कायद्यासमोर सर्व समान?

Submitted by सचिन पगारे on 24 February, 2021 - 06:44

सध्या महाराष्ट्रात जे पुजा चव्हाण हीच्या मरणा वर राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्र युपीच्या रांगेत उभा राहतोय की काय असे वाटण्याजोगे दुर्दैवी आहे. एक जीव गेलाय त्यावर राजकारणी त्यांची पोळी भाजत आहे. ज्या मंत्र्याचा या प्रकरणाशी संबंध आहे असे बोलले जातेय तो मंत्री बारा दिवस पसार काय होतो नंतर समाजापुढे येउन भाषण काय देतो हे सर्व लाजीरवाणे आहे.

स्त्रियांच्या बाबतीत एक निरीक्षण आहे की त्या अशा प्रकरणाबाबत पक्ष पाहुन वागतात. भाजपचे प्रकरण असेल तर विरोधी पक्षाच्या स्त्रिया आक्रमक होतात नि इतर पक्षांचे असेल तर भाजपनिष्ठ स्त्रिया आक्रमक होतात... माझ्या मते स्त्रियांनी पक्षनिष्ठा, नेत्यावरील निष्ठा बाजुला सारुन अशा प्रकरणात स्त्रिया ंवरील अन्यायाला महत्व द्यावे. जर एखाद्या स्त्रीवर अन्याय होतो तेव्हा स्त्रि आमदार, खासदार, नगरसेवकांनी पक्ष भेद बाजुला ठेवुन आपला एक दबाव गट बनवावा. कुठलाही प्रभावशील व्यक्ती असो कुठल्याही पक्षाचा असो त्या प्रकरणी पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी एकत्र यावे हा आपल्या पक्षाचा तो दुसर्या पक्षाचा असा भेद करु नये.

जॉर्ज ऑर्वेल या लेखकाने 'अ‍ॅनिमल फार्म' कादंबरीमध्ये सांगितल्याप्रमाणे, कायद्यासमोर सर्व समान असतात, पण काही जण अधिक समान असतात. वर्तमान राजकीय, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये वारंवार त्याचे प्रत्यंतर येत असते. आपल्या अवतीभवती अधिक समान असलेले खूप सारे लोक वावरत असतात आणि त्यांच्यासाठीचे मापदंड इतरांपेक्षा वेगळे असल्याचे वारंवार सगळ्या यंत्रणा दाखवून देत असतात.

आपण कितीही संस्क्रुतीचा टेंभा मिरवत असलो तरी शेवटी ही पुरुषप्रधान संस्क्रुती आहे. स्त्रि जातीवरील अन्याया बाबत जात पात, पक्ष, नेता, धर्म न बघता स्त्रियांनी एकत्र यायला हवे. नाहीतर अशा कित्येक अबला न्यायावाचुन बळी पडतील व लोक दुसरा विषय मिळेपर्यंत चर्चा करतील.

Group content visibility: 
Use group defaults

नानबा, मायबोली ने चारचार दा हाकलून दिलेल्या आयडींचे काय एव्हढे मनावर घेता!

त्यांच्या नावापुढे अजुन बरीच टिंबे वाढलेली दिसतात.... मधल्या काळात परत परत हकालपट्टी झालेली दिसतीय Proud

अन्वय नाईक प्रकरणात मराठी स्त्रीवर अन्याय होतोय म्हणून गळे काढणारे पुजा चव्हाण प्रकरणात एकदम सुमडीत गप्प आहेत!

अन्वय नाईक प्रकरणात मराठी स्त्रीवर अन्याय होतोय म्हणून गळे काढणारे पुजा चव्हाण प्रकरणात एकदम सुमडीत गप्प आहेत!

Pages