तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे

Submitted by हशि on 21 April, 2021 - 13:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

2 वाटी तांदूळ
1 वाटी मुगडाळ
3/4 (पाऊण) वाटी चना डाळ
3/4 (पाऊण) मटकी डाळ
1/4 (पाव) वाटी उडद डाळ
1 इंच आलं
6 ते 7 पाकळ्या लसूण
2 ते 3 मिरची
2 कांदे
2 टोमॅटो
1 गाजर
कोथिंबीर
इनो/सोडा

क्रमवार पाककृती: 

1. 2 वाटी तांदूळ, 1वाटी मुगडाळ , 3/4 (पाऊण) वाटी चना डाळ, 3/4 (पाऊण) मटकी डाळ, 1/4 (पाव) वाटी उडद डाळ ह्या सर्व डाळी आणि तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवुन ठेवा.
2. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हे भिजलेले मिश्रण स्वच्छ धुवून घ्या.नंतर ह्या मिश्रणामध्ये आले, लसूण , मीठ, मिरची आणि कोथिंबिर टाकून मिक्सर मधून दळून घ्या (खूप जास्त बारीक दळू नये)
3. मग ते मिश्रण दिवसभर ठेवा आणि रात्री आप्पे बनवा. आप्पे बनवताना त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो,गाजर आणि अगदी चिमूटभर इनो किंवा सोडा टाका. हे सर्व मिश्रण छान एकत्र करा.
4. (जेवढे आप्पे करायचेत तेवढ्याच मिश्रणात कांदा, टोमॅटो आणि इनो टाका आणि हवे तेव्हढेच टाका) बाकी मिश्रण फ्रिज मध्ये ठेवलं तरी चालेल. मग नंतर हवे तसे /तेव्हा गरमागरम बनवून खाऊ शकतात.
5. आता गॅस चालू करून आप्पे पात्राला तेल किंवा तूप लावून गॅस वर ठेवा आणि आप्पे पात्र छान गरम झालं की त्यात थोडे थोडे मिश्रण टाका.
6. मिश्रण टाकून झाल्यावर झाकण ठेवा आणि 10 मिनट नंतर आप्पे दुसऱ्या बाजूने पलटी मारा आणि पुन्हा झाकण ठेवा. 10 मिनिट नंतर आप्पे काढून घ्या.
7. आता तयार झालेले आप्पे तुम्ही छान हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकतात.

वाढणी/प्रमाण: 
48 नग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users