प्रौढत्व - Maturity

Submitted by संयम.... on 12 May, 2021 - 08:37

प्रौढत्व - Maturity

प्रौढत्व येन म्हणजे नक्की काय ? आजच्या परिस्थितीत तुम्ही जर बऱ्यापैकी शिक्षण घेतलाय म्हणजेच बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे आणि जर तुम्ही जबाबदार नागरिक आहात, याचा सद्सद्विवेक बुद्धीने विचार केला तर, मला वाटत मॅच्युअरिटी म्हणजे आपण केलेल्या कृत्याचे किती दुरागामी परिणाम होतील आणि होणारे परिणाम प्रतिकुल असू नयेत म्हणून असेल त्या परिस्थितीत संयमाने केलेले वर्तन म्हणजे मॅच्युरिटी होय. खरं तर ही व्याख्या खूप खोल होऊ शकते पण शब्दांच्या चक्रव्यूवाहात अडकण्याची माझी इच्छा नाहीये. मला हेही मान्य आहे की ब-याचदा तुमची चूक नसेलही कदाचीत पण जर पुढची वक्ती कशी आहे हे आपल्याला माहीत आहे आणी फक्त काही शब्दांच्या जोरावर ती तुमचा संयम तोडू शकत असेल तर तुम्हाला संयमी म्हणायचं का ??
तुम्ही म्हणाल, अन्याय सहन करणे गुन्हा आहे. हेही मान्य, पण अन्याय नक्की कशाला म्हणायच हे आपल्याला ओळखता येत का हाही विचार आपण केला पाहिजे. या जगात पांढर आणि काळ असं, काही नसतं तर ते दोन्ही असत फक्त जास्त प्रमाण कशाच हे त्या परिस्थितीच आकलन करून आपण ठरवायच असत. जर तुमच्यावर अन्याय होतेय अस तुम्हाला जर वाटत असेल पण जर त्याला दिलेला प्रतिसाद भविष्यात खूप प्रतिकुल आणि भयावह परिणाम करणार असेल तर मला वाटतं शांत राहण बेहत्तर!!
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर पुढची व्यक्ती तुमचा संयम तोडू शकत असेल तर तुम्ही स्वत:वर विजय मिळवलाय का, Buddhism, Jainism फक्त परिक्षेत लिहायला वाचायचं का ??
व्यक्तीमत्व हा खर तर खूप विस्तारित आणि सखोल शब्द आहे. खरच जर right conduct आणी right character develop केले तर माणूस कुठं पोहचेला असता !!
चिडन, रडन, ओरडन माणूस आसण्याच लक्षण आहे हे मान्य आहे १००% मान्य, पण मग ते नियंत्रित करण हे पण फक्त माणसाच लक्षण आहे. भावना जरी माणसाला जास्त प्रमाणात मिळाल्या, तरी त्याबरोबर बुद्धीही मिळालेली आहे, याचा खुलासा श्रीकृष्णाने भगवद़गितेत केलेला आहे, शरीर हे रथ, मन/ भावना म्हणजे घोडे आणि मेंदु म्हणजे सारथी. जर सारथ्याला चांगला प्रशिक्षण दिल नाही तर घोडे रथ कोठेही नेतील आणि आंधाधुंद माजेल. म्हणजेच, शरीररूपी रथ चालवणा-या भवनारूपी घोडयांना मेंदू या सारथ्याचा लगाम हवाच !! नाही का ??
खरं तर माझा मुद्दाच वेगळा आहे.
छोटया छोटया गोष्टी आपलं व्यक्तीमत्व घडवत असतात जर छोटया झुळकिनेच जर आपली जीवनाची नाव डगमगू लागली तर मोठ्या वादळात ती कशी तग धरनार ? आपलं तर अखंड आयुष्य जगायचं बाकी आहे. आयुष्यात खूप मोठं मोठी वादळं येतील दुरदुरवर सोबतीला कोणीच दिसणार नाही, त्या वेळेस फक्त आणि फक्त तुम्ही घडवलेले खंबीर व्यक्तीमत्व तुम्हाला साथ देईल. त्यामुळे स्वत:वर नियंत्रण मिळवनं हा एक चांगल्या व्यक्तीमत्वाचा पैलू मानता यंईल. तो प्रत्येकाने आपल्या व्यक्तीमत्वाला पाडण्याचा प्रयत्न करावा.
या जगात प्रत्येकाला वाटतं की माझ्यावर जास्त अन्याय झालाय, मी खूप संघर्ष केलाय पण जर आपण २ मिनीट ‘मी पणा’ बाजूला ठेवून विचार केला तर सगळं निथळ पाण्यासारख स्पष्ट दिसायला लागेल.
हे नीट समजायला पुढील काही उदाहरणे पाहूयात. एक मुलगा/ मुलगी अशा कुटुंबात जन्माला आलीये जिथे एका वेळेचं जेवन मिळत नाहिये, दुसरी एक व्यक्ती जन्मत विकलांग आहे. थोडं मी पणा बाजूला ठेवून स्वत:ला त्यांच्या जागी ठेवून पहा आणि २ मिनीट थंड डोक्याने विचार केला तर लक्षात येईल की आपण खूप नशिबवान आहोत कधी कधी माणसाला वाटत कि मला स्वतंत्रता नाहीये म्हणून मला स्वत:ला सिद्ध करता येत नाही पण आपण असा कधीच विचार करत नाहित कि आपल्याला ज्यांनी जन्म दिला व मोठे केले त्यांनी तर आपलं अर्ध आयुष्य आपल्याला मोठ करण्यासाठी स्वातंत्र्याचा त्याग करण्यात घालवला . त्यामुळे या जगात निशेष्: स्वातंत्र्यच नाहिये त्यामुळे र्सव गोष्टींचा समतोल विचार करत आणि वागत चालणे हाही एक चांगल्या व्यक्तीमत्वाचा पैलू मानता येईल.
प्रौढ होण आणि प्रौढत्व येण या दोन्ही शब्दांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्रौढ म्हणजे तारूण्य ज्या काळात माणंसाच रक्त सळसळत असतं पण मग नको तिथे उफाळू न देता, ती उर्जा योग्य दिशेने रूपांतरित करून वापरणे म्हणजे प्रौढत्व…।
मला नेहमी वाटत कि चार शब्द ऐकावे लागले की माणूस छोटा होत नाही उलट ते संयमाने ऐकूण घेण्यात मोठेपणा आहे. पुढचा माणुस एक, दोनदा बोलेल पण मनातून तुमच्या वृत्तीला सलाम करेल आणि अशाच छोट्या छोटया गोष्टी तुमचा संयम वाढवतील आणि तुम्हाला जबाबदार नागरिक बनावतील. बघायला गेलं तर आयुष्य खूप छोट आहे. त्यामुळे तु आपल्या ने आपल्या नियमांनी जगता आलं पाहिजे.
आयुष्य जगण आणि आयुष्य आनंदाणे जगणं यात फार विरळ रेष आहे. ती ओळखणा-या वक्तीही विरळंच. मला माहीत नाही मला ती ओळखता येते की नाही पण मला एवढी खात्री आहे की जर कोणत्याही व्यक्तीने वर उल्लेखत केलेल्या गोष्टींच आकलन करून अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य आनंदाने जगण्याच्या मार्गावर तुम्ही नक्की जाल. यश आणि अपयश या गोष्टी तुम्हाला गौण वाटायला लागतील. तुम्ही त्या दर्मिळ व्यक्तींच्या पंगतीत जाऊन बसाल ज्यांना मरताना, "आपण असं जगायला हव होतं" याचा पश्चाताप नसेल, नाहीतर सगळेच येत आणि जात असतात या पृथ्वीतलावर पण मग फार कमी लोक असतात ज्यांना जीवनाच सार्थ झाल्याचं समाधान असतं..।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!! सुंदर लिहीले आहे. वयापरत्वे, मला कळलेली एक गोष्ट म्हणजे - दूरगामीपरिणामांचा/ वाईट परिणामांचा विचार करता येण्याची क्षमता. तुम्हीही पहीला मुद्दा तोच मांडला आहे. मी प्रचंड सहमत आहे.

छान लिहिले आहे . अनेकानेक शुभेच्छा व स्वागत. पुढील लेखनाच्या आतुरतेने प्रतीक्षेत. तुमच्या लेखाचा मला प्रौ ढत्व आले की मॅनेज करायला नक्की उपयोग होईल .

प्रौढत्व ? हमारे यहा प्रौढ (बुजूर्ग), बूढा नही भूतपूर्व नौजवां कहते है.

किसी प्रौढ कवी ने जवां कवयित्री से कहा है कि,
दूर ही रहो नादां, मत उलझो हमारे बूढों से
ये आज भी अक्रोड फोड देते है फोफले मसूडों से

तो जवां कवयित्री पलट कर बोली

खतरा आज कल जवानों से कम , बुजूर्गों से अधिक हो गया है
याद आते है हमें नारायण दत्त तिवारी और दिग्गी राजा, आशाराम बापू
ये भी उम्र के साथ बुजूर्ग हो गये थे.
स्वतःची समजूत सर्वांच्यात बसून काढणे ही चांगली गोष्ट आहे.
तात्पर्य - ज्या वयात ठेवले आहे त्या वयात दाताने अक्रोड फोडावेत. नंतर हिरड्यांनी फोडायचेच आहेत. ठराविक वयापर्यंत दात साथ देतात. नंतर मॅच्युरिटी कामाला येते. मॅच्युरिटी म्हणजे प्रौढत्व (बुजूर्ग) असेल तर हा प्रतिसाद पुन्हा पहिल्यापासून वाचावा.

युथ इज वेस्टेड ऑन यंग हे आपल्याला जेंव्हा मनापासुन पटते तेव्हा आपण प्रौढ झालेले असतो.

प्रत्येकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. मला असा वाटत की माणसाने कसाही जगावं फक्तं आनंदी राहणे तेही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर आपल्यामुळे बाधा येत नाही याची खबरदारी घेत.
बाकी वर नमूद केलेले मला जाणवलेले काही पैलू आहेत त्यामुळे तुम्ही म्हणताय तेही चांगल्या वक्तीमत्वाचे पैलू असतील.
धन्यवाद !!