नमस्कार. मी आणि माझे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून सोसायटीतील काही लोकांच्या वागणूकीमुळे त्रस्त आहोत.
समस्या अशी आहे की दर रविवारी ऑलमोस्ट दर रविवारी हे लोक खाली सोसायटीच्या ओपन पार्किंग भागात क्रिकेट खेळतात. आमच्या वाट्याला आलेले पार्किंग तिथेच आहे आणि त्यामुळे सारखं कोणीतरी वॉचमन ला पाठवून आम्हाला गाडी काढा म्हणून सांगायला येतात . सुरवातीला आम्ही सहकार्य केले काही दिवस आणि नवरा जाऊन दुसरीकडे तेवढ्यापूरते गाडी लावून यायचा. पण आता चार वर्षे झाली जवळपास इथे येऊन तीच कटकट अजूनही सुरूच आहे. आता काही दिवस कोरोनामुळे जरा काळजी घ्यावी म्हणून त्याना सध्या खेळु नका असे शांतपणे चांगल्या भाषेत सांगितले होते. पण काहीही फरक नाहीये.
या गोष्टीवरून आता वाद व्हायची वेळ आलीये. इतर काहीजण सुध्दा त्या लोकांना बोलले मागे की सध्या खेळु नका पण त्याउपर कोणी काही बोलत नाही . आणि याचं कारण म्हणजे सोसायटीचा सेक्रेटरी स्वत: त्यांना सामील आहे. त्याला कोणीही काहीही बोलत नाही उलट त्याचा सोबत खेळतात. हे वागणं म्हणजे मिळालेल्या पोझिशनचा गैरवापर करणे नाही का? आम्ही यांच्या पार्किंग मध्ये गाडी लावतो मग असे म्हटले तर तेही चालत नाही. काय करावे अशा लोकांना कसे समजवावे? स्वत:च्या च पार्किंग मध्ये गाडी लावणे गुन्हा आहे का? काय कायमस्वरूपी तोडगा काढावा यावर जेणेकरून ते लोक पुन्हा असे वागणार नाहीत. कृपया जेन्यूईन समस्या आहे, जेन्यूईन मदत हवीये. मी नियमित माबोकर आहे तेव्हा आताच स्पष्ट करते की हा जरी डुआयडी असला तरी धागा टीपी म्हणून काढलेला नाही. धन्यवाद.
तुम्ही आधी त्यांच्यात मिळून
तुम्ही आधी त्यांच्यात मिळून मिसळून होता. आत्ताही तुम्हाला संबंध बिघडवायचे नाहीत. लेखी काही करायचे नाही. तसेच त्यांच्या उर्मटपणाला उत्तरही द्यायचे नाही. तुम्ही सध्या जे करताय तेच योग्य आहे. त्यानंतर जर तुम्हाला त्रास झालेला नाही तर यात इतरांनी काय सल्ला द्यावा ? प्रश्न सुटलाय असे नाही का वाटत ?
अरे देवा!
अरे देवा!
अहो, च्रप्स तुम्हीच... ‘वाचकांना त्रास का?‘ , नारीमारीतो यांनी ‘दोनदा धागा आलाय‘ असे मला उद्देशून लिहिल्यावर +१ वगैरे करता व पुन्हा मलाच विचारता ??
मी बास करते आता. मलाच नीट समजले नसेल तुम्हाला यांना काय म्हणायचे होते. व तुम्हालाही समजले नाहिये मला काय सांगायचे आहे.
गोंधळात गोंधळ.
गोंधळात गोंधळ.
आणि शंभर
आणि शंभर
एकशे एक
पंच्याण्णव, किंवा नारळीकर बाईंच्या पद्धतीनुसार नव्वद पाच.
मी बास करते आता. मलाच नीट
मी बास करते आता. मलाच नीट समजले नसेल तुम्हाला यांना काय म्हणायचे होते. व तुम्हालाही समजले नाहिये मला काय सांगायचे आहे.
>>> हो जाऊ दे... विषयांतर खूप होतंय
Pages