द डिसायपल

द डिसायपल : एका शिष्यत्वाची शोकांतिका

Submitted by अश्विनीमामी on 2 May, 2021 - 10:25

गुरु-शिष्य परंपरा हा उत्तर भारतीय, अर्थात हिंदुस्थानी, शास्त्रीय संगीत शिक्षणाचा आत्मा आहे. रागदारी संगीत - ख्याल गायकी - ही अनेक घराण्यांनी आपापल्या खास परंपरांनुसार , सादर केलेली आहे व करत आहेत. संगीता चे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर जेव्हा पुढील अवघड वाट शोधायची वेळ येते तेव्हा गायक कलाकार आपला गुरू शोधतात व त्या गुरुंचे जे घराणे त्यामध्येच आपली पुढील विद्या प्राप्त करून पारंगत होतात. आपल्या गुरुंचा गंडा बांधला की शिष्याची अवघड वाटचाल सुरू होते त्यात त्याला जोड असते स्वतःच्या सृजन शीलतेची आणि अंगभूत गुणांची.

विषय: 
Subscribe to RSS - द    डिसायपल