स्पर्श

Submitted by आर्त on 8 February, 2021 - 15:19

ही कविता इथे टाकताना थोडी मनात भीती चुरचुरत आहे. विषय सगळ्यांना पटेल असा नाही. पण एका बदलत्या युगाची ही एक बदलती गाथा. १८ वर्षा खालील वयोगटासाठी अनुचित. धन्यवाद.

स्पर्श त्याचा झाला पहिला,
धर्माच्या तटबंदीस तडे गेले,
रात्र चढत गेली तशी,
तुकडे तुकडे कोसळले.
चुंबन चुंबन ओठांचे,
चिंब चिंब ओले,
अनावर भावनांच्या वर्षावात,
रूढी-नियम भिजून गेले.
गलबत पिढ्या पिढ्यांचे,
कागदासारखे ढासळले,
काळीमेची खोटी भीती ओलांडून,
तितकेच निरपराध मानस उरले.
थरथरले माझे अंग कुमारी,
सळसळल्या नसात रक्ताच्या धारी,
नग्न दोन्ही वक्षे खिळली,
अनभिज्ञता तुमची उघड्यावर पडली,
आजलग तथ्यहीन भय दाखवले,
धाडसाचे सुख तुम्हाच ना कळले.

- आर्त

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults