आई तरी तू माझ्यासाठी इतकी करते

Submitted by आरती शिवकुमार on 8 May, 2021 - 15:32
ठिकाण/पत्ता: 
पुने

डिअर आई,

आई तरी तू माझ्यासाठी इतकी करते,
मी आजारी असली की तू रात्रभर जागते,
मला चांगले जेवायला मिळावे म्हणून,
स्वता :चे हात भाजते आणि किती तरी चटके खाते,
तुझ्या पदराने माझे पाय पुसते,
तरी तू माझ्यासाठी इतकी करते.

तुझ्या वाटणीचा खाऊ तू मला देते,
तू कितीही आजारी असली तरी स्वयंपाकघरात,
राब राब राबते,
तरी तू माझ्यासाठी इतकी करते.

तुझा विचारामध्ये मीच असते,
झोपेत मला थंडी वाजली की,
तुझी चादर पण माझ्यावर टाकते,
तरी तू माझ्यासाठी इतकी करते.

रणरणता उन्हाचे चटके माझ्यासाठी खाते,
नेहमी माझे कौतुक गाते,
मी चुकली की तुलाच अपराधा सारखे वाटते,
तरी तू माझ्यासाठी इतकी करते.

माझा आनंदात मध्ये तूच आनंदी होते,
माझा दुःखात तूच दुःखी होते,
तरी तू माझ्यासाठी इतकी करते.

तुझ्या जगात मीच वावरत असते,
माझा शाळेत जाणाऱ्या पहिला दिवसाच्या प्रवासा पासून,
लग्न करून सासरी येणारा प्रवासा पर्यंत तुला माझी कमी जाणवते,
तरी तू माझ्यासाठी इतकी करते.

--आरती शिवकुमार

माहितीचा स्रोत: 
सेल्फ
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 8, 2021 - 15:27 to शुक्रवार, May 31, 2024 - 19:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे:
प्रिय आई,

आई तरी तू माझ्यासाठी इतकं करतेस
मी आजारी असली की तू रात्रभर जागतेस
मला चांगले जेवायला मिळावे म्हणून,
स्वता :चे हात भाजते आणि किती तरी चटके खाते,
तुझ्या पदराने माझे पाय पुसते,
तरी तू माझ्यासाठी इतके करते.

तुझ्या वाटणीचा खाऊ तू मला देते,
तू कितीही आजारी असलीस तरी स्वयंपाकघरात,
राब राब राबते,
तरी तू माझ्यासाठी इतके करतेस
तुझ्या विचारामध्ये मीच असते,
झोपेत मला थंडी वाजली की,
तुझी चादर पण माझ्यावर टाकते,
तरी तू माझ्यासाठी इतके करतेस

रणरणता उन्हाचे चटके माझ्यासाठी खाते,
नेहमी माझे कौतुक गाते,
मी चुकले कि तुलाच अपराधा सारखे वाटते,
तरी तू माझ्यासाठी इतके करतेस

माझा आनंदात मध्येच तू आनंदी होते,
माझा दुःखात तूच दुःखी होते,
तरी तू माझ्यासाठी इतकं करतेस

तुझ्या जगात मीच वावरत असते,
माझा शाळेत जाण्याच्या पहिल्या दिवसाच्या प्रवासा पासून,
लग्न करून सासरी येण्याच्या प्रवासा पर्यंत तुला माझी कमी जाणवते, म्हणजे काय नक्की?
तरी तू माझ्यासाठी इतकं करतेस.

छान कविता. शुद्धलेखन सुधारून दिले आहे. मॉम ड्युटी यु क्नो.

हॅपी मदर्स डे आता आई साठी काहीतरी करा व करत रहा.

आईसारखे कोणी नाही.
तुमच्या कवितांसारखी दुसरी कोणतीही कविता नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, आरती.

This poem is simple to understand, but in its simplicity you find beautiful truths about what a mother is and what they do. This is simply beautiful, I couldn't hold back my tears. Great poem.