द डिसायपल : एका शिष्यत्वाची शोकांतिका

Submitted by अश्विनीमामी on 2 May, 2021 - 10:25

गुरु-शिष्य परंपरा हा उत्तर भारतीय, अर्थात हिंदुस्थानी, शास्त्रीय संगीत शिक्षणाचा आत्मा आहे. रागदारी संगीत - ख्याल गायकी - ही अनेक घराण्यांनी आपापल्या खास परंपरांनुसार , सादर केलेली आहे व करत आहेत. संगीता चे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर जेव्हा पुढील अवघड वाट शोधायची वेळ येते तेव्हा गायक कलाकार आपला गुरू शोधतात व त्या गुरुंचे जे घराणे त्यामध्येच आपली पुढील विद्या प्राप्त करून पारंगत होतात. आपल्या गुरुंचा गंडा बांधला की शिष्याची अवघड वाटचाल सुरू होते त्यात त्याला जोड असते स्वतःच्या सृजन शीलतेची आणि अंगभूत गुणांची. बाकी हा प्रवास एकट्याने करण्याचा आणि खडतर असाच असतो. अनेक वर्षे मेहनत व रियाज करून घराण्याचे राग गळ्यात उतरवून छोटे मोठे कार्यक्रम करून मग कुठे कधी प्रसिद्धीची माळ गळ्यात पडते आणि आर्थिक स्थैर्य येते.

सध्याच्या प्रत्येक गो ष्ट लगेच मिळवण्याच्या इन्संट युगात अनेक तासांचा रियाज, कलेला जीवन वाहून घेणे , आपली निष्ठा अर्पण करणे हे हास्यास्पदच ठरेल. व तसा अट्टहास करणार्‍या कलाकारांची ओढाताण होते. त्यात निसर्गाने जर मधुर आवाजाची आणि उपजत क्रिएटिव्हिटी चे थोडेसेच माप पदरात घातले असेल तर त्या कलाकारा चे कला जीवन वैफल्याने व एका विचित्र दु:खाने भरून जाते. सांगितिक क्षेत्रात नाव
कमावणार्‍या एका विद्यार्थ्याची शोकांतिका द डिसायपल ह्या चित्रपटात संयत पणे दाखवली आहे.

शरद नेरुल कर चा जीवन प्रवास त्यांचे गुरू जींशी असलेले संबंध त्याची अनेक आघाड्यांवरची वैफल्ये व हार ही आपल्या ला चित्रप टात दिसते. दिग्दर्शकाची दृष्य व शाब्दिक भाषा अतिशय नेमकी व नैसर्गिक आहे. सि नेमा बघतो असे वाटत नाही. किंवा संत्रे सोलणे हा प्रकार फारसा नाही त्याच्या भावना घटनांमधून संवादातून दिसत राहतात. वडिलांचे अनुकरण म्हणून किंवा त्यांच्याशी असलेले कनेक्षन टिकून राहावे म्हणून तो शास्त्रीय संगीत शिकायला लागतो व अलवार घराण्याच्या गुरुंचे शिष्यत्व पत्करतो. हे वयस्कर व हळू हळू आपल्या गायकी आवाजाला हरवत चाललेले आहेत. पण अ‍ॅनालिसिस ची क्षमता उत्तम आहे व अजूनही टिकून आहे. उपेक्षित किंवा फारसे यशस्वी होउ न शकलेल्या गायकाचा जीवन प्रवास गुरुजींच्या मैफिलींतून ;तक्रारींतून दिसतो. आर्थिक दैन्य व म्हातारपणात सेवा करायला कोणी नसणे हे त्यांच्या जीवनाचे विदारक सत्य. शरद त्यांच्या कडे शिकतो, त्यांच्या तब्येतीक डे लक्ष देतो व जमेल तसे त्यांना साहाय्य करतो. त्यांच्यात एक बंध आहे. पण गुरुजी त्याला त्याच्या मर्यादा स्पष्टपणे सांगू शकत नाहीत . एक प्रकारे वडील व गुरू ह्यांच्या मधल्या जागेत शरद चाचप डत राहतो.

कलाकारांना व्यावसायिक यशासाठी तडजोडी कराव्या लागतातच. संगीत शो करणार्‍या मुलीच्या पात्राद्वारे ते अधोरेखित होते.
चित्रपटाच्या अखेरीस शरद देखील आपल्या मर्यादा समजून घेउन पुढे जातो. त्याच्या बरोबरच्या विद्या र्थ्यांना जास्त प्रतिष्ठा मिळते. शेवटीच्या शॉट मध्ये एक लोक गीत कलाकार ज्याला काहीच प्रशिक्षण नाही पण अंगभूत सृजनशीलता आहे. तो येतो त्यामुळे एक प्रकारची आशा जाग ते की संगीत- स्वर हे खरंतर घराण्यांच्या मर्यादांच्या फार पुढे आहे व ते युनिवर्स फार मोठे आहे.

चित्रपटात अधून मधून येणारी माईंची स्वग ते कलेच्या जगतातील प्रत्येकाने अगदी ऐ कावी व लिहून घ्यावीत अशीच अनमोल आहेत. तो आवाज बहुतेक कै. सुमित्रा भावे ह्यांचा आहे. पण आम्हाला तो आमच्या आजीचाच वाटला. कापरा थरथरता पण सच्चा. हे ऐकताना तो बाईक वरून भटकत राहतो. २४ वर्शांचा तरूण गायक ते चाळीशी पंचे चाळीशीचा प्रौढ जीवनाशी तडजोड करून स्थिर झालेला गृहस्थ हा त्या व्यक्तिरेखेचा प्रवास कला काराने नेमस्त पणे सादर केला आहे. असे लोक सहजी कोणत्याही गटात सामी ल होउ शकत नाहीत. आपले तारुण्य
गमवत असताना - काका लुक आल्या वर- तो एका पार्क मध्ये अचानक क्रिकेट खेळायला एक तरी बॉल मला टाक म्हणून परक्या मुलाला विनंती करतो ते केविल वाणे वाट्ते.

चित्रपटाची इतर अंगे जसे दिग्दर्शन, चित्रलेखन संगीत उत्तम आहेत. शास्त्रीय संगीत आहे पण ते कथा सोडून अंगावर येत नाही. एक ही
पर्फॉर्मन्स किंवा आयटेम नंबर नाही. महत्वाच्या व्यक्तिरेखांना गाण्याची क्राफ्ट येते पण कुठे तरी ते क्रिएटिव्हिटीत / आवाजाच्या क्वालिटीत कमी आहेत किंवा मिडिऑकर - सामान्य आहेत हे लगेच कळून येते.

दिग्दर्शक ताम्हाणे ह्यांना रोमा, ग्रॅविटी चित्रपटांचे दिग्दर्शक अल्फोन्सो कोरोन ह्यांनी मार्गदर्शन केले आहे. ( मेंटर शिप) संपूर्ण चित्रप टाची ट्रीटमेंट
अगदी अनाव्॑श्यक नाट्य वगळून केलेली आहे. हिरोचे वडिलांबरोबरचे फ्लॅश बॅक मधील रंग पीच पिं क गुलाबी व वर्तमानातले रंग निळे हिरवे आहे. सरोद वादनाच्या कार्यक्रमाचे लोकेशन लै भारी आहे. ती जागा कुठे आहे?

जरूर बघण्या सारखा चित्रपट . कोर्ट पेक्षा जास्त सफाईदार आहे .

===================================================================

मी ज्या घरात वाढले त्यात माझे दत्तक वडील संगीताचे रिटायर्ड प्रोफेसर व आमचे पूर्वी व रिटायर में ट नंतरही संगीत विद्यालय होते.
त्यामुळे गायन क्षेत्रातील कलाकारांचे संघर्ष घालमेल/ उलघाल परीक्षा, स्पर्धा मधील घडामोडी सर्व जवळून पाहिले आहे आई वडील वयस्कर झाल्यावर त्यांची सेवाही शरद करतो त्याच पद्धतीने केलेली आहे त्यामुळे मला एक वैयक्तिक कनेक्ट पण जाणवला पण तो वेगळा कालखंड होता ते लोक वेगळे होते.... ते सूर तेच होते. जा जारे अपने मंदिर वा व संगीत क्लासातली चीज ह्या दोन मैत्रिणी परत भेटल्या हा एक वैयक्तिक आनंद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमितव आणि अमा - प्रतिसाद आवडले आणि सहमत.

शेवटी एका कार्यक्रमांतुन तो उठून जातो तेव्हाचं त्याचं गाणं >> इथे मुकुल शिवपुत्रची आठवण झाली. तसं त्यांचं गाणं फारच ताकदीचं आहे म्हणा, त्यामुळे इतर बाबतीत तुलना होऊ शकत नाही. फक्त हाच एक प्रसंग.

असली कसली तत्वं.. आणि त्यानी काय असं विशेष मिळालं माईंना किंवा प्रधान गुरुजींना >> चांगला प्रश्न आहे आणि शरदसुद्धा ह्याच विचारात पडतो. चित्रपट कुठेही माईंची आणि प्रधान गुरुजींची तत्त्वं सर्वात योग्य आहेत असं सुचवत नाही. उलट त्यांनी मांडलेली आदर्शवादी तत्त्वं आणि प्रत्यक्ष जीवनातील अनुभव/क्षमता ह्यातील तफावत शरदच्या समोर विदारक सत्य म्हणून येतं.

आदर्शवाद आचरुन माईंना लौकिक अर्थाने काय मिळालं माहीत नाही, पण जितक्या ठामपणे त्या तत्वांचा उच्चार करत होत्या त्या अर्थी काहीतरी मिळालं असणार. ते सर्वांनाच मिळेल असं नाही. ते आचरण्याची सर्वांचीच तयारी असेल असंही नाही.

इथली चर्चा वाचून सिनेमा बघण्याची अधिकाधिक इच्छा होते आहे.

अमितव, प्रतिसाद फार आवडला.

आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे वेगळा विषय.
ग्रामिण/ नॉन शहरी प्रश्न नसलेला, पानचट विनोदी नसलेला, शहरातील पण टिपिकल सुखवस्तू चौकोनी कुटुंब किंवा फारतर त्यातच किंचितसा थोडा बदल करुन मॉडर्नपणाची आब राखत बनवलेला नसलेला.... रादर निराळे इंग्रजी चित्रपट बघितल्यावर असं वेगळं काही तरी मराठीत का नाही दिसतं असं वाटतं... ते पूर्ण करणारा, पण आपल्या मातीतला निराळा विषय असल्याने जास्त भावला.

अगदीच रच्याकने, आमच्या सतीश प्रधानांचं काही नातं आहे का? का स्पॉन्सर/ जाहिरातदार वगैरे आहेत? असल्यास अर्थात काही बिघडत नाही, पण ज्ञानसाधना कॉलेज मध्ये गाण्याची स्पर्धा, त्यात सतीश प्रधान नाव ठळक दिसणे, गुरुजींचं नाव प्रधान. Proud
म्युझिक अनीश प्रधान यांनी छान दिलं आहे, हे ही लिहायचं राहिलं. ते तबला वादक म्हणून माहित होते.

मुलांच्या शास्त्रीय गायनाच्या स्पर्धा. त्यावेळची त्यांची ती मनःस्थिती. स्पर्धेसाठीची झब्बा खरेदी. बैठक घालून फिटींग नीट आहे ना हे बघण्यासाठीची सूचना,

उपज ह्या विषयावरचे विचार. खयाल म्हणजे काय ते समजाऊन सांगणं. शा. सं. मैफिलीतली मर्यादित त्याच त्याच लोकांची उपस्थिती.

सगळ्यात आवडलं ते रिक्षात गुरूंनी " तुला घाई कसली आहे" हे विचारणं.

अमा, मागच्या वेळेस सांगायचं राहून गेले, सुंदर लेख.

अमित, उत्तम प्रतिसाद.

शेवटी एका कार्यक्रमांतुन तो उठून जातो तेव्हाचं त्याचं गाणं ही फार सुंदर घेतलं आहे. त्याच्यात शिकल्याने येणारी हुकुमत, घोटलेला रियाझ, स्वरांवर असलेली पकड उत्तम आहे... तो हे सगळं तुटक तुटक मस्त गातो. >>> हेच मर्म आहे चित्रपट न आवडल्याचं. अनेक छान जागा आहेत पण दिग्दर्शकाचा ख्यालच नाहीये.

चित्रपट काहीतरी सांगतो - कधी गोष्ट, कधी प्रसंग किंवा अजून काही. त्या सांगण्याला एक फ्लो असतो आणि त्यामागे कारण मिमांसा असते. तेच नसेल तर १०० जागा घेउनही काही फायदा नाही.

नाव आणि मला जितका सिनेमा समजला त्यावरून सिनेमाचं बीज आहे - शरदच्या डिसायपलपणामध्ये होत जाणारे बदल. बदल दिसतात, पण त्यामागची कारणमिमांसा कुठेच जाणवत नाही. नुसत्या तुटक घटना, विचार, फॅक्ट्स यांनी डोक्युमेंटरी बनते, चित्रपट नाही.

अजून एक जाणवलं म्हणजे लोक इथे वाचून नंतर सिनेमा बघताहेत, अणि मग तो त्यांना समजतोय आणि काहिसा आवडतोय (तरी गोंधळ आहेच अनेकांच्या मनात) . अमांचा मूळ लेख आणि अमितचा प्रतिसाद सिनेमा समजायला खूप उपयुक्त आहेत. पण सिनेमा बघण्याआधी अशी पूर्वतयारी करायला लागणं याला काही अर्थ नाही.

पण सिनेमा बघण्याआधी अशी पूर्वतयारी करायला लागणं याला काही अर्थ नाही. >> सिनेमा पाहिला नाहीये पण माधव यांचे हे वाक्य पटले नाही. काही कलाकृती दुर्बोध असू शकतात. सगळंच सोप्पं, पटकन समजणारं नसावं. अनेक चित्रं समजून घेण्यासाठी सेशन्स घेतली जातात. चित्रकाराने सोपीच चित्र काढावी अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे तसंच सिनेमा सर्वांना समजेल असा सोप्पा काढावा अशीही अपेक्षा करणं अयोग्य आहे.

अमा, अमितव, तुमचे प्रतिसाद अतिशय आवडले आहेत!

अमा, विश्लेषण सुंदर केले आहे
मला चित्रपट विशेष क्लिक झाला नाही.पण हे परीक्षण, फारएन्ड, अमितव आणि इतरांचे प्रतिसाद यामुळे परत पाहिला.

>>>माताजी अन्नपूर्णा देवींना प्रत्यक्ष भेटण्याचे नशीब मला ह्या जन्मी प्राप्त झाले होते 1992 साली. माईंचे विचार त्यांचेच विचार वाटले. संगीत ही 'फकीरी विद्या' आहे असं म्हणत त्या.

वाह!

द डिसायपल या चित्रपटाबद्दल मला असे वाटले की आधुनिक मराठी चित्रपटाच्या प्रागैतिहासिक विरोधविकासवादी दृष्टिकोनातुन विचार करता, असले चित्रपट समाजविन्मुखतेच्या मनोवृत्तीतून एका विशिष्ट मनोगंडातून निर्माण होणाऱ्या पलायनवादी स्वप्नरंजनातून निर्माण होतात. समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडून करणात्मक गतिमानतेकडे जाताना असले अवगतीत्मक चित्रपट प्रतिविरोधी ठरतील का ?

फे.बू.वरून

तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलंय का हो?
वाचलंय... आहो मीच लिहीलेय. माझे नाव ऐकलेच असेल तुम्ही. प्रो. भगवते.

असे अनेको लोकं पाहिले आहेत, त्या जागा अनुभवल्या आहेत. त्यामुळे चित्रपट फारच आवडला. येक अन येक तपशील सुरेख आणि वास्तववादी. अस्सल. तो सतत वाजणारा तानपुरा. The constant drone of our lives.
वाईट वाटले पाहताना. मुंबईचे रस्ते पाहून तर गलबलून आले.
फार सुरेख तपशील येकेक. सिनेमातल्या एकेका कार्यक्रमाचे प्रेक्षक पाहून सुद्धा फार हसले. ख़तरनाक तपशील भरलेत.
सिंधूताईंचे spelling वरही फुटले. गुरूजींचे घर, शरदचे घर, तो येक विशिष्ट उजेड, रंग, आजी, माईंचा आवाज, ती झारखंडवाली मुलगी आणि तिचं होत गेलेलं माकड, तू नंतर रिक्षाने ये असे आजीला सांगणे, आवडत्या मैत्रिणीला सुद्धा माईंच्या टेप बद्दल न सांगणे ...अगागागा
शरदला त्याची अशी जागा सापडते जगात शेवटी. कुठला तरी सुवर्णमध्य सापडतो ते बरं वाटलं.
मला अशी येकच कमी वाटली. एक तरी भारून टाकणारी बंदिश हवी होती. खूप सुमार काय काय आहे या क्षेत्रात. मान्य आहे. पण मेंदूला शॉट लावणारा येखादा दैवी स्वर हवा होता यायला. का हा मुलगा त्या ध्यासाने झपाटला, काय ती जादू असते संगीत कलेची.
दोन दिवस झाले. ‘मार्गी संगीत’ हेच शब्द कानात रूंजी घालतायेत.
पुन्हा पाहणार दोन-तिनदा

"शेवटी एका कार्यक्रमांतुन तो उठून जातो तेव्हाचं त्याचं गाणं >> इथे मुकुल शिवपुत्रची आठवण झाली. तसं त्यांचं गाणं फारच ताकदीचं आहे म्हणा, त्यामुळे इतर बाबतीत तुलना होऊ शकत नाही. फक्त हाच एक प्रसंग." @हरचंद जी पंडित मुकुल शिवपुत्र यांची आठवण का झाली?? त्यांच्या देखील आयुष्यात(मैफीलित) असे खरोखर झाले आहे का?? कृपया सविस्तर सांगावे.

हाय रैना, हो तशी बंदिश मुद्दामच नसेल घातली. एकूण सुमार पणा अधोरेखित करायला. गुरुजी म्हण तात व सांगायचा प्रयत्न कर्तात तसे शरदला एकूण इंटेलि जन्स पण सुमारच आहे. तो मैफील स्टार्ट टु फिनिश नीट प्लॅन करत नाही. कुठे ही काहीही घालतो. तुलनेने सांगायचे झाले तर
पंडित रविशंकर व उस्ताद अल्लारखां ( दोनो पाय लागु.) ह्यांची मॉण्ट्रेरेरी पॉप फेस्टिव्हल १९६७ मधील महफील जरूर ऐका व बघा
https://www.youtube.com/watch?v=lk60ObnbIOk

सुरुवातीपासून दोघे कलाकार अशी पकड घेतात की हे काहीत री अद्भुत आहे ह्याची आपल्याला लगेच जाणीव आहे. आपल्याला जरा प्राथमिक तरी माहिती आहे संगीताची पण अगदी अनभिज्ञ असलेले तिथले रसिक पण त्या जादूने अगदी भारून गेलेले दिसतात आपल्याला. दोन्ही कलाकारांनी आधी एक मीटिन्ग घेउन कधी काय जागा घ्यायच्या ते आधी ठरवले आहे व ते उपस्थित रसिकांना भारून टाकायच्या इराद्यानेच जाग्यावर बसलेले आहेत. इथे शरद कमी पडतो. टॅलेंत प्लस प्लॅनिन्ग मध्ये.

वरील महफिलीत सतार व तबला वाद्ये पण त्यांना साथ देतात ती ही एका वेगळ्याच लेव्हल ला लागलेली आहेत. तुलनेत झाकीर हुसेन व अनुश्काची वाद्ये ऐका. दे आर गुड बट द पापाज आर वे वे वे बेटर.

एन पी आर च्या फ्रेश-एअर ( बाय टेरी ग्रोस) कार्यक्रमात डीसायपल चा रिव्ह्यू ऐकला.
जस्टिन च्यांग या एल ए टाईमस च्या फ्लिम क्रिटिक ने रिव्ह्यू लिहीलाय.
NPR: 'The Disciple' Review: A Triumphant Story About Artistic Failure.
https://www.npr.org/2021/05/05/993802811/the-disciple-is-triumphant-even...
लेख आणि ऑडियो दोन्ही आहे.

अमांना अनुमोदन. शोकांतिकाच आहे ही. वर कुणीतरी लिहिलं तसं 'त्याने शेवटी सुवर्णमध्य शोधला/
गाठला' वगैरे काही वाटलं नाही.

अशी एखादी उच्च दर्जाची बंदिश सिनेम्यात असती तर काय झालं असतं माहित नाही. कदाचित शरदचं झगझगीत मनस्वी अपयश झाकोळलं गेलं असतं..

रिव्ह्यू आवडला.
माईंची भाषणं पण एकदम भाराऊन टाकतात. पण त्याचबरोबर मनात 'मग आजी, कलाकाराने आयुष्यभर खायचं तरी काय' असे प्रश्न पण उभे करतात. हाच उद्देश असावा.

हरचंद जी पंडित मुकुल शिवपुत्र यांची आठवण का झाली?? त्यांच्या देखील आयुष्यात(मैफीलित) असे खरोखर झाले आहे का?? कृपया सविस्तर सांगावे. >> प्रगल्भ, मला त्या मैफिलीत उठून जाण्याच्या सीनवरून आठवलं. पं. मुकुल शिवपुत्र ह्यांचे मैफिलीतून उठून जाणे, अचानक मूड खराब होऊन चांगल्या चाललेल्या मैफिलीत मध्येच सूर न लागणे, घरातून गायब होणे, कुठेतरी देवळाबाहेर भीक मागताना सापडणे असे अनेक प्रकार पूर्वी घडत असत. त्यावेळी दैवी आवाज लाभलेल्या ह्या अवलियाच्या डोक्यात काय चालू असेल हे कळणे अवघड आहे. आता कदाचित परिस्थिती बरी असावी.

खालील लिंका पहा:
https://www.newindianexpress.com/magazine/2009/jun/14/rehabilitating-mukul-shivputra-58555.html
https://timesofindia.indiatimes.com/india/kumar-gandharvas-son-found-begging/articleshow/4537328.cms
http://archive.indianexpress.com/news/kumar-gandharva-s-son-traced-friends-say-he-s-a-recluse/458901/

माईचे शेवटचे स्वगत खरे तर शरद चाच आतला आवाज आले आपलाचि संवाद आपणा शी सत्य कुरूपच असते आणि एका बाबतीत आपण हरलो आहोत हा क्षण त्याच्या समोर येतो. तो खरा ज्ञानाचा क्षण. पुढे मै फील सोडून उठून जाणॅ दूरची बाब.

हा पिक्चर दोन दिवसांत दोनदा पाहिला गेला. म्हणजे बहुतेक आवडल्यासारखं वाटतंय. काही टिप्पण्या
-मैफिलीतून उठून जाणे हा बोळा निघण्याच्या प्रोसेसचा क्लायमॅक्स म्हणता येईल, पण बोळा सैल होण्याला सुरवात तेव्हा होते जेव्हा माईंची ध्येयवादी टकळी चालू असताना नायक इयरफोन उपटून काढतो आणि गाडीचा पुढचा गियर टाकतो.
-वय वाढल्याचा गेटप पांढरे केस वगैरे ऑब्वियस गोष्टी न दाखवता उत्कृष्ट साधला आहे. मात्र जोशींबरोबरच्या सीनमध्ये नायक पुन्हा तरूण झालेला दिसतो(?)
-शेवटचं एक gem मिस केलं वाटतं बहुतेकांनी. बॅंडमध्ये गायलासुद्धा मनाई करणारा नायक शेवटी चक्क 'ऑनलाईन क्लासेस वगैरे सुरू करायचा विचार आहे' सांगतो तेव्हा फुटलो. डोळ्यासमोर सतरा विंडोज चालू ठेवून झूमवरून शिकणारे विद्यार्थी आले.
-जे दुर्लक्षित संगीत/गायक सीडीवर खरेदी करायला २००६ मध्ये कोणी तयार नसतात ते पुढे युएसबीवर विकून नायक थोडा संपन्न होतो. हे कसं ते कळलं नाही.
-सिंगल तरूण पुरुष, मग अगदी यशस्वी, पैसेवाला असला तरी 'त्या' बाबतीत उपाशी असतोच. हे इतक्या बटबटीतपणे दाखवण्याची काय गरज आहे. मैत्रिणीवर अनसक्सेसफुली लाईन मारायला जातो तेव्हा ते दिसतंच. ते प्रसंग एकंदर चित्रपटाच्या कथेशी आणि शैलीशी फार विसंगत वाटले.
ॲक्टींग अत्यंत अंडरस्टेटेड आहे. नायक पूर्णवेळ कोर्‍या चेहर्‍याने वावरतो. काहीवेळा पात्रं भाषण वाचून दाखवल्यासारखं संवाद म्हणतात. पण याचं काही वाटलं नाही. इनफॅक्ट, ही शैली आवडलीच. मराठी चित्रपट सहसा पाहायला आवडत नाहीत. तुपाळ चेहरे. वरणभाताने माखलेले ॲक्सेंट, नाटकीपणा, पण याच्या जोडीला आशयदारिद्र्य हे फार बोर होतं. याला छेद देणारे असे चित्रपट अधून मधून मराठीत निघणं चांगली गोष्ट आहे. कोर्ट मिळवून पाहिला पाहिजे आता.
अवांतर - इयरफोन लावून दुचाकी चालवताना पाहून जरा धक्का बसला.

तरी 'त्या' बाबतीत उपाशी असतोच
>>>
ते सीन्स 'तेवढ्यासाठी'च नाहीत, नसावेत. आणि ते दोनदा आहेत, हेही महत्वाचं आहे. नीट विचार केला तर संगती लागते, आणि अशा जबरदस्त पटकथेचं कौतुक वाटतं. प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळ, स्वतंत्र आणि ज्याचं त्याचं त्या ठिकाणी बरोबर असेल- हे गृहीत आहेच.

आपलं संपूर्ण जगणं नाहीतरी 'लैंगिकते'भोवती फिरत असतं. आपली इच्छा असो नसो, आपल्याला कळत किंवा नकळत. या सिद्धांताचं वेगळ्या अर्थाने, वेगळ्या प्रतलातलं प्रकटीकरण, आणि या सार्‍याला अपरिहार्यपणे स्पर्शून गेलेलं तत्त्वज्ञान- हे बघून स्तिमित व्हायला झालं. विचार केला, नाही केला तरी चालेल, पण 'इथं' थोडं थांबावं असं वाटलं..

Pages