.... फार छान चव आहे ह्याची पण माझ्या आईसारखे नाही जमले... जगाच्या पाठीवर कुठेही हे वाक्य ऐकायला मिळू शकते. प्रत्येकाला आपल्या आईच्या हातची सर आणि चव जगात दुसऱ्या कुणाच्याही हाताला नाही असे हमखास वाटत असते. 'आईच्या हातचे जेवण' हळवा कोपरा असतो खरा. घर-नोकरी-करियर सांभाळून आपल्या मुलामुलींना उत्तम पदार्थ रांधून खिलवण्यासाठी भरपूर कष्ट उपासणाऱ्या, त्यांची हौस पुरवणाऱ्या आयाही सर्वत्र मुबलक दिसतात. रोज नाही जमले तरी बहुतेक कुटुंबात वाढदिवस / विशेष सिलेब्रेशन असले की 'आईच्या हातची' अशी एखादी खास डिश असतेच आणि कितीही धामधुमीत असल्या तरी तो पदार्थ करून सेलेब्रेशनला 'चार चांद' लावणाऱ्या आया (आईचे अनेकवचन हो) सगळीकडेच ! तीच तऱ्हा माहेरवाशिणी मुलींसाठी, दूरवर स्थायिक मुला-मुलींसाठी काय करू नी काय नको असे होणाऱ्या आयांची.
हे सगळे ठीक, आईचे काय? जुन्या काळी स्रियांच्या आवडीला फारसे महत्व नव्हते, मोठ्या कुटुंबात सगळे पुरुष आणि लहान मुले जेवली की शेवटच्या पंगतीत जे उरले ते खाणाऱ्या आज्या-आत्या-मावश्या-आया हे सामान्य चित्र. आता ते नक्की बदलले आहे. स्वयंपाकघरही एकट्या स्त्रीचीच जबाबदारी असे राहिले नाही. छोट्या कुटुंबामुळे, सुलभ मदतनीसांमुळे घरातील सर्वांच्याच आवडीनिवडीकडे लक्ष देणें शक्य आहे.पण तरीही आईला काय आवडते हा विषय तसा दुर्लक्षितच आहे.
तर मंडळी, 'आईला काय आवडते' यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
आईला काय आवडते? तिच्यासाठी तुम्ही खास कोणते पदार्थ करता किंवा करावेसे वाटतात? की तिच्या खाण्यापिण्याच्या आवडीकडे कधी फारसे लक्षच गेले नाही ? खूप दिवसांनी आईला भेटल्यावर तिच्यासाठी स्वहस्ते खास तिच्या आवडीचे काय कराल ?
@ मनीमोहोर,
@ मनीमोहोर,
... तरुण मुला मुलींनो, आईच्या आवडी निवडी लक्षात घ्या आणि तिला आवडणाऱ्या गोष्टी देऊन तिला आनन्द द्या आणि तुम्ही ही आनंदित व्हा....
मर्म सांगितले तुम्ही धाग्याचे !
मी नुकतेच वाचले आणि मला फार पटले - The things said at funerals better be said at birthday parties instead. We leave so much love unspoken !
माझी आई पाचवी शिकलेली। तिला
माझी आई पाचवी शिकलेली। तिला रेडिओ वरील गाणी ऐकायला खूप आवडायची। खूपच कष्टकरी होती । पहाटे उठल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत काम करत राहायची। तिला सोबत करायचा तो रेडिओ। लहान होतो तेव्हा तिचे हे कष्ट कधीच लक्षात आले नाहीत कारण तिने आम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी आग्रह नाही धरला। आम्ही चार भावंडे (दोन बहिणी दोन भाऊ ) आपण कमी शिकलो पण आपल्या मुलांनी खूप शिकावे म्हणून तिने आम्ही काम करावे अशी कधी अपेक्षाच ठेवली नाही। बटाटे वडे आणि व्हेज चायनीज सूप तिला फार आवडायचे। तिचा स्वभाव खूप करारी आणि मानी होता। तरुण होती तेव्हा वडिलांच्या हेकेखोर स्वभावामुळे तिला स्वतःसाठी काहीच करता आले नाही। सतत पाहुण्यांची / नातेवाईकांची उठबस। १० X १२ च्या चाळीच्या वडिलांच्या गव्हर्मेंट तर्फे दिलेल्या क्वार्टर्स मध्ये राहून तिने कधीच कुठल्याही गोष्टीची खटखट केली न्हवती। पण एवढं करूनही तीच कोणी मन दुखावलं तर ती त्या व्यक्तीशी कर्तव्य म्हणून तेवढयापुरतच वागे । तिच्या मनातून ती व्यक्ती कधीच उतरली असे। आईचा हा स्वभाव माझ्यात उतरला आहे व मलाही रेडिओ फार आवडतो। ती आता या जगात नाही पण असा कुठलाही दिवस जात नाही कि तिची आठवण येत नाही .
@ mi_anu,
@ mi_anu
ऑ ग्रॅतीन आणि मिरची ठेचा ….. वाइड रेंज:-)
@ जाई.
आंबे आणि व्हिक्टोरियन डेकोर…. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस !
माझ्या आइला काय आवडते हे एक
माझ्या आइला काय आवडते हे एक कोडच आहे तिला लोकाना खायला घालायला आवडते, आमच्याकडे कधिही कुणी आल तरी किमान चहा -पोहे तरी खावुनच जात, येणारी व्यक्ती अगदी घाइत असली तरी पाच मिनिटात आई चिवडा,लाडु,वडी,एखाद फळ, खाकरा अस काहितरी डीश मधे घालुन देतेच.परिस्थिती सामान्य होती तेव्हाही घरात किमान पोहे,दुध्,रवा ,साखर असेल हे आई नेहमी पाहायची.
आपल्या माणसासाठि स्वत:ला अॅव्हेलेबल ठेवायला आवडते त्याचे असख्य तोटेही असतात पण ते जावुच दे! खुपदा लाबचे नातेवाईक, भावाचे मित्र, वहिनीच्या ओळखितलेही काही कारणाने येवुन हक्काने राहतात.
तिला आवडणार म्हणजे ब्रेड आणी बटर, गरम ताजा ब्रेड आणी त्याला बटर लावुन किवा वेगवेगळे सॅन्डविच हे प्रकार आईला फार आवडतात.मागे आली तेव्हा मग इथे मिळणारे फोकाशिया,गार्लिक ब्रेड, फ्रेच बगेट,सावर डो असे अनेक प्रकार खावु घातले तिला.
बाकी तिला माझ्या हातची सुरळीची वडी,पावभाजी,आलु पराठे ,डोसे अस आवडत.
पुरणपोळी मात्र मला कितिही प्रयत्न करुन तिच्यासारखी जमत नाहि तिच्या म्हणजे ओठानी खाव्या इतक्या नाजुक तलम असतात.
साबानाही माझ्या हातचे डोसे आणि तव्यावरुन थेट पानात पोळी हे फार आवडायच.
@ प्राजक्ता,
@ प्राजक्ता,
तुमच्या आईप्रमाणे अशी नातीगोती सांभाळणे कठीण आहे, थोडे दुर्मिळ होत आहे.
फोकाशिया ? वाहवा !
@ Ajnabi
मनमोकळे शेयरिंग आवडले.
प्रतिसादांमध्ये एक विशेष
प्रतिसादांमध्ये एक विशेष जाणवले की 'ए' आणि 'अहो' आई अनेकांच्या आठवणीत सहजतेने एकत्रच डोकावल्या आहेत.
दुसरे म्हणजे गाणी ऐकत/गुणगुणत स्वयंपाक करण्याचा सुंदर पायंडा आदल्या पिढीतल्या अनेक आईमंडळींनी घालून दिलेला दिसतो आहे.
मनीमोहर +१.
मनीमोहर +१.
मदर्स डे - मातृदिना निमित्त
मदर्स डे / मातृदिना निमित्त धागा वर काढत आहे.
आईला फिश करायला आणि मला खाऊ
आईला फिश करायला आणि मला खाऊ घालायला आवडते.
मी ते जास्तीत जास्त खाऊन तिला हा आनंद द्यायचा प्रयत्न करतो.
माझ्या पोरांना म्हणजे तिच्या नातवंडांनाही हेच करायला लावतो. फिश असेल तर चॉकलेटचा खुराक थांबवून ते जास्तीत जास्त जेवतील कसे हे बघतो. कारण आता माझ्या खाण्यापेक्षा त्यांनी खाल्लेले आईला जास्त आवडते
आज आता हा विकेंड आईसोबत असल्याने हेच करतोय ..
वर प्रज्ञा९ म्हणतात तसे केलेत
वर प्रज्ञा९ म्हणतात तसे केलेत तर ?
आईच्या हातचं" हे स्पेशल असतंच, पण जे पदार्थ फक्त आईच मस्त करते ते मुद्दाम शिकून तिला करून खाऊ घातले तर ती मनापासून खूष होईल. निदान एक तरी पदार्थ !
हा धागा मस्त आहे.
हा धागा मस्त आहे.
आईला garlic bread, soup, salads, guacamole, Mexican bowl, ट्रेसे leeche केक, फलाफल असे अनेक पदार्थ इकडे ओळख करून दिले आणि तिला ते अतिशय आवडले आणि आवडतात.
आधी तीच सगळं छान बनवून द्यायची.
… garlic bread, soup, salads,
… garlic bread, soup, salads, guacamole, Mexican bowl, ट्रेसे leeche केक, फलाफल…..
झकास यादी !
आज मे महिन्याचा दुसरा रविवार
आज मे महिन्याचा दुसरा रविवार अर्थात् मातृदिवस / मदर्स डे ! त्यानिमित्ताने धागा वर काढत आहे.
ज्यांनी आईच्या खाण्यापिण्याच्या आवडी समजून घेतल्या आहेत आणि त्या जपल्या आहेत त्यांचे अभिनंदन, कौतुक. इतरांना इथली चर्चा प्रेरणा देईल ही आशा
सर्व मातांना शुभेच्छा !
सर्व मातांना शुभेच्छा !
आधी हा धागा वाचला नव्हता..
आधी हा धागा वाचला नव्हता.. माझ्या आईला बासुंदी आवडायची, पण मला नाही ..क्वचित घरी सणावाराला आणायचो..
कॉलेज, नोकरी ह्या तंद्रीत होतो की तिला एकटं घेउन फिरायचे, खाउ पिउचे लाड अजिबात केले नाहीत ह्याच आता फार वाइट वाटतं ..
कालच लापता लेडीज बघितला त्यात्ला डायलॉग आहे ना की सगळ्यांच्या आवडीनिवडी बघ्ता मला काय आवडत हेच विसरुन गेलेय ..हे ऑल्मोस्ट सगळ्या आयांच्या बाबतीत खरं असणारं !
मनिमोहोर >> +१
छान धागा. अमेरिकेत मातृदिन
अमेरिकेत मातृदिन जोरात साजरा करण्यात येतो. काल आमच्या घराजवळच्या दुकानात तऱ्हेतऱ्हेच्या pie , चॉकलेट कव्हर्ड स्ट्रॉबेरीज, भरपूर फुगे आणि पुष्पगुच्छांची आरास मांडली होती.
सर्व माबोकर मैत्रिणींना मातृदिनाच्या शुभेच्छा..!

१.
२.

३.
(No subject)
अहाहा सुंदर फोटो, flowers,
अहाहा सुंदर फोटो, flowers, greeting card नी सजला धागा. हार्ट हार्ट !
… मला काय आवडतं हेच विसरुन गेलेय ..हे ऑल्मोस्ट सगळ्या आयांच्या बाबतीत खरं….
नाही नाही, असे होवू देणार नाही आपण. Let’s work on it and change it - wherever whenever however possible.
माबोच्या सर्व मैत्रिणींना Happy Mother’s Day !
2021 मध्ये मी इथे लिहिलं
2021 मध्ये मी इथे लिहिलं तेव्हा आई बाबा दोघेही होते, 2022 जुलै आई देवाघरी गेली, जून 2023 मध्ये बाबा.
हा धागा परत वाचताना दोघांची उणीव जाणवते.
मातृदिन शुभेच्छा.
फुलांचे फोटो आणि ग्रीटिंग दोन्ही सुरेख.
थँक्यू, अनिंद्य!
तुमचे हैदराबादी जोक्स ही एक छान गिफ्ट असते माझ्यासाठी.
आणि स्नानांतर सारखे लेख पण.
अमांची डॉली भूभू दिसते
अमांची डॉली भूभू दिसते कार्डावरती.
अस्मिता फोटो आवडले.
मी काही विसरले बिसरले नाही
अमा भूभू आवडला. अस्मिता फुलांचे फोटो आवडले. मातृदिनाच्या बिलेटेड शुभेच्छा सर्वांना....
मी काही विसरले बिसरले नाही मला काय आवडतं ते.
मागे कुठे तरी वाचल्यावर लक्षात आले होते कि आपण आईच्या खाण्याच्या आवडी निवडी जाणून घेत नाही तेव्हापासून आईच्या आवडीचे पदार्थ आठवणीने करते. तशी तिला खाण्याबाबत एकंदर आवड नाहीच, वाचायला मात्र आवडते. त्यामुळे लायब्ररी लावून दिली आहे, तिला आवडणारे दिवाळी अंक खास तिच्यासाठी घेतले जातात. पुस्तके सगळ्यांसाठी घेतली जातातच.
साबांना आवडणारे पदार्थ आवर्जून खाऊ घालते.
भारतात मदर्स डे च्या शुभेच्छा द्यायला सुरुवात झाली तेव्हा कधीतरी आई व साबांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या तर 'ही काय नवीन फॅडं' यावर दोघींचे एकमत झाले होते. त्यामुळे सेलिब्रेशन वगैरे करत नाही.
हे काल मला मिळालेले कार्ड.
Pages