अज्ञातवासी! - भाग २८!

Submitted by अज्ञातवासी on 27 February, 2021 - 10:32

भाग २७

https://www.maayboli.com/node/78162#new

दादासाहेब तिच्याकडे बघून हसले.
"मी कधी चुकीची निवड करणार नाही."
"मूर्ख आहेस तू."
"वेडा आहे मी."
"दादासाहेब..." खानसाहेब अस्वस्थ झाले.
"खानसाहेब, घेऊन जा याला. ह्या गल्ल्या आधीच सुन्या झाल्या आहेत. अजून याची सावली नको."
"दादासाहेब... चला..." खानसाहेब त्यांना ओढतच घेऊन गेले.
"मी परत येईन मुमताज... मी परत येईन..." दादासाहेब मागे वळत तिला म्हणाले.
"पागल..." आणि ती तिथून निघून गेली.
◆◆◆◆◆
खोलीत खानसाहेब आणि दादासाहेब दोघेच बसले होते.
"इब्राहिमची बहीण आहे ती."
"इतकी सुंदर???? खरोखरच ना???"
"दादासाहेब!!!"
"सोडा खानसाहेब. चला, उद्या सकाळी हवेलीवर जायचंय."
"बरं उद्या सकाळी जाऊयात. मी बेगमला सांगून ठेवतो."
"कोणती बेगम?"
"माझी बेगम..."
"मी इब्राहिमच्या हवेलीवर जायचं म्हणतोय!"
"दादासाहेब....मतलब कुछ भी..."
"खानसाहेब. जायचंय उद्या.. तयारी करा. आणि आता मला झोपू द्या. काही चांगले स्वप्न पडायला हवेत."
"दादासाहेब."
"झोपलो. गुड नाईट."
खानसाहेबांची अस्वस्थता लपत नव्हती.
...मात्र दादासाहेबांच्या चेहऱ्यावरचं हसू तसच होतं.
शेवटी खानसाहेब बाहेर आले व जगनअण्णांकडे निघाले.
◆◆◆◆◆
मंद प्रकाशात अण्णा काहीतरी लिहीत बसले होते.
"अण्णा... येऊ?"
"अरे खान, ये ये. बस. बऱ्याच दिवसांनी आमच्याकडे?"
"हो... म्हणजे वेळच मिळत नाही."
"कळत मला. दादाची सावली बनून राहणं साधी गोष्ट नाही."
"अण्णा, आता अवघड झालंय अजून."
"म्हणजे?" अण्णांनी भुवया वर केल्या.
"दादासाहेब प्रेमात पडलेत अण्णा..."
"हात्तीच्या, एवढंच ना. अरे वयच आहे, प्रेमात पडायचं. मी तर म्हणतो योग्य वेळी प्रेमात पडलाय. सांग बरं, मुलगी कुठली, काय?"
"अण्णा..."
"बोल की..."
"मुमताज नाव आहे तिचं. इब्राहिमची बहीण..."
"महादेवा!!!" अण्णा पुटपुटले, आणि विचारमग्न झाले.
◆◆◆◆◆
"खानसाहेब, या, आज इकडे कुठे वाट चुकलात?"
"शेखावतसाहेब, वाट चुकण्याआधी मार्ग दाखवायला आलोय."
"म्हणजे?" शेखावत चरकला.
"म्हणजे आम्ही जरी वाड्यावर नसलो, तरी वाड्याच्या बातम्या आमच्यापर्यंत येतातच."
"तुमच्यावर शक घेतला शेलारांनी खानसाहेब..."
"...शेलारांनी नाही, संग्रामने."
"तेच ते..."
"तेच ते नाही शेखावतसाहेब. मी तर आता शेलारांपासून दूरच गेलोय, पण खुर्चीवर बसल्यावर तो मला सुखाने जगू देईल, याची शाश्वती नाही."
"खानसाहेब, इतना डर?"
"लगता है. बघा ना, उद्याच तुमची फॅक्टरी ताब्यात घेतली त्याने तर? संग्राम नाचेल सगळ्यांच्या डोक्यावर."
"मग संग्रामला विरोध करु म्हणतात?"
"नाही... फक्त दादासाहेबांच्या वारसाला सपोर्ट करा."
"मोक्ष?"
"हो, येतोय तो परत. मी आणेल त्याला. नामधारी असला, तरी शेवटी वारसदार तोच असेल...
...आणि आपल्या हातातही...." खानसाहेब हसले.
शेखावत त्यांच्याकडे बघतच राहिला.
"खानसाहेब, तुमच्या निष्ठेची उदाहरणे दिली जातात, आणि आज तुम्ही...?"
"माझी निष्ठा दादासाहेबांवर होती आणि कायम राहिली... मात्र आता मलाही माझा वाटा घ्यावा लागेल."
"कसला वाटा?"
"माझ्या मानाचा! त्या संग्रामने मला अपमान करून बाहेर काढलंय, आता वेळ आलीये शेलारांच्या जोखडातून मुक्त होण्याची."
"खानसाहेब विश्वास बसत नाही." शेखावत हसला.
"शेखावतसाहेब, हे कडं तुमच्याकडे ठेवतोय. घ्या, विश्वास बसत नसेल तर..."
शेखावत खानसाहेबांकडे बघतच राहिला.
"मला खुर्चीवर मोक्ष हवाय. मोक्ष शेलार, आणि सगळे धागे आपल्या हातात..." खानसाहेबांनी शेखावतकडे बघितले.
"तसच होईल मग." शेखावतने समाधानाने सुस्कारा सोडला.
◆◆◆◆◆
"खान बदलला, काळ बदलतोय मित्रांनो." पांडे हसला...
"खानाने आपल्या बाजूनेच डाव टाकलाय. चला, तुम्हा तिघांची निष्ठा आणि आमचं स्वातंत्र्य, दोघेही सोबत मिळतील." शेखावत म्हणाला.
"दादासाहेबांचा मुलगा आहे शेखावत, सांभाळून." डिसुझा म्हणाला.
"सांभाळूनच आहे. तर... जर मोक्ष शेलार परत येत असेल, तर तुमची सगळ्यांची त्याला मान्यता आहे?"
सगळ्यांनी माना डोलावल्या.
..आणि शेखावत समाधानाने हसला...
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच!
अज्ञात, कथेवरची तुमची पकड वाखाणण्याजोगी आहे!!

छान

@पद्म - धन्यवाद. तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी
@रुपाली - धन्यवाद. तुमचा प्रतिसाद कायमच हुरूप वाढवतो.
@गौरी - Thanks! You made my day.... Happy
@लावण्या - तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद आणि नेहमीच्या प्रोत्साहनासाठी आभार!

छान!!!!

खूप छान!!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

मागचे चार-पाच भाग आत्ताच वाचले , गॉडफादर ची आठवण होतेय का ?
भूतकाळ , वर्तमान काळ यांच्यातलं context switching आवडलं Happy

@स्नेहा रोहित - धन्यवाद. तुमचा प्रतिसाद हुरूप वाढवतो.
@गार्गी - after long time.... Welcome back.
@rani - धन्यवाद
@श्रद्धा - धन्यवाद... गॉडफादर खूप अभिजात कलाकृती आहे, त्याची आठवण येणं हा मी कथेचा बहुमान समजतो
@आसा - धन्यवाद