सायकलने छे सेल्फ रिस्पेक्ट नाम की भी कोई चीज होती है यार!!

Submitted by Santosh zond on 24 April, 2021 - 02:34

हा फोटो आहे Netherland चे पंतप्रधान मार्क रुट यांचा!
ते नेहमी सायकलनेच पंतप्रधान कार्यालय गाठतात मजेची गोष्ट म्हणजे सायकल पार्क केल्यानंतर ती तिथुन चोरली तर जाऊच शकत नाही तरी पण सायकलप्रेम म्हणून तीला कुलुप सुद्धा लावतात वयाच्या 55व्या वर्षी ते हे सगळं करताय त्याचं कारण असं की सायकल चालवण्याचे फायदे खुप आहेत पहीलं तर ट्रॅफिक चा वेळ आपण वाचवु शकतो,पर्यावरण प्रदुषण मुक्त करु शकतो,सायकल चालवुन फिट राहू शकतो!!
आता जरा विचार करा की थ्री पिस सुट मध्ये कुणी सायकल चालवतंय कीती वेगळं दृश्य आहे ना! जे इंजीनिअर,डॉक्टर,शिक्षक आहेत आयटी कंपनीत काम करणारे सगळे सायकलने आँफीसला जायला लागलेच तर लोक काय म्हणतील?असं कुठ असतं तरी का सायकलने छे सेल्फ रिस्पेक्ट नाम की भी कोई चिज होती है यार अपने सोशल स्टेटस का क्या होगा? कुणी तर असा अंदाज पण लावू शकतं की औरंगाबाद ते दिल्ली का सायकलनेच जायचं की काय आता? मान्य आहे की सेकंदा सेकंदाची स्पर्धा असणार्‍या या जगात ते इतपत शक्य नाही पण आपल्याला दैणदीन जीवनात आपण हे छोटेमोठे ध्येयं तर ठरवुच शकतो जर मला 3किमी जायचं आहे तर का नाही मी सायकलने जावु शकतं मला 5,10कीमी जायचंय तर मी सायकलनेच जाईल ऐवढं तर आपण आपल्याला पर्यावरणासाठी आणी येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी करूच शकतो त्याचा अप्रत्यक्ष पणे शारीरीक,मानसिक आणी अर्थिक फायदा तर आपल्याललाच आहे ना!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users