व्यक्तिमत्व विकास कसा करावा ?

Submitted by प्रचिती on 9 March, 2021 - 06:39

माझा प्रॉब्लेम असा आहे कि माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल्स,बारगेन/ डिबेट स्किल्स अजिबात नाहीत. निर्णय घेता येत नाहीत. आपला मुद्दा पटवता येत नाही. राग आला कि डोळ्यात पाणी येते, त्या भितीमुळे मिटिंग मध्ये बोलूच शकत नाही. कमालीची इन्ट्रोव्हर्ट आहे. विचारांची क्लेरिटी नाही. मुळात स्वतःला काय हवे आहे तेच कळत नाही. सतत समोरचा काय विचार करेल हाच विचार/भिती असते.
माझे मराठी, इंग्लिश वाचन प्रचन्ड होते पूर्वी. शिक्षण सुरु होते तोपर्यंत हुशार (?)समजले जात होते. पण बोलायला गेले कि घोडे पेंड खाते. कारण काय बोलायचे हेच मुळात कळत नाही. या अवगुणांवर मात करून personality कशी डेव्हलोप करता येईल ते सांगा.

सध्याच्या नोकरीत मॅनेजर म्हणून बढती मिळाली पण सतत मनात आपण या पदाला लायक नाही असे वाटत असते. नोकरीत ग्रोथला वाव नाही.उलट इथल्या वर्क कल्चरमुळे अधोगतीच झाली आहे. १५ वर्षे अनुभवाला बाहेर प्रोजेक्ट मॅनेजर शिवाय पर्याय मिळत नाहीत. कृपया कुठला जॉब प्रोफाइल योग्य असेल ते पण सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकीचे अनूभवाने लिहीतीलच. पण प्रथम तुम्ही तुमच्या मनातला न्युनगंड काढुन टाका. मी हे पूर्वी उत्तम रित्या केले आहे, निभावले आहे, मग आता का नाही? तर या पुढेही मी माझ्याजवळ जे काही सर्वोत्तम आहे तेच द्यायचा प्रयत्न करेन, नव्हे देईनच हाच विचार मनात बाळगा. टिव्हीवरील कुचकामी सिरीयल , पिक्चर्स टाळा. त्यात प्रचम्ड विरोधाभास असतो. आमच्या सारखे लोक काही पर्याय नाही म्हणून बघायचा निष्काळजीपणा करतात.

मायबोलीवर स्वाती २, भरत मयेकर सारखे उत्तम सल्लागार आहेत. खरच अगदी प्रामाणीकपणे मी यांची नावे घेतलीत. यांचे तसेच इतरांचे देखील अनूभवाचे बोल तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. तुम्हाला यातुन बाहेर पडता यावे या साठी अनेक शुभेच्छा. बी पॉझीटिव्ह !

लोकांना फाट्यावर मारा. अजुन एक करता येईल, Shush your inner critic. आपला स्वतःबरोबर चालणारा मनातल्या मनातला संवाद फक्त सकारात्मकच ठेवा. मलाही हा इश्यु आहे. I keep beating up myself for small small things. त्याची गरज तर नसतेच नसते उलट उपद्रवच होतो. अंतर्मुख होउन स्वतःचे परीक्षण करणे वेगळे. पण श्वासागणिक स्वतःला कोसणे वेगळे.
जे झाले ते गंगेला मिळाले या भावनेने रहा. In the past you did the best you could do under the given circumstances. हा आत्मसंवाद सुधारला आणि मनाला त्याची पायरी दाखवुन दिली ना की आपल्यापुरता, जग आपोआप सुधारतं.

धन्यवाद रश्मी, सामो
मला स्वतः:ला improve करायचा आहे. communication skills हे अत्यावश्यक आहेत. अजून एक ते डोळ्यात पाणी येणे फार अपमानास्पद वाटते. आवाज भरून येतो. त्यामुळे समोरच्या माणसाशी/बॉसशी खटकणारे मुद्दे मांडता येत नाहीत. इतकी सिनिअर असून मुळु मुळु रडते असंच चित्र दिसतं. इतके दिवस ज्युनिअर, टीम लीड असेपर्यंत चालून गेलं कारण फारसे वाद घालायची वेळ आली नाही किंवा येऊ दिली नाही. पण मॅनेजर झाल्यावर जे अपरेझल झाले त्यात मला माझ्या काही टीममेम्बरसाठी भांडता आले नाही,ज्यांचे ग्रेड टाय झाले होते. अर्थात तिथे प्रचंड फेवरीसम चालतो (वर म्हणले तसे अत्यंत बेकार वर्क कल्चर, favorism, uprofessional bosses) त्यामुळे फार फरक नसता पडला पण I know I didnt put my best. I could have tried more.
प्लिज कम्युनिकेशन साठी उपाय सुचवा.

तसेच माझ्यासारख्या लोकांना सुटेबल जॉब काय असतील? मी जे काही विचार करते त्यात सगळ्यात हे स्किल्स गरजेचे आहे. बिझिनेस तर शक्यच नाही होणार असे वाटते.

प्रचिती, आधी तुमच्या स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्या. करोनाकाळात अनेकांना ड जीवनसत्त्वाची कमतरता झाली व अशा पद्धतीची लक्षणे दिसू लागली. रडू येणे, भांडता न येणे हा स्वभाव असतो हे खरं आहे पण इतर कारणे नाहीत ना हे तपासून बघणे बरे पडेल.

सध्याच्या परिस्थितीत जॉब असणे हीच फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही करता त्या नोकरीस तुम्ही योग्य आहात याची खात्री बाळगा. You could have tried more but only you know that you could have tried more. If anyone else says 'You could have tried more' you can always ask 'How?'. At least, you will get some ideas then you can close the conversation with - "these are interesting ideas but that's not how it goes in those cabins. Thank you for your input." Hang tight and give it 1000 days.

'रडू येणे' मलाही व्हायचे. अगदी तुम्ही म्हणता तसेच. आता औषधे घेतल्यानंतर ती समस्या दूर झालेली आहे.
>>>>>>>सध्याच्या परिस्थितीत जॉब असणे हीच फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही करता त्या नोकरीस तुम्ही योग्य आहात याची खात्री बाळगा.
अतिशय प्रेरणादायी विचार. सीमंतिनी म्हणतात ते खरे आहे. कोणीही चॅरिटी म्हणुन कामावर ठेवत नाही. तुमची पात्रता आहे याची निश्चिंती बाळगा. खूपदा सहकारी अतिशय हलकट असू शकतात. तेव्हा एका कानाने ऐकायचे व दुसर्‍याने सोडायचे असे धोरण ठेवा. असे लोक ना स्वतः संतुष्ट असतात, ना त्यांना दुसर्‍यांचे भले बघवते. पण आपण त्यांच्यावर किती डोके खपवायचे ते आपण ठरवायचे. Take them for granted - की हे लोक असेच वागत रहाणार.

Unfortunately there may not be any scope for you to change things around you, unless you start recognizing your personality traits as your strengths and not weaknesses.

तुमच्या कडे खुप चांगल्या क्वालीटीज आहेत तेव्हा तर तुम्ही पंधरा वर्षे इंडस्ट्रीत आहात..असं बर्याच लोकांबरोबर होतं..कुणी सांगतं.. कुणी सांगत नाही...so Don't take it personally...Take it easy..Time heals everything..
हा विडिओ नक्की बघा..
https://youtu.be/LnJwH_PZXnM

भावना प्रधान असणे, पटकन रडू येणे या निगेटीव्ह क्वालिटी नाहीत, जर तुमचे स्किल्स आणि इतर गोष्टी जागच्या जागी असतील तर. प्रत्येक जॉब ला माचो मॅन रँबो अ‍ॅग्रेसिव्ह अल्फा (फि)मेल रोबो कॉप पाहिजेच ही आपली समजूत आहे.
डिबेटस ला योग्य मुद्दे जवळ असणे आवश्यक. हे मुद्दे ऐन वेळी दुसर्‍याच्या अ‍ॅग्रेशन मुळे सुचत नसतील, घाबरायला होत असेल तर शांतपणे काही तरी करुन टाईम बाय करणे शक्य. (छोटीसी बात मध्ये अमोल पालेकर असराणी ला वेळ काढून नर्व्हस करत असतो तसे.) आवाज चढवून, एकमेकांना नामोहरम करुन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लढाई जिंकली जाते असे नाही.
अगदी साधे सोपे उपाय, कॉफीचे घुट्के घेणे, पाणी पिणे, चष्मा साफ करणे याने आवश्यक तो कूल डाऊन टाइम मिळू शकतो. मुद्दे गोळा करुन मांडता येऊ शकतात. न आल्यास वेळ घेता येतो. आर्मी मधल्या सारखे जीवन मरणाचे निर्णय नसतात, की आता १० सेकंदात घेतलाच पाहिजे(फक्त तसं भासवलं जातं पॉवर प्ले साठी.)

रिमोट टीम्स बरोबर (जास्तीत जास्त माणसं परदेशात/दुसर्‍या लोकेशन ला) तुम्ही फोनवर्/मेलवर/स्काईप वर उत्तमपणे डील करु शकाल.

अगदी साधे सोपे उपाय, कॉफीचे घुट्के घेणे, पाणी पिणे, चष्मा साफ करणे याने आवश्यक तो कूल डाऊन टाइम मिळू शकतो. >> Happy +१०००
हो, लोकं बिनडोक ते outrageous ideas मांडत असताना कॉफी पित पित - " Tell me more on ways it supports our project goals" असलं काही तरी विचारणं यासारखं सुख नाही!!!!!!!!!!! एकदा याची चटक लागली की कॉर्पोरेट लॅडरचा एस्कलेटर होईल बघा ... Wink

यात अजून 'वी शुड नॉट रीइन्व्हेन्ट द व्हील' 'आय थिंक वी आर मिसिंग द बिगर पिक्चर हिअर' 'वी आर नॉट थिंकिंग द अजाईल वे' 'वी शुड स्पीक कस्टमर्स लँग्वेज' 'ईट इज मोर अबाउट गिव्हिंग युजर एक्सपिरियन्स डॅन जस्ट फुलफिलिंग द स्पेक्स' ही वाक्यं चाट मसाल्या सारखी पेरली की समोरच्याचा (दही)वडा झालाच म्हणून समजा Happy

एका लिमिटपर्यंत मला वाटले की कोणीतरी खोडसाळपणा करून माझीच समस्या लिहिली की काय. दचकायला झाले होते खरेच... फक्त एक लाईन मिसमॅच झाली. मला ते रडू वगैरे येत नाही. किंबहुना मी आहे त्यातच सुखी समाधानी राहतो. आणि मग विचार करतो की जसा आहे त्यात मस्त मजेत जगतोय तर कश्याला हवाय व्यक्तीमत्व विकास...

अर्थात हा तुम्हाला सल्ला नाही. यातले बरेच काही रिलेट झाले म्हणून लिहिले. याव्यतीरीक्त आपल्या स्वभावातले ईतर पैलू वेगळे असतील तर ते वेगळेच राहणार आणि त्यानुसार या समस्येवरचा उपाय बदलणार. माझ्यासाठी मुळात आता हि समस्याच ऊरली नाहीये.

आणखी एक म्हणजे तुम्हाला योग्य किंबहुना पर्रफेल्ट सल्ला खरे तर ईथे कोणीही जुजबी माहितीवर देऊ शकत नाही. सगळे एकेक तीर मारणार. कुठला आपल्यासाठी निशाण्यावर आहे हे तुम्हालाच ओळखून त्यानुसार वागायचे आहे. शुभेच्छा Happy

सर्वात आधी कोण काय विचार करेल हा विचार मनात येऊच द्यायचा नाही. तुम्ही मॅनेजर आहात..ह्या लेव्हलला सर्वाना खुष ठेवणं शक्य नसतं..म्हणून तर स्टिव्ह जाॅबने म्हटलं आहे..

"If you want to make everyone happy dont be leader sell ice cream."

भावनाप्रधान असणं ह्यात काहीच चुकीचं नाही पण प्रोफेशनल लाईफमध्ये भावनांना आवर घालणं फार महत्वाच असतं..

तुम्ही म्हणता तसं राग आला की, डोळ्यांतून पाणी येत वैगेरे.
हे नैसर्गिक आहे लगेच बदल होणार नाही ह्यात पण अगेन अशक्य असं काहीच नाही. राग आल्यावर स्वतःला काल्म कसं ठेवायचं ह्याकडे लक्ष दिलं पाहीजे. रागाला आपण सांगू शकत नाही की, बाबा आता येऊ नकोस पण आला तर त्याची तीव्रता कमी करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे..राग आल्यावर मनातल्या मनात छानसं आवडीचं गाणं म्हणा. राग कमी नाही होऊ शकला तरी त्याची तीव्रता कमी होण्यास नक्कीच मदत होईल आणि कदाचित इमोशन्सचा फोकस हटवून माइंडला तेव्हा थोडं मॅनिप्यूलेट करता येऊ शकतं..

राहीला प्रश्न communication skills चा तर भडाभड बोललचं पाहीजे असं नाही..तुमच्या introvert स्वभावाला धरूनच बोला पण पाॅईट टू पाॅईट बोला..त्यासाठी थोडा आत्मविश्वास नक्कीच वाढवा..स्वतःला कमी लेखू नका आत्मविश्वास आपोआप वाढू लागेल..जिथे तुमचे मुद्दे कुचकामी ठरतीलं असं वाटतं असेल तर तिथे डिल्पोमॅटीक राहा..

बार्गेन आणि डिबेट करणं म्हणजे अग्रेसिव्ह होऊन बोलणं नव्हे तर तुमच्या मुद्द्यांत इतरांपेशा जास्त तथ्य असलं पाहीजे...त्यासाठी मिटींगच्याआधी पूर्वतयारीवर भर द्या..एक एक पाॅईट लिहून काढा..नोट्स तयार करा.. एकेक मुद्दा कसा खोडला जाऊ शकतो कुठले प्रश्न किंवा शंका येऊ शकतात आणि त्यावर काय बोलायचं हे ही आधीच ठरवा..

बोलायचं दडपण येत असेल तर मिटींगमध्ये बोलत आहात असं समजून स्वतःशीच बोला... ह्याने बोलायचं धाडस वाढेलं.. जरी कोण मिटींगमध्ये तावातावाने बोलत असेल तर शांत राहा आणि त्याला आधी बोलू द्या मग तुमचे मुद्दे व्यवस्थित मांडा. दडपण येऊन जमलचं नाही बोलायला तर सरळ नोटस मधले तुम्ही लिहलेले तुमचे मुद्दे वाचून दाखवा.

आणि मिटींगमध्ये तीच तीच माणसे असतील तर त्यांना वाचायला शिका.. कारण एकदा माणूस वाचायला शिकलं की, समोरचा व्यक्ती काय बोलू शकतो किंवा कसा रिअक्ट करू शकतो ह्याच्या शक्यता पडताळता येतात..

बाहेरच्या आयुष्यात जास्त भाग घ्यायला सुरुवात करता येते का पहा.
उदा. गावातले महाराष्ट्र मंडळ, वा कोणत्याही मंडळात भाग घ्या, मुख्य समितीमधे शिरा व मंडळातर्फे लोकांकरता कार्यक्रम केले जातात त्याच्या मिटिंगमधे वगैरे उत्साहाने भाग घेऊन बोलायला लागा. तिथे कोणाचे वाईट-चांगले होण्याची भिती नसते. केवळ हौसेकरता आपण करतो पण ते खूप लोकांपर्यंत पोचवायचं असतं म्हणुन आपोआप प्रोजेक्टवर काम केल्यासारखे वाटते, फक्त ताण नसतो. खूप आत्मविश्वास येईल.

स्वतःच घरगुती कार्यक्रम मित्रमंडळात करुन प्रसिद्ध करायचे. झूमवर प्रसारीत करायचे. तुम्हीच समिती स्थापन करून उपक्रम पार पाडा.

तुमच्यात काही कला असेल तर तशा लोकांचा ग्रूप करून एक कार्यक्रम बसवा व ऑनलाईन प्रिमिअर करा.

मी_अनु च्या दोन्ही पोस्टना +१.
आपण या कामाला लायक नाही हे बहुदा प्रत्येक सेन माणसाला अधुन मधुन वाटतंच असतं. सेल्फ डाऊट थोडाफार बरा, त्यात फार वाहावत जाऊ नका. वर कुणी म्हटलंय तसं तुम्हाला फायर केलं नाहीये म्हणजे तुमची स्किल्स हवी आहेत. लायक नाही असं कंपनीला वाटलं आणि दुसरं कुणी मिळालं की क्षणाचाही विलंब न करता कंपनी कु_णा_ ला_ ही फायर करते.
हँग इन देअर!

सगळ्यांनी छान सल्ले दिले आहेत.

सभाधीटपणा येणे आणि कुठल्याही उच्चपदावरील / तापट / दरारा असणाऱ्या व्यक्तीसोबत बोलताना आत्मविश्वास वाढवणे या साठी दोन आठवड्याच्या व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेचा मला चांगलाच उपयोग झाला.
सेल्स / मार्केटिंगला मी घाबरायचो. त्याकाळी डेल कार्निजी आणि नेपोलियन हिल वगैरेंची चलती होती, त्यांच्या वाचनाने तेव्हा खूप मदत झाली. 7 Habits of Highly effective people ने ही पुढे मदत झाली.

माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल्स,बारगेन/ डिबेट स्किल्स अजिबात नाहीत. निर्णय घेता येत नाहीत. आपला मुद्दा पटवता येत नाही. मुळात स्वतःला काय हवे आहे तेच कळत नाही. सतत समोरचा काय विचार करेल हाच विचार/भिती असते. >> मला वाटतं हा जर स्वभावाचा भाग असेल तर मुळातून तो बदलणे कठीण. त्यामुळे उगाचच अट्टाहास करून "people management" करत राहू नये. कम्युनिकेशन स्किल्स, मुद्दा पटवणे, निर्णय घेता येणे ह्या गोष्टी people management साठी अतिशय आवश्यक आहेत. त्यामुळे तुमच्या १५ वर्षांच्या अनुभवांच्या आधारावर तुम्हाला दुसरे काही technical job profile मिळू शकेल का? ह्याची शक्यताही आजमावून पहा. मॅनेजर होण्याचा अट्टाहास करण्या ऐवजी काही काळ individual contributor म्हणून काम करून बघा. चांगल्या कंपन्यांमधे मॅनेजरला आणि १५ वर्षांचा अनुभव असणार्‍या individual contributor ला जवळपास सारखाच पगार असतो. आणि job profile बदलताना थोडेसे आर्थिक नुकसान सोसावे लागले तर आपल्या मनःशांती साठी मोजलेली ही किंमत आहे असे समजावे.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
सीमंतिनी, व्हिटॅमिन डेफिशिएन्सी आहेच, त्यावर गोळ्या सुरु केल्या आहेत. पण रडू येणे हा स्वभावच आहे.
पात्रता आहे हे नक्की. या पूर्वी कंपनीत झोकून देऊन काम केले आहे. घरातल्या अडचणी कामाच्या आड येऊ दिल्या नाहीत कधी. त्यामुळे पटापट प्रमोशन्स देखील मिळत गेली. आतापर्यन्त रेप्युटेशन चांगले राहिले आहे. पण आता काळजी भविष्याची आहे. कारण नुसता मॅनेजर होऊन काय उपयोग ? स्किलसेट डेव्हलप करायचा आहे. इथे शिकायलाही काही नाही कारण काम प्रत्यक्षात टीमलीडचे आहे . दुसरा जॉब शोधावा तर मॅनेजरचा अनुभवही नाही आणि स्किलसेटपण नाही.

प्रकाश घाटपांडे, खूप छान लिन्क. पॉडकास्ट नक्की ऐकेन.

सामो, खरं आहे. मी लोकांचा जरा जास्तच विचार करते.

हायझेनबर्ग, तेच जमायला हवं आहे. बहुधा मी स्वत:ला जास्त क्रिटिसिइझ करते.

मृणाली, लिंक बघितली. त्यातले वाक्य न वाक्य मला लागू होते. त्या व्हिडीओमुळे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला.

मी_अनु, सध्या WFH असल्याने फोन, एम टी , किंवा मेलच सुरु आहे. असे प्रसंग नेहमी येतात असे नाही पण आधी लिहिले तसं अप्रेझल टाइम मध्ये होतेच होते. बाकी ती वाक्ये भारी आहेत. नोट करून ठेवते.

वर्षा, टोस्टमास्टर बघते जवळच्या भागात आहे का.

ऋन्मेऽऽष, रडू येणं हाच तर कळीचा मुद्दा आहे. तो नसेल तर बाकी गोष्टी चालून जातात. पण हा मुद्दा + बाकी कम्युनिकेशन स्किल्सचा अभाव हे कॉम्बो घातक आहे असे माझे मत.

अजय चव्हाण, खूप उपयुक्त सल्ले. अमलात आणायचा नक्की प्रयत्न करेन. पण फक्त ते नेमकं माणूस वाचणे ही कलाच अवगत नाही. खूप पटकन समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवते आणि मग फटका बसतो. आयुष्यात अजून खूप काही शिकायचं आहे असं दिसतंय.

सुनिधी, हो असं काही करता येऊ शकेल. फक्त घरात २ मुले, एकाला सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम, त्यात कोरोनामुळे घरकाम आणि ऑफिस दोन्ही आघाड्यांवर लढाया यामुळे वेळात वेळ काढून हे जमवावं लागेल.

अमितव, कंपनीला सध्या तरी माझी गरज आहे. पण या प्रतिसादात वर लिहिला तसं हे थोडं भविष्याच्या काळजीतूनही आहे. पुढे जाऊन नोकरीत बदल इ. इ. अजून एक काळजी म्हणजे मलाच या गोष्टी जमत नाहीत तर माझ्या मुलांना कसा डेव्हलप करता येईल असेही वाटते.

मानव पृथ्वीकर, कुठली कार्यशाळा? डिटेल्स देऊ शकाल का. डेल कार्निजी आणि नेपोलियन हिलची पुस्तके शोधते. 7 हॅबिट्स खूप पूर्वी वाचले होते. परत एकदा वाचते.

सोहा, individual contributor चा पर्याय होऊ शकला असता पण माझे कोअर आयटी नाही. मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जे सॉफ्टवेअर टूल लागते त्यात माझे काम आहे. माझ्या डोमेन मध्ये ज्या टूल वर मी काम करत होते ते आता बंद होऊन नवीन टूल आले आहे. हे टूल बाहेरच्या इतर कंपन्यांमध्ये येऊन जमाना झाला. सो माझा १५ वर्षाचा एक्सपेरियन्स झटक्यात बिगिनर लेवलला आला. तेही शिकणे सुरु आहे. पण डेव्हलपमेंट पूर्वी इतकी करायला मिळत नसल्याने पूर्वी जी लेवल गाठली ती लगेच गाठता येणे अवघड आहे.

शिक्षण सुरु होते तोपर्यंत हुशार (?)समजले जात होते. पण बोलायला गेले कि घोडे पेंड खाते. कारण काय बोलायचे हेच मुळात कळत नाही. या अवगुणांवर मात करून personality कशी डेव्हलोप करता येईल ते सांगा. >> प्रचिती, इतर लोक समजत होते म्हणजे तुम्ही हुषार असणारच. हा आत्मविश्वास बाळगा. हे तर खूप छान आहे. निम्मी लढाई तुम्ही जिंकलात.
माझ्या मते तुमच्या समस्येचे मूळ तुम्हाला काय हवे आहे हे स्पष्ट नसणे हे आहे. (म्हणजे स्पष्ट करून घेणे आवश्यक आहे हे माहित नसणे किंवा पुरेशी तयारी न करणे, इत्यादी ).
काय करायचे याची स्पष्टता असणे हे आत्मविश्वास असण्यामागचे मुख्य मूळ आहे.
अगदी सोपे प्रयोग करून बघा. कुणाशी चर्चा होणार असेल तर आधी नीट तयारी करा. त्यातून तुम्हाला काय निष्पन्न व्हावे असे वाटते ते आधी लिहा. तुम्ही काय बोलणार आहात ते व्यवस्थित लिहून काढा. काय बोलायचे नाही हे ही लिहून ठेवा. चर्चा कशी झाली पाहिजे, टोन, बॉडी लंग्वेज याचाही विचार करा. दुसर्ञा व्यक्तिची बाजूही मनात मांडून बघा. एखादी गोष्ट चर्चेत मनासारखी झाली नाही तर तुमची कशी रिअ‍ॅक्शन झाली तर तुमचा फायदा होइल याचाही विचार करून ठेवा. येवढी सगळी तयारी झाली तर तुम्ही तुमचा मुद्दा नक्की पटवून देउ शकाल.
तुम्हाला स्वतःला काय पाहिजे असे वाटते याच्याबरोबरच "खरोखरच" काय झाले पाहिजे याचाही विचार केलात तर तुम्हाला स्पष्टता येइलच पण चुकाही टळतील. आणि तुमची बाजू बरोबर असल्याने आत्मविश्वास येइलच. ( प्रचिती चुकिच्या गोष्टींसाठी वाद घालणार नाही हे बॉसच्या/त्याच्या बॉसच्या मनात ठसणे महत्वाचे आहे. ते होते ही. Happy )
शुभेच्छा.

प्रचिती तुम्ही एकट्या नाहीत. आपल्यासारखे बरेच जण असतील. मी आता लोकांना फाट्यावर मारायला शिकले आहे. हे लोक काही आपले पाहुणेरावळे नाहीत. त्याच्या मताला किंमत ती कितीशी द्यायची? तुमच्या डोळ्यात पाणी आले, यात तुमचे अपयश नाहीच. कधीकधी टीम खरोखर बकवास असते.
आपण अडखळून पडतो, रडतो तेव्हा आपल्याला अगदी नको नको होउन जातं, अपमान झोंबतो यामागे उत्क्रांतीचे कारण आहे. आदिमानवाला तो आजारी आहे, शारीरीक दॄष्ट्या अक्षम आहे, हे दाखविणे प्रचंड महागात पडत असे. अनेक जण त्याची शिकार करायला, त्याला भारी पडायला टपलेले असत. त्यातून मग सदैव कणखर, मजबूत असल्याचा देखावा/फसाड ठेवावा लागे. तसे काही आता नाही. तुम्ही रडलात म्हणुन तुमच्या कौशल्यालांना गालबोट लागत नाही की कोणी तुम्हाला काही बोलणार नाही. विसरा तो प्रसंग. जितकी उजळणी कराल तितके क्लेश होतील.
be Happy! You are fine. असं सगळ्यांबरोबर होतं.

मला कधीही विपू करा.

हा धागाही जरुर वाचा - https://www.maayboli.com/node/76377

कुठली कार्यशाळा? >>>> खूप वर्षे झाली त्याला, १९९३-९४ मध्ये, पुण्यात. आता त्यांचे नावही आठवत नाही. पण अशा कार्यशाळा असतीलही अजून नक्कीच, ऑनलाईन शोधून बघता येईल.

जाता जाता एक महत्वाचे. कामाची, मग ते कोणतेही असो, नीट आखणी करा. माझ्या सकट बर्‍याच जणांची इलेवंथ अवरला पळापळ करण्याची अत्यंत घाण सवय असते. ती टाळा. काम नीट मॅनेज करा, तयारी करा. जर तसे नाही झाले तर प्रचंड टेन्शन येते आणी त्यातुन चूका होतात. मी त्यातुन सावरण्याचा प्रयत्न करतेय.

प्रचिती, तुमचा प्रोब्लेम समजू शकते.
मला अगदी रडायला येत नाही. पण मी चटकन घाबरुन जाते. पूर्ण ब्लँक होते . सगळं काही ठार विसरते .

पोह्यात हळद घालायला विसरावं, कांदा उलटा कापावा इतकं.
सासरी पहिल्यांदा पोहे करत असताना उगीचच टेन्शन घेतलं होतं आणि असा घोळ घातला होता.

खरी परीक्षेची , कसोटीची वेळ येते तेंव्हा अशीच गडबडून जाते . मला काय येतंय , काय विचार केलाय ते मुद्दे - सगळं काही गायब होतं .
सध्या त्या क्षणी दीर्घ श्वास घेणे आणि काही सेकंद काहीच उत्तर न देणे एवढं करते . कधी कधी अशा गॅप नंतर डोकं जरा जागेवर येतं.

पण तुम्ही म्हणताय तसं स्वतः मध्ये बदल आवश्यक आहे . विशेषतः जेंव्हा आपल्या आसपासच्या बहुतांश लोकांना अशी वेळ कशी निभावून न्यावी हे येत असताना, असा विकनेस उठून दिसतो. मीही जाणीवपूर्वक स्वतः मध्ये बदल करत आहे.

इथे प्रतिसादांमध्ये चांगले सल्ले आहेत.

आपल्या आजुबाजुला जी लोक आहेत ती समजून घेणारी धीर देणारी नसतील तर अशा समजूतदार, पेशंट, सामावून घेणार्‍या आणि constructive criticism ऑफर करणार्‍या लोकांचा गोतावळा जमवायला हवा. Toastmasters program is a good start. तिथले बहुतांश लोक communication, speaking anxiety संदर्भातील अडचणी मधून गेलेले असतात, जात असतात त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत असतात.

अजून एक महत्वाचे म्हणजे दुसर्‍यांच्या reaction मधून स्वतःला बघणे टाळा. आपला आत्मविश्वास महत्वाचा, त्याला तडा देणार्‍या गोष्टीपासून/लोकांपासून एक तर लांब रहायचे किंवा ते अशक्य असेल तर मना (emotions) ऐवजी डोके (thoughts) वापरून tactically दोन हात करायचे.
Confrontation टाळणे दरवेळी शक्य असेलच असे नाही. पुन्हा हरप्रकारे confrontation टाळणे हा स्वभाव असेल तर त्यातून गमावलेल्या संधी बद्दल मनस्ताप करून घेणे ही योग्य नाही.

कामाच्या ठिकाणी रडणे हा प्रसंग अनेक वेळा येतो ह्याला एक प्रॅक्टिकल उपाय आहे. रडू येते आहे हे आपल्याला कळले की प्लीज एक्स्क्युज मी म्हणून लेडिज रेस्ट्रूम मध्ये जायचे. भरपूर रडून घ्यायचे व तोंड स्वच्च्छ धुवुन मीटिन्ग मध्ये जायचे. भर ओसरला की लगेच रडू येत नाही परत.

महत्वाचे म्हणजे अनेक वेळा परिस्थिती व कामातले इशूज हेच डिस्कस करायचे असतात तेव्हा तुम्ही तुमची मानसिक परिस्थिती ह्याचे अस्तित्व गरजेचे नाही. वहीत इशू नोटून तेच व तेच फोकस करून डिस्कस करायचे. त्य आधी टीम बरोबर डिस्कस करून गृपचा अप्रो च ठरवावा.

म्यानेजर म्हणजे गृप मधील पीपल मॅनेजमेंट व्यव्स्थित करणे. ह्या साठी टीम बरोबर संबंध वाढवा. एखादे इन्फॉर्मल टीम लंच किंवा कॉफी
सेशन करून त्यांचे प्रश्न व फॅमिली सिचुएशन जाणून घ्या. हीच मीटिन्ग एकदा तुमच्या बॉस बरोबर पण घडवून आणा अ‍ॅज पीपल संबंध व ओळख सुधारली की तुमची कंफर्ट लेव्हल वाढेल व एकटे रड वेले वाटणार नाही.

बरेच वेळा कामाचे इशू फक्त आणि फक्त सद्य परिस्थिती व सोलुशन शोधणे ह्यावर आधारित असतात. तितकेच ते ठेवावे. त्यात वैयक्तिक काही आणू नये. म्हणजे तुमची मानसिक एनर्जी बकेट भरलेली राहील.

एखादा रिसोर्स निगेटिव्हच असल्यास त्याच्याशी कामापुरतेच व एकदम चोख संबंध ठेवावेत. कम्युनिकेशन मेल मध्ये एकदम प्रॉ पर व व्यवस्थित ठेवावे. ह्याचा उपयोग होतो.

पुढील वाक्य मी काळजीने लिहीत आहे त्यामुळे फार वैयक्तिक रित्या घेउ नका.
जुने पार लहान पन पासूनचे काही अन रिजॉल्व्ड इशू असतील तर त्यावर काउन्सेलिन्ग घ्या व ते आधि रिझॉल्व्ह करा
जसे फार शिस्तप्रीय वडील/ आजोबा अस तील लहान पणी तर आथॉरिटीची भीती बसते. सद्य परिस्थितीत तो बॉस त्यामुळे आपण मानसिक रित्या बॉस शी बोलताना त्या आजोबा वडील ह्यांच्या समोअर फ्रॉक घातलेली लहान तीन वर्शाची मुलगी होउन जातो डिफेन्स लेस, घाबरलेली .

असे व्हायची गरज नाही. आपण आता मोठे अ‍ॅडल्ट झालो आहो त हे समजून वेगळ्या पद्धतीने सर्व सिचुएशन हँडल करावी. तुमच्या इनर स्ट्रेंग्थ शोधून त्यावर काम करा व त्या वाढवा.

आप दिल छोटा न करो धीर धरा. मी अनेक सिचुएशन डोळ्यात टिपे लेव्हल ला फेस केल्या आहेत. अनेकानेक शुभेच्छा.

Pages