द डिसायपल : एका शिष्यत्वाची शोकांतिका

Submitted by अश्विनीमामी on 2 May, 2021 - 10:25

गुरु-शिष्य परंपरा हा उत्तर भारतीय, अर्थात हिंदुस्थानी, शास्त्रीय संगीत शिक्षणाचा आत्मा आहे. रागदारी संगीत - ख्याल गायकी - ही अनेक घराण्यांनी आपापल्या खास परंपरांनुसार , सादर केलेली आहे व करत आहेत. संगीता चे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर जेव्हा पुढील अवघड वाट शोधायची वेळ येते तेव्हा गायक कलाकार आपला गुरू शोधतात व त्या गुरुंचे जे घराणे त्यामध्येच आपली पुढील विद्या प्राप्त करून पारंगत होतात. आपल्या गुरुंचा गंडा बांधला की शिष्याची अवघड वाटचाल सुरू होते त्यात त्याला जोड असते स्वतःच्या सृजन शीलतेची आणि अंगभूत गुणांची. बाकी हा प्रवास एकट्याने करण्याचा आणि खडतर असाच असतो. अनेक वर्षे मेहनत व रियाज करून घराण्याचे राग गळ्यात उतरवून छोटे मोठे कार्यक्रम करून मग कुठे कधी प्रसिद्धीची माळ गळ्यात पडते आणि आर्थिक स्थैर्य येते.

सध्याच्या प्रत्येक गो ष्ट लगेच मिळवण्याच्या इन्संट युगात अनेक तासांचा रियाज, कलेला जीवन वाहून घेणे , आपली निष्ठा अर्पण करणे हे हास्यास्पदच ठरेल. व तसा अट्टहास करणार्‍या कलाकारांची ओढाताण होते. त्यात निसर्गाने जर मधुर आवाजाची आणि उपजत क्रिएटिव्हिटी चे थोडेसेच माप पदरात घातले असेल तर त्या कलाकारा चे कला जीवन वैफल्याने व एका विचित्र दु:खाने भरून जाते. सांगितिक क्षेत्रात नाव
कमावणार्‍या एका विद्यार्थ्याची शोकांतिका द डिसायपल ह्या चित्रपटात संयत पणे दाखवली आहे.

शरद नेरुल कर चा जीवन प्रवास त्यांचे गुरू जींशी असलेले संबंध त्याची अनेक आघाड्यांवरची वैफल्ये व हार ही आपल्या ला चित्रप टात दिसते. दिग्दर्शकाची दृष्य व शाब्दिक भाषा अतिशय नेमकी व नैसर्गिक आहे. सि नेमा बघतो असे वाटत नाही. किंवा संत्रे सोलणे हा प्रकार फारसा नाही त्याच्या भावना घटनांमधून संवादातून दिसत राहतात. वडिलांचे अनुकरण म्हणून किंवा त्यांच्याशी असलेले कनेक्षन टिकून राहावे म्हणून तो शास्त्रीय संगीत शिकायला लागतो व अलवार घराण्याच्या गुरुंचे शिष्यत्व पत्करतो. हे वयस्कर व हळू हळू आपल्या गायकी आवाजाला हरवत चाललेले आहेत. पण अ‍ॅनालिसिस ची क्षमता उत्तम आहे व अजूनही टिकून आहे. उपेक्षित किंवा फारसे यशस्वी होउ न शकलेल्या गायकाचा जीवन प्रवास गुरुजींच्या मैफिलींतून ;तक्रारींतून दिसतो. आर्थिक दैन्य व म्हातारपणात सेवा करायला कोणी नसणे हे त्यांच्या जीवनाचे विदारक सत्य. शरद त्यांच्या कडे शिकतो, त्यांच्या तब्येतीक डे लक्ष देतो व जमेल तसे त्यांना साहाय्य करतो. त्यांच्यात एक बंध आहे. पण गुरुजी त्याला त्याच्या मर्यादा स्पष्टपणे सांगू शकत नाहीत . एक प्रकारे वडील व गुरू ह्यांच्या मधल्या जागेत शरद चाचप डत राहतो.

कलाकारांना व्यावसायिक यशासाठी तडजोडी कराव्या लागतातच. संगीत शो करणार्‍या मुलीच्या पात्राद्वारे ते अधोरेखित होते.
चित्रपटाच्या अखेरीस शरद देखील आपल्या मर्यादा समजून घेउन पुढे जातो. त्याच्या बरोबरच्या विद्या र्थ्यांना जास्त प्रतिष्ठा मिळते. शेवटीच्या शॉट मध्ये एक लोक गीत कलाकार ज्याला काहीच प्रशिक्षण नाही पण अंगभूत सृजनशीलता आहे. तो येतो त्यामुळे एक प्रकारची आशा जाग ते की संगीत- स्वर हे खरंतर घराण्यांच्या मर्यादांच्या फार पुढे आहे व ते युनिवर्स फार मोठे आहे.

चित्रपटात अधून मधून येणारी माईंची स्वग ते कलेच्या जगतातील प्रत्येकाने अगदी ऐ कावी व लिहून घ्यावीत अशीच अनमोल आहेत. तो आवाज बहुतेक कै. सुमित्रा भावे ह्यांचा आहे. पण आम्हाला तो आमच्या आजीचाच वाटला. कापरा थरथरता पण सच्चा. हे ऐकताना तो बाईक वरून भटकत राहतो. २४ वर्शांचा तरूण गायक ते चाळीशी पंचे चाळीशीचा प्रौढ जीवनाशी तडजोड करून स्थिर झालेला गृहस्थ हा त्या व्यक्तिरेखेचा प्रवास कला काराने नेमस्त पणे सादर केला आहे. असे लोक सहजी कोणत्याही गटात सामी ल होउ शकत नाहीत. आपले तारुण्य
गमवत असताना - काका लुक आल्या वर- तो एका पार्क मध्ये अचानक क्रिकेट खेळायला एक तरी बॉल मला टाक म्हणून परक्या मुलाला विनंती करतो ते केविल वाणे वाट्ते.

चित्रपटाची इतर अंगे जसे दिग्दर्शन, चित्रलेखन संगीत उत्तम आहेत. शास्त्रीय संगीत आहे पण ते कथा सोडून अंगावर येत नाही. एक ही
पर्फॉर्मन्स किंवा आयटेम नंबर नाही. महत्वाच्या व्यक्तिरेखांना गाण्याची क्राफ्ट येते पण कुठे तरी ते क्रिएटिव्हिटीत / आवाजाच्या क्वालिटीत कमी आहेत किंवा मिडिऑकर - सामान्य आहेत हे लगेच कळून येते.

दिग्दर्शक ताम्हाणे ह्यांना रोमा, ग्रॅविटी चित्रपटांचे दिग्दर्शक अल्फोन्सो कोरोन ह्यांनी मार्गदर्शन केले आहे. ( मेंटर शिप) संपूर्ण चित्रप टाची ट्रीटमेंट
अगदी अनाव्॑श्यक नाट्य वगळून केलेली आहे. हिरोचे वडिलांबरोबरचे फ्लॅश बॅक मधील रंग पीच पिं क गुलाबी व वर्तमानातले रंग निळे हिरवे आहे. सरोद वादनाच्या कार्यक्रमाचे लोकेशन लै भारी आहे. ती जागा कुठे आहे?

जरूर बघण्या सारखा चित्रपट . कोर्ट पेक्षा जास्त सफाईदार आहे .

===================================================================

मी ज्या घरात वाढले त्यात माझे दत्तक वडील संगीताचे रिटायर्ड प्रोफेसर व आमचे पूर्वी व रिटायर में ट नंतरही संगीत विद्यालय होते.
त्यामुळे गायन क्षेत्रातील कलाकारांचे संघर्ष घालमेल/ उलघाल परीक्षा, स्पर्धा मधील घडामोडी सर्व जवळून पाहिले आहे आई वडील वयस्कर झाल्यावर त्यांची सेवाही शरद करतो त्याच पद्धतीने केलेली आहे त्यामुळे मला एक वैयक्तिक कनेक्ट पण जाणवला पण तो वेगळा कालखंड होता ते लोक वेगळे होते.... ते सूर तेच होते. जा जारे अपने मंदिर वा व संगीत क्लासातली चीज ह्या दोन मैत्रिणी परत भेटल्या हा एक वैयक्तिक आनंद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'द डिसायपल' पाहिला. अत्यंत अस्सल वातावरणनिर्मिती आणि अचूक तपशील !

शास्त्रीय संगीताशी संबंधित आतलं जग बऱ्यापैकी जवळून पाहताना 'हे असंच असण्याची आवश्यकता आहे का ?!' हा जो प्रश्न वर्षानुवर्षे पडत गेला आहे तो आज परत तळापासून ढवळून वर आला चित्रपट बघताना. ह्या प्रश्नामागे भिरभिरणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही चित्रपटात दाखवलेल्या नाहीत पण त्या आठवत राहिल्या... त्यामुळेच संथ गतीमुळे कंटाळवाणा होऊन सुद्धा तो सोडू शकले नाही, बघत राहावासा वाटला.

- शास्त्रीय संगीततल्या गुरुशिष्य परंपरेत unquestioning acceptance and surrender इतका जास्त अभिप्रेत आहे की गुरुने शिष्यांना घालूनपाडून बोलणे, केवळ गळ्याला नैसर्गिक फिरत किती ह्यावरुन त्यांची किंमत करणे, गळ्याला अब्यूज होईल अशाप्रकारे रियाज, फेव्हरेटिझम आणि त्यानुसार शिष्याला प्रोत्साहन वा चक्क खच्चीकरण, अत्यंत exclusive असे ज्ञान देण्याच्या बदल्यात इतर कामे शिष्याने विनातक्रार करावीत अशी अपेक्षा, ज्ञान हातचे राखून ठेवणे अशा अनेक गोष्टी ओघाने होत आल्या आहेत.
-सुरांचे परफेक्षन गुरुच्या कल्पनेप्रमाणे न गाठता आल्यास शिष्याला येणारे वैफल्य हाही असाच एक विषय. सुराचे परफेक्षन महत्त्वाचे आहेच पण ह्यात १०० मार्कांच्या पुढचा अट्टहास असतो म्हणजे अमूक एक शृतीचा सूर लागला नाही म्हणजे अगदी लायकी काढतो गुरु वा ठळक नाराजी दाखवतो. पण हा इतका सबजेक्टिव्ह प्रांत आहे की दोन गायकांचे 'परफेक्ट' सुराचे interpretation वेगळे असू शकते. उदा द्यायचे झाले तर बॉलिवूड गायक मुकेशचे सूर जरा उतरे लागतात पण तीच त्याची खासियत आहे !
-ह्यामुळे गायक ही एक स्वतंत्र व्यक्तीही आहे आणि प्रत्येक व्यक्तीची dignity जपली गेली पाहिजे हा विचार बरेचदा खिजगणतीतही नसतो. निसर्गदत्त आवाज, फिरत ह्यावरुन फार जास्त मूल्यमापन होते. म्हणजे मूल्यमापन होणे चूक नाही पण भेदभाव होतो, अपमान होतात !

ह्या सगळ्या वातावरणनिर्मितीमुळे शास्त्रीय संगीत शिकताना प्रचंड भारावलेपण असतं. हे भारावलेपण खूप प्रभावीपणे आलंय चित्रपटात. खूप उदात्त, exclusive असं आपण काहीतरी करतोय असं वाटून स्वतःला खूप स्पेशल, प्रिव्हिलेज्ड समजणे तरी होते किंवा गुरुला अभिप्रेत असलेले गाता आले नाही तर स्वतःला कमी लेखणे तरी ! ह्या क्षेत्राभोवती असे एक वलय आहे जो फार सहज एक ट्रॅप बनू शकतो. शास्त्रीय संगीताच्या जगाला disillusionment चा मोठाच शाप आहे. कदाचित कलेच्या सगळ्याच प्रांतांना असेल पण इथे वेळोवेळी ही disillusionment जाणवली आहे, स्वतःही अनुभवली आहे.
ह्याच disillusionment मधून येणारा एक मुद्दा म्हणजे 'चमकदार लोकानुनय करणारं गाणं' जे 'सामान्य' श्रोत्यांनाही आवडतं आणि पठडीतलं गाणं जे 'सामान्य' लोकांच्या डोक्यावरुन जातं, त्यांना रटाळ वाटतं पण ज्यात दर्जेदार आणि भेसळ नसलेला निर्भेळ कंटेट असतो ह्यावरुन कमीजास्त लेखणे. अशी पठडीतली लोकं मग 'चमकदार शास्त्रीय' गाणाऱ्यांवर टीका करत राहतात.

ह्या सगळ्यातून जे पार होतात ते आजच्या घडीचे लोकप्रिय, ह्या परिघाबाहेरच्या लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले शास्त्रीय गायक आहेत पण तितकीच मेहनत करुन आयुष्य खर्ची घातलेले अनेक असंतुष्ट शरद नेरूळकरही ह्या यशस्वी गायकांमागे आहेतच आणि डिसायपल त्यांची कथा सांगतो !

हा चित्रपट बघणार नाही पण परीचय लेख आणि त्यावरचे बरेच प्रतिसाद फार छान आहेत. लेख आणि प्रतिसादातून अनेक कंगोरे समजत जातायेत, फार सुरेख. सर्वांनाच धन्यवाद. संगीतातले काहीही समजत नाही मला खरंतर. आवर्जून वाचायला येते इथे.

मला आवडलेल्या गोष्टी: नायक जे काही घडले ते गंगार्पण करून कुणालाही बोल लावत न बसता पुढचा मार्ग पत्करतो, तो पत्करताना सांगितिक घराण्याशी असलेली बांधिलकी सोडत नाही. नायकाच्या शिष्यत्वाची शोकांतिका झाली तरी व्यक्तिगत पातळीवर त्याचे चाकोरीतले आणि यशस्वी जीवन दाखवून चित्रपटाचा शेवट केला आहे. नायक वैफल्यग्रस्त होत नाही, उलट तो 'जागा' होतो, भानावर येतो हा भाग खूपच सकारात्मक आहे.

सरतेशेवटी संगीताचे औपचारिक शिक्षण 'न के बराबर' घेतलेल्या माणसाचे गाणे देखील परिणामकारक असू शकते हे दाखवले आहे. त्यातून श्री जोशी (संग्राहकाची भूमिका, पाहुणे कलाकार) बिनदिक्कत बोलतात त्याप्रमाणे अनावश्यक गोष्टींचा बाऊ करणे आणि व्यक्तिपूजा करत काही कलाकारांचा 'हव्वा' करणे, त्यांचे स्तोम माजवणे सहजगत्या लक्षात येऊ शकते. अधून मधून थोडेसे अंतर राखून आपल्याच समज/ गैरसमजांकडे थोडे लक्ष पुरवले या दोन्ही गोष्टी टाळता येणे फार अवघड नाही हे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे. असो.

चित्रपट परिचय लेख आणि प्रतिसाद छान आहेत.

Pages