तुम्हाला कोणता प्राणी पाळायला आवडेल?

Submitted by अनिळजी on 22 April, 2021 - 11:18

काहीतरी साहसी करायचं मनात आहे. कुत्रे, मांजर हे पाळणारे लोकं भरपूर आहेत. त्यात काय मजा नाही. कुठलातरी डेंजर प्राणी मला पेट म्हणून पाहिजे. मी टीव्हीवर अनेक कार्यक्रम बघतो आहे त्यातून थोडीफार आयडिया आली आहे. तरीपण एक धाकधूक मनात आहे. थोडीतरी चूक झाली तर जीवावर बेतू शकतं. आमच्या नदीत एक मगर आली आहे. आठ दहा फूट मोठी मगर आहे. ती काठावर झोपली होती तेव्हा गुपचूप जाऊन लांबी मोजली. ती मगर पकडायचा मानस आहे. दोघे तिघे मदतीला तयार झालेत पण ते मगरीच्या जवळ जाणार नाही बोलत आहेत, लांबून शूटिंग काढणे, मगरीने मला पकडलं तर आरडाओरडा करणे असली कामं करणार आहेत. माझा प्लॅन असा आहे की दुपारी मगरीला पोटभर कोंबड्या खायला द्यायच्या. मग ती दुपारी काठावर येऊन झोपेल. झोपल्यावर मी झटकन तिच्या पाठीवर उडी मारून डोळ्यावर पोतं टाकणार आहे जेणेकरून तिला काही दिसू नये. नन्तर चपळाईने तिचं तोंड दोरखंडाने बांधणार आहे. दुसरं टोक ट्रॅक्टरला बांधलेले असेल. तसाच तिला ओढत ओढत घरी नेणार आहे. यानंतर पुढची पायरी म्हणजे तिला पेट करणं आणि ट्रेनिंग देणं. हा पुढचा भाग असल्याने याबाबत फार विचार नाही केला. तरी मगर कशी पकडावी या विषयावर माबोकरांनी त्यांचे सल्ले देऊन मार्गदर्शन करावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

धागा आणि प्रतिसाद Proud
धागा शीर्षक वाचून मला तरी भूत पाळायला आवडेल. छानसं भूत. जे चुटकी वाजवताच मला हवं ते आणून देईल. कामं करेल. माझं ऐकेल जे घरातल्या व्यक्ती अजिबात ऐकत नाहीत. अर्थात असं भूत कुठे मिळेल, ते माझ्याकडे येईल का , आलं तर मला सोडून घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला वश होईल का हे सध्या गौण .

मगर पकडायची असेल तर तळ्याच्या काठावर बसून "मगर तुम मिल जाओ, जमाना छोड देंगे हम" हे गाणे म्हणा. गाताना मगरीचे अश्रू ढाळायला विसरू नका.

अतुल Lol
पण बोलावले तरी तिच्याकडे जाऊ नका मात्र कारण,

बुलाती है मगर जाने का नही Lol

साप पुरेसे नसतील तर त्याला खायला काय देता येईल?>>>टेन्शन नै लेनेका अनु,इथेच कुणाचा तरी धागा होता न घरात साप खूप झाले आहेत तो,
सो सिम्पल एकतर तुम्ही ते घर राहायला घ्या किंवा विकेंड ला वगैरे एक चक्कर मारा,येण्या जाण्याचा खर्च दोघात करा,कारण प्रॉब्लम दोघांचा पण मिटेल ना

ठिके Happy
मुंगुस पाळला की लगेच काकेपांदा ना संपर्क करते.

मी अनु, मुंगुसाला वडापाव घाऊ घालण्याचा अनुभव आहे. आमच्याकडे आख्खं एक कुटूंब होतं रहायला. आईबाबा आणि तिन लहान पिल्लं.

रानभुली तुम्हाला खोटं वाटतंय का ? मुंगूस खरोखर वडापाव खातं. घायला देऊन बघा.
धागा कसा काढतात ते मला माहिती नाही. धागा काढावा असा हा विषयही नाही.

मुंगूस पाळता येत नसेल तर सोपा उपाय, गूस पाळा आणि तिला चंद्रावर घेऊन जा. मग सगळे तिला मून-गूस मून-गूस म्हणू लागतील. खायला साप नसले तरी चालतील, ती दाणे वगैरे खाईल.

भूतबाळसर जी, अहो खोटं कुठे म्हणाले? इंटरेस्टिंग माहिती आहे म्हणून म्हणाले. मला तर मुंगूस शाकाहारी कि मांसाहारी ते ही माहिती नाही. आणि भीती वाटते त्याची.

दारावर सेल्समन, जीझसवाले वगैरे फार येतात. त्यांचा अपमान करून घालवून द्यायला एक पुणेकर पाळायचा आहे.

मला एक पाणघोडा पाळायचा आहे. मध्यरात्रीनंतर आमच्या गावात रेड्यावर बसून म्हसोबा फिरतो. मी पाणघोड्यावर बसून त्याच्यासमोर जाणार आहे. एकदा होऊनच जाऊ दे.

चला, आता मला पाळीव प्राण्यांचे दुकान काढून त्यात कोणकोणते प्राणी ठेवायचे आणि कोणत्या प्राण्याची जाहीरात कोणाला पाठवायची हे कळले.

Pages