सोसायटीच्या प्रश्नात मदत हवी आहे

Submitted by एक-माबोकर on 11 April, 2021 - 07:59

नमस्कार. मी आणि माझे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून सोसायटीतील काही लोकांच्या वागणूकीमुळे त्रस्त आहोत.
समस्या अशी आहे की दर रविवारी ऑलमोस्ट दर रविवारी हे लोक खाली सोसायटीच्या ओपन पार्किंग भागात क्रिकेट खेळतात. आमच्या वाट्याला आलेले पार्किंग तिथेच आहे आणि त्यामुळे सारखं कोणीतरी वॉचमन ला पाठवून आम्हाला गाडी काढा म्हणून सांगायला येतात . सुरवातीला आम्ही सहकार्य केले काही दिवस आणि नवरा जाऊन दुसरीकडे तेवढ्यापूरते गाडी लावून यायचा. पण आता चार वर्षे झाली जवळपास इथे येऊन तीच कटकट अजूनही सुरूच आहे. आता काही दिवस कोरोनामुळे जरा काळजी घ्यावी म्हणून त्याना सध्या खेळु नका असे शांतपणे चांगल्या भाषेत सांगितले होते. पण काहीही फरक नाहीये.

या गोष्टीवरून आता वाद व्हायची वेळ आलीये. इतर काहीजण सुध्दा त्या लोकांना बोलले मागे की सध्या खेळु नका पण त्याउपर कोणी काही बोलत नाही . आणि याचं कारण म्हणजे सोसायटीचा सेक्रेटरी स्वत: त्यांना सामील आहे. त्याला कोणीही काहीही बोलत नाही उलट त्याचा सोबत खेळतात. हे वागणं म्हणजे मिळालेल्या पोझिशनचा गैरवापर करणे नाही का? आम्ही यांच्या पार्किंग मध्ये गाडी लावतो मग असे म्हटले तर तेही चालत नाही. काय करावे अशा लोकांना कसे समजवावे? स्वत:च्या च पार्किंग मध्ये गाडी लावणे गुन्हा आहे का? काय कायमस्वरूपी तोडगा काढावा यावर जेणेकरून ते लोक पुन्हा असे वागणार नाहीत. कृपया जेन्यूईन समस्या आहे, जेन्यूईन मदत हवीये. मी नियमित माबोकर आहे तेव्हा आताच स्पष्ट करते की हा जरी डुआयडी असला तरी धागा टीपी म्हणून काढलेला नाही. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

क्रिकेट हा मोठ्या मैदानात खेळण्याचा खेळ आहे.
लहान जागी लोकांना त्यांच्या गाड्या हलवून खेळण्यापेक्षा
तिथे कबड्डी खेळावी. म्हणजे कुणाला गाड्या हलवाव्या लागणार नाहीत.

क्रिकेट हा मोठ्या मैदानात खेळण्याचा खेळ आहे
>> हे माहीत नव्हते.. आम्ही लहानपणापासून मैदान सोडून सगळीकडे खेळत आलोय मुंबईत...

हे माहीत नव्हते.. आम्ही लहानपणापासून मैदान सोडून सगळीकडे खेळत आलोय मुंबईत...
>>>
यावर एक धागा झाला पाहिजे
अख्खे बालपण तरळले डोळ्यासमोर या एका वाक्याने. मला तर आज रात्रीच जागून एक लेख टाकावासा वाटतोय Happy

आम्ही लहानपणापासून मैदान सोडून सगळीकडे खेळत आलोय मुंबईत. >>> तो खेळ वेगळा. आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड कात्री लावते त्याला.

आम्ही जिन्यापुढच्या जागेत संडासाच्या दाराचा स्टंप करून खेळलोय चाळीत. आत कोणी बसला असेल तर लई कावायचा.

अरे मग तर तुम्ही उद्या आमचा फ्लॅट पण मागाल असे उत्तर मिळाले >>>
तुम्ही आज गाडी काढायला सांगताय, उद्या आमचा फ्लॅट पण पाडायला सांगाल असे तुम्ही टोलवा त्यांना.

च्र्प्स, वाचकांना यात कसला त्रास झाला? ते सुरुवातीला खेळायला गेले. नंतर बंद झाले असं लिहिलंय. >>> असं कुठे लिहीलंय त्यांनी ? हा धागा दोनदा प्रकाशित झालेला आहे. दुस-याआ धाग्यावर एकच प्रतिसाद आहे. तो वाचून सांगा बरं.

च्रप्स यांच्याशी पुन्हा एकदा सहमत आहे.

आणि पहील्या पासून आमचे सगळ्यांशी चांगलेच संबंध आहेत . नवरा तर मिळून मिसळून वागणारा आणि माझ्या हून जरा जास्तच सोशल होणारा आहे. सध्या फार मिसळणं होत नाही पण आमचे कोणाशी कसलेच भांडण नाही. नवीन नवीन तर नवरा सुध्दा जात होता कधी कधी खेळायला. पण हळूहळू ते कामाच्या व्यापात कमी होत गेले आणि आता बंदच झाले.

तर कदाचित समस्येबद्दल वेगळा दृष्टीकोण झाला असता. हे सुरूवातीला न लिहील्याने त्या लोकांचा राग आला. पण आत्ता वाचल्यानंतर यांची एकमेकांशी चांगली मैत्री आहे, एकत्रच खेळतात त्यामुळे ते हक्काने गाडी हलवायला सांगतात असा आता समज होतोय. सुरूवातीला आपणच सवय लावली आता त्रास होतोय असे समस्येचे स्वरूप आहे हे पहिल्यांदा स्पष्ट झाले नव्हते.

असं कुठे लिहीलंय त्यांनी ? हा धागा दोनदा प्रकाशित झालेला आहे. दुस-याआ धाग्यावर एकच प्रतिसाद आहे. तो वाचून सांगा बरं.
>>> +1

तुम्हाला क्रिकेट येत नसेल तर एक बेष्ट आयडिया सांगतो. ज्याचं पार्किंग त्याची पहिली बॅटिंग आणि दहा बॉलिंग ओव्हर्स असा नियम काढा. बॅटिंगला थोडं जीवावर उदार होऊन उभं राहायची तयारी ठेवा, पण मी लिंबुटीम्बु असल्यामुळे सरपटी बॉलिंगच टाकावी अशी सूचना द्या. स्टंप समोरून हलू नका, रन्स नाही काढल्या तरी चालेल. नंतर तुमची बॉलिंग आली की खुशाल सरपटी, वाईड बॉल, नो बॉल टाका. खेळ जितका रटाळ करता येईल तितका करा. फिल्डिंगची वेळ आली तर घरी जाऊन पाणी पिऊन या. नवऱ्याला अंपायर करा व चुकीचे आउट द्यायला लावा.

ओपन पार्किंग बिल्डर कडून घेतलेले आहे का? ओपन पार्किंगला शेड टाकणे लीगल आहे का? सोसायटी कदाचित हे मंजूर करणार नाही. पालिकेची परवानगी देखील लागेल, कोणी तक्रार केली तर शेड चा खर्च वाया जाईल आणि त्रास अजून वाढेल. >>>> हो नरेन ते सगळे पार्किंग बिल्डरने दिलेलेच आहेत लीगली आणि प्रत्येक पार्किंग पुढे तो तो फ्लॅट नं. ही आहे. आणि शेड टाकणे का लीगल नसावे आपल्याच पार्किंग वर ? या प्रश्नाचा रोख मला कळला नाही. आणि तो ऑप्शन जर काहीच करुन त्या लोकांनी आमचा प्रश्न सोडवला नाही तरचा आहे. एवढे दिवस त्यांच्या मनासारखे होतेय आता आमच्या मनासारखे होईल हीच भावना झालीये आता.

च्रप्स, माझा नवराही खेळत होता हे सांगण्याचा हेतू हाच आहे की आम्ही काही खडूस , कोणातही न मिसळणारे आणि उगाच आडमुठेपणाने कधीच वागलो नाही आणि त्यांच्या कलाने घेतलेय. नवरा जात होता हे फार सुरवातीच्या काळातील आहे आणि हे लोक कायम असंच चालू ठेवणार याची त्यावेळी कल्पना आली नाही. पण कस आहे ना ऊस गोड लागला की लोक मुळासकट उपटून काढू बघता आणि आमचा प्रश्न सोडवा म्हणले की निर्लज्ज उत्तरे देता हे बघून आता जशास तसे वागायचे हे वाटणे मला अजिबात चुकीचे वाटत नाही. आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय आणि त्या संदर्भात मदत किंवा मतं जाणावी म्हणून हा धागा काढलाय. जर आम्हाला त्यांना खेळूच द्यायचं नसतं तर एवढे दिवस गप्प बसलो नसतो.
आणि हा धागा पहील्यांदाच काढलाय मी सो चुका होऊ शकतात. चुकून आधी वाहते पान हेडींग अंडर काढला गेला जो बहुतेक दिसत नव्हता . तो उडवावा कसा हे माहीत नव्हते. Admin तुम्ही तो उडवू शकता.

आणि च्रप्स धागा न उघडण्याचा पर्याय तुमच्यासमोर असतोच सो तुम्हाला अथवा इतर कोणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही.

एक - माबोकर तुम्ही माझ्या लिखाणाचा विपर्यास करून च्रप्स यांना उत्तरे देताय. खरे तर प्रश्न सुनिधी यांना होता. त्या संदर्भातले प्रतिसाद आहेत ते. पुन्हा वाचून बघा. दोन धागे उडवण्याबद्दल आक्षेप कुठून दिसला ? असेच काहीसे होतेय का सोसायटीत ? दुसरी बाजू समजणे गरजेचे आहे.

अहो मी फक्त त्यांच्या प्रतिसादाला उत्तर दिलंय आणि ते दोन धाग्यांची गडबड झाली असे लिहीलेय. तुमच्या लिखाणाचा विपर्यास कुठे केलाय Uhoh

आधी त्यांचा प्रश्न काय होता, त्याला उत्तरे काय दिलीत हे जमल्यास समजून घ्या.
चेअरमनने तुम्हाला तसे का उत्तर दिले असावे याची दुसरी बाजू जाणून घेणेही आता गरजेचे झाले आहे.

म्हणजे आता मायबोली कोर्ट एक-माबोकर यांची ट्रायल घेणार का? >>>> असा अर्थ निघतो का ? तुम्हीही ते प्रतिसाद पुन्हा वाचा. म्हणजे कोर्ट ट्रायल साठी म्हटलेय कि कसे हे समजेल. संत्र सोलावं लागणार नाही ही अपेक्षा आहे.

चेअरमनने तुम्हाला तसे का उत्तर दिले असावे याची दुसरी बाजू जाणून घेणेही आता गरजेचे झाले आहे. >>>>> ओके. खुशाल जाणून घ्या. आणि नेक्स्ट टाईम पासून त्यांना तुमच्या पार्किंग मध्ये कायमस्वरूपी खेळायचे निमंत्रणही द्या. माझी मेली कशाला हरकत? Lol

मानव तुमचा युक्तीवाद माझ्या आकलनाबाहेरचा आहे . सुरूवातीला त्यांची बाजू खरी गृहीत धरून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल सर्वांनी लिहीले होते. तेव्हां ती कुठली ट्रायल होती ?
आता त्या ज्या पद्धतीने विपर्यास करत आहेत त्यामुळे ही त्यांची एकच बाजू झाली, जी एकतर्फी असू शकते हे लक्षात आले आहे. यात ट्रायल चालवायचा कुठून संबंध आला ? त्यांचीही बाजू समजून घेतली पाहीजे म्हणजे लगेचच मायबोलीकडून सोसायटीत एक वकील पाठवला जाईल असे का वाटले ?

एक माबोकर, मला वाटते आपल्याला उत्तर देणे थांबवावे यातच जगाचे होत आहे. सर्व प्रकार ध्यानात आलेला आहे.
कुणीही अचानक अशा पद्धतीने विचित्र उत्तर देत नाही, तरीही तुमच्यावर विश्वास ठेवून बीपी वाढवून घेतल्याबद्दल स्वतःचाच निषेध ! ( चेअरमनची बाजू घेतली असा याचा अर्थ काढायला तुम्ही खुशाल मोकळ्या आहात तसेच तुमच्या सोसायटीने माझी नेमणूक केली असाही अर्थ काढल्यास माझी काही एक हरकत नसावी. तसेही अर्थ काढण्यात तुमचा हात कुणी धरू शकेल असे वाटत नाही. प्रचंड आदर आहे या कौशल्या बद्दल ).

चेअरमनने तुम्हाला तसे का उत्तर दिले असावे >>> कारण तो आता स्वत:ला सोसायटीचा मालक समजायला लागलाय आणि त्याला त्याची चूक दाखवून देणे गरजेचे आहे.
जाउ देत आता नारी मारीतो, मला कळलेय तुम्हाला वर काय म्हणायचे होते ते. पण तुम्ही उगच रागावला‌. Donno y

पण तुम्ही उगच रागावला >>> पुन्हा एकदा समोरच्यावर आरोप. पुन्हा एकदा सांगतोय, उत्तर सुनिधी यांना होते. त्यामुळे तिथून वाचणे अपेक्षित होते. आता जे कळलेय ते आधीच कळाले असते तर ज्यांनी तुमची बाजू घेतली त्यांनाच तुम्ही दुखावले नसते. मी दुखावलो जाण्याचा प्रश्नच नाही कारन आपण दोघेही ड्युआयडी आहोत. Lol

नारी मारितो, माझी पोस्ट तुमच्या पोस्टवरून असली तरी तो प्रश्न तुम्हाला एकट्याला उद्देशून नाही.

दुसरी बाजू जाणून घ्यायचीय. आता ते चेअरमन आणि खेळणारे तर मायबोलीवर नाहीत. म्हणजे त्यांची बाजू आपल्याला एक-माबोकर यांच्या मार्फतच कळणार.

मग मायबोली कोर्ट-"सगळे मायबोलीकर" - "एक-मायबोलीकर"ची ट्रायल घेणार का?.

ह्युमरसली घ्या.

नारी मारितो, मी दुसरा धागा पाहिला नव्हता. च्रप्स त्याबद्दल लिहितात ते ही कळले नाही. जाऊदे. एकमाबोकरांना मार्ग सापडलाय म्हणजे काय करायचे ते त्यांनी ठरवले आहे. त्यांना शुभेच्छा.

गाडी खेळणार्‍या एखाद्याच्या पार्किंग मधे लावा न खुशाल बाहेर निघुन जा, एकदम रात्री किंवा एक - दोन दिवसानी या. (त्यांची गाडी नेहमी तिथे असते पण रविवारी नाहिये हे बघुन) असे २-३ वेळा झाले की कळेल

सुनिधी.. कोणता दुसरा धागा? दोन्ही धाग्यात तसा उल्लेख नाही जो फक्त तुम्हाला आणि लेखिकेला माहीत होता..

दुसरी बाजू जाणून घ्यायचीय. आता ते चेअरमन आणि खेळणारे तर मायबोलीवर नाहीत. म्हणजे त्यांची बाजू आपल्याला एक-माबोकर यांच्या मार्फतच कळणार.
>>> एक्साक्टली.. जशी पण असेल कळली पाहिजे योग्य सल्ला द्यायला.. कोतबो मध्ये धागा आहे तर वाचक प्रश्न विचारणारच...

सोसायटीचा सेक्रेटरी हे इतकं मोठं, महत्वाचं आणि न्युसन्स व्हॅल्यू असणारं पद असतं हे पहिल्यांदाच कळलं (खरंच, खोचकपणे नाही लिहीलं हे). आमच्या सोसायटीत सहसा सगळ्या अनुभवी लोकांनी नाकारलेली, एखाद्या त्यातल्या त्यात अननुभवी / उत्साही माणसाच्या गळ्यात मारून त्याला काकुळतीला आणलेलं पद होतं हे.

Pages