इवलंस बीज

Submitted by omkar_keskar on 2 May, 2021 - 00:52

इवलसं एकाकी बीज कुठूनतरी मातीत पडलं
जीवनसत्वाच्या शोधासाठी एकटंच धडपडलं.
मग पावसाच्या सरींनी थोडीफार मदत केली
बीजाची फुलण्याची इच्छा निसर्गाच्या कानी गेली.
आता ते बियाणं मातीच्या कुशीतून तरारून वर आलं,
घुसमटीचा जन्म तरुन बीज आता पार झालं.
थोडा वेळ जाईल, करेल निसर्ग पुन्हा माया,
इवलेसे झाड देईल मग फळ, फुल अन छाया.
स्वत्वाचा अंश घेऊनी मातीत मिसळले बीज
मातीनेच पोसले अवघ्या देहाचे झाले चीज.
या टप्प्यावर आता माणसानेही यायला हवं,
आपल्याबरोबर दुसऱ्यासाठीही जगायला हवं.
बहुतेक सगळ्यांच्या जगण्यातील पायऱ्या अशाच असतील.
खाचखळगे कुठे कमी, कुठे जास्त असतील.
जो तो विचार जेव्हा तेव्हा करून पाहू.
मरणाच्याहीआधी चला थोडं जगून पाहू.

Group content visibility: 
Use group defaults

खूप छान कविता..!
सुंदर विचार मांडले आहेत कवितेते..!