प्रीतीत गुंतले रे - १

Submitted by रमण३०१२ on 14 May, 2021 - 13:12

साहेब आले, साहेब आले बंगल्यावर च्या कामगारांमध्ये कुजबुज सुरू झाली. प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न असल्याचा बहाणा करू लागले. खरतर बंगल्यावर एवढ्या लोकांची गरजच नव्हती तरी पण साहेब मोठ्या मनाचे असल्यामुळे त्याना कामावर ठेवलं होतं.

एक सिल्वर कलर ची बीएमडब्ल्यू गेट मधून आत आली आणि एक शानदार वळण घेऊन पोर्चमध्ये उभी राहिली. त्याबरोबर बंगल्याचा मुख्य सेवक धावत गाडीपाशी आला. ड्रायव्हर ने गाडी बंद करून पटकन साहेबांच्यासाठी कारचे बंगल्याच्या दरवाज्या कडील दार उघडले. मुख्य सेवक, बापूने लगबगीने कार मधली साहेबांची बॅग घेतली आणि दिवाणखान्यात नेहमीच्या ठिकाणी ठेवली. गाडीतून थ्री पीस सूट घातलेले रामराव पायउतार झाले.

रामराव, हे राधानगरी मधलं बडे प्रस्थ!
मुळचे कर्नाटकामधले, गदगचे, गदग हे जिल्ह्याचे ठिकाण. सर्व सुखसोयी तिथे होत्या. त्यांचं बालपण तिथेच गेलं. त्यांची जेमतेम दहावी झाली आणि एका car accident मध्ये त्यांच्यावरच आई वडिलांचं छत्र हरवलं.

दहावी पास झाल्यानंतर ते आपल्या मामाकडे म्हणजे राधानगरीला आले. तिथे त्यांनी आय टी आय चे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा मामा काही फार मोठा श्रीमंत नव्हता पण खाऊन पिऊन सुखी होता. चार एकर बागायत जमीन होती. जमिनीतून बऱ्यापैकी उत्पन्न येत होतं.

आय टी आय झाल्यानंतर काय करायचे हे नक्की ठरत नव्हतं. त्याच्या मनात नोकरी न करता काहीतरी व्यवसाय करावा असं ठाम होतं . त्यादृष्टीने त्याची चौकस नजर सगळीकडे होती.

एक दिवस मामाला त्यांन विचारलं, मामा माझ्या मनात काहीतरी उद्योग धंदा करावा असं आहे. आणि त्यासाठी भांडवलाची गरज लागणार आहे. काय करूयात?

क्रमशः..

पुढील भाग: https://www.maayboli.com/node/78941

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users