प्रीतीत गुंतले रे!! - २

Submitted by रमण३०१२ on 15 May, 2021 - 05:07

आधीचा भाग : https://www.maayboli.com/node/78936

मामानं विचारलं तुला काय काय लागणार आहे?
आणि आर्थिक मदत कितीपर्यंत लागेल?
रामराव ने त्याची योजना मामाला सांगितली.
थोडीशी जागा आणि एक लेथ आणि मिलिंग मशीन घेण्यासाठी लागणारा पैसा.

मामा म्हणाला अरे एवढेच ना मग काम होऊन जाईल तुझं! आपली बारव खालची जमीन आहे ना, त्याच्या बाजूला थोडीशी पडीक जमीन आहे आपलीच आहे ती! वापर तू तुझ्या व्यवसायासाठी. मशनरी पाहिली आहेस का तू? नसेल तर आपण उद्या कोल्हापूरला जाऊ आणि मशनरीची चौकशी करून येऊ. भाच्याला मोठा हूरूप आला.

मामाच्या जागेत मामाच्या मदतीने त्याने लेथ मशीन मीलिंग मशीन वर व्यवसाय चालू केला. सुरुवातीला तो स्वतः काम करायचा त्या मशीनवर. आजूबाजूच्या सह व्यवसायिकांची लेथ आणि मिलिंग ची कामे त्याला मिळू लागली. सुरुवातीला फार इन्कम नव्हता पण कष्टाचा पैसा आणि त्यात समाधान होतं.

हळूहळू त्यात त्याची प्रगती होत गेली दोनाचे चार चाराचे आठ अशी वेगवेगळी मशीन वाढत गेली. त्याच्याकडे आता सहा-सात कामगार काम करत होते.

पुढे मोठी कारखान्याची इमारत बांधली. आणि त्यामध्ये सगळी ॲडव्हान्स मशनरी ठेवली. त्यात सी एन सी मशीनस फार उपयुक्त ठरली.

ती एक अध्यावत टूलरूम होती. आता त्याला फार मोठ्या मोठ्या कंपन्यांची तसेच गव्हर्मेंटची सुद्धा ऑर्डर मिळू लागली. बक्कळ पैसा हाती आला.

त्याने राधानगरी मध्ये पाच एकरमध्ये मोठा टोलेजंग बंगला बांधला. बंगला पूर्वाभिमुख बांधला होता. पोर्च मधून आत गेल्यावर.,मोठा ओटा होता, पायर्‍यांच्या दोन्ही बाजूला ओटा होता. एका बाजूला बैठक घालून ठेवला होता. दुसऱ्या बाजूला झोपाळा होता. त्याच्यावर बसून झोके घेत समोरचा निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवता येत होतं. समोरच्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आणि फळझाडे होती शिवाय काही शोभेची झाडे होती.

पोर्च मधून ायर्‍या चढून वर गेल्यानंतर आत भला मोठा दिवाणखाना होता. दिवाणखान्याला नैसर्गिक प्रकाशाची भरपुर सोय केली होती. दिवाणखान्यात देखील मऊ मऊ कोच, टिपोय, एका बाजूला कॉम्प्युटर आणि लिहिण्यासाठी मोठं टेबल होतं. दिवाणखान्याच्या आजूबाजूला कमीत कमी 10 रूम होत्या. त्यामध्ये एक किचन होतं. रूम मध्ये सर्व सुविधा उपलब्ध होत्या. त्यामुळे पाहुणेरावळे आले गेले यांचं व्यवस्थित आदरातिथ्य होतं आणि त्यांना सुख समाधान मिळत होतं. कोणत्याही रूममधून सरळ दिवाणखान्यात येता येत होतं. त्यामुळे दिवाणखान्यात बसलेल्या रामरावांशी थेट येऊन गप्पा गोष्टी करता येत असत. त्यांचे नोकरचाकर बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या आऊटहाऊस मध्ये रहात असत.घरासमोरील गार्डन च्या एका बाजुला ग्यारेज होते. त्यामध्ये साहेबांची BMW, मालकीण बाईंची D-SWEEFT आणि एक अधिक अश्या तीन गाड्या असतं.

क्रमशः

पुढील भाग : https://www.maayboli.com/node/78957

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users