माझा प्रॉब्लेम असा आहे कि माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल्स,बारगेन/ डिबेट स्किल्स अजिबात नाहीत. निर्णय घेता येत नाहीत. आपला मुद्दा पटवता येत नाही. राग आला कि डोळ्यात पाणी येते, त्या भितीमुळे मिटिंग मध्ये बोलूच शकत नाही. कमालीची इन्ट्रोव्हर्ट आहे. विचारांची क्लेरिटी नाही. मुळात स्वतःला काय हवे आहे तेच कळत नाही. सतत समोरचा काय विचार करेल हाच विचार/भिती असते.
माझे मराठी, इंग्लिश वाचन प्रचन्ड होते पूर्वी. शिक्षण सुरु होते तोपर्यंत हुशार (?)समजले जात होते. पण बोलायला गेले कि घोडे पेंड खाते. कारण काय बोलायचे हेच मुळात कळत नाही. या अवगुणांवर मात करून personality कशी डेव्हलोप करता येईल ते सांगा.
सध्याच्या नोकरीत मॅनेजर म्हणून बढती मिळाली पण सतत मनात आपण या पदाला लायक नाही असे वाटत असते. नोकरीत ग्रोथला वाव नाही.उलट इथल्या वर्क कल्चरमुळे अधोगतीच झाली आहे. १५ वर्षे अनुभवाला बाहेर प्रोजेक्ट मॅनेजर शिवाय पर्याय मिळत नाहीत. कृपया कुठला जॉब प्रोफाइल योग्य असेल ते पण सुचवा.
अमा+१
अमा+१
व्यक्तिमत्व विकासातला एक
व्यक्तिमत्व विकासातला एक महत्वाचा भाग म्हणजे आत्मविश्वास. आणि तो वाढवताना स्वतः मधे काही बदल घडवावे लागतात. त्यासाठी माझ्या अनुभवातून मला उपयोगी पडलेल्या काही युक्त्या मी या लेखात लिहल्या आहेत. करून पहा कदाचित तुम्हालाही फायदा होईल.
अनेकान कांनी उपयुक्त सल्ले
वर अनेकांनी उपयुक्त सल्ले दिले आहेत. तुम्हाला शुभेच्छा.
रानभुली, लिन्क भारी आहे.
रानभुली, लिन्क भारी आहे. मुद्दा कळाला.
विक्रमसिंह, चर्चेच्या आधी लिहून काढून बघेन आता. आधीही काढत होते पण काय बोलायचं नाही ते आणि रिअॅक्शन याचा ही विचार करेन.
>>मराठी बाणा, स्पष्ट वक्ते पणा वगैरे विसरा --- अगदी बरोबर. हे होते माझ्याकडून. डिप्लोमॅटिक बोलता येत नाही.
>>प्रचिती चुकिच्या गोष्टींसाठी वाद घालणार नाही हे बॉसच्या/त्याच्या बॉसच्या मनात ठसणे महत्वाचे आहे --- हे पटलं
सामो, सॉफ्टस्किलच्या धाग्यासाठी धन्यवाद. धागा व त्यावरील प्रतिक्रिया उपयोगी आहेत.
रश्मी, खरंय मी पण ऑर्गनाईझ नसते. खूप गोष्टी नव्या सुरु केल्या आहेत त्यातली एक म्हणजे प्लॅनिंग करणे.
पीनी, खरं तर मी रडूबाई अजिबात नाही. अगदी माझ्या लग्नात पण मी रडले नाही. मात्र मला प्रचंड राग आला कि डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात. खरतर त्याला रडणे म्हणावे की नाही प्रश्नच आहे; पण डोळ्यातून पाणी मात्र यायला लागते. मग समोरच्याचा गैरसमज होतो. माझ्या रागाचं कारण बाजूलाच राहातं आणि वेगळाच ट्रॅक सुरु होतो.
हायझेनबर्ग , Toastmasters
हायझेनबर्ग , Toastmasters जॉईन करत आहे.
>>हरप्रकारे confrontation टाळणे हा स्वभाव असेल तर त्यातून गमावलेल्या संधी बद्दल मनस्ताप करून घेणे ही योग्य नाही - बरोबर आहे. तुम्ही म्हणता तसं मना ऐवजी डोके वापरायची सवय लावून घ्यायला हवी आहे खरं. कळतंय पण वळत नाही अशी अवस्था आहे.
अमा, छान टिप्स. सुदैवाने लहानपण माझे छान गेले. मानसिक ताण नव्हता. पण मी ओव्हर प्रोटेक्टिव्ह वातावरणात वाढल्याने असेल का काय माहित नाही पण हे स्किल्स डेव्हलपच नाही झाले.
अजय, खूप छान धागा आहे. सहज होऊ शकणारे उपाय दिले आहेत. नक्की करून बघेन.
< माझ्याकडे कम्युनिकेशन
< माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल्स,बारगेन/ डिबेट स्किल्स अजिबात नाहीत. निर्णय घेता येत नाहीत. आपला मुद्दा पटवता येत नाही.>
हे नक्की खरंच असं आहे का? की आत्मविश्वास कमी झाल्यामुळे तसं फक्त वाटतंय? याबद्दल स्वतः एकदा मागे वळून तपासून पहा. तुमच्या जवळच्या लोकांचा फीडबॅक घ्या.
अभिनेते आरशात बघून सराव करतात म्हणे. तसं आपलं म्हणणं मांडायचा सराव करा. पूर्वतयारी म्हणून त्या त्या विषयावर विचार करावा लागेल. विरोधी पक्षाकडून काय आक्षेप , मुद्दे येतील त्याचाही विचार करून त्यावरची उत्तरं तयार करा.
मीटिंगमध्ये वगैरे राग का येतो ?
बाकीचे काय बोलतात या आधी स्वतःला काय सांगायचं आहे त्यावर फोकस करा. त्यात इतरांनी त्रुटी काढल्या तर त्या स्वीकारा.
Pages