काहीतरी साहसी करायचं मनात आहे. कुत्रे, मांजर हे पाळणारे लोकं भरपूर आहेत. त्यात काय मजा नाही. कुठलातरी डेंजर प्राणी मला पेट म्हणून पाहिजे. मी टीव्हीवर अनेक कार्यक्रम बघतो आहे त्यातून थोडीफार आयडिया आली आहे. तरीपण एक धाकधूक मनात आहे. थोडीतरी चूक झाली तर जीवावर बेतू शकतं. आमच्या नदीत एक मगर आली आहे. आठ दहा फूट मोठी मगर आहे. ती काठावर झोपली होती तेव्हा गुपचूप जाऊन लांबी मोजली. ती मगर पकडायचा मानस आहे. दोघे तिघे मदतीला तयार झालेत पण ते मगरीच्या जवळ जाणार नाही बोलत आहेत, लांबून शूटिंग काढणे, मगरीने मला पकडलं तर आरडाओरडा करणे असली कामं करणार आहेत. माझा प्लॅन असा आहे की दुपारी मगरीला पोटभर कोंबड्या खायला द्यायच्या. मग ती दुपारी काठावर येऊन झोपेल. झोपल्यावर मी झटकन तिच्या पाठीवर उडी मारून डोळ्यावर पोतं टाकणार आहे जेणेकरून तिला काही दिसू नये. नन्तर चपळाईने तिचं तोंड दोरखंडाने बांधणार आहे. दुसरं टोक ट्रॅक्टरला बांधलेले असेल. तसाच तिला ओढत ओढत घरी नेणार आहे. यानंतर पुढची पायरी म्हणजे तिला पेट करणं आणि ट्रेनिंग देणं. हा पुढचा भाग असल्याने याबाबत फार विचार नाही केला. तरी मगर कशी पकडावी या विषयावर माबोकरांनी त्यांचे सल्ले देऊन मार्गदर्शन करावे.
तुम्हाला कोणता प्राणी पाळायला आवडेल?
Submitted by अनिळजी on 22 April, 2021 - 11:18
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला 'शांतता' पाळायची आहे, पण
मला 'शांतता' पाळायची आहे, पण स्वभावात बसत नाही.
माझ्या एका मैत्रिणीला शहामृग
माझ्या एका मैत्रिणीला शहामृग पाळायचंय. कुठे मिळेल?
वाळूत.
वाळूत.
काही वर्षांपूर्वी ईमू पालन ची
काही वर्षांपूर्वी ईमू पालन ची लाट आली होती. शहामृग वरून आठवलं.
ईमू हा मध्यमवर्गीयांचा
ईमू हा मध्यमवर्गीयांचा शहामृगच आहे जसे स्वप्निल जोशी मध्यमवर्गीयांचा शाहरूख खान
शहामृग हे नाव अकबराने दिलंय.
शहामृग हे नाव अकबराने दिलंय. नाहीतर इतक्या मोठ्या आकाराच्या पक्ष्याला 'शहा' म्हणायचं कुणा संस्कृत व्यक्तिला सुचलं नसतं.
मग संस्कृत बाराखडी मध्ये श
शहामृग हे नाव अकबराने दिलंय.>
शहामृग हे नाव अकबराने दिलंय.>>आधी नाव मुर्ग असेल,तसाही थोडाफार कोंबडी सारखाच दिसतो म्हणून,मग अकबराने ते शाहीमुर्ग असं नाव केलं असेल,त्याचा काटकूट होऊन शहामृग झालं असेल
त्याच्या आधी त्यांना नाव
त्याच्या आधी त्यांना नाव नव्हतं का ?
मग कन्फ्युज असतील ना बिननावाचे पक्षी !
Struthio camelus ->
Struthio camelus -> शुतुरमुर्ग (शुतुर म्हणजे उंट. त्यावरून शुतुरमुर्ग म्हणजे उंटा सारखा दिसणारा कोंबडा) -> शहामृग
सीमंतिनी, शशकच असणार.
सीमंतिनी, शशकच असणार. त्यावेळी ससा-कासवाची गोष्ट संस्कृतमध्ये कोणीतरी मातृवाचा नावाच्या जालसंस्थळावर शत शब्दात लिहिली होती, तेव्हापासून सशाला शशक नाव पडलं.
संस्कृत द्वादश-खडी तरी होती का हा प्रश्नच आहे. बहुतेक बारा बलुतेदारांना उभे करून अकबराने बाराखडीचा शोध लावला.
असो, माझा मुद्दा सिद्ध झाला. आता शहामृग/शहामुर्ग/शुतुरमुर्ग पाळायला हरकत नाही. वरील सर्वांचे आभार!
शाखामृगचेही येऊ द्या लगेहात ,
शाखामृगचेही येऊ द्या लगेहात , व्युत्पत्ती आवडली तर पाळीन
शाखामृग - ते ऋन्मेषला
शाखामृग - ते ऋन्मेषला विचारावे लागेल.
मला वाटलंच होतं !
मला वाटलंच होतं !
असा एकांगी विचार करून स्वप्नील, सईवर अन्याय करू नका.
मृग म्हणजे कोंबडा तर मृगया
मृग म्हणजे कोंबडा तर मृगया म्हणजे कोंबड्या का ?
मृग चा मृगी होईल की
मृग चा मृगी होईल की
(चिमणा चे चिमणी आहे तसे)
मृगया का ?
भारतात पण पूर्वी सुमारे 25
भारतात पण पूर्वी सुमारे 25 हजार वर्षांपूर्वी शहामृग होते त्यामुळे शिकारीला मृगया नाव पडलं. शिकार करून ते नामशेष झाले.
मृग म्हणजे कोंबडा तर मृगया
मृग म्हणजे कोंबडा तर मृगया म्हणजे कोंबड्या का ? नाही. त्याचा अर्थ मी कोंबडा आणलाय, या!
बि(इंग्रजी B र्हस्व लिहावा की दीर्घ?)टी(आणि T?)डब्ल्यू(आणि W?): मुर्ग म्हणजे कोंबडा, मृग नव्हे.
मृग म्हणजे हरीण ना?
मृग म्हणजे हरीण ना?
कोंबडी कुठून आली?
तरी नशीब की अपभ्रंश
तरी नशीब की अपभ्रंश करणाऱ्यांनी मुर्ग चे मृग केले. मूर्ख नाही केले अन्यथा शहामूर्ख झाला असता
हे बघा अतुलराव यांची
हे बघा अतुलराव यांची राजकारण्यासारखी पलटीमार पॉलिसी ! तुम्हीच ना ते ? तेच ना तुम्ही ?
मृग म्हणजे कोंबड्या खाणारे ?
मृग चा मृगी होईल की (चिमणा चे
मृग चा मृगी होईल की (चिमणा चे चिमणी आहे तसे) मृगया का ? >> अरे देवा! अहो मृगया म्हणजे 'मृग'ची मादी नाही हो! पा.आ. ह्यांचा विनोद वायाच गेला म्हणायचा. मृगया म्हणजे शिकार. आता सर्व संस्कृतोत्भवमराठीशब्दसंग्रहप्रेमी येतील तुमची मृगया करायला.
असा एकांगी विचार करून
असा एकांगी विचार करून स्वप्नील, सईवर अन्याय करू नका. >>
मृगया म्हणजे 'मृग'ची मादी
मृगया म्हणजे 'मृग'ची मादी एवढ्यावर निपटलं हे काय कमी आहे नाही तर उद्या अलिची बाईल अलिया यायचं.... अलि फालतूच पेढे वाटायचा नि ती जायची रणबीर बरोबर!!!
(No subject)
जबरी सीमंतिनी!
जबरी सीमंतिनी!
त्यांच्या लग्नात अलि, अलिया आणि रणबीर फोटोसाठी स्टेजवर उभे असतील आणि अलिया जरा मागच्या बाजूला उभी असेल, तर तेव्हा फोटोग्राफर म्हणेल, "अगं जरा 'अलि'कडे सरक ना"
अगं म्हणजे असंबद्ध गप्पा का ?
अगं म्हणजे असंबद्ध गप्पा का ? त्या केव्हांच सरकलेल्या आहेत.
रामाचा पक्या ह्या न्यायाने
रामाचा पक्या ह्या न्यायाने सांगायचं तर, अलिया - अळिया म्हणजे कन्नडात जावई, अर्थात जमाई, त्याचा पाला (पालीचा नर) म्हणजे जमाईकन इग्वाना - हा पाळायला आवडला असता. पण बहुतेक तो नामशेष झाला असावा.
एखाद्या प्राण्याचा एखादा गुणच
एखाद्या प्राण्याचा एखादा गुणच आवडत असेल.. कुणाचा आवाज,रंग,आहार, निरुपद्रवी, वगैरे वगैरे
तर ..?
सगळ्याचा संकर करून तसा प्राणी/पक्षी/उभयचर/कीटक(?).. पाळायला आवडेल
संकरपाळी
संकरपाळी
Pages