सोसायटीच्या प्रश्नात मदत हवी आहे

Submitted by एक-माबोकर on 11 April, 2021 - 07:59

नमस्कार. मी आणि माझे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून सोसायटीतील काही लोकांच्या वागणूकीमुळे त्रस्त आहोत.
समस्या अशी आहे की दर रविवारी ऑलमोस्ट दर रविवारी हे लोक खाली सोसायटीच्या ओपन पार्किंग भागात क्रिकेट खेळतात. आमच्या वाट्याला आलेले पार्किंग तिथेच आहे आणि त्यामुळे सारखं कोणीतरी वॉचमन ला पाठवून आम्हाला गाडी काढा म्हणून सांगायला येतात . सुरवातीला आम्ही सहकार्य केले काही दिवस आणि नवरा जाऊन दुसरीकडे तेवढ्यापूरते गाडी लावून यायचा. पण आता चार वर्षे झाली जवळपास इथे येऊन तीच कटकट अजूनही सुरूच आहे. आता काही दिवस कोरोनामुळे जरा काळजी घ्यावी म्हणून त्याना सध्या खेळु नका असे शांतपणे चांगल्या भाषेत सांगितले होते. पण काहीही फरक नाहीये.

या गोष्टीवरून आता वाद व्हायची वेळ आलीये. इतर काहीजण सुध्दा त्या लोकांना बोलले मागे की सध्या खेळु नका पण त्याउपर कोणी काही बोलत नाही . आणि याचं कारण म्हणजे सोसायटीचा सेक्रेटरी स्वत: त्यांना सामील आहे. त्याला कोणीही काहीही बोलत नाही उलट त्याचा सोबत खेळतात. हे वागणं म्हणजे मिळालेल्या पोझिशनचा गैरवापर करणे नाही का? आम्ही यांच्या पार्किंग मध्ये गाडी लावतो मग असे म्हटले तर तेही चालत नाही. काय करावे अशा लोकांना कसे समजवावे? स्वत:च्या च पार्किंग मध्ये गाडी लावणे गुन्हा आहे का? काय कायमस्वरूपी तोडगा काढावा यावर जेणेकरून ते लोक पुन्हा असे वागणार नाहीत. कृपया जेन्यूईन समस्या आहे, जेन्यूईन मदत हवीये. मी नियमित माबोकर आहे तेव्हा आताच स्पष्ट करते की हा जरी डुआयडी असला तरी धागा टीपी म्हणून काढलेला नाही. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचून मनातल्या मनात मी "आमच्यात उकीरडा मागत नाहीत" म्हणाले...>> ह्या वाक्याचा निषेध. आमच्यात म्हणजे? ते सोलून सांगा.
ते कोणाचे तरी घर आहे तर उकीरडा!! मला तर होमलेस लोक रस्त्याच्या कडेला आडोसा लावून करतात ते ही घरच वाटते. काहींन खरेच उकीरडा उपसून जगा वे लागते किंवा गटारीशेजारी आसरा शोधावा लागतो.

धागा संबंधाने: तुमच्या नवर्‍याला एखादी क्रिकेट टीम जॉइन होणे शक्य नाही का? इफ यु कांट विन देम जॉइन देम असा वाक्प्रचार आहे. असा विचार करून बघा. ओन्ड फ्लॅट असेल तर सर्वांशी सामोपचाराने वागावे लागेल. आमच्या बिलिडिंग मध्ये बारक्यांची, महिलांची व बाप्यांची अशा टीम्स आहेत व बी पीएल पण होते बिल्डिंग प्रीमीअर लीग. हे सामने व प्रॅक्टिस चालू असताना जाणे येणे पण अवघड होते. पण आम्ही रेंटल रहिवासी आहोत म्हणून गप्प बसतो. जनरली कोणत्याच बाबतीत सोसायटी मॅनेज मेंट शी पंगे घेत नाही. ओनर लोकांची वेगळी मिजास असते.

जितका उंच फ्लॅट तितका अ‍ॅरोगं ट मालक हे टॉवर असलेल्या वसाहतीत अनुभवले आहे. त्यामुळे साहान भूति. इथला चेअर्मन व माझा घर मालक ह्यांचे काहीतरी मेजर बिनसले होते. त्यामुळे तो कायम आम्हाला त्रास देत असे. त्यामानाने ह्या सोसायटीत पब्लिक फार लक्षच देत नाही.

निषेध मान्य आहे अमा, म्हणूनच मनातल्या मनात म्हणाले Happy "तुम्ही आमचा फ्लॅट मागाल" ह्याला तितकंच दुसरं इल्लॉजिकल काही उत्तर असेल तर सांगा. ते त्यांचं घर आहे असा तुमचा समज, अमा. घर काय फक्त चार भिंतीने असतं काय? शेजार धर्म ही हवा. चार वर्ष दुसर्‍याला त्रास देतात मग असलीच इल्लॉजिकल भाषा ऐकवायला हवी (प्रत्यक्षात तसं करायची हिंमत नाही!).
सोलूनच सांगायचं तर उकीरडा गाढवाचे घर असते.

मला तर होमलेस लोक रस्त्याच्या कडेला आडोसा लावून करतात ते ही घरच वाटते. काहींन खरेच उकीरडा उपसून जगा वे लागते किंवा गटारीशेजारी आसरा शोधावा लागतो. >>>> ते तुमच्या घरात तुम्ही जरा बाहेर जा म्हणून सांगायला येतात का ?
वडाची साल पिंपळाला कशाला ? ज्यांना धागाकर्तीने उत्तर दिले आहे त्यांचे पराक्रम बघता त्याचा निषेध करावासा वाटत नाही का ? आपण दुस-याला त्याच्या हक्काच्या जागेतून गाडी काढायला लावायची. ते ही एखाद दुस-या वेळी नाही तर नियमितपणे. तर मग त्या व्यक्तीने तुमची गाडी पार्किंग मधून काढून मला ती जागा द्या असे सांगितले तर "उद्या घर सुद्धा मागाल " असे उत्तर दिले तर याची संगती कशी लावाल ? हे जितके उर्मट उत्तर आहे तितकेच उर्मट उत्तर या व्यक्तीने दिले तर त्याचा कीस काढणार आणि ज्यामुळे उत्तर द्यावे लागते त्याबाबतीत कानावर हात ठेवणार का ?

इथे भाडेकरू विरूद्ध मालक असा काही प्रकार नाही. तसेच त्या क्रिकेट टीम मधे सामील होणे हे काही सोल्युशन नाही. त्यांना गाडी लावण्यासाठी कायमस्वरूपी सोल्युशन सोसायटीने द्यावे इतकीच त्यांची मागणी आहे. टीम मधे खेळून आपलीच गाडी कुठे तरी बेवारशासारखी लावणे हे सोल्युशन आहे का ?

मी शांतपणे ' चार वर्षांपासून गाडी काढतोच आहोत कारण तुम्ही फक्त विकेंडला खेळत असायचा. आता लोकडाऊन झालंय तर रोजच खेळणार मग आम्ही गाडी कुठे लावणार? त्यामुळे आता काही आम्ही गाडी हलवत नाही. तुमची अगदीच गैरसोय होत असेल तर मला दुसरं पार्किंग शोधून द्या म्हणजे तुम्हालाही रोज त्रास नको आणि मलाही नको' असं सुनावलं असतं पण ही गेंड्याच्या कातडीची लोकं असतात. तुम्ही गाडी काढत नाही तर आम्ही इथेच खेळतो मग काय वगैरे फुटली तर आम्हाला दोष देऊ नका म्हणायला मागे पुढे पाहणार नाहीत. तसं झालंच तर रीतसर तक्रार करावीच लागणार.

फक्त कसं आहे तुम्हाला एक रिऍलिटी सांगते - आमच्या सोसायटी मध्ये अशीच एक टगी गॅंग आहे, त्यात चेअरमन पासून सगळे रिकामटेकडे लोकं शामिल आहेत.

कोरोनाच्या काळात माझी आजी गेली. नातेवाईक बाहेर गावी तेंव्हा कोणी येण्याची शक्यता नव्हती. बाबा एकटे काय काय करणार, आमच्या सोसायटीमधले लोकं एकजुटीने आमच्यासाठी तेंव्हा उपलब्ध झालेले होते. अगदी आजीचं मृत्यूपत्र मिळवून देण्यापासून ते खांदा देण्यापर्यंत सगळं त्यांनीच केलं. अगदी काका , आत्या वगैरे सुद्धा येऊ शकले नाहीत तेंव्हा हेच कुटुंब मदतीला आलं.

आणखी एका बिल्डिंग मधली ताई गरोदर होती, तिचं water break झालं तेंव्हा नवरा बाहेर गावी गेला होता अर्जंट कामासाठी तेंव्हा तिला दवाखान्यात नेऊन सगळे सोपस्कार पार पाडून नवरा येईपर्यंत सोबत थांबणारे पण हेच लोकं होते.

कोणावर कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही. मी चांगली घटना आणि वाईट घटना याचं फक्त उदाहरण दिलंय , तसं काही होईल असं मला नाही म्हणायचं. तेंव्हा इथे तावातावाने मिळालेल्या सल्लांवर विचार करून तसं करणार असाल तर तुम्हाला या लोकांची कधीच गरज पडणार नाहीये याबाबत शुअर व्हा आधी. तसं नसेल तर मात्र सहन करून दुसरा उपाय काढता येतोय का तर पहा.

मागाच्यावर्षी लॉक डाऊन मध्ये माझ्या आईच्या सोसायटी मध्ये बिल्डिंग च्या खाली बसून पुरुष मंडळी भर दुपारी हास्यकल्लोळ करत पत्ते खेळत बसायचे. शेजारच्या काकूंची बाल्कनी अगदीच वर असल्याने त्या आवाजाने दुपारच्या झोपेचं खोबरं व्हायचं. काकांनी खूप वेळा आड मार्गाने पण प्रेमाने दुसरीकडे खेळा सांगून पाहिलं पण काहीच उपयोग झाला नाही. मग काकासुद्धा त्यांच्यात खेळायला जायला लागले, त्यांची टीम जॉईन केली आणि 1 महिन्यानंतर गोड बोलून त्यांना दुसऱ्या जागी घेऊन गेले.
असं काही जमतंय का बघा.

समोरचा माणूस पोलिस स्टेशन वा कोर्टाची पयरी चढणारा आहे हे समजले की असली नाठाळ लोकं नरमतात.

असले प्रश्नं अंतर्गत असतात. भांडणाचे आणि शत्रुत्व वाढण्याचे. यापलिकडे काही नाही.

सिरीयस चर्चा चालू आहे.. पण महत्वाची गोष्ट म्हणजे धागकर्ती आणि त्यांचे हबी यांनी चार वर्षे काहीच जाणवू दिले नाही की त्यांना त्रास होतोय...
त्यांना टेकन फॉर ग्रंटेड घेतले गेले आहे..
एकदा टेकन फॉर ग्रंटेड झाले की खूप अवघड आहे...

कायदेशीर नोटीस, अथवा सोसायटी मीटिंग मध्ये सेक्रेटरी विरुद्ध तक्रार हे उपयोगी नाहीय.. काहीही फायदा होणार नाही..

IMO प्रॅक्टिकल सोल्युशन - गाडी move करा म्हणून जेंव्हा ते लोक वॉचमन ला पाठवतील तेंव्हा दरवाजा उघडूच नका..
कॉल केला तरी उत्तर देऊ नका..
एक दोन आठवडे असे केले की आपोआप बंद होतील...

कुणी तरी आपल्याला वेळ आल्यावर मदत करणार आहे अशा समजात गुंडगिरी सहन करणे वेगळे आणि माणुसकीच्या भावनेतून आपणही वेळ आल्यावर दुस-यांना मदत करणे वेगळे. जर आपण मदत करत असू तर तशी ती कुणीतरी करेलच. अगदी सोशल नसलेल्या कुटुंबांनाही अशा वेळी मदत केली जाते. त्या वेळी जे कुणी न्याय्य हक्कासाठी हा मनुष्य आपल्याला नडला होता अशी भावना बाळगून मदत करायला नकार देत असतील अशांशी संबंध ठेवावेत का ?

च्रप्स - योग्य सल्ला. धागाकर्तीला जी उत्तर मिळाली आहेत ती पाहता या लोकांची संबंध ठेवण्याची लायकी नाही. असा एक सेक्रेटरी आमच्या सोसायटीत होता. ज्याला त्याला अशा भाषेत उत्तरं द्यायचा. त्याला मी जीबी मधे झाडला होता. अनेकांनी येऊन माझे अभिनंदन केले. ते समजल्यावर त्याने रागारागाने राजीनामा दिला. आज त्याच्याशिवाय सोसायटी चालू आहे. योग्य बाजू समजणारे कुणीच नसतील का त्या सोसायटीत ? तसे असेल तर तो फ्लॅट विकून दुसरीकडे जाणे श्रेयस्कर.

च्रप्स

पोलीस नाही. सहकार खाते.
गाडी काढायला लावणे हा त्रास देण्याचा प्रकार समजला जाऊ शकतो.

सोलूनच सांगायचं तर उकीरडा गाढवाचे घर असते.>> ते माहीत आहे.

आमच्यात हे सोलायला विचारले होते पण असो.

इंदिरानगर का गुंडा जाहिरात बघितलात का. त्याला बोलावून घ्या बघू. हलके घ्या.

ओह... "आमच्यात" सोलायला सोपे आहे अमा... "आमच्यात" म्हणजे "तुम्ही उद्या फ्लॅट मागाल" असलं चक्रम न बोलणार्‍या सर्व लोकांचा गट!! Happy जाहिरात माहिती नाही. यूट्यूब वर असेल तर बघते.

आमच्यात हे सोलायला विचारले होते >>> आमच्यात म्हणजे नियमाने वागणा-यांच्यात / कायद्याने वागणा-यांच्यात / इतरांना त्रास न होईल असे वर्तन करणा-यांच्यात असे त्यांना म्हणायचेय असे मला वाटले.
तुम्हाला यात काय खटकले ?

कुणी तरी आपल्याला वेळ आल्यावर मदत करणार आहे अशा समजात गुंडगिरी सहन करणे वेगळे आणि माणुसकीच्या भावनेतून आपणही वेळ आल्यावर दुस-यांना मदत करणे वेगळे. जर आपण मदत करत असू तर तशी ती कुणीतरी करेलच. अगदी सोशल नसलेल्या कुटुंबांनाही अशा वेळी मदत केली जाते. त्या वेळी जे कुणी न्याय्य हक्कासाठी हा मनुष्य आपल्याला नडला होता अशी भावना बाळगून मदत करायला नकार देत असतील अशांशी संबंध ठेवावेत का ?

>>>>

एथिकली आणि मॉरली हे अगदी बरोबर आहे पण प्रॅक्टिकली सगळं असं ब्लॅक अँड व्हाइट नसतं. म्हणूनच त्यांनाच मी विचार करण्याचा सल्ला दिलाय की इथे तावातावाने सल्ले देणारे कोणीही प्रॅक्टिकली वेळ आल्यावर मदतीला येणार नाहीयेत आणि अशी वेळ आली तरीही तुम्हाला या लोकांची गरज लागणारच नाहीये याची खात्री असेल तर (वाचा माझा पहिला परिच्छेद).

इथे तावातावाने सल्ले देणारे कोणीही प्रॅक्टिकली वेळ आल्यावर मदतीला येणार नाहीयेत >>> हा टोन खटकला. लेखिकेने धागा सोसायटीच्या पेजवर काढलेला नाही. इथले लोक प्रत्यक्षात मदत करायला येणार नाहीत याची कल्पना लेखिकेला नाहीये का ?इथे सल्ले देणा-या सर्वांना वेड्यात काढण्याआधी हा विचार करायला हवा होता.

जे लोक चक्रमपणाची उत्तरे देतात त्यांना पाचपोच आहे का कसे वागायचे याचा ? तेच लोक मदत करणार आणि बाकीचे हातावर हात धरून बसणारे आहेत का ? अगदी आलीच वेळ तर वॉचमन असतात. ते करतील मदत. सल्ले देणा-यांना वेड्यात काढण्यासाठी अशा सबबी नकोत शोधायला.

लिहिणारा कोणत्या टोन मध्ये लिहितो या पेक्षा वाचणारा कोणत्या टोन मध्ये वाचतो यावर पोस्ट खटकणं न खटकणं अवलंबून आहे.हा लिखित माध्यमाचा दोष आहे. त्यापेक्षा जास्त यावर काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही.

मायबोली वर दिवसाला किमान 1 हजार लोकं तरी येत असतील आणि वाचत असतील, प्रत्येकाला स्वतःचं मत आणि सल्ले असणार आणि तो प्रत्येक जण देणार. मी माझं मत सांगितलं. 1000 सल्यांमधून एक सल्ला निवडताना त्याचे प्रोज आणि कॉन्स माहीत असले पाहिजेत. इथे जो सल्ला वारंवार दिला जातोय , जो मी स्वतः ही दिलाय, तो सिलेक्ट करताना काय रिऍलिटी आहे ते मी स्पष्ट आणि उघड शब्दात सांगितलं एवढंच. त्यांना त्याचं ज्ञान किंवा जाणीव नाही असं माझं म्हणणं नाही. त्यात मी अगदी ताजा अनुभव घेतल्यामुळे माझ्याकडून ते सांगितलं गेलं हे ही आहेच.

मी कोणाला वेड्यात काढते आहे असं वाटत असेल तर तो माझ्या लेखनाचा दोष आहे.

मायबोली वर दिवसाला किमान 1 हजार लोकं तरी येत असतील आणि वाचत असतील, प्रत्येकाला स्वतःचं मत आणि सल्ले असणार आणि तो प्रत्येक जण देणार. >>> त्या प्रत्येकाचा आदर ठेवून सल्ला देणे अगदीच अशक्य नाही. इथे तावातावाने लिहीणारे असा उल्लेख नसता तरी वाचणा-याला कळलेच नसते असा काही नियम नाही.

हो पण तुम्हाला मी कोणाचा तरी अनादर करतेय असं वाटतंय आणि माझं म्हणणं आहे की मी कोणाचाही अनादर करत नाहीये मी फक्त रिऍलिटी सांगितली तर तुम्ही माझ्या सांगण्याचा आदर करा की राव.

तुम्हाला एक शब्द 'खटकला' तो मला नाही खटकतेय so lets।move on?

तुम्हाला तो खटकावा ही अपेक्षाच नाही. लोक सारासार विचार करून काहीही सल्ले देतात असा तुमच्या प्रतिसादाचा सरळ सरळ अर्थ आहे.

कुणी इथे धागा काढतो तेव्हां इथे येणा-या सल्ल्याप्रमाणेच वागेल असे काही एक नसते. आपला होणारा कोंडमारा आणि त्याचा निचरा हाच हेतू जास्त करून असू शकतो. अशा वेळी त्याच्या भावनांशी सहमत होऊन "तावातावाने" दिलेले सल्ले हे त्या व्यक्तीला बरं वाटावं म्हणूनही दिलेले असू शकतात. आपल्या भावनांशी कुणीतरी सहमत आहेत एव्हढे सुद्धा पुरेसे असते. लगेच कुणी सल्ला अंमलात आणायला जात नसतं. शेवटी ज्याला तिथे रहायचंय तोच त्याप्रमाणे निर्णय घेत असतो. धागा काढणारा अजाण बालक आहे आणि इथले सल्ले वाचून काहीतरी अघटित होणार अशी भीती बाळगून सर्वांना वेड्यात काढणे हास्यास्पद आहे.

सोसायटीच्या वादात पोलीस हस्तक्षेप करत नाहीत.तुम्ही आपापसात मिटवा सांगतात.
>>>>>>>
आमच्या जुन्या बिल्डींगमध्ये जेव्हा रिपेअरींग रिनोवेशनचे काम लागलेले तेव्हा सेक्रेटरीने गफला केलेला म्हणून त्याला मारले होते.
तेव्हा आलेले पोलिस बिल्डींगमध्ये.

सांगायचा मुद्दा असा की गाडी कुठे लावायची या वादात पोलिस येणार नाहीत.
पण गाडी हलवायला नकार दिला तर जर धमकी देणे वा तसेच खेळून गाडीची काच फोडणे हा प्रकार झाला तर पोलिस पिक्चरमध्ये येऊच शकतात.

तेंव्हा इथे तावातावाने मिळालेल्या सल्लांवर विचार करून तसं करणार असाल तर तुम्हाला या लोकांची कधीच गरज पडणार नाहीये याबाबत शुअर व्हा आधी.
>>>>>>
याच्याशी सहमत आहे. तालाब मे रह के मगरमछ से बैर नही करते.
म्हणून मी माझ्या पोस्टमध्येही लिहिलेले की वैर करायची वेळ आलीच तर एका सेक्रेटरीशीच करा. तसेच शक्य झाल्यास आपलाही कंपू बनवा. म्हणजे सोशल व्हा. मिक्स व्हा सोसायटीमधील लोकांत. सोसायटी चाळीस कुटूंबांची असते. क्रिकेटच्या वादातून तुम्हाला चाळीस कुटूंब वाळीत टाकतील, मदतीला येणार नाहीत हे प्रॅक्टीकली शक्य नाही.

पण त्रास खरेच जास्त असेल तर मात्र थोडेफार वैर घेण्याची तयारीही हवीच.
म्हणजे उद्या बिल्डींगमधली टवाळ मुले आपल्या मुलीबाळींची छेड काढत असतील तर सोसायटीतील पोरांशी वैर नाही घ्यायचे म्हणून शांत तर बसू शकत नाही ना?
तर त्रास किती होतोय हे ज्याला होतोय त्याने स्वतःच ठरवावे. ईथल्या एखाद्या सल्याने कमीजास्त वैर होणारच, त्या त्रासातून सुटका व्हायला कितपत वैर घ्यायची तयारी आहे हे धागाकर्त्याने स्वतःच ठरवावे. देणारे सर्व प्रकारचे सल्ले देणारच. जसे काही लोकांनी त्यांच्यातच सामील व्हा असेही सल्ले दिलेत. पण सगळीकडेच लगे रहो मुन्नाभाई आणि गांधीगिरी चालत नाही हे देखील तितकेच खरे आहे.

आणि हो, वैर असे लगेच होत नाही. म्हणजे बरेचदा समोरच्यालाही माहीत असते की चूक त्याचीच आहे. फक्त आपण विरोध करत नाही तोपर्यंत तो फायदा ऊचलत असतो. एकदा तुम्ही विरोध केला तर तो मागे हटतो. फक्त इन्सल्ट करणे वा समोरच्याचा ईगो दुखावणे शक्य तितके टाळले की काही टोकाचे वैर होत नाही.

आमच्या जुन्या चाळीत तर लोकं कचाकचा अर्वाच्य शिव्या देत भांडायचे एकमेकांशी, रक्त काढण्यापर्यंत मारामार्‍या व्हायच्या, पुरुष तर पुरुष, बायकाही एकमेकींना नडायच्या, पण तश्याच एमर्जन्सीला त्यांच्यात वाद शून्य होऊन एकमेकांना मदत केली जायची. फ्लॅट संस्कृतीचे मात्र फार अनुभव गाठीशी जमा झाले नाहीत अजून.

अरे भांडू नका लोक्स . माझ्यामुळे माबोकर भांडले तर मलाच वाईट वाटेल. रीया तुम्ही म्हणताय ते पटतंय शेवटी आपल्याला इथेच रहायचे आहे याचा विचार करूनच या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते आतापर्यंत. दुर्लक्ष म्हणजे अधूनमधून आमची सोय करून द्या एवढं सांगण्या इतपतच होते.
आणि पहील्या पासून आमचे सगळ्यांशी चांगलेच संबंध आहेत . नवरा तर मिळून मिसळून वागणारा आणि माझ्या हून जरा जास्तच सोशल होणारा आहे. सध्या फार मिसळणं होत नाही पण आमचे कोणाशी कसलेच भांडण नाही. नवीन नवीन तर नवरा सुध्दा जात होता कधी कधी खेळायला. पण हळूहळू ते कामाच्या व्यापात कमी होत गेले आणि आता बंदच झाले.
असो. तर सध्या तरी काही झालं तरी गाडी हलवायची नाही हे धोरण ठेवले आहे. आणि नंतर सामोपचाराने तोडगा नाही निघाला तर सरळ आमची शेड बांधून टाकण्याचा विचार आहे. मग बसू देत बोंबलत.
तुम्ही सगळ्यांनी सल्ले दिलेत त्यासाठी धन्यवाद सर्वांना Happy .

म्हणून मी माझ्या पोस्टमध्येही लिहिलेले की वैर करायची वेळ आलीच तर एका सेक्रेटरीशीच करा. तसेच शक्य झाल्यास आपलाही कंपू बनवा. म्हणजे सोशल व्हा. मिक्स व्हा सोसायटीमधील लोकांत. सोसायटी चाळीस कुटूंबांची असते. क्रिकेटच्या वादातून तुम्हाला चाळीस कुटूंब वाळीत टाकतील, मदतीला येणार नाहीत हे प्रॅक्टीकली शक्य नाही. >>>>> हो ऋन्मेष तोच विचार आहे .

मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडल वर लोक लॉकडाउनचे नियम मोडत क्रिकेट खेळत असल्याच्या फोटोसकट तक्रारी येत असतात..
हे शक्य आहे का ?

मग अशावेळी पोलिस करतायेत का मध्यस्थी? वर काहींनी लिहीलेय नाही करत असे. कनफ्यूज आहे. आणि हे सोसायटीच्या आवारातच खेळताय बाहेर नाही सो काय होणार?

आणि हे सोसायटीच्या आवारातच खेळताय बाहेर नाही सो काय होणार?
>>>>>
आमच्या सोसायटीतही लहान मुले खेळत आहेतच, आपली सोसायटी आपली जबाबदारी. त्यामुळे निव्वळ लॉकडाऊनच्या मुद्द्यावर पोलिस हस्तक्षेप फारसे करणार नाहीत. केले तरी कुठेकुठे करत फिरणार... आणि तुमच्या केसमध्ये केले तरी ते लॉकडाऊनपुरता तात्पुरता ईलाज होईल.

अरे भांडू नका लोक्स >> छे हो, माबो म्हटले की एवढे चालायचेच. लोकं पेटतील तेव्हाच आणखी चांगले मुद्दे चर्चेत येतील आणि सर्व अनुषंगाने चौफेर चर्चा घडेल. ईथे धाग्याचा फायदा सर्वांनाच होतो. मी सुद्धा नवीन घर नवीन सोसायटीत राहायला गेल्याने मलाही चार गोष्टी कळतील म्हणून वाचतोय.

च्रप्स - योग्य सल्ला. धागाकर्तीला जी उत्तर मिळाली आहेत ती पाहता या लोकांची संबंध ठेवण्याची लायकी नाही
>>धन्यवाद लेडीकिलर...

नवीन नवीन तर नवरा सुध्दा जात होता कधी कधी खेळायला. पण हळूहळू ते कामाच्या व्यापात कमी होत गेले आणि आता बंदच झाले.
>>>हे तुम्ही आधी का नाही लिहिले... म्हणजे तुम्हाला चार वर्षांपासून त्रास चिडचिड नाहीय, कामाच्या व्यापात तुमचा नवरा आता खेळायला जाऊ शकत नाही तेंव्हापासून आहे...
आता मी खेळायला येत नाही ना, तुम्हालापन खेळू देणार नाही असा मेसेज सरळ सरळ दिसत आहे...

तुम्ही पुढे लिहिले आहे की शेड बांधायचे ठरवले आहे पार्किंग मध्ये... शेड वगैरे बांधणे उपाय आहे का खरच? आणि हा उपाय ठरवला होता तर मग इकडे कशाला वाचकांना त्रास...

तुमच्या समस्येवर कोणाशी वाकडं न येता तोडगा मिळावा याकरता शुभेच्छा.
च्र्प्स, वाचकांना यात कसला त्रास झाला? ते सुरुवातीला खेळायला गेले. नंतर बंद झाले असं लिहिलंय. तरीही त्यांनी गाडी बाजुला केलीच. पण थांबत नाहीत म्हणुन त्रास होतोय असं लिहिले आहे की.

नवरा जर पूर्वी १-२ वर्षे खेळायला जात होता तर आता परत खेळायला गेल्यावर आडून आडून सुचवू शकतो काय त्रास होतो ते. कदाचित खेळण्याच्या मूड मध्ये या प्रश्नाचे कायम स्वरुपी उत्तर पण मिळून जाईल. बिल्डिंग मध्ये राहतो म्हणजे हा सहनिवास आहे आणि येथे काही त्रास होत असेल तर सोसायटीच्या वार्षिक सभेत हा मुद्दा मांडू शकता.

कोरोना मुळे खेळणे तर बंद झाले पाहिजे कारण त्यात प्रसार होण्याचा खूप धोका आहे. पालिकेला / पोलिसाना कळवले तर संबंधित यंत्रणा येऊन सेक्रेटरी/ अध्यक्षाला समज देऊ शकतात.

ओपन पार्किंग बिल्डर कडून घेतलेले आहे का? ओपन पार्किंगला शेड टाकणे लीगल आहे का? सोसायटी कदाचित हे मंजूर करणार नाही. पालिकेची परवानगी देखील लागेल, कोणी तक्रार केली तर शेड चा खर्च वाया जाईल आणि त्रास अजून वाढेल.

Pages