सॉफ्ट स्किल्स कसे शिकावेत?

Submitted by सामो on 29 August, 2020 - 11:25

सॉफ्ट्स्किल्स नक्की कसे शिकायचे? मान्य आहे की अनुभवांनी जरुर काही प्रमाणात शिकता येतात. पण बालपणी आपल्या पाल्यांना शिकवता येतात का? मूळात आडात (पालक) नसतील तर पोहर्‍यात (पाल्य) येउ शकतील का? तुम्हाला काय वाटते तुम्ही सॉफ्ट स्किल्स्मध्ये कितीसे पारंगत आहात? तुम्ही कसे शिकलात?

यावेळचा परफॉर्मन्स रिव्ह्यु बंडल गेला. मॅन्युअल टेस्टर असल्यामुळे, माझ्या प्रोफेशनमध्ये सॉफ्ट स्किल्स तसेच अ‍ॅप्लिकेशनची पुरेपूर माहीती असणं या दोन बाबी फार महत्वाची कौशल्ये मानली जातात. पैकी डिफेक्ट सापडल्यानंतर स्क्रममध्ये कौशल्याने , जबाबदारीने मांडणे, कोणी नाकारल्यास, त्याबद्दल अधिक माहीती देउन उदाहरणार्थ - रिक्वायरमेन्ट नंबर/स्टोरी नंबर आदिकडे अंगुलीनिर्देश करुन तो डिफेक्ट 'इन स्कोप' कसा आहे ते पटवणे, हे सर्रास करावे लागते. बरेचदा प्रॉडक्ट ओनर्स स्टोरीज नीट लिहीत नाहीत त्या पुरेश्या स्पष्ट नसतात, म्हणजे ambiguous असतात पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? मग स्टोरीज नीट अ‍ॅटॉमिक व स्पष्ट लिहीण्याची विनंती करणे आदि कामे करावी लागतात. यामध्ये सॉफ्ट स्किल्स नसतील तर त्रेधा तिरीपीट उडते किंवा मग परफॉर्मन्स रिव्युत दट्ट्या बसतो. फक्त तोंड बंद ठेउन इतरांच्या सोयीनी काम केलं की सगळं ऑल वेल असत. हे माहीत आहे पण जमत नाही.

कसे डेव्हलप करायचे हे स्किल्स? उदाहरणे देउन स्पष्ट करावे प्लीज. माझ्या टिममध्ये , क्लायंटशी ज्यांचा संबंध येतो त्या लोकांत ही कौशल्ये असतात असे आढळलेले आहे किंबहुना म्हणुनच ते त्या पदावर टिकू शकतात. यावेळेला पर्फॉर्मन्स रिव्युमुळे, मानसिक स्थिती बरीच विमनस्क झालेली आहे. स्वतःत दोषच दोष आढळत आहेत. ऑटोमेशन शिकायला सुरुवात केलेली आहे वगैरे अलाहिदा. हेही दिवस मागे पडतील पण कोणाशी तरी बोलावेसे वाटले, इतरांचे अनुभव जाणुन घ्यावेसे वाटले म्हणुन हा धागाप्रपंच.

काही उदाहरणे -
- उशीरा का होइना, एक शिकले की जर प्रोसेसमध्ये किंवा एखादी तृटी आढळली तर एकदम 'युरेका युरेका' करत तॄटी दाखवुन 'जितं मया' करायचे नाही. आधी त्यावरील सोल्युशन शोधुन , तॄटी व सोल्युशन दोन्ही सुचवायचे. Sad Sad
- अजुन एक शिकले ते म्हणजे प्रॉजेक्टचा भार आपल्याच शिरावर ठेवल्यागत, प्रॉजेक्टचा ठेका घेतल्यागत वागायचे नाही. थोडक्यात काही स्लॉपी गोष्टींकडे कानाडोळा करायचा. योग्य वेळेवर त्या सुधारणा होत असतात. आपण लक्षात आणून देउन उगाचच रोषास पात्र होतो. हे नको तिथे परफेक्शनिझम टाळायचं, परफेक्शनिझमचा रोख स्वतःवर वळवायचा. आपण सुधारायचं, प्रॉजेक्ट सुधारण्याकरता लोकं ठेवलेले असतात ज्यांना भरपूर मोबदला दिलेला असतो. लष्कराच्या भाकर्‍या आपण भाजायच्या नाहीत Sad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उशीरा का होइना, एक शिकले की जर प्रोसेसमध्ये किंवा एखादी तृटी आढळली तर एकदम 'युरेका युरेका' करत तॄटी दाखवुन 'जितं मया' करायचे नाही. आधी त्यावरील सोल्युशन शोधुन , तॄटी व सोल्युशन दोन्ही सुचवायचे. Sad Sad

Consulting सोडा. फुल्ल टाईम जॉब पकडा. या बाकी गोष्टींची गरज पडणार नाही. तुमचे कामच तुमच्या बद्धल सांगेल.

तुम्ही ट्रम्प समर्थक आहात ना?
मग ट्रम्प यांची पुस्तकं वाचा. त्यांनी खूप सेल्फ हेल्प बुक्स लिहिली आहेत. तुम्हाला आवडतील.

सामो तुम्ही क्लायंट शब्द वापरला म्हणून मला वाटले तुम्ही कन्सल्टन्सी मध्ये आहात.
स्वतः क्लायंट बना असे म्हणायचे होते मला फुल टाईम म्हणजे.

कटप्पा, अजुन एक शिकले ते म्हणजे प्रॉजेक्टचा भार आपल्याच शिरावर ठेवल्यागत, प्रॉजेक्टचा ठेका घेतल्यागत वागायचे नाही. थोडक्यात काही स्लॉपी गोष्टींकडे कानाडोळा करायचा. योग्य वेळेवर त्या सुधारणा होत असतात. आपण लक्षात आणून देउन उगाचच रोषास पात्र होतो. हे नको तिथे परफेक्शनिझम टाळायचं, परफेक्शनिझमचा रोख स्वतःवर वळवायचा. आपण सुधारायचं, प्रॉजेक्ट सुधारण्याकरता लोकं ठेवलेले असतात ज्यांना भरपूर मोबदला दिलेला असतो. लष्कराच्या भाकर्‍या आपण भाजायच्या नाहीत Sad

I wish I could help , just hang in there. Take care. लवकरच मार्ग मिळो आणि तुमचा मूड परत येवो.

कित्येक लोक आपलं काम {कसंही}साध्य करणे यामागे असतात.
अ ) काम सुरू केल्यावर अडचणी आल्यास १)वेळ मारून नेऊ, / २)आडमार्गाने काम करवून घेऊ अशा विचाराचे असतात.
हीच पद्धत वापरून त्यांनी कामं पूर्वी उरकलेली असतात.

ब ) असे कस्टमर्स तुमच्याकडे येतात पण तुम्ही 'फोकस्ट' असणारे असतात. तुम्हाला स्पष्ट नोंदी, स्पष्टपणे काय करायचे आहे हे हवे असते.

क ) डीलिंग करायला पाठवलेली व्यक्ती ही फक्त मालकाने पाठवलेली 'फीलर' असू शकते/असते. विचारलेल्या प्रश्नावर निर्णय न घेणारी. 'वर' विचारून सांगेन या पद्धतीची. म्हणजे तुमचा वेळ वाया घालवणार आणि व्यर्थ बडबड ऐकावी लागणार.

ड) सॉफ्ट स्किल्स म्हणजे अशा कस्टमरसना पटवून तुमच्या कंपनीच्या नियमांप्रमाणे डॉक्युमेंट तयार करून सह्यांसाठी वर पाठवायचे असेल म्हणजे हे कसं करायचं हा प्रश्न असेल तर

--------
एक प्रश्नावली ( प्रिलिमिन्री) त्याच्या उत्तरांचे चार पर्याय बोलून/लिहून घेतल्यास काम सोपे होईल. कस्टमर आणि त्याचे काम आणि बजेट समजेल.

-----------
हे नसल्यास चुकीचा प्रतिसाद . सोडून द्या.

धन्यवाद शरदजी. मला वाटतं सॉफ्ट स्किल्स्करता काही टेम्प्लेट नसल्याने ते आत्मसात करणं अवघड जात असावं. त्यात ओव्हरली अ‍ॅकॅडेमिक/मग्गु/ पुस्तकी कीडा/ अंतर्मुख व्यक्तींना जास्तच.

माझ्या आयटीतल्या सात वर्षांच्या अनुभवावरून वाटते ते असे की: सॉफ्ट स्किल्स शिकता येतात. नवनविन व्यक्ति, काम, बरेवाईट अनुभव तुमच्यामध्ये वेगवेगळ्या सॉफ्ट स्किल्स इंपार्ट करत जातात. संवाद थेट, टु द पॉईंट ठेवणे, केलेल्या कामाचे योग्य क्रेडिट घेणे आणि आपल्या स्किल्ससंबंधी डॉक्युमेंटेशन तयार ठेवणे हे आयटीत तरी सगळ्यात महत्वाचे मुद्दे. एवढुश्या कामाचा डांगोरा पिटणारे अनेक असतात, त्यांना लगेच फायदा मिळतो, सातत्यपुर्ण परफॉर्मन्स देणे हे जर ध्येय असेल तर स्वतःच्या कमतरतासुद्धा जाणून घेणे आणि त्यामध्ये दुरुस्ती करत राहणे आवश्यक.
अजून एक: सौजन्य हे एरव्ही बावळट ठरवले गेलेले मूल्य प्रत्यक्ष्यात ॲसेट ठरते असे मला तरी आढळून आले आहे.

>>>>सातत्यपुर्ण परफॉर्मन्स देणे हे जर ध्येय असेल तर स्वतःच्या कमतरतासुद्धा जाणून घेणे आणि त्यामध्ये दुरुस्ती करत राहणे आवश्यक. >>> त्रिवार सत्य

सामो , मी हि तुमच्या सारख्या situation मधून जात आहे. मला मॅन्युअल टेस्टिंगचा ७ वर्षयचा एक्सपेरियन्स आहे . पण सध्या स्थिती तुमच्या सारखी आहे. खरोखर योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. सॉफ्ट स्किल्स ची पण

अश्विनी जरी खूप अनुभव असला तरी, माझा अनुभव अति एकसुरी आहे, मॅन्युअल आहे.मला अतिशय टफ जाते आहे नवा जॉब मिळणे. मी तर तुम्हाला हा सल्ला देइन की लवकर ऑटोमेशन कडे वळा. SDET नावाची एक भारी पोझिशन सध्या मार्केटात आहे. Software Development Engineer in Testing. खूप टेक्निकल व नॉन-रिडन्डन्ट अशी मला तरी वाटली.
जरी सेलेनिअम/जाव्हा, जाव्हास्क्रिप्ट, एच्टीएमेल व सी एस एस चे मूक कोर्सेस मी केलेल आहेत तरी, कोणी उभं करत नाहीये त्या बळावर. अनुभव इज अ मस्ट Sad Sad
टेरिबल!!!

Manual testing चा ८ वर्ष अनुभव असलेल्या माझ्या एका मैत्रिणीच असंच झालंय, कंपनी switch करता येत नाहीये, अडकलीये ती, इतर बऱ्याच गोष्टी आहेत.
Autimation शिकून घेतलं तरी त्यावर प्रोजेक्ट करायला मिळणे महत्वाचे

सामो,
प्रत्येक परिस्थितीत एकच उपाय असेल असे नाही. पण तुमची आपोआप सुधारणा होण्यासाठी खालील गोष्टी ध्यानात ठेऊ शकता.
१. प्रत्येक गोष्टीला नेहमी अनेक बाजू असतात. तुमचीच बाजू, किंवा तुमचे परिस्थितीचे आकलन "बरोबर" असेलच असे नाही. एकदम बोलण्यापूर्वी, उत्तर वा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कानांचा तोंडापेक्षा जास्त वापर करा. Empathy (संवेदना, सहवेदना) असणे हा सर्वात मोठा गुण आहे.
२. Act. Never react. म्हणजे whatever you do in a work environment do it knowingly and not as an uncontrolled reaction. अर्थात हे आचरणात आणण्यासाठी खूप विचार व तुम्ही एक पाउल पुढे असण्यासाठी तुमची स्वतःची तयारी लागते.
३. प्रत्येक प्रसंगामधे आपल्याला काय साध्य करायच आहे याची clarity असणे महत्वाचे असते. एकदा का ही clarity असेल तर त्यावर focus असणे महत्वाचे आहे. ती गोष्ट साध्य करण्यात काय आड येउ शकेल/त्याज्य असेल याचा विचार महत्वाचा असतो. त्या गोष्टी ठरवून टाळाव्या. एकदा ठरवल की काहीच अवघड नसते. शिवाय काय करायलाच, बोलायलाच कसे वागायलाच पाहिजे हेही माहिती असणे महत्वाचे.
४. यश मिळवायच असेल तर आपल्या उद्देशाला साजेशी आपली वागणूक, भाषा, तांत्रीक तयारी , असलीच पाहिजे. मराठी बाणा, स्पष्ट वक्ते पणा वगैरे विसरा. याला manipulation म्हणू नका, तर तुमच्या कामासाठी आवश्यक असलेली एक महत्वाची बाब असे समजा.
तुम्हाला कधीकधी यात एक manipulative झाल्याचे वाटू शकते. पण त्यात Guilty मानण्याचे कारण नाही. आपल्या समोरचे नेहमीचे उदाहरण म्हणजे आई. तिचे आपल्याला सुधारण्याचे गोडी, गुलाबी, धाक, धपटशा हे सगळे त्या त्या वेळेस एक आवश्यक पण नैसर्गीक नाटकच असते. आपण सुद्धा जीवनात वेगवेगळे रोल करतच असतो.
५. शेवटी तुमचे Performance appraisal होते. यात Performance हा शब्द यासाठी आहे की तुम्ही एक रोल Perform करत असता. म्हणजेच ते एक समजून उमजून केलेले क्षणिक नाटक असते ज्यायोगे तुमचे यश सुनिश्चित होउ शकते.
६. "कर्तव्याच्या बाबतीत मात्र तुम्ही तुमचा रोल कसा वठवू शकता" यावर तुमचे यश अवलंबून असते. अवतरणातील वाक्याचा शब्दशः अर्थ घ्या. प्रत्येक यशस्वी व्यक्ति तिचा " रोल " व्यवस्थित, अगदी सर्व नवरसांचा वापर करून वठवत असते. म्हणूनच ऑफिसमधे अतिशय कडक वाटणार्‍या अधिकार्‍यांचे एकदम मृदू आणि घरगुती रूप पाहून आपण अचंबित होतो. Is this the same person?.

This is in short soft skill.

अफाट सुंदर व उपयोगी प्रतिसाद दिलेला आहे विक्रमसिंह.

१, २
पहीले २ मुद्दे तर मला पर्फन्स् रिव्ह्युत वारंवार (२ दा) मिळालेले आहेत. माझा इम्पल्सिव्हनेस, बराच कर्ब करते पण त्यावर काम करण्यास खूप स्कोप आहे.

हा मुद्दा मला नवीन आहे.

होय हे माझे फार चुकते. फार फार. डिप्लोमॅटिक असणे फार गरजेचे आहे. सहवेदना, संवेदना फक्त कविता वाचताना जाणवणार असतील तर उपयोग काय. यावर मी नीट विचार करेन पण येस ही तॄटी माझी मला जाणवली आहे.
५, ६
अफाट!!!
___________________
आपले मार्गदर्शन उत्कृष्ट आहे. धन्यवाद. मी नीट विचार करेन यावर.

सामो, खूप विचार करून नकारात्मक स्थितीच्या कल्पनेला ओढवून घेऊ नका. कदाचित परिस्थिती इतकी चिंताजनक नसेलही. शांत राहिले तर आवश्यक त्या बाबी शिकणे कदाचित सोपे होईल.
शुभेच्छा.

>>>>परिस्थिती इतकी चिंताजनक नसेलही>>> अनफॉर्च्युनेटली, चिंताजनक आहे. जॉब आहे का जातोय अशी परिस्थिती आहे.

सॉफ्ट स्किल्स विषयी वर लिहिलंय
मॅन्युअल टेस्टिंग मधून - ऑटोमेशन शिकणं हा एक पर्याय आहे - पण खूप वर्ष कोडींगला हात लावला नसेल तर थोडं जड जातं, टेक्निकल कामाची आवड असेल तर CICD शिकणं हा सुद्धा पर्याय आहे

अनुभव हवा असेल तर स्वतःचे ऑफलाईन प्रोजेक्ट करून git वर ठेवा त्याचा उपयोग होतो

टेक्निकल मध्ये रस नसेल तर तुमचा मॅन्युअल टेस्ट अनुभव कोणत्या क्षेत्रात आहे ते चाचपून बघा - बिझनेस अनॅलिस्ट किंवा प्रॉडक्ट ओनर असा लॅटरल चेंज करता येईल का ते तपासा

जास्त खोलात बोलायचं असेल तर snehamayee Kulkarni म्हणून linked in war शोधा आणि तिथे पिंग करा बोलू आपण - मी या क्षेत्रात जवळजवळ वीस वर्ष आहे

धन्यवाद स्नेहमयी. मी तुम्हाला लिन्कडैनवरती अ‍ॅड करते. माझा इश्यु आत्मविश्वासाची कमी हाही आहे. बोलू.
__________
पाठवलाय. आपल्यात एक कॉमन कनेक्शनही आहे.

सामो, तुम्ही धाग्यात जी जितं मया, आणि ठेका ही स्किल्स लिहिली आहेत ती फार महत्त्वाची आहेत.

आपण आपल्या पेस्केल मध्ये जे बसतं तितकंच (मोस्ट ऑफ द टाईम) बोलावं. म्हणजे प्रोजेक्ट मध्ये समजा काही तृटी असतील तर त्या सिस्टिममध्ये जिकडे दाखवायच्या तिकडी नक्कीच दाखवाव्या उदा. जिरा फाईल करणे, कॉन्फ्लुअन्सवर काही पेजेस/ टेबल्स असतील तिकडे अपडेट करणे... इ. जी काही सिस्टिम असेल त्यात वेळेवर आणि जास्तित जास्त डीटेल देऊन लिहावा. तो ज्याला कोणाला असाईन करायची पद्धत असेल त्याला असाईन करावा. पण त्याच्या/ तिच्या डेस्कवर जाऊन मिटिंग मध्ये जाऊन एखाददा बोललात तर ठीक... पण वारंवार बोलू नये. कधी तो जिरा ओपन ठेवून तुमच्या मॅनेजरची डेव्हलपमेंट/ इंजि. मॅनेजरला कात्रीत पकडण्याची ती स्टॅटेजी असू शकते. की डेव्ह. काम करत नाही... कधी आणखी काम डोक्यावर न घ्यायला ते शील्ड म्हणून वापरायचे असते.... किंवा जेन्युअनली तो जीरा तुम्हाला ब्लॉकर आणि डेव्हलपरला ट्रिव्हिअल वाटू शकतो ( Proud यावर मात्र चिकाटीने आपले म्हणणे मांडावे. पण दुसर्‍याचे ऐकुनही घ्यावे) .. की आणखी काही पॉलिटिक्स करायला ते वापरतात.
प्रॉडक्ट उत्तम बनवणे हे तुमचे एकट्याचे काम नाही. बर्ड आय व्हू नसेल तर प्रत्येकाला आपलं फीचर फार भारी वाटतं. पण दिलेल्या वेळेत दिलेल्या माणसांबरोबर, आणि त्यांच्या प्रायॉरिटीज मध्ये तो बग लिव्ह विथ होऊ शकतो.
हा सल्ला वर जायला कदाचित उपयोगी नाही... पण पॉलिटिक्समधून वर जायचं नसेल आणि जे आहे त्या कामात सुखात जगायचं असेल तर उपयोगी आहे.

अमितव, धन्यवाद. आपण कधीकधी, अति-आत्मकेंद्रित असतो . त्या भरात आपल्या हेच लक्षात येत नाही की अन्य टीममेटसचेही काही डायनॅमिक्स आहेत, पॉलिटिक्स म्हणा सॉफ्ट कॉर्नर म्हणा. त्यामुळे आपल्या दर वेळेला ठासून सांगणे (ठेका घेतल्यागत) - यामुळे, आपण रोषास पात्र होउही शकतो.
>>>> आपण आपल्या पेस्केल मध्ये जे बसतं तितकंच (मोस्ट ऑफ द टाईम) बोलावं. म्हणजे प्रोजेक्ट मध्ये समजा काही तृटी असतील तर त्या सिस्टिममध्ये जिकडे दाखवायच्या तिकडी नक्कीच दाखवाव्या उदा. जिरा फाईल करणे, कॉन्फ्लुअन्सवर काही पेजेस/ टेबल्स असतील तिकडे अपडेट करणे... इ. जी काही सिस्टिम असेल त्यात वेळेवर आणि जास्तित जास्त डीटेल देऊन लिहावा. तो ज्याला कोणाला असाईन करायची पद्धत असेल त्याला असाईन करावा. पण त्याच्या/ तिच्या डेस्कवर जाऊन मिटिंग मध्ये जाऊन एखाददा बोललात तर ठीक... पण वारंवार बोलू नये. >>>>>>> सॉलिड!!!! एकदम पट्या!! खूप महत्वाचा सल्ला आहे.

Pages