चष्म्याचा नंबर कमी कसा करावा

Submitted by नंबर१वाचक on 17 April, 2021 - 00:57

माझी मुलगी 13 वर्षाची आहे! तिचा चष्म्याचा नंबर 7 झालाय.
अनुभव घेतलेले खात्रीशीर उपचार कोणी सुचवू शकेल का!!

धन्यवाद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चष्म्याचा नंबर काही केलं तरी कमी होत नाही, गाजर खाऊन किंवा डोळ्याचे व्यायाम करून तो जात नाही असं मला डोळ्याच्या डॉक्टरने सांगितलं होतं. अठराव्या वर्षानंतर वाढत नाही. त्यामुळे त्यानंतर ऑपेरेशन करून घेणे उत्तम. लेन्स वापरणे फार कठीण आणि वेळखाऊ असते. मलाही दुसरीत असताना चस्मा लागला होता. मी पंधरा वर्ष लेन्स वापरल्या. डोळ्याचा मेकप किंवा स्विमिंग, सायकलिंग अशा अनेक गोष्टींना मुकले. ऑपेरेशन केल्यावर हे सगळे करायला उमेदच राहिली नाही.

अरेरे.. पण लेसर ऑपरेशन करून कितपत फरक पडतो?..
स्विमिंग सायकलिंग करते मुलगी पण आता व्हिजन स्पष्ट} नसल्याने बिचकते. आणि अजून किती वाढू शकतो..
10 नंबर ला ऑपरेशन करून फारसा उपयोग होत नाही म्हणे..

म्हणजे डॉक्टर माहिती देतातच पण अनुभव घेतलेल्या लोकांशी बोलणे वेगळे असते ना.. म्हणून विचारले

स्विमिंग सायकलिंग ला काय प्रॉब्लेम आहे? चष्मा लावून सायकल चालवता येते, tank मध्ये पोहायला ही काही समस्या नाही. दूरचं दिसत नाहीये ना? पोहायला काय अडचण आहे?
जे आहे ते आहे, स्वीकारा आणि मार्ग काढा.

इथे आधीही असा धागा होता.त्या धाग्यावर डॉ.इब्लिस यांनी म्हटल्याप्रमाणे शेवटी ही एक शस्त्रक्रिया आहे.९९% जरी यशस्वी होत असल्या तरी त्या १% मध्ये आपण असलो तर ? (शब्द हेच नसतील भावार्थ तोच आहे)
हे वाचून मीही शस्त्रक्रिया टाळली होती.माझ्या ऑफिसमधील दोघींनी आणि माझ्या फिजिओथेरपिस्ट्ने लेझर शस्त्रक्रिया करून घेतली होती.उत्तम रिझल्ट्स होते.

मी करून घेतली आहे शस्त्रक्रिया. माझा नंबर तसा फारसा जास्त नव्हता पण तरी केली. त्यानतंर मात्र उगीच केली असं वाटलं. म्हणजे मला शस्त्रक्रियेचा त्रास नाही झाला. गेली १२ वर्ष बुणा चष्म्याचे व्यवस्थित चालू आहे. पण फारशी काही गरज नसताना केलेली शस्त्रक्रिया होती...काही complication झाले असतं तर?

डॉ. इब्लिस नी इथे लेसिक च्या एका धाग्यावर चांगले प्रतिसाद दिले होते.

शस्त्रक्रिया करायचा सल्ला डॉ नी दिला तरी वाढीचे वय उलटून गेल्याशिवाय करता येणार नाही. आणि सध्या तरी नंबर वाढतच राहील. वाढीच्या वयात जास्त वाढतो. १८-२० वयात स्टेबल होईल. व

इतक्या लहान वयात चष्मा का लागतो? काय कारणे आहेत?>>> नक्की कारण माहीत नाही. पण यावरून एक किस्सा आठवला.... आमच्या इमारतीत खाली एक मेडीकल स्टोअर होते. तिथल्या काकू नेहमी काहीना काही प्रश्न विचारायच्या. मी आणि माझी बहीण काहीतरी आणायला गेलो तर म्हटल्या, “काय गं? एव्हढ्या लहानपणी कसा चष्मा लागला?” त्यावर बहीण म्हटली, “जास्त टिव्ही बघून लागला असेल”. तर त्यावर त्यांनी विचारले, “पण तुम्हा सगळ्याच भावंडांना कसा काय लागला?” मग ती म्हटली, “आम्ही सगळेजण एकच टिव्ही बघतो ना म्हणून” Happy

दुर्दैवाने चष्म्याचा नंबर कमी होऊ शकत नाही.
मीही अनेक वर्षे लेन्सेस वापरल्या. आधी सेमीसॉफ्ट व नंतर सॉफ्ट. सॉफ्ट अतिशय कंफर्टेबल असतात. कधी कधी विसरायलाही होते लेन्स असल्याचे इतक्या सरावाच्या होतात. ८-९ वर्शांपूर्वी मात्र लेसिक करुन घेतले व नंबर पूर्ण गेला. लेसिकचा माझा तरी अनुभव उत्तम आहे.
लेन्सेस कुठल्याही असल्या तरी काळजीपूर्वक वापरण्याचा स्वभाव असेल तरच वापराव्या. नखं कापलेली असणे, हात स्वच्छ धुऊन मग लेन्स काढणे/घालणे, लेन्स सोल्यूशन्स वेळेवर बदलणे, डिस्पोझेबल असल्यास तशाच न वापरता वेळेवर डिस्पोज करुन फ्रेश पेअर वापरणे इ., ओवरनाईट ट्रीपला जाणार असल्यास आठवणीने लेन्सची केस, सोल्यूशन्स च्या बाटल्या बरोबर घ्याव्यात.

माझा नंबर पाच आणि साडेपाच होता. जवळच आणि लांबच दोन्ही दिसायचं नाही त्यामुळे स्विमिन्गचा प्रश्नच नव्हता. लेन्स लावून स्विमिंग केलं आणि डोळ्यात पाणी गेलं तर, फेरफटका यांनी सांगितलेला गॉगलची तेव्हा माहिती नव्हती (तेव्हा होता की नाही माहित नाही) सायकल चालवताना लेन्स उडाली तर अशी भीती वाटायची, चष्मा लावून शाळा संपेपर्यंत सायकल चालवली.
लेसीकचा अनुभव उत्तम आहे. दहा मिनिटात ऑपरेशन होते जे मशीनने केले जाते. सहा वर्ष झाली काही तक्रार नाही.

चष्म्याचा नंबर 7 किंवा

चष्म्याचा नंबर 7 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ती मेडिकल ट्रीटमेंट समजली जाते, कॉस्मेटिक सर्जरी नाही. त्यामुळे इन्शुरन्स क्लेम करता येतो.

माझा नंबर वय आणि उंचीबरोबर वाढत 9 आणि 10 झाला होता. मी चष्मा कधीच वापरला नाही. कायम सेमी सॉफ्ट लेन्सेस. पण मग जेव्हा नंबर वाढण्याचं वय संपलं तेव्हा पुण्यात डॉ माधुरी चांदोरकरांकडे लेसिक करून नंबर पूर्णपणे गेला. आम्हाला सांगण्यात आलं होतं की 7 च्या वर जेवढा नंबर असेल तेवढा सर्जरीनन्तर रहाण्याची शक्यता असते ( माझ्या केसमध्ये 2 आणि 3). पुर्ण जाईलच याची खात्री नाही. पण माझ्या केसमधे नंबर पूर्ण गेला. आता अगदी शुन्य आहे. मला दूरच आणि जवळचं बिना चष्म्याचं व्यवस्थित दिसतं. या वर्षी 14 ऑगस्टला 16 वर्षे पूर्ण होतील. अजुन तरी सगळं उत्तम आहे.

*डॉ इब्लिस / आ रा रा नी लेसिक बद्दल एका लेखाच्या प्रतिसादात कॉशन अलर्ट दिला आहे, तो पण विचारात घ्यायला हवा.

माझ्या मुलाचा दोन्ही डोळ्यांचा नंबर 6व्या वर्षापासून 16 व्या वर्षापर्यंत 4.5 एवढा वाढला. आम्ही अनेक उपाय केले, आयुर्वेदिक उपचार, ज्यासाठी 2012 मध्ये महिना 5000 खर्च आला,तेसुद्धा आले. नंबर वाढत राहिला.
डॉक्टर आधीच म्हणाले होते, उंची वाढेल तास नंबर वाढेल. मग आम्ही फक्त त्रिफळा पाण्याने दिवसात दोन वेळा डोळे धुणे चालू ठेवले. गाजर वगैरे नॉर्मल सलाड प्रमाणे चालू होते.
16 व्या वर्षा पर्यंत त्याची उंची 5-11 झाली, गेल्या दोन वर्षात हार्डली इंचभर वाढली असेल पण नंबर सेम आहे. तो सायकलिंग स्विमिंग बॅडमिंटन अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी करतो ( गेले वर्षभर बंद आहे), पण चष्म्यामुळे त्रास झाला नाही.

शहरात बंद दाराआड जास्त वेळ असल्याने दूर बघणे होत नाही म्हणून चष्मा लागण्याची शक्यता जास्त असते असे कुठेतरी वाचले होते,यात तथ्य असेल का?

इथे नॉर्थ अमेरिकेत सिआरटि लेंस म्हणुन एक प्रकार आहे. या (हार्ड) लेंसेस रोज रात्री झोपताना घालायच्या असतात. झोपेत तुमची विजन तात्पुरती करेक्ट (२०/२०) करण्याचं काम त्या करतात. लहान मुलांचा (ग्रोथ इयर्स) नंबर वाढत असतानाच किंवा चष्मा लागण्याची शक्यता निर्माण झालेली असताना हा उपाय केला तर जास्त सोयिस्कर. नंबर पुढे वाढत नाहि. मुलं २२-२३च्या पुढे गेली कि रेग्युलर सॉफ्ट लेंसेसना स्विच करु शकता.

तटि: इथे सगळेच आप्टामेट्रिस्ट सिआरटि लेंसेस प्रिस्क्रायब करत नाहित. का ते सांगत नाहित. बहुतेक इंशुरंसची अट असेल; कारण या लेंसेस कस्टम मेड असल्याने महाग असतात, इंशुरंस त्यांची कॉस्ट कवर करत नाहि. बट दे वर्क अ‍ॅज डिझाइन्ड, अँड अ‍ॅडवर्टाय्ज्ड...

हाय केया. मी ठाण्याला केले श्री रामकृष्ण नेत्रालय. डॉ प्राजक्ता नी केले. मला आठवतय त्यानुसार अंदाजे ४० हजार खर्च आला होता.
माझ्या नवर्‍याने नंतर दादरला केले. त्यालाही ४०-४५हजार खर्च आला होता. डॉ माधवी जेस्टे. त्यांचे शिवाजी मंदीरसमोर क्लिनिक आहे.

मी बंगलोरला केलं होतं. डोळयांचं हॉस्पिटल होतं आता नाव आठवत नाही. मला एक लाख खर्च आला होता.

केया, पुण्यात NIO (national institute of ophthalmology) येथे चांगला अनुभव आहे. त्यांच्या घोले रोडजवळ आणि ब्रेमेन चौकाजवळ अशा दोन शाखा आहेत.

घाट्कोपरला डॉ. विराम अगरवाल आहेत. त्यांच्या डोळ्यांच्या व्यायामाने नंबर कमी होतो. माझ्या मुलीला ६ वर्षाची असताना +२.५ आणि +३.० नंबर होता. पण १ महिन्याच्या ट्रिटमेंट्ने पुर्णपणे नंबर गेलाय. आत्ता ६ वर्ष होउन गेलीत पण परत नंबर वाढला नाहिए. त्यांची वेबसाईट www.myvisionyoga.com

माझ्या ऑफिसमधल्या अनेकांनी इथे ट्रिटमेंट् घेतली आणि सगळ्यांना रिझल्टस चांगले मिळालेत.

NIO आमचे खानदानी डॉक्टर :). बर्‍याच वर्षांपासून.
अगदी योग्य सल्ला व उपचार! विशेषतः लहान मुलांसाठी जाई केळकर ह्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी असते.
पूर्वी घोले रोड ला जायचो...आता औंध मध्ये जात असतो.

NIO आमचे खानदानी डॉक्टर :). बर्‍याच वर्षांपासून.
अगदी योग्य सल्ला व उपचार!
+१

सर्वात आधी मी, चष्म्याचा नंबर घालवण्या करता लेसर शस्त्रक्रिया जवळपास वीस वर्षांपुर्वी केली इकडूनच नंतर ज्येनांचे काच बिंदू मोती बिंदू ई शस्त्रक्रिया देखील इकडेच.

देवकी- त्रिफळा चूर्ण नाही. अख्खा त्रिफळा तांब्याच्या भांड्यात गरम पाणी घालून रात्रभर ठेवायचा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून घ्यावे. त्या पाण्याने आय कप वापरून डोळे धुवायचे.

मलाही कळत नाहीये.
त्रिफळा चूर्णाने डोळे हे मी मला ०.५ लागण्यापूर्वीच वाचत आलेय. पण ती पावडर डोळ्यात अडकेल, डोळे लाल होतील वगैरे भितीने कधी केलं नाही.
अख्खा त्रिफळा म्हणजे अजून काही वेगळे आयुर्वेदिक वनस्पती फळ आहे का?

अनू, पावडर जर गाळुन घेतली तर होऊ शकते की.

कोणी आक्षेप घेईल म्हणून लिहीत नव्हते पण माहिती म्हणून वाचा. मी वाद घालु शकत नाही. माझा डोळ्या साठी नाही पण बाकी अनूभव उत्तम.

सुर्य व चंद्र यांना काळपुरुषाचे नेत्र मानले जातात. चाक्षुपोनिषद म्हणून सूर्य स्तुती आहे. हे स्तोत्र लहान मुले सुद्धा म्हणून शकतील असे सोपे आहे. उगवत्या सुर्याला अर्ध्य देऊन हातात पेयजल घेऊन हे स्तोत्र म्हणतात. आणी मग ते हातातले पाणी डोळ्याला लावतात. मी हे वर्षभर केले होते. डोळ्या साठी नाही पण सुर्य एक उर्जा देवता म्हणून करत होते.

प्रसिद्ध ज्योतिष्यी पं. अरविंद गजेंद्रगडकर यांची एक आठवण होती. त्यांच्याकडे नेत्र रोगाने त्रासलेला मुलगा आला होता. त्याने बरेच उपाय केले, ऑपरेशन पण झाले पण फरक पडत नव्हता. तेव्हा त्यांनी त्याला हे स्तोत्र दिले होते. त्याने त्याला बराच फरक पडला.

तळटीप : मी हे साप्ताहीक सकाळ मध्ये वाचले होते. लिंक माझ्या कडे नाही तेव्हा कृपया ती मागुन टिंगल टवाळी करु नये. मी याची सक्ती करत नाही. एक वै अनूभव म्हणून लिहीले आहे. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी त्यावर वेगळा धागा काढुन तिकडे गोंधळ घालावा.

अनु, त्रिफळा पावडर एक चमचा रात्री पेला भर पाण्यात घालून छान हलवून घ्यायचे आणि आणि ग्लास झाकून ठेवायचा रात्र भर. सकाळी चूर्ण तळाशी बसले असते वरचे पाणी अलगद दुसऱ्या पेल्यात काढून घ्यायचे. गाळायची गरज नाही पडत. वाटलेच तर पाणी वस्त्रगाळ करून घ्यायचे.
ते मग आय कप मध्ये घालून त्यात अर्धा मिनिट डोळे बुडवून पापण्यांची उघडझाप करायची.

मला पहिल्यांदा जवळचे बारीक अक्षर दिसायला त्रास होऊ लागला आणि जवळचा ०.२५ बहुतेक नंबर लागला, डॉक कडे गेल्यावर. मग मी तो रेडिमेड चष्मा विकत घेतला फक्त वाचायचा आणि डोळ्यांचे व्यायाम, त्राटक आणि त्रिफळा चूर्णाने वरील प्रमाणे डोळे धुणे सुरू केले. आणि मग दीड दोन महिन्यात मला चष्मा वापरणे बंद करावे लागले. ते पुढील तीन वर्षे चष्मा लागला नाही.
त्यांनतर मात्र परत तोच चष्मा लागला आणि मग आता आठेक वर्षे झाली परत चष्मा लागून. आता नंबर १.५ आहे.
ते त्रिफळा चूर्णाने डोळे धुणे आणि तो व्यायाम हे सहा महिने पर्यन्त केले होते, मग उत्साह मावळला. अजूनही आठवले की सुरु करतो आठवड्याभरात बंद पडते.

साधारण असा अनुभव असा आहे की जवळचा नंबर कमी असेल तर व्यायाम, त्रिफळा या उपायांनी जातो, पण लांबच्या नंबरला हे उपाय चालत नाहीत. त्यात जो वेळ लागतो ते बघता काही दिवसांनी उत्साह बारगळतो.

एन आय ओ बेस्टच आहे. आम्ही पण सर्वजण तिथेच जातो. वडिलांच काचबिंदू आणि मोतीबिंदू ऑपरेशन 2011 मध्ये आदित्य केळकरांनी केलं होतं. मी पण दर सहा महिन्यांनी नंबर चेकिंग ला जात असतो. त्यांनी लेझर सजेस्ट केलं होतं पण मी अजून तरी नाही केलं.

त्रिफळा भरड मिळते त्यात आवळा, हिरडा बेहेडा चे तुकडे असतात. अगदी अख्खा नव्हे पण तुकडे केलेला सुकलेला आवळा असतो त्या साईजचे. ह्याचं पाणी वस्त्रगाळ केलं तर पाण्यात अजिबात पावडर येत नाही म्हणून हे वापरतात

मानव - तुमचं म्हणणं खरं आहे, मुलांचा उत्साह फार टिकत नाही, त्यांना लगेच परिणाम दिसला नाही तर कुरबुर करतात

असा नंबर कमी होणार नाही, अजून ४/ ५ वर्षे वाढेल आणि मग वाढ बंद होईल.
नवीन Submitted by अमितव on 17 April, 2021 - 16:30

<<
अमितव

फक्त तुमच्यासाठी प्रतिसाद. या सेम विषयाचा जुना धागा तुम्हाला ठाऊक आहे.

पेशंट १३ वय वर्षे. नंबर ७. याचा अर्थ नंबर वाढायला सुरुवात फार लवकर झाली आहे.

अशा प्रकारचा मायोपिया सहसा पॅथॉलॉजिकल प्रकारचा असतो. हा शरीराची वाढ थांबली तरी वाढता राहू शकतो. ६० वगैरे नंबर रेकॉर्डवर आहेत. ( म्हणजे ६० नंबरचा चष्मा घालून कामापुरते दिसू शकणे) यात बुबुळाची साईज अनियंत्रितपणे वाढत राहू शकते, आवरणे कमकुवत होऊन स्टॅफिलोमा नामक फुगवटे येऊ शकतात, किंवा इतरही अनेक बाबी.

मुद्दा हा, की हे ४-५ वर्षांत थांबणारे प्रकरण दिसत नाहिये.

बाकी इथले ज्योतिष, आयुर्वेद वगैरे तज्ञ अतीशय उत्तम सल्ले देताहेत, जे धागाकर्त्यांस अपेक्षित आहेत, असे वाटते.

उदा> साधारण असा अनुभव असा आहे की जवळचा नंबर कमी असेल तर व्यायाम, त्रिफळा या उपायांनी जातो, पण लांबच्या नंबरला हे उपाय चालत नाहीत. त्यात जो वेळ लागतो ते बघता काही दिवसांनी उत्साह बारगळतो.
नवीन Submitted by नरेन. on 19 April, 2021 - 20:10 << हे. यांना जितके धन्यवाद द्यावेत तितके कमीच. याम्च्या सारख्या उपयांनी कोव्हिडची दुसरी लाट आपण झेलत आहोत. असो.

तसेच, माय डोक्टर इज स्ट्राँगेस्ट प्रकाराने अमुक ठिकाणी जा वगैरे टाईप प्रतिसाद. तुम्हा सगळ्यांना थँक्स बर्का!

असो.

@नंबर१वाचक.

हा फुकट सल्ला आहे, टोटली इग्नोर कराल याची खात्री आहे. तरी:

तुमच्या नेत्रतज्ज्ञांची डिग्री आधी पहा. अ‍ॅलोपथीवाले आहेत का ते कन्फर्म करा. त्यानंतर त्यांना विचारून त्यांच्या अनुभवातला कुणी 'रेटिना' तज्ज्ञ असेल तर त्याला दाखवा. हवे तर दुसर्‍या (अ‍ॅलोपथिक) रेटिना वाल्याचे सेकंड ओपिनियन घ्या . ते काय बर्फाची वेल्डिंग / लेझर ची वेल्डिंग इ. पडद्याचे उपचार सांगतील ते ऐका. (लेझर नंबर कमी करण्याचे ऑपरेशन नव्हे, पडद्यासाठी. रेटिना साठी उपचार)

चष्मा कमी करणे / घालवणे म्हणजे त्या नंबरची काच डोळ्याचा कॉर्निआ घासून वा डोळ्यात भिंग घुसवून रिझल्त मिळवणे होय.
१. दोन्ही ऑपरेशन आहेत, ऑपरेशनची सारी काँप्लिकेशन्स सोबत आहेत. पूर्ण व दुरुस्त न करण्यासारखे अंधत्व येऊ शकते.
२. ऑपरेशन स्क्सेक्ष झाले तरी मूळ आजार बरा झालेला नाही. पडदा कमकुवतच आहे.
३. नंबर स्टेबल होई पर्यंत, (किमान १ वर्श सेम नंबर) या प्रकारे नंबर कमी करायचा विचार करू नका. किमान १८-२० वयापर्यंत.
४. ऑपरेशनचा उपयोग म्हणजे, *फक्त हुंडा कमी होईल, तिच्या मुलांना चष्मा लागेलच अशी खूप मोठी शक्यता राहीलच.*

ही तिची डिसॅबिलिटी आहे, तिच्या सोबत 'वरतून' आलेली आहे. "कंपनीतून" ही गाडी तशी बनून आलेली आहे. आणि या कंपनीत ग्यार्‍ंटी वारंटी नाही, हे अ‍ॅक्सेप्ट करा, रेटिना तज्ञांसोबत वेलोवेळी दाखवत रहा, मुख्य म्हणजे "चश्मा" हा आजार नसून तो मूळ मायोपिया नावाचा आजार सहन करण्याचा/ त्यासोबत नीट जगण्याचा कुबडी/चप्पलेसारखा accessory आहे हे समजून घ्या.

कुबडी सोडून क्यालिपर बसवले किंवा इतरही काही केले तरी मूळ आजार गेलेला नाही, हे प्ली ज लक्षात घ्या. त्याकडे लक्ष ठेवायला हवे. नंबर कमी करायची ऑपरेशन्स केलीतच, तर सर्व कागदपत्रे/चश्म्याचे नंबर इत्यादी तिला 'शेवटपर्यंत' म्हणजे "विठ्ठलचरणी लीन होई पर्यंत" जपून ठेवायला सांगा ही नम्र विनंती.

ऑल द बेस्ट.

अजून एक ताजा कलम.

मी मूर्खपणे ७ नंबर मायनस आहे असे गृहित धरलेले आहे. (कारण "झालाय" हा शब्दप्रयोग, याचा अर्थ वाढत वाढत झालाय अस मी समजलो. हा कमी होत होत ७ देखिल होऊ शकतो) हा प्लस असेल तर संपूर्ण वेगळी बाब आहे.

ओके. मला आणि भावंडांना असा पिढीजात मायोपिया आहे. लहानपणी नंबर वाढत जाऊन मग शरीराची वाढ मंदावल्यावर नंबराची वाढ थांबलेली बघितली आहे, म्हणून अ‍ॅनेकडॉटली लिहिलेलं.
लहान असताना लेसिकची चैन परवडण्यासारखी न्हवती, परवडणेबल झाल्यावर ती कटाक्षाने न करण्यात तुमचा हात आहे, त्याबद्द्ल मात्र सदैव ॠणी आहे.

लहान वयात डोळ्यांचा नंबर जास्त असेल तर २५ वयापर्यंत तो स्थिर होतो. त्यानंतरच लेसर उपचार केलेले चांगले. तोपर्यंत कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरून आणि डोळ्यांवर ताण देणारे काम कमी करून नंबर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. अशा केसमध्ये खाण्यात ठराविक पदार्थ समाविष्ट करण्यानं, काही औषधोपचार केल्यानं फरक पडेलच याची खात्री नाही. लेसर उपचारांमुळे अगदी १०-११ नंबरही जाऊ शकतो.