौला जटचा हा रिमेक आहे. मौला जटची भूमिका सुलतान राहीने केली होती. त्याचा एक जरी सीन पाहिला तरी त्याच्याजागी धरमपाजींखेरीज दुसरा पर्याय नाही या निर्णयाप्रत पोहोचता येते. अस्मादिकांच्यामते धरमपाजींनी ओरिजिनलला मागे टाकले आहे. दुर्दैवाने त्याचे पडसाद पाजींच्या अभिनयकौशल्यावर खोलवर उमटले आणि पाजींच्या शब्दकोशातून "संयत" हा शब्द पुसला गेला. पण ते काय चालायचंच. कारण चित्रपटातील इतर दिव्य गोष्टींच्या तुलनेत पाजींचा अभिनय नॅशनल अवार्ड विनिंग म्हणावा लागेल.

आणि अगदी हे सर्व जरी बाजूला ठेवले तरी या चित्रपटाचे सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे भारतीय जनतेची 'रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंग' सोबत करून दिलेली ओळख! अशा चित्रपटांत दिव्य अभिनय होणे ही काही नवीन गोष्ट नाही. दिव्य अभिनय करण्याची अहमहमिका होणे यातही काही नावीन्य नाही. पण या सर्व दिव्य तार्‍यांनी एकत्र येऊन 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती' असे म्हणायला लावणारी एकमेव तारका म्हणजे रोशनी. मुख्य भूमिका साकारण्याची ही तिची पहिली वेळ. काही नाही तर रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंगची मुहूर्तमेढ रोवणारा चित्रपट म्हणून बॉलिवूड याची कायम आठवण ठेवेल. तरी भूतमात्रांना प्रसन्न करण्यासाठी चार थेंब उडवल्यानंतर रसग्रहणास सुरुवात करूया.

१) रोशन, तुझे जीने नही दूंगा

१.१) जंग (अ‍ॅक्शन) वि. दिल (रोमान्स)

निवेदक कादर खान सुरुवातीला काहीतरी क्रिएशनिस्ट बडबड करतो. मुख्य मुद्दा असा की मनुष्यांमध्ये सुष्ट व दुष्ट दोन्ही प्रवृत्ती आहेत. त्यानुसार या सिनेमातही दोन कबिले आहेत - जंगावर आणि दिलावर. जंगावर = जंग, फाईट इ. दिलावर = दिल, प्रेम, मोहोब्बत इ. या सिनेमातील कबिला सिस्टिम, नॉमेनक्लेचर विचित्र वाटू शकते पण दिग्दर्शकाचा नाईलाज आहे. कारण मौला जटच्या स्टाईलचा या सिनेमावर प्रचंड प्रभाव आहे. असो, दिलावर कबिल्यातून आपल्या कथेस सुरुवात होते.

दिलावर कबिल्यात कोणा रोशनवर खटला चालू आहे. इथे कबिला शब्दप्रयोग केला असला तरी ती एक छोटीशी गढी आहे. गढीच्या पहिल्या मजल्यावरून तिथला सरदार विचारतो की रोशनचा गुन्हा काय आहे? रोशन म्हणजे आपले धरमपाजी. धरमपाजींनी पहिल्याच सीनमध्ये स्पष्ट केले आहे की या सिनेमाची 'फॅशनेबल' कपड्यांची स्वतंत्र व्याख्या आहे. काळा फुल बाह्यांचा टी-शर्ट, त्यावर चेक्सचा शर्ट, त्यावर काळा कोट, खाली मळकट खाकी विजार, लेदरचा बेल्ट, हंटिंग बूट आणि कपाळाला एक चिंधी बांधलेली अशा वेषात पाजी एंट्री घेतात. हा सर्व वेष टळटळीत उन्हात!

पाजींचा गुन्हा हा की त्यांचे जंगावर कबिल्यातील एका मुलीवर प्रेम आहे. त्यांच्यामते जर हे लग्न झाले तर शतका-शतकांपासून चालत आलेले वैर संपेल. शेरवानी घातलेला सरदार म्हणतो की दिलावर कबिल्यात प्रेम करणे गुन्हा नाही. च्यामारी मग खटला कशाला भरला? एक अंगरखा घातलेला कबिलेवाला येऊन म्हणतो की हाच खटला जर जंगावर कबिल्यात भरला असता तर असा फालतूपणा झाला नसता. दोन मुद्दे - १) मग तू जंगावर कबिल्यात जा ना! इकडे कशाला आगीत तेल ओततो आहेस? २) पाजींच्या आयटमची काही धडगत नाही.

१.२) प्रेमळ गुन्हा

जंगावर कबिल्यात पाजींच्या आयटमवर असाच खटला चालू आहे. पण इकडे तिला सरळ फरफटत आणले गेले आहे. हिचे नाव चांदनी. चांदनीची भूमिका केली आहे नीता मेहताने (पोंगा पंडितची हिरोईन). चांदनीला गुलाबी कलर स्कीमचा स्लीव्हलेस ड्रेस दिला आहे. ८०च्या दशकातील बंजारा स्त्री श्ट्यांडर्डनुसार रबरबँड लावून एका बाजूने पोंगा सोडला आहे. चांदनी म्हणते की प्रेम करणे काही गुन्हा नाही. कबिल्याचा सरदार (आणि बहुधा तिचा बाप) म्हणतो - व्हेरी गुड, इसी खुशी में सजा-ए-मौत हो जाए.

इथे हसत हसत, काळी कफनी परिधान केलेला परीक्षित साहनी एंट्री घेतो. हा फकीरबाबा झाला आहे. याच्या कपाळावर शैवपंथी गंध आहे, गळ्यात रुद्राक्षमाळा आहेत, हातात सर्पाकृती काठी आहे. इथे उच्चप्रतीचा चुना लावला आहे. कथानक क्लिअरली राजस्थान-पंजाब बॉर्डरवर, सूफी/वैष्णव/शीख प्रदेशात घडत असताना शैव साधू कुठून आला? त्यापेक्षा याला सूफी संताची वेशभूषा दिली असती. तसेही नाव फकीरबाबा आहेच. मुस्लिम पात्राचा कोरमही भरला असता आणि बिकानेरशी भूगोलही मॅच केला असता. असो. हा मोहोब्बत रिलेटेड काहीतरी जनरिक बडबड करतो. अशावेळी एक्स्ट्रांवर लक्ष केंद्रित केल्यास अधिक मनोरंजन होते. जसे की फकीरच्या डाव्या बाजूला एक एक्स्ट्रा आहे ज्याच्या डोळ्यांवर थेट ऊन येते आहे. त्यामुळे बाकी सर्व एक्स्ट्रा फकीराकडे बघत असताना हा एकटाच जमिनीकडे बघून चुळबूळ करतो आहे. या सिनेमातील बहुतांश सर्व एक्स्ट्रा प्रचंड मनोरंजक आहेत. तसेच साधारण निम्मे एक्स्ट्रा दोन्ही कबिल्यात आढळतात. कंटाळा आलाच तर ते एक्स्ट्रा कोणते हे ओळखण्याचा खेळ खेळता येतो. तात्पर्य: जसा विराट कोहली सहसा डॉट बॉल खेळत नाही, तसा राज कोहली फ्रेममधली इंचभर जागाही वाया घालवत नाही. असो, फकीराच्या विनवणीचा काही परिणाम होत नाही आणि चांदनीला मरेस्तोवर चाबकाने बडवण्याचा निर्णय घेतला जातो.

१.३) रेड हेरिंग दाखवण्यासाठी अ‍ॅगाथा ख्रिस्ती असणे बंधनकारक नाही.

त्यानुसार कबिल्याबाहेरील माळरानावर, एका चौथर्‍यावर चांदनीला बांधले जाते. तिला ड्रेसही बदलू दिला जात नाही. एक चिल्लर गुंड चाबकाचे दोन फटकारे ओढतो तोच पाजी घोड्यावर बसून एंट्री घेतात. त्यांनी सुद्धा अजून ड्रेस बदललेला नाही. हिंदी चित्रपटात शॉटगन चालवणे हे सायकल चालवण्याइतके सोपे असल्याने डबल बॅरल शॉटगनच्या मदतीने पाजी सर्व गुंडाना घायाळ करून चांदनीची सुटका करतात. आता जंगावर कबिल्याचा सरदार उखडतो. त्याच्या लक्षात येते की शॉटगनधारी पाजींना रोखण्यासाठी शॉटगनच हवा. मग शाका अर्थात शत्रुघ्न सिन्हाला पाचारण केले जाते. याच्या एंट्रीचा अँगल खालून वर असा लावला आहे. हिरविणीसाठी लावायचा अँगल शॉटगनसाठी लावून काय उपयोग? असो शाका म्हणतो की पाजींच्या उद्दामपणाबद्दल तो संपूर्ण दिलावर कबिला नष्ट करणार आहे.

शॉटगनला बघताच भयातिरेकाने दिलावर कबिलावासी घराची दारे बंद करत आहेत. यापासून अनभिज्ञ पाजी चांदनीसोबत भरदुपारी मधुचंद्र साजरा करत आहेत. कुठल्या वेळी कोणते दरवाजे तोडावेत याची जाण नसलेला शॉटगन "मौत की शकल" बनून थेट बेडरुममध्ये घुसतो. घुसल्या घुसल्या पाजींवर गोळीबार! तीन गोळ्या आणि खेळ खल्लास, दुसरी बातच नको!! अर्थातच चाणाक्ष प्रेक्षकाला ठाऊक आहे की हिरो धरमपाजी मरणे शक्य नाही. सुहागरातच्या क्लोजअपमध्ये पाजींचा कुरळा विग प्रकर्षाने जाणवतो. हिरो धरमपाजींचे केस कधी कुरळे असतात होय? याचाच अर्थ पाजींचा डबल रोल असणार आणि दुसर्‍या धर्मेंद्राची लवकरच एंट्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ! हे सर्व ठाऊक असल्याने तो असल्या थर्ड क्लास रेड हेरिंगकडे तु.क. टाकून पुढे बघू लागतो. बेडरुमबाहेरच पोलिस 'कधी शॉटगन पाजींवर गोळीबार करतो' याची वाट बघत उभे होते. ते लगेच येऊन शॉटगनला हातकड्या घालतात. इथे शाकाच्या हावभावांवरून याचे स्क्रू ढिले आहेत ही शंका येते. उर्वरित सिनेमात त्यावर शिक्कामोर्तब होईल. तूर्तास कबिल्याचा बदला घेतल्याच्या सुखपरत्वे सुटलेली ढेरी दाखवत शॉटगन पोलिसांसोबत निघून जातो.

२) दो कबिलों के बीच के अमन, तुझे जीने नही दूंगा

२.१) सिनेमात मंदिरा बेदी नसू दे, आपण मात्र शांती ठेवायची

(१.३) मधला कयास तात्काळ खरा ठरतो. दुसरे धरमपाजी घोड्यावरून एंट्री घेतात. यांचे नाव राका - हिरो असल्याचा आणखी एक पुरावा. राका-शाका, गेट इट? (टू सेट काँटेक्स्ट ओरिजिनल आहे मौला जट-नूरी नट. यापेक्षा राका-शाकाच बरं) शाकाप्रमाणेच राकालाही थेट बेडरुममध्ये घुसण्याची सवय आहे. इथे दोन धर्मेंद्रांचा रडारडीचा अल्टिमेट सीन आहे. पाजींचे अभिनयकौशल्य बघताक्षणी ऑल नेगेटिव्ह थॉट्स विल इन्स्टंटली व्हेपराईज. राका विचारतो की हे कोणी केलं? मधुचंद्र अर्धवट राहिल्याने भडकलेली चांदनी लगेच सांगते हे शाकाने केलं. अपेक्षेप्रमाणे राका जंगावर कबिल्याचा विध्वंस करायला निघतो. पण रोशनची २०००-०१ च्या सुनील शेट्टीशी भेट झालेली नसल्यामुळे त्याचा 'दो दिलों की धडकन; प्यार, इश्क और मोहोब्बत' वर अधिक विश्वास आहे. तो म्हणतो की अशी मारामारी नाही करायची, तुला माझी शपथ! या आणाभाका चालू असताना रोशन आपल्या पोटावरचा रक्ताचा डाग लपवण्याची पराकाष्ठा करतो आहे. चांदनी 'हा आहे तोवर घ्या चान्स मारून' असा विचार करून रोशनला नॉन-स्टॉप कुरवाळते आहे. हे सर्व असह्य होऊन राका 'मी दोन कबिल्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करेन असे वचन देतो' तेव्हा कुठे रोशन इहलोकाचा निरोप घेतो. एकतर त्या शपथेला काही अर्थ नाही, पाजींनी डायलॉग चुकीचा बोलला आहे - 'तुम ऐसा कोई कदम नही उठाओगे जिससे तुम्हारी भाई की आत्मा को शांती पहुंचे'. तर्कशास्त्राच्या कसोट्यांनुसार याचा अर्थ 'तू नॉनस्टॉप हाणामारी कर' असा निघतो. दुसरे म्हणजे या लोकांना हाणामारीशिवाय दुसरी कसलीही कोअर कंपिटन्सी नसल्यामुळे राका इतर काहीही करू शकत नाही. तिसरे म्हणजे शपथ घेतल्यानंतरही रोशन मरतोच. पण रोशन मेल्याशिवाय कथा पुढे जाऊ शकत नसल्यामुळे - ये भी ठीक हैं.

२.२) सात साल बीत गए

तिकडे तुरुंगात "शाका आया, शाका आया" चा जयघोष सुरु आहे. जंगावर-दिलावर कबिल्यांचे प्रभावक्षेत्र फारच मर्यादित असावे किंवा पोलिसांना लाच देणे त्यांच्या उसूलांत बसत नसावे. जे काही असेल, शॉटगनची कुठल्याशा तुरुंगात रवानगी झाली आहे. तिथला जेलर आहे जगदीश राज (अनिता राजचे वडील). याच्या कानांपर्यंत जंगावर कबिल्याची कीर्ति पोहोचलेली नसल्यामुळे काही संवादमौक्तिके आपल्या कानांवर आदळतात. सारांश असा की शाकाचा नाद करायचा नाही. जेलर हे एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देतो.

आता आपल्याला गचाळ एडिटिंग आणि महागचाळ पटकथा लेखन बघावयास मिळते. त्यांना असे दाखवायचे आहे की सात वर्षांचा कालावधी निघून गेला आहे आणि शाका या तुरुंगातून त्या तुरुंगात फिरतो आहे. पण त्यासाठी एडिटरने कसलेही ट्रान्झिशन टाकलेले नाही. पटकथा लेखकानेही "शो, डोन्ट टेल" हा नियम भ्याड लोकांसाठी आहे असे ठरवून आपल्याला टाईम स्किपविषयी रझा मुरादच्या तोंडून कळवले आहे. बॉटम लाईन, मध्ये सात वर्षे निघून गेली आहेत. शॉटगनची नव्या तुरुंगात बदली झाली आहे. तो किती डेंजरस आहे हे दाखवण्यासाठी एक इन्स्पेक्टर, तीन हवालदार पूर्णवेळ त्याच्यावर बंदुका रोखून आहेत. याच तुरुंगात कैक दिवस रझा मुराद कैद होता. आज त्याची सुटका झाली आहे. सिनेमाच्या फॅशनला साजेसे लेदरचे लाल-काळे रंगाचे पॅचवर्क रझा मुरादने घातले आहे. पुन्हा हे सर्व रखरखीत उन्हात. त्यालाही कुरळ्या केसांचा विग दिला आहे. हा व्हिलन आहे हे त्याच्या महाजाड भुवयांनी अधोरेखित केले आहे. गळ्यात कसलेसे आभूषण आहे. हा शाकाचा भाऊ आहे. दोघांमध्ये हवापाण्याच्या गोष्टी होतात. रझा मुराद विसरतो की आपण नुकतेच तुरुंगातून सुटलो आहोत आणि शाकाप्रमाणेच सगळीकडे "मौत और खून की लकीरे" काढण्याचे वचन देतो. इथे शाका क्लिनिकली इन्सेन असल्याचा संशय बळावणारे एक्सप्रेशन्स!

२.३) शुद्ध बावळट

बोलून चालून तो पडला रझा मुराद. "मौत और खून की लकीरे" त्याच्या कुवतीच्या बाहेरचे काम आहे. तो घोड्यावर बसून एका तरुणीचा पाठलाग करू लागतो. ही तरुणी आहे दलजीत कौर नामक पंजाबी अभिनेत्री. हिचे कपडे आश्चर्यजनकरित्या सामान्य आहेत. ती एका वैद्याच्या घरात घुसते. वैद्य म्हणतो की तुला हार्ट ट्रबल आहे, उगाच धावपळ करू नकोस. ती म्हणते, अरे म्हातार्‍या माझ्या मागे लागलेल्या ट्रबलपासून आधी वाचव मग हार्ट ट्रबलविषयी बोलू. इथे आपल्याला रझा मुरादचे नाव जाबरसिंग आहे ही बिनकामाची माहिती मिळते. रझा मुराद मरतुकड्या वैद्याला ढकलून देतो. पण तरुणी अधिक चपळ असल्याने ती निसटते. मग तिला विविध वयोगटातील चार-पाचजण भेटतात. ती त्यांच्याकडे मदत मागते. इथे बॅकग्राऊंडला "भरोसा" ही अक्षरे रंगवलेली भिंत टाकण्याचा दिग्दर्शकीय टच. त्यानुसार आधी ते एक्स्ट्रा शौर्याचा आव आणतात पण रझा मुराद येताक्षणी गळपटतात. त्यांची निर्भत्सना करून ती तिथूनही पळते.

रझा मुरादला एवढा वेळ वाया घालवायची सवय नाही. तो म्हणतो की कशाला धावपळ करतेस, तसेही तुला हार्ट ट्रबल आहे. पण तिचा मर्दप्रजातीवर अवास्तव विश्वास आहे. ती म्हणते की सूर्यास्ताच्या आधी जर कोणा मर्दाने तुला तुडवले नाही तर तुला काय करायचे ते कर. तसे बघावे तर हा शुद्ध बावळटपणा आहे. व्हिलनला अशा ऑफर द्यायच्या नसतात. पण तिच्या सुदैवाने ती पळत पळत दिलावर कबिल्यात आली आहे. चांदनी भाभी तिथे प्रकटतात आणि तरुणीला अभय देतात. विधवा स्टेटस दर्शवणारी पांढरी साडी त्यांनी परिधान केली आहे. रझा मुरादला झालेले मॅटर ठाऊक आहे. त्याला वाटते की आज हिलाही मारता येईल. पण राज बब्बर आडवा येतो. हा धरमपाजींचा सर्वात धाकटा भाऊ. याचे कपडे तुलनेने साधे आहेत. कपाळाला कसलीशी चिंधी बांधली आहे. तो रझा मुरादला म्हणतो की बंदुकीच्या बळावर गमजा मारणे बंद कर. रझा मुरादही महामूर्ख! तो लगेच बंदुक फेकून देऊन हाणामारीस उतरतो.

३) जाबर, तुझे जीने नही दूंगा

३.१) भाभी, तरुणी, आणि फर्स्ट-एड

बाज रब्बर वि. रझा मुराद हा सामना रंगतो. दोघे एकमेकांना पाळीपाळीने बुकलतात. फायटिंग खरीखुरी वाटावी म्हणून मध्ये मध्ये भाभी-तरुणीचे चिंताक्रांत क्लोजअप्स आणि दोघांना आपटायला मुबलक प्रमाणात रचून ठेवलेल्या विटा, मडकी इ. अखेर पारडे रझा मुरादच्या बाजूला झुकते. खोडरब्बर रक्तबंबाळ होऊन कोसळतो. धाकल्या दीराची अवस्था बघून चांदनी भाभी बेंबीच्या देठापासून किंचाळतात (हा भयाण शॉट आहे) - राका! सात वर्षांमध्ये राका अजूनच जाड झाला आहे. तो रझा मुरादला कॉम्प्लेक्स येईल असे विचित्र फॅशनचे कपडे घालून अवतरतो. इथे आपल्याला दिसते की दिलावर कबिल्यात "भरोसा लीडर अगरबत्तीयां" वापरतात. तसेच राकाच्या बॅकग्राऊंडला पुन्हा "भरोसा" व "लीडर" चा दिग्दर्शकीय टच. धरमपाजी रझा मुरादला म्हणतात की बिल खूप होतंय, चड्डीत राहा. पण रझा मुरादला अंथरूण न पाहताच पाय पसरायची सवय आहे. तो म्हणतो की विसरू नकोस रोशनला आमच्या कबिल्यातील बंदुकीची एक गोळीसुद्धा पचली नव्हती. हे धादांत खोटे विधान आहे. रोशनला मारायला तीन गोळ्या लागल्या होत्या. अशा खोटारड्याला पाजींकडून मार पडणे रास्तच आहे.

परत हाणामारी सुरू. रझा मुरादला पहिल्या फटक्यातच आपण जीवघेणे प्रकरण अंगावर घेतल्याची कल्पना येते. तिकडे तरुणी जाऊन रबराला कवटाळते. ते बघून चांदनी भाभी त्याच्या दुप्पट आवेशात फ्रेममध्ये घुसून रबराला कवेत घेतात. हा कुठला फर्स्ट-एड आहे? पाजी रझा मुरादला बुकल-बुकल-बुकलतात. ही संधी साधून तरुणीही त्याला दोन कानाखाली वाजवते. मग ती जाऊन पाजींच्या हाताचे चुंबन घेते. मग रडायला लागते. मग अचानक हसायला लागते. हे बघून पाजी प्रचंड गोंधळतात. राज कोहलीला देखील आपण काय करावे हे सुचत नाही. जेव्हा बॉलिवूड दिग्दर्शकाला काय करावे हे सुचत नाही तेव्हा तो गाणे सुरु करतो. त्यानुसार ती तरुणी वेडीपिशी होऊन नाचू लागते.

३.२) गुरूर, तुझे जीने नही दूंगा

गाणे आहे तेरा गुरूर टुकडे टुकडे हुआ. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार आनंद बक्षी, आणि गायिका आशा भोसले. ब्रिटिश कॉमेडिअन रिचर्ड अयोआदी एकदा म्हणाला होता की "ऑफ्टन देअर इज अ टेंडन्सी टू रीच फॉर एक्सलन्स. लाईफ ऑफ एक्सलन्स इज अ बोरिंग लाईफ. आय थिंक वी ऑल्सो नीड कंफर्टिंग मीडिऑक्रिटी". या सिनेमाच्या म्युझिक डिपार्टमेंटचा यावर पूर्णतया विश्वास आहे. त्यामुळे या सिनेमातील गाण्यांमध्ये कंफर्टिंग मीडिऑक्रिटी ठासून भरली आहे. पण जसे विराट कोहली डॉट बॉल खेळत नाही तसे राज कोहली इंचभरही फ्रेम वाया घालवत नाही. त्यामुळे या मीडिऑकर समुद्रातही काही मोती आहेत.

तरुणी आधी "टुकडे उठा और जा जा जा" "अपना मूंह छुपा और जा जा जा" असे म्हणत रझा मुरादला लाथा घालते. मग ती पाजींचा बेल्ट काढून घेते. हे बघून चांदनी भाभी दचकतात. बेल्टचा वापर रझा मुरादला बडवण्यासाठी होतो. चांदनी भाभीचा जीव भांड्यात पडण्याचा क्लोजअप - तात्पर्य पाजींची पँट खाली घसरली नाही. रझा मुरादवर अत्याचार करायचे असल्यामुळे त्याला भर उन्हात हिचा डॅन्सही बघावा लागतो आहे आणि त्याला पाणीसुद्धा पिऊ देत नाही आहेत. भारतीय जनता अतिशय सॅडिस्ट असल्यामुळे त्याची ससेहोलपट बघायला लगेच गर्दी जमते. या गर्दीसमोर त्याचा अजून थोडा पाणउतारा केला जातो. मग अचानक तरुणीला आठवते की आपल्याला हार्ट ट्रबल आहे. आता एवढ्या उन्हातान्हाचं नाचल्यावर अजून काय होणार? तिला हार्ट अ‍ॅटॅक येतो.

३.३) लॉजिक, तुझे जीने नही दूंगा

धरमपाजी इथे अप्रतिम संवाद फेकतात - अरे गिरना तो जबर को चाहिए था, ये सबर कैसे गिर गया? तरुणी मरायला टेकल्यानंतर तिला आपल्यात अजून बराच वाह्यातपणा शिल्लक असल्याची जाणीव होते. ती पाजींना सांगते की या रझा मुरादचा पाणउतारा काही पुरेशी शिक्षा नाही. जंगावर कबिल्याची लोकांना धडा शिकवण्यासाठी काहीतरी फार भारी करावं लागेल. पाजी विचारतात काय करू? ती म्हणते की जाबर आणि शाकाला एक बहीण आहे. ती खूप मग्रूर आहे. तिला जर दिलावर कबिल्यात लग्न करून आणलं तर हिशोब चुकता होईल. हे सर्व ती कॅमेर्‍यात बघत बोलते. पाजी वचन देतात की खोडरब्बराचं आणि जाबरच्या बहिणीचे लग्न होईल आणि ती दिलावर कबिल्यात सून म्हणून येईल. हे ऐकून तरुणी समाधानाने प्राण सोडते.

एकतर हे काय लॉजिक आहे? ती कोण कुठली बहीण, काळी का गोरी कोणी पाहिलेली नाही. त्यात हिच्या म्हणण्यानुसार मग्रूर. तिला सून करून घ्यायचं म्हणजे धोंडा गळ्यात बांधायचा. कोणी सांगितलेत असले नस्ते धंदे? दुसरे, समजा लग्न झालंच तर रेम्याडोक्याचे जंगावर कबिलेवाले चांदनी भाभीप्रमाणे तिलाही मारण्याचा प्रयत्न करणार नाहीत हे कशावरून? तिसरे म्हणजे खोडरब्बर तिच्या गळ्यात मारण्याएवढी ती बंडल आहे का? (उत्तर - हो) असो, यात खूप काही मुद्दे काढता येतील तरी कथानक पुढे नेऊयात. धरमपाजी जाऊन रझा मुरादचे बखोट धरून सुनावतात की आपला नाद करायचा नाही. रँडम तरुणीने आपल्याला भाऊ संबोधून अंतिम इच्छा सांगितली आहे. जा, तुझ्या बहिणीची डोली सजव, मी वरात घेऊन आलोच.

३.४) अ‍ॅक्टिंग, तुझे जीने नही दूंगा

रझा मुराद तसाच जखमी अवस्थेत जंगावर कबिल्यात परततो. शरमेने त्याने मान खाली घातली आहे. पाजींच्या मुष्टिप्रहारामुळे त्याचे नाक फुटून ते कापल्यासारखे दिसत आहे. जंगावरवाल्यांना "लेका नाक कापलंस" म्हणण्याची संधी मिळावी म्हणून हा सेटअप. तरीही रझा मुराद जरा टेरर असल्यामुळे कोणाची काही बोलायची हिंमत होत नाही आहे. आणि मग......

बिहोल्ड, रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंग - https://youtu.be/rhPHcV8lSx4?t=1793 (इथून पुढची साधारण दोन मिनिटे बघणे)

प्रॉब्लेम हा नाही आहे की तिचा 'अभिनय' दिव्य कोटीतला आहे. ओरिजिनल सीनमध्येही प्रचंड ओव्हरअ‍ॅक्टिंग आहे पण ती अतिशय स्टायलिस्टिक ओव्हर अ‍ॅक्टिंग आहे. त्या विचित्रपटाच्या काँटेक्स्टमध्ये इट समहाऊ वर्क्स. (ओरिजिनल सीन - दारो नटनी किल्स माख्या) इथे रेफरन्स असूनही तिला ओव्हरअ‍ॅक्टिंगही नीट करता आलेली नाही हा प्रॉब्लेम आहे. रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंग हे बिरुद अनाठायी नाही, तिचे इतर चित्रपटातही असे अनेक सीन्स आहेत (आमच्या अभ्यासानुसार डाकू बिजली नामक चित्रपट या अ‍ॅक्टिंग स्कूलचे शिखर आहे. वैधानिक इशारा: नवख्या प्रेक्षकांनी डाकू बिजलीपासून दूर राहावे.). अर्थात रझा मुरादचा मरण्याचा अभिनयही काही कमी दिव्य नाही.

असो, तर रोशनीचे चित्रपटातील नाव आहे रेश्मा. कबिल्याची इभ्रत धुळीस मिळवल्याबद्दल रेश्मा आपल्याच भावाला, जाबरला दोन गोळ्या घालून ठार करते. स्वतःवर नको तितका विश्वास असल्यामुळे ताई राका की लाश आणण्याची प्रतिज्ञा करतात आणि तडक घोड्यावर मांड टाकून लाश आणायला निघतात.

इथे माझा अल्पविराम! या पॉईंटला चित्रपटाचा मुख्य सेटअप पूर्ण झाला आहे. याशिवाय अनिता राज, विनोद मेहरा, आणि शक्ती कपूरही नंतर आपल्याला दर्शन देतात. धरमपाजी रोशनी-खोडरब्बर जोडी कशी जुळवतात, शॉटगनचे योजनेत खोडा घालण्याचे प्रयत्न, आणि उर्वरित रोमहर्षक प्रसंग प्रतिसादांत कव्हर करूयात.

____________________________________________________________________

पुढील विश्लेषण येथे

(४) - https://www.maayboli.com/node/78997#comment-4671598

(५) - https://www.maayboli.com/node/78997?page=1#comment-4672214

(६) - https://www.maayboli.com/node/78997?page=1#comment-4672799

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जबर लिहिलंय. हसून हसून मेलो Lol

पण एक निरीक्षण. राज कोहली स्कुल ऑफ दिग्दर्शनमधल्या सगळ्या दिग्दर्शकांना हिरोईन किंवा हिरोच्या नावाच्या विनाकारण हिंट द्यायची सवय असते. (यावरून न जाणे कुणी हिरोइनचे नाव ओळखा अशी पैंज खेळत असेल.)

१. तुला रेश्माच्या धाग्यात घेऊन जाईन. इ. इ. (रेशीम किडा आहे का ती?) - नाव रेश्मा
२. कडकती बिजली - बिजली

पायस एकदम भारी निरीक्षण. बिचारा राज कोहलीने विचार केला नसेल की मराठीमध्ये त्याच्या दिग्दर्शन शैलीचे इतके कौतुक होईल.

बाकी यातील 'तुम याद ना आया करो' गाणे चांगले आहे. ऐकून माहित होते पण तुमच्या परिक्षणामुळे हा चित्रपट पाहिला.

तिसरे म्हणजे खोडरब्बर तिच्या गळ्यात मारण्याएवढी ती बंडल आहे का? (उत्तर - हो) असो..
हे मला फारफार आवडलेले आहे. खूपच लोल . मी मधेच दुसरे काही काम करताना आठवलं की फिसकन हसू येते...
थँक्यू पायस ..
Lol

बिहोल्ड, रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंग - https://youtu.be/rhPHcV8lSx4?t=1793 (इथून पुढची साधारण दोन मिनिटे बघणे)

प्रॉब्लेम हा नाही आहे की तिचा 'अभिनय' दिव्य कोटीतला आहे. ओरिजिनल सीनमध्येही प्रचंड ओव्हरअ‍ॅक्टिंग आहे पण ती अतिशय स्टायलिस्टिक ओव्हर अ‍ॅक्टिंग आहे.
>>

बापरे! विचार केला तर अजुन ३० वर्षांनी आज कालचे शिणेमे पण असेच वाटतील का आपल्याला?

मलातर कॅालेज काळात आवडलेले चित्रपट आता पाहिले तर फारच बंडल वाटतात Lol
‘जीने नही दूंगा’ पाहिला एकदाचा. इथले परिक्षण वाचून बघायला मजा आली. धन्यवाद पायस.
पायसस्पर्ष झालेले अन्य चित्रपटही बघायच्या यादीत आहेत Happy

काल एकदाचा हा अत्युच्च दर्जाचा चित्रपट रोशनीवर फोकस ठेवून पाहिला. अवर्णनीय! अशा मनोरंजक चित्रपटाची माहिती देण्यासाठी पायस यांचे अनेक आभार!

धन्यवाद Happy
नवीन प्रतिसादकांचे - अथेना, rr38, अज्ञातवासी, सियोना - आभार.

राज कोहली स्कुल ऑफ दिग्दर्शनमधल्या सगळ्या दिग्दर्शकांना हिरोईन किंवा हिरोच्या नावाच्या विनाकारण हिंट द्यायची सवय असते. >> Happy तुम्हाला, आणि हे जाणवलेल्या सर्व वाचकांना, पुढील लिंक माझ्यातर्फे खास रेकमेंडशेन. 'बिजली' नाव असलेल्या कोणत्याही पात्राची यापेक्षा एपिक एंट्री मी तरी पाहिलेली नाही.

https://youtu.be/P8wUBdMYJvo?t=365 (मुद्दा चाळीस सेकंदात क्लिअर होईल. सीन साधारण दीड मिनिटाचा आहे.)

५) मनोरंजन, तुझे जीने नही दूंगा

नोंदः इथून पुढची साधारण पंधरा मिनिटे जरा पकाऊ आहेत.

५.१) रामसे बंधूंचा प्रभाव

यानंतरची साधारण चार मिनिटे स्किप केलीत तरी चालेल. मुद्दा असा की १९८४ मध्ये रामसे बंधूंचा तुफान चाललेला पुराना मंदिर आलेला. यात जगदीपचे इतर सिनेमाशी विसंगत मच्छरसिंगचे स्किट होते. इथे समज असा की सततच्या हॉररमधून प्रेक्षकांना काही क्षण विसावा म्हणून विनोदी प्रसंगांची पेरणी. ही पेरणी अनावश्यक असली तरी सिनेमा चालला. बहुधा राजजींनाही सततच्या हिंसाचारातून प्रेक्षकांना विसावा द्यावासा वाटला. म्हणून त्यांनीही सर्वथैव अनावश्यक विनोदी (?) स्किट टाकले आहे. उर्वरित चित्रपटात प्रेक्षकांना विनोद सापडणार नाही हा त्यांचा आत्मविश्वास बघून माझ्या घरी अश्रूंचा पूर आला.

या प्रकरणाचा सारांश असा की घसीटाराम म्हणून हलवाई आहे. जयश्री टी त्याची मुलगी, तिला घराबाहेर पडायला मनाई आहे कारण घसीटारामला आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. जगदीपची घसीटारामकडे बरीच उधारी आहे. घसीटाराम आधीची उधारी चुकती कर म्हणून त्याला हाकलतो. योगायोगाने तो जयश्रीला दिसतो. जयश्री त्याला "मला एंटरटेन करणे" ही नोकरी ऑफर करते. आता या नोकरीची रसभरीत वर्णने ऐकून घसीटारामला संशय येतो की आपल्याच घरात तर हा उद्योग चाललेला नाही ना? उर्वरित सिनेमात हा फार्स रबरबँडप्रमाणे ताण-ताण-ताणला आहे. अ‍ॅडब्रेक समजून या प्रकरणाला इग्नोर मारणेच इष्ट!

५.२) मचाणावर जुळलेल्या गाठी

सिनेमातले या रबरबँडपेक्षा महत्त्वाचे रबर म्हणजे खोडरब्बर. खोडरब्बर-रोशनी जोडी जुळणे कथेच्या दृष्टीने अनिवार्य आहे. पण रोशनीला राका की लाश काय आणता आलेली नाही. पांढरा शर्ट, पांढरी पँट, सोनेरी जाकीट आणि कपाळाला सोनेरी पट्टी अशा विचारपूर्वक निवडलेल्या पोशाखात ती धुमसते आहे. तिला एक चिल्लर एक्स्ट्रा येऊन सांगतो की परत शेतांना आगी लागू नयेत म्हणून राका स्वतः शेतांची राखण करणार आहे. ही सुवर्णसंधी साधण्यासाठी रोशनी दिवसाउजेडी घोडा पळवत रात्रीची शेतांवर पोहोचते. आय रिपीट - रोशनी दिवसाउजेडी घोडा पळवत रात्रीची शेतांवर पोहोचते.

अजिबात पाऊस पडत नसतानाही तिचे केस ओले आहेत (कारण या सीनचे बरेच रिटेक झाले असणार). तिला मचाणावर कोणीतरी एकटेच गाताना दिसते. 'हा राकाच असेल' असा विचार करून ती चाकू काढून मचाणावर जाते. पण मचाणावर झोपला आहे ऑप्टिकल फायबर. हा कोण आले आहे हे बघायला कुशीवर वळतो मात्र, रेश्मातै भूत पाहिल्यागत दचकतात, त्याला अडखळतात, आणि मचाणाखालच्या चिखलात उडी घेतात. इथे पोटरीभर चिखलाला दलदल म्हणून कसे खपवावे याचा डेमो आहे. फायबर तिच्यावर पाणी उडवून तिच्या अंगाला लागलेला चिखल साफ करतो. बादल रेश्मासोबत फ्लर्ट करतो तर ती त्याला हलकीशी जखम करून पळते.

दुर्दैवाने दिलावर कबिल्यातील शेतकरी, ज्यांची शेतं रेश्माने जाळली, तेही पहारा देत आहेत. ते रेश्माला मारू बघतात. नॅचरली बादल मध्ये पडतो. कबिलेवाले म्हणतात की ही दुश्मन पार्टी आहे, तू बाजूला हो. तो म्हणतो की नाही, आपल्या कबिल्यात पाहुण्यांवर हल्ला करत नाहीत. ही आपली पाहुणी आहे, हिला वाचवण्यासाठी वेळ पडली तर मी आपला जीवही देईन. एकतर - खुशाल दे. आत्तापर्यंत याने कसलेही कर्तृत्व दाखवलेले नाही. यःकश्चित रझा मुरादही याला बडवत असेल तर..... दुसरे म्हणजे, हे काय लॉजिक आहे? नॅचरली रेश्मा मात्र प्रेमळ नजरेने त्याच्याकडे बघते. नोंदः प्रेमळ नजर म्हणजे आमचा आपला एक अंदाज. प्रत्यक्षात ते भाव 'अहो घरातील साखर संपेपर्यंत तुम्हाला साखरेचाच चहा बिनसाखरेचा म्हणून देत होते' या छापाचे रहस्योद्घाटन ऐकल्यावरचे आहेत.

५.३) नवपरणित प्रेमिकांची वेडी साहसे

बिच्चारे कबिलेवाले! खोडरब्बर पाजींचा भाऊ असल्याकारणाने कितीही इच्छा झाली तरी त्याला गठ्ठ्याने बडवणे शक्य नाही. ते हत्यारे टाकतात. रेश्मा अपमानित होऊन तिथून निघून जाते तर बादलही तिच्या पाठोपाठ दुसर्‍या दिशेने जातो. थोडे अंतर गेले नसतील तर तिला तो भेलकांडताना दिसतो. खरं तर त्याला भेलकांडायचं काही कारण नाही पण काही कारणास्तव तो बेशुद्ध होतो. याकरिता सोयीस्कररित्या शेतांजवळच बारादरी बांधली आहे. आपण इथे समजून घ्यायचे काही जे एक-दोन फटके याला पडले तेवढा मुका मार याची शुद्ध हरपण्यासाठी पुरेसा होता. रेश्मातै येऊन बादलचे डोके आपल्या मांडीवर ठेवतात. याने तो शुद्धीवर येण्यास अर्थातच कसलीही मदत होत नाही. मग त्या उजाडेपर्यंत तशाच बसून राहतात. सुदैवाने याला काही विशेष झालेले नसल्याने तो पहाट होताच शुद्धीवर येतो. उठल्या उठल्या त्याला रोशनीचा भूतासारखा चेहरा दिसतो. सामान्य पुरुष इथे हार्ट अ‍ॅटॅकने दगावेल. पण खोडरबर फ्लर्टिंग करतो आहे.

इथे एक अप्रतिम डायलॉग आहे - लगता हैं हुस्न ने दिल का सलाम कुबूल कर लिया हैं. हे जरी खरे असले तरी एक मोठा प्रॉब्लेम आहे. शाका तुरुंगातून परत आला आहे. शाका परत आल्याच्या आनंदात गाणे सुरु होते. हम भी ना माने, तुम भी ना माने, दिल दे के खेल गए जान पे दीवाने. कमकुवत हृदयाच्या व्यक्तींनी पुढची पाच-सहा मिनिटे सिनेमा म्यूट करावा. आता कंफर्टिंग मीडिऑक्रिटीचा उबग आल्याने प्रेक्षकांवर शब्बीर कुमारला सोडले आहे. सोबतीला आशाताईंनी आपल्या परीने ही पाच मिनिटे सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. पण कोरिओग्राफर आणि गाण्यापुरती बोलावलेल्या डान्सर जोडीलाही उत आला आहे. या जोडीतील स्त्री डान्सर आहे लीना दास म्हणून अभिनेत्री. ही जवळपास सगळ्याच सिनेमात डान्सरच बनते. अस्मादिकांच्या रसग्रहण मालिकेच्या नियमित वाचकांना ही ललना सिंघासनमधील बूबा बूबा गाण्यातील एक बूबा म्हणून ओळखता येईल. हे गाणे काही बाबतीत अभ्यासण्यालायक आहे.

शॉटगन कबिल्याच्या सिंहासनाला पर्यायी म्हणून जे काही आहे तिकडे बसला आहे. सर्वांना ठाऊक आहे की या प्राण्यास प्रेम या संकल्पनेचे वावडे आहे. तरीही जान पे खेल गए दीवाने असे शब्द असलेले गाणे का सादर करावेसे वाटले असेल? तेही हा तुरुंगातून सुटून परत आल्याच्या आनंदात? तसेच बादल-रेश्मा जवळच्या टेकाडावरून हा डान्स परफॉर्मन्स बघत आहेत. धाडस आणि वेडे साहस यातला फरक या लोकांना कळत नाही का?
नियमितता या गुणधर्माचे महत्त्वही या लोकांना ठाऊक नाही. डान्सर जोडीतील बाप्याला इतर पुरुष एक्स्ट्रांसारखेच कपडे दिले आहेत. लीना दासलाही स्त्री एक्स्ट्रांसारखेच, फार फार तर थोडे फॅन्सी फॅब्रिकचे कपडे द्यायला पाहिजेत. त्याऐवजी तिला एकटीलाच चंदेरी, जिप्सी स्टाईलचे उत्तान कपडे आणि बाकी एक्स्ट्रांना साडी. हिचे एकटीचेच केस मोकळे आणि त्यांचे केस बांधलेले. या डिझाईन चॉईसमधून त्याकाळच्या प्रेक्षकांची चव लक्षात येऊ शकते.
मध्ये यांना नाचताना हातात रुमाल दिले आहेत. कसोशीने कुठल्याही एक्स्ट्राच्या रुमालांचा रंग त्यांच्या कपड्यांना मॅच होणार नाही हे बघितले आहे. हे असे का हा प्रश्न अनुत्तरित आहे.
गाण्यात मध्ये मध्ये राज बब्बर-रोशनी नाचताना दिसतात. अर्थातच हे त्यांचे स्वप्न निघणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. अशी प्रेमकहाणी केवळ स्वप्नातच असू शकते याचे हे प्रतीक आहे.
मध्येच एक्स्ट्रांच्या हातात घुंगुरकाठ्या दिल्या आहेत. हे लोक कबिलेवाले आहेत हे दर्शवण्याकरता उत्तर भारतात फारसे न आढळणारे वाद्य दिलेले बघून प्रेक्षक धन्य होतो.

गाण्याच्या शेवटी शेवटी कंफर्टिंग मीडिऑक्रिटी परत डोके वर काढते. हे बघून दिग्दर्शक आवरते घेतो. रेश्माला स्वप्नात असे दिसते की शाका बादलला मारतो आहे. हे बघून तिचे स्वप्न संपते. राज बब्बर तिला आश्वस्त करत म्हणतो की मी नफरतच्या नदीवर प्रेमाचा पूल बांधेन (आधी चिखल नसलेल्या जागी मचाण बांधायला शिक, मग पूल बांधत बस). पण इतक्या सहजासहजी रेश्मावरचा शाकाचा पगडा दूर होणे शक्य नाही. गेली पंधरा मिनिटे या सिनेमाच्या स्टँडर्डने काहीशी पकाऊ असल्यामुळे, कु. रोशनी भयातिरेकाने कसे पळत सुटावे याचा अ‍ॅक्टिंग डेमो देतात.

इथे सिनेमाचा निम्मा मुद्दा झाला आहे. शाका परत आल्यामुळे आता खर्‍या अर्थाने हे लोक एकमेकांना जीने नही देंगे. यांच्या कबिल्यात लिफ्टा नसल्यामुळे उरलेल्या सिनेमात यांना जिन्यावरून भांडाभांड करणे भाग आहे. ती पुढच्या भागांमध्ये बघूयात.

पण मचाणावर झोपला आहे ऑप्टिकल फायबर. हा कोण आले आहे हे बघायला कुशीवर वळतो मात्र, रेश्मातै भूत पाहिल्यागत दचकतात, त्याला अडखळतात, आणि मचाणाखालच्या चिखलात उडी घेतात. इथे पोटरीभर चिखलाला दलदल म्हणून कसे खपवावे याचा डेमो आहे ,>>>
Lol Lol Lol

असला खत्तरणाक पिक्चर शोधून काढल्याबद्दल मी पायस ह्यांचे या ठिकाणी आभार मानतो. परीक्षण फारच भारी लिहिलं आहे. त्यामुळे काल हा चित्रपट मुद्दाम वेळ काढून पाहिला.

ती रौशनी जेव्हा शर्ट पॅन्ट मध्ये आहे, तेव्हा ती काही कारण नसताना एक विशिष्ट स्टॅन्स घेऊन उभी राहते, जे फार विनोदी वाटतं. प्रत्येक वाक्याला, उभं राहताना, चालून झाल्यावर, मागे वळल्यावर, ती तो स्टॅन्स घेते, जणू काही असं उभं राहण्याची तिच्यावर नैतिक जबाबदारी आहे!

तो शिट्टी वाजवून घोड्याला परत बोलावतो तो सीन पण भारी आहे. तिथे घोडा उलटा परत येतो तेव्हा हवेत असलेली धूळ ही घोड्याच्या टापांखाली नीट बसत जाताना दिसते. ज्यांनी हा सीन पाहिलाय त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते. (इथे मी मागे कुणी एक्सट्रा बैल, घोडा वगैरे हागायला उभा आहे का शोधत होतो. फाळक्यांनी दिग्दर्शित एका सिनेमात असा उलटा सीन पळवताना म्हणे पाठीमागे उभ्या असलेल्या एका बैलाचं शेण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध उडून आत गेलेलं दिसलं. फाळक्यांना लक्षात आल्यावर तो स्पेशल इफेक्ट् एडिट केला गेला.)

तो शिट्टी वाजवून घोड्याला परत बोलावतो तो सीन पण भारी आहे. … >> हो. पुढे शक्ती कपूर अनिता राजला अश्याच रिव्हर्स ॲक्शन मधे घोड्यावर बसवून पळवतो. ती उभी असतानाच टूनकन घोड्यावर बसलेली दाखविले आहे.

नवीन प्रतिसादांचे आभार.

६) चांदनी भाभींचा पाय, तुझे जीने नही दूंगा

६.१) धाकल्या दीराचे लग्न वहिनी जुळवते

रेश्मा धावत धावत घरी परतते. शाका तिचीच वाट पाहत होता. त्याला बघताच आधी ती आनंदते पण आपला लेटेस्ट उद्योग आठवून तिच्या पोटात गोळा येतो. पण शाकाला अजून या नवीन डेव्हलपमेंट्स माहित नाहीत. तो विचारतो की डोळ्यात गंगा-यमुना का? रझा मुरादला मारून तू अगदी बेस्ट काम केलं आहेस, अजिबात रडायची गरज नाही. ती गूढपणे "आधे आंसू तुम्हारे आने के खुशी में, आधे आंसू किसी के जाने के गम में" आपल्या उद्योगाची हिंट देते. पण शाकाला त्यामागचा गर्भितार्थ समजत नाही. तो तिला आश्वस्त करत म्हणतो की फिकर नॉट, आपल्या मानहानीचा बदला मी घेईन.

जंगावर कबिल्यात शाकाच्या पुनरागमनाचा धिंगाणा चालू आहे तर दिलावर कबिल्यात चांदनी भाभी बादलची मलमपट्टी करत आहेत. मुळात त्याला फारसा मार पडलेलाच नाही. तरी समजा हे मान्य केलं की त्याला शेतकर्‍यांनी चांगला चोपला. पण त्याला काठीचे काय एक दोन फटके पडले ते पडले पाठीवर. बँडेज गुंडाळलंय दंडावर. चांदनी भाभी, हा कुठला फर्स्ट एड आहे? पण भाभींनाही दोष देण्यात अर्थ नाही. ऑप्टिकल फायबर म्हणतो की माझी जखम बाह्यदर्शनी नसून अंतर्गत आहे. चांदनी भाभी जरा गोंधळतात. जेव्हा सायबर सांगतो की नयनबाणांनी माझ्या हृदयास जखमी केले आहे तेव्हा त्यांची ट्यूब पेटते. आपल्याला वाटते त्यापेक्षा बॉलिवूडची 'वहिनीने दीराचे लग्न जुळवणे' ही परंपरा जुनी आहे. त्यानुसार चांदनी भाभी बादलला आश्वस्त करतात की तुला आवडलेल्या मुलीसोबत तुझं लग्न करू. याने आनंदून तो भाभीला मस्त मिठी मारून उचलून घेतो. (इज ही अ भाभी पर्सन?)

६.२) उतावळी नवरी आणि दंडाला चाकू

इथे तुनळीवर बहुतेक सीन काटला आहे. कारण राज बब्बरचे एक्सप्रेशन्स बघता इथे गैरसमजूतीतून उत्पन्न होणारा विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असावा. बेसिकली, धरम पाजींनी रँडम तरुणीला वचन दिले आहे ना. त्यामुळे राज बब्बरला लव्ह मॅरेजचा ऑप्शन नाही. त्याचे नशीब जोरावर असल्याने त्याचा डाव शाका की मग्रूर बहन रेश्माच आहे. सर्व सेट असल्याने राका बादलसाठी रेश्माला रीतसर मागणी घालण्याचा निर्णय घेतो. त्याला यश यावे म्हणून चांदनी भाभी मंदिरात पूजा करून राकाला शकुनाचा दहीभात राकाला भरवण्याचा प्लॅन करतात. लोकांना मांजर आडवी जाते, नीता मेहताला अनिता राज आडवी येते. ती म्हणते चक्कू मार दूंगी.

अनिता राज म्हणते जाऊबाई तुम्ही माझ्या स्थळासाठी शकुनाचा दहीभात कधी आणणार? इथे चांदनी भाभींच्या डावीकडची एक्स्ट्रा केवळ एंटरटेनमेंट आहे - तिच्या चेहर्‍यावर 'कशात काही नाही आणि म्हणे जाऊबाई शकुनाचा दहीभात पाहिजे' असे भाव आहेत. चांदनी भाभी तिला म्हणतात की सतत चक्कू मारलास तर कोण तुझ्यासोबत लग्नाला तयार होईल? त्यांचे म्हणणे अनेक पातळ्यांवर खरे आहे. निव्वळ कपडेच बघूयात. विधवा-स्पेशल पांढर्‍या साडीतही चांदनी भाभी हिच्यापेक्षा जास्त प्रेझेंटेबल दिसतात. हिची सर्व मदार नेव्हल एक्सपोजरवर. आय मीन किमान फॅशन सेन्स दाखवावा. आपण सतत चाकू बाळगतो. चांगली एंब्रॉईडरी असलेली चामडी म्यान शिवून घ्यावी. ती कंबरेला लटकवण्याच्या दृष्टीने मस्त कंबरपट्टा डिझाईन निवडावे. हे राहिलं बाजूलाच. उलट चाकूची जागा दंडावर. त्यात स्लीव्हलेस चोळी असल्याने तो चाकू लपतही नाही. कोण हिच्यावर लाईन मारेल? पण ही वेगळ्याच तारेत आहे. तिने आधीच मुलांची नावे सुद्धा ठरवली आहेत. धरमपाजी लगेच तिला जमिनीवर खेचतात. ते चांदनी भाभींना विचारतात की घरात कामवाली ठेवायची होती ना, ही कशी वाटते? बिचारी यावर काय बोलणार - अर्थातच चक्कू मार दूंगी.

६.३) अदला बदली

इतका वेळ बिकानेर, नैऋत्य पंजाबचा भूगोल दाखवल्यावर अचानक दिग्दर्शकाला माऊंट अबूसाईडला जायची हुक्की येते. त्यामुळे सीन एका दरीवर बांधलेल्या झुलत्या पूलावर शिफ्ट होतो. दरीच्या दोन्ही बाजूंना पुरेशी हिरवळ; वाळवंट/माळरानाचा दूरवर मागमूस नाही. या पुलावर एका बाजूने राका, दुसर्‍या बाजूने शाका घोड्यावरून येतात. आधी तर त्यांचे घोडेच एकमेकांशी भांडतात. मग हे दोघे फडतूस वाद घालत बसतात. मुद्दा असा आहे की पुलावरून आधी कोण जाणार. हा वाद अतिशय फडतूस आहे. पूल दोन घोडे जाण्याइतपत रुंद आहे. घोडे पळवणे शक्य नाही पण सावकाश नेले तर ते दोन घोडे सहज पुलावरून ये जा करू शकतात. ऑलरेडे दोन घोडे आणि दोन रेडे पुलावर उभे असल्याने पुलाच्या मजबूतीचाही प्रश्न नाही. तरीही दोन मिनिटे फूटेज खाल्लंय.

याहूनही मोठे प्रॉब्लेम्स या दोन मिनिटाच्या सीनमध्ये आहेत. एकतर शाकाला राका ओळखू कसा येत नाही? अगदी शाकाने राकाला कधी पाहिले नाही हे मान्य केले, शाकाला दिलावर कबिल्यात जुळे भाऊ आहेत हे माहित नाही हेही मान्य केले, तरी शाकाने रोशनला पाहिले आहे. आपण मारलेला धर्मेंद्र जिवंत कसा, हा प्रश्न तरी त्याला पडायलाच हवा. दुसरे दोघे एवढ्या गमजा मारतात, त्यांना एकमेकांचे नाव विचारावेसे वाटू नये? तिसरा मुद्दा - घोडे अदलाबदल करणे हा चांदनी भाभीच्या फर्स्ट एडपेक्षाही यूजलेस उपाय आहे. हे दोघे एवढे शूरवीर, मर्द लोक. त्यांचे घोडेही तसेच घमेंडखोर असणार. आणि अगदी नसले तरी अज्ञात व्यक्तीला इतक्या सहजा सहजी उमदा घोडा स्वार होऊ देईल? एनीवे, ते घोड्यांची अदलाबदली करतात जेणे करून घोड्यांना एकमेकांना क्रॉस करावे लागणार नाही. घोडे परत देण्यासाठी संध्याकाळी काली पहाडीवर भेटण्याचे ठरवून ते आपापल्या वाटेस लागतात.

६.४) अहिंसक लढाया

हा वेडेपणा अर्थातच काहीच नाही. कारण धरमपाजींच्या स्वागतास कु. रोशनी बंदूक घेऊन उभ्या आहेत. इथे पाजींना कळते की पुलावर भेटलेला घमेंडखोर घोडेस्वारच शाका आहे. रोशनीला कळते की जामीन देणारा राका होता. इथे फारच अहिंसक लढाई होते. राका सापडल्याच्या आनंदात ती दोन गोळ्या झाडते. पाजींना अर्थातच याने काही होत नाही. पाजी निवांतपणे तिची बंदूक हिसकावतात आणि म्हणतात की रॅंडम तरुणीला मी वचन दिले आहे. 'पदरी पडलं पवित्र झालं' न्यायाने तुझं बादलशी लग्न लावणं भाग आहे. पण रोशनीचा शॉटगनवर भलताच विश्वास! शॉटगनने एव्हाना दिलावर कबिल्याचा विध्वंस केला असेल असा ती दावा करते.

तिकडे शॉटगनच्या स्वागतास खोडरब्बर तलवार घेऊन उभा आहे. शॉटगनही विचित्रसा काटेरी सोटा घेऊन आला आहे. काही कारणाने बादल स्वतःची ओळख राका अशी करून देतो. शाका म्हणतो बरा सापडलास, आता फायटिंग करू. दोघांची खणाखणी सुरु होते. ही तुलनेने फारच अहिंसक लढाई आहे. दोघांत मिळून एकही वार धड बसत नाही. मिनिटभर खेळल्यानंतर शाका शारिरिक बळाचा वापर करून बादलची तलवार खाली पाडण्यात यशस्वी होतो. बादलची शंभरी भरली असे वाटत असतानाच चांदनी भाभी मध्ये पडतात. शाकाचा वार होतो त्यांच्या पायावर. त्या किंचाळतात बादल! शाकाला लक्षात येते की हा राका नाही. त्याला फक्त राका की लाशमध्ये इंटरेस्ट असल्याने तो तिथून निघून जातो.

ऑफकोर्स आता काली पहाडीवर शाका वि. राका सामना रंगेल. पुढच्या भागात तो कव्हर करू. पण तत्पूर्वी - बिच्चार्‍या चांदनी भाभी. बिजली आडवी गेल्यामुळे शकुनाचा दहीभात कामी आला नाहीच, उलट त्यांच्यावरच लंगडण्याची पाळी आली.

पायस, तुमच्या परिक्षणामुळे हा चित्रपट पहाणार. एका स्क्रिनवर चित्रपट व दुसर्‍यावर हे लिखाण असेच बघत आलेलो आहे.

हे वाचत वाचत चित्रपट बघतेय. अगदी हहपुवा होतेय.

त्याला काठीचे काय एक दोन फटके पडले ते पडले पाठीवर. बँडेज गुंडाळलंय दंडावर. चांदनी भाभी, हा कुठला फर्स्ट एड आहे?>>>>>> त्या काठ्या पडण्याआधी, रेश्माने दोन्ही हातांवर चाकूने वार केलेला असतो ना.... खरंतर पुढच्याच सीनमध्ये दंडांवर जखमांचा मागमूसही दिसत नाही. आणि लॉजिकली रात्रभर जखम सुकल्यावर सकाळी बांधलेल्या पट्टीतून रक्ताचे डाग दिसायला नको.

वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे रोशनीताईंची तिरकी चाल लगेच नजरेत भरते.

किती तो राग त्या राज babbar वर! दर वेळी vegvegale नाव त्याला! Biggrin
दुसरे दोघे एवढ्या गमजा मारतात, त्यांना एकमेकांचे नाव विचारावेसे वाटू नये? ..
हे मस्त.

तिसरा मुद्दा - घोडे अदलाबदल करणे हा उपाय कोडे सोडविल्या सारखा आहे....

आय रिपीट - रोशनी दिवसाउजेडी घोडा पळवत रात्रीची शेतांवर पोहोचते.
>>
अस काय करता राव दिवसाची आग दिसणार कशी!

धमाल, असेच "वतन के रखवाले " या ऑस्कर योग्य चित्रपटाचे परीक्षण वाचावयास आवडेल.
अर्थात कोणी तो पूर्ण पाहू शकले तर

पुभाप्र !
नेफिवर शेरनी नाव ऐकल्यावर हा कोणाला आठवला

माझी जाहीर दिलगिरी. कामाच्या नादात याकडे दुर्लक्ष झाले आणि खंड पडला. उर्वरित सर्व भाग लिहून झाले आहेत आणि ते एकत्रच पोस्टत आहे.

नेफिवर शेरनी नाव ऐकल्यावर हा कोणाला आठवला >> Happy तुम्ही विषय काढलाच आहे तर वैधानिक इशारा दिल्याशिवाय राहवत नाही. श्रीदेवीचा शेरनी मिळमिळीत आहे. त्या काळात आलेल्या सर्व लेडी डाकूपटांमध्ये सर्वाधिक बोरिंग.

७) कितीही ऑब्व्हिअस असले तरी तोंडघशी पडल्याखेरीज तह करण्याचे शहाणपण येत नाही

७.१) रहस्यमयी जखम आणि निरर्थक बंधन

शॉटगन आपल्या कबिल्यात गेलाय हे कळल्यावर पाजी वायुवेगाने घोडा दौडवत परत येतात. परत येताना ते बहुधा वेगळ्या वाटेने येतात कारण त्यांची शॉटगनशी भेट होत नाही. त्यांच्या स्वागतास उभी आहे कडकती बिजली. अनिता राज दिलावर कबिल्याची नार म्हणून शोभत नाही. फाईट हरला बादल, पाय कापला गेला चांदनी भाभीचा आणि उखडली आहे ही. अमन-शांती वगैरे प्रकारात तिचा विश्वास नाही. ती थेट राकाला शाकाविरुद्ध चिथावते. राकासुद्धा आत जाऊन बघतो तर नेहमीप्रमाणे बादलला किरकोळ जखमा आहेत. तर चांदनी भाभींच्या पायाच्या जखमेचं ड्रेसिंग चाललं आहे. ही जखम फार रहस्यमय आहे. आधीच्या शॉटमध्ये शाकाचा वार डाव्या पायावर बसला होता. आत्ता जखम उजव्या पायाला चाललं आहे. समजा पहिली कंटिन्यूटी मिस्टेक माफ केली तरी, उर्वरित चित्रपटात त्या ज्या रीतिने लंगडतात त्यावरून त्यांचा एक पाय गुडघ्यातून कापला गेला असे वाटते. आणि उर्वरित चित्रपटात पूर्ण वेळ त्यांचा डावा पाय शाबूत दाखवला आहे. म्हणजे उजवा पाय कापला गेला आहे. मग या शॉटमध्ये उजवा पाय बँडेजसकट शाबूत कसा?

इथे पुन्हा एक अप्रतिम डायलॉग - रोशन भैयाने अपनी जान देकर अमन का जो चिराग जलाया था, शाका उसे एक फूंक मार के बुझा गया. पाजी म्हणतात की वहिनी मला वचनमुक्त कर. केवळ मी दिलेल्या वचनाचे बंधन मला थांबवत आहे नाहीतर जंगावर कबिल्याचा केव्हाच विध्वंस झाला असता. चांदनी भाभी म्हणतात दॅट इज द होल पॉईंट. तू असं काही करू नयेस म्हणूनच मी आणि रोशन भैयाने हे बंधन घातले आहे. राका म्हणतो की मग मी हे बंधन झुगारून देत आहे. दरवेळी येऊन शाकाने काही कांड करून जायचं, याला काय अर्थ आहे? पाजींचा मुद्दा योग्य आहे, पण मग त्या बंधनाला तरी काय अर्थ राहिला?

७.२) ढ गोळा

ठरल्याप्रमाणे काली पहाडीवर पाजी कुर्‍हाड घेऊन येतात. तिथे एक थोडी पडझड झालेली हवेली आहे. शॉटगन काटेरी त्रिशूळ घेऊन त्यांची वाट बघतो आहे. इथे एक अप्रतिम डायलॉग - ये तूफान तो सो रहा था अमन के बादलों को अपना तकिया बना कर. थोडी बाचाबाची केल्यानंतर फायटिंग सुरु होते. क्लोजअपमध्ये हे दोघे लढतात आणि लाँगशॉटमध्ये त्यांच्यापेक्षा कितीतरी लुकडे स्टंट डबल. इथे शाका क्लिअरली ढ लढवय्या आहे. तो लांब दांड्याचा त्रिशूळ घेऊन आला आहे. हे क्लोज रेंज फाईटसाठी फारसे उपयुक्त शस्त्र नाही. राका इथे सहज वेटिंग गेम खेळू शकतो. त्रिशूळाच्या दांड्यावर लक्ष केंद्रित करून त्याला तोडण्याचा प्रयत्न करणे ही अतिशय ऑब्व्हिअस स्ट्रॅटेजी तो वापरतो. त्यानुसार शाकाचा त्रिशूळ निकामी होतो.

मग तो तीन गोळ्यांची फ्लेल (साखळी लावलेली काटेरी गदा) घेऊन लढू लागतो. फ्लेल अतिशय रिस्की शस्त्र आहे. दोन वारांमध्ये बराच वेळ जाणार, कंट्रोल करायला अवघड, त्यात पाजी सोबत ढाल घेऊन आलेले. पुन्हा एकदा शाका टॅक्टिकली लढाई सुरु होण्याआधीच हरला आहे. त्यात तो दोन्ही शस्त्रे तलवार वापरल्यासारखी वापरतो आहे. असं कसं चालेल? एक वार बसल्याचे तेवढे समाधान त्याच्या हाती लागते. त्याची अजून नाचक्की होऊ नये म्हणून इतका वेळ वाट पाहत थांबलेले पोलिस मध्ये पडतात.

७.३) कॅटफाईटची हुकलेली संधी

साधारण साडेचार मिनिटे स्किप - जयश्री टी-जगदीप ट्रॅक. कट टू सेम लोकेशन (काली पहाडीची हवेली). तिकडे टेंपररी पोलिस स्टेशन टाकले आहे. दोघे दावा करतात की पोलिस मध्ये पडले नसते तर आज आपण आपल्या शत्रूला मारलेच असते. इन्स्पेक्टरला या दोघांच्या फाईटमध्ये काही रस नाही. किंबहुना पोलिसखात्यालाच यांच्या फडतूस वादावादीत इंटरेस्ट नाही, जस्ट नॉट वर्थ इट. इन्स्पेक्टर त्या दोघांना सांगतो की वरून आदेश आला आहे की तुम्हाला नजरकैदेची शिक्षा दिली आहे. हुशार माणूस या संधीचा फायदा घेऊन घरबसल्या विरोधकाविरुद्ध फूलप्रूफ प्लॅन बनवेल. पोलिस परत गेले की प्लॅननुसार विरोधकाचा कायमचा काटा काढून टाकावा. ये हैं मेंटॉस जिंदगी! राका आणि शाका मात्र आम जीवन जगत असल्यामुळे ते नजरकैदेतून पळतात, वाळवंटात फाईट करतात आणि पुन्हा पकडले जातात.

या दुसर्‍या फाईटच्या दरम्यान दोघांना पोलिसांच्या गोळ्या लागतात. आता दोघे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहेत. अनिता राज पाजींना भेटायला येते. आधी तिला नर्स अडवते, म्हणते की व्हिजिटिंग अवर्समध्ये या. पण अचानक तिथे रोशनीतै अवतरतात. त्या त्यांच्या स्टँडर्डनेही फारच उच्चप्रतीचा अभिनय करतात. तो प्रकार बघून अनिता राज तिच्याकडे तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकते - तू, तू बनणार हिरोईन, तू? तिकडे राका-शाका अजूनही वायफळ बाता मारतच आहेत. डॉक्टरही वैतागून म्हणतो की रक्त चढवायची पाळी आली, आता तरी सुधरा. पण या दोघांवर त्याचा काही परिणाम होत नाही. मग या दोघी येतात. इथे कॅटफाईटची सर्व लक्षणे आहेत पण पाजी अनिताला म्हणतात ती तुझी धाकली जाऊ आहे, दे सोडून. कमऑन धरम पाजी - आधीच्या सीनमध्ये अनिता ज्या फणकार्‍याने रोशनीकडे बघते ते पाहता ही सॉलिड, वास्तववादी कॅटफाईट झाली असती.

असो, राका-शाकाच्या डोक्यात प्रकाश पडतो की नुसत्या हाणामारीने काही साध्य होणार नाही, पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये आपण मारले मात्र जाऊ. मग ते दोघे तात्पुरता तह करतात. ते बघून इन्स्पेक्टरही सुटकेचा निश्वास टाकतो. पण इथे एका महत्त्वाच्या गोष्टीची नोंद घ्यावी - राकाला हुंडा म्हणून शाकाचा पाय हवा आहे (चांदनी भाभींच्या पायाच्या बदल्यास्वरुप) तर शकुन म्हणून शाकाला राकाचे मुंडके हवे आहे. हे फार फार महत्त्वाचे फोरशॅडोईंग आहे. हे सिनेमाच्या अखेरीस स्पष्ट होते.

Pages