चिकन बिर्याणी

Submitted by हशि on 26 April, 2021 - 09:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

250g चिकन
250g तांदूळ
दही
गरम मसाला
खोबरे
आलं
लसूण
कोथिंबीर
टोमॅटो
मीठ
काजू
कांदा

क्रमवार पाककृती: 

1) 250g चिकन चे मऊ पीस छोटे छोटे कट करून घ्या.
२)त्यात 3 चमचा दही,
कांदा-आलं-लसूण-खोबरे-टोमॅटो-कोथिंबीर(एकत्र) पेस्ट, 2 छोटे चमचे गरम मसाला, 1 छोटा चमचा मीठ टाकून 45 मिनिट marinate करून ठेवा.
3) आता एक पातेल्यात पाणी घ्या . त्यात 4-लवंग ,4-मिरी,3 तमालपत्र(तेजपान),तांदूळ खारट होतील एवढे मीठ टाका, नंतर 250g बासमती तांदूळ धुऊन घेऊन त्या पाण्यात तांदूळ टाका. आणि मऊ होईपर्यंत उकळून घ्या. हाताला तांदूळ मऊ लागला की गॅस बंद करून तांदूळ एक गाळणीने गळून घ्या.
4) आता गॅस वर कुकर ठेवा. त्यात खाली 4 मोठे चमचे साजूक तुप टाका...मग marinate केलेले संपूर्ण चिकन पसरवून टाका. मग नंतर आपण जे तांदूळ शिजवले आहेत ते कुकर मधल्या चिकन वर अर्धे तांदूळ पसरवून टाका.
आणि त्या तांदूळ वर एक मोठा चमचा गरम मसाला पसरवून टाका . गरम मसाला टाकल्यानंतर त्यावर एक मोठा चमचा तूप टाका. नंतर पुन्हा उरलेले अर्धे तांदूळ पसरवून टाका. पुन्हा त्यावर एक मोठा चमचा गरम मसाला पसरवून टाका. पुन्हा त्यावर एक मोठा चमचा तूप टाका. जर केशर (optional)असेल तर छोटी वाटीभर पाणी गरम करून त्यात 6 ते 7 केशरची कांडी टाका. आणि मग ते पाणी सगळ्यात वरती पसरवून टाका.
5) आता कुकर च झाकण लावा. आणि कुकर च्या 2 शिट्ट्या करून गॅस बंद करा.
टीप:- 1. जर कुकर स्टील चा असेल तर कुकर हा तव्यावर ठेऊन मग त्याच्या 2 शिट्ट्या करा.
2. जर तुमच्याकडे कुकर अल्युमिनियम चा असेल तर तसाच गॅसवर ठेऊन 2 शिट्ट्या करा.

****बिर्याणी सजवण्यासाठी***

1)थोडेसे काजू घ्यायचे त्याचे दोन दोन फोडी(slice) करा. ते काजू थोडं तूप टाकून छान खरपूस तळून घ्या.
2)नंतर एक कांदा घेऊन तो बारीक बारीक उभा चिरून घ्या. नंतर तो कांदा तुपात लाल होईपर्यंत तळून घ्या.
३)थोडी कोथिंबीर चिरून घ्या .

**आता बिर्याणी खायला सुरुवात करण्याआधी आपण तिला थोडं सजवू या..

एका डिश मध्ये थोडी बिर्याणी घेऊन त्यावरती तो तळलेला कांदा थोडासा घेऊन पसरवा. नंतर तळलेले काजू घेऊन ते वरून टाका. नंतर थोडी कोथिंबीर पसरून टाका.आणि खायला सुरुवात करा.

वाढणी/प्रमाण: 
2 जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
स्वतः
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम साधी अन सोपी पद्धत आहे..! नक्की करून बघेन. जर कुकरचा अंदाज नीट माहित नसेल तर कुकरच्या तळाला बटाट्याचे गोल गोल काप ठेवले तर ते मस्त खरपुस लागतील अन चिकन करपणार नाही असं मला वाटतं.

छान

तळाला कांद्याच्या चकत्या पसरून ठेवणे
त्याने वरचा माल करपत नाही

हो... ब्लॅककॅट यांनी सांगितलेली कांद्याच्या कापांची आयडिया पण करपण्या पासून वाचवू शकते.

छान पाककृती... फोटो मध्ये मागे चिकन करी पण दिसत आहे. त्याची पण एखादी स्पेशल रेसेपी असेल तर टाका.

@ मी नताशा
चिकन marinate करण्यासाठी
कांदा-आलं-लसूण-खोबरे-टोमॅटो-कोथिंबीर(एकत्र) पेस्ट करा.