मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग ६

Submitted by कविता१९७८ on 6 February, 2021 - 03:06

बर्‍याच ठीकाणी घरात किंवा कुटुंबात सतत कलह होत असतो. घरातील किंवा कुटुंबातील एक व्यक्ती अतिशय वरचढ स्वभावाची असली तर दुसरी व्यक्ती शांत असावी म्हणजे नाती निभावता येतात पण बर्‍याच ठीकाणी सगळेच वरचढ आणि समोरच्याला न जुमानणारे असले की सतत वादावादी सुरु असते आणि यात चुक नसणारेही भरडले जातात. © Copy Right by Kavita Patil बर्‍याचदा क्षुल्लक कारणावरुनही कलह होतो याला मुख्य कारण म्हणजे अहंकार. अहंकार जपण्यासाठी माणुस सतत दुसर्‍याला दुखावत असतो आणि कमी लेखत असतो. "मला काहीही फरक पडत नाही" असे कीतीही म्हंटले तरीही आपल्याला या गोष्टीचा फरक पडतोच. आपला अपमान झाला असेल तर तो अपमान सतत आपल्या मनात घोळत असतो आणि आपली मन:शांती भंग करत असतो , आपल्याला अस्वस्थ करतो, आपलं लक्ष दुसर्‍या कामात लागत नाही. बर्‍याचदा त्यामुळे अहंकार निर्माण होउन बदल्याची भावना निर्माण होते. © Copy Right by Kavita Patil तर ज्याने अपमान केला असेल त्याच्याही मनात ही गोष्ट सतत घोळत राहते , त्या व्यक्तिचा अहंकार सुखावला जातो. कुठे ना कुठे त्याचंही मन अस्वस्थ होतं आणि मीच कसा / कशी बरोबर आहे किंवा योग्य वागलो / वागले याची कारणे मोठ्या चवीने चघळली जातात. परीणामी दोन्ही बाजुंनी नकारात्मक उर्जा आमंत्रीत केली जाते.

यासाठी सतत आपण आपल्या डोळ्यासमोर आपण सगळ्यांशी खुप चांगल्या प्रकारे वागत आहोत आणि समोरचेही आपल्याशी अगदी प्रेमाने वागत आहेत असे पाहत राहावे. © Copy Right by Kavita Patil यासाठी पुढील सकारात्मक विधान योग्य ठरेल,

"मी सर्वांशी अत्यंत आदराने ,विनम्रतेने आणि प्रेमाने वागत आहे."

इथं लक्षात घ्या वरील सकारात्मक विधानात कुठेही अहंकार या शब्दाचा वापर केला गेला नाही म्हणजे

"मी अहंकार मुक्त झालो / झाले आहे"

असे कुठेही नमुद केले गेले नाही कारण त्याचा सामावेश करणे म्हणजे कुठेतरी अहंकाराची उर्जा आमंत्रित करणे म्हणुन सकारात्मक विधान बनवताना नेहमी चांगल्या गोष्टींचा उल्लेख करावा.

लक्षात घ्या आपण दुसर्‍या व्यक्तिमधे बदल घडवुन आणु शकत नाही पण आपण स्वत:ला बदलु शकतो. © Copy Right by Kavita Patil मान सन्मान , प्रेम हे कुणाला दुखवुन किंवा जबरदस्तीने , हिसकावुन मिळत नाही तर ते आपल्या वागणुकीने कमवावे लागते. याचा अर्थ असाही नाही की समोरच्याच्या वाईट वागणुकीला विरोध करु नये पण जर त्यामुळे आपली मन:शांती बिघडत असेल तर स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रयत्न करावेत तेही दुसर्‍याला काही त्रास न देता.

मी सकारात्मकतेचे मेडीटेशन घेताना स्वत: मधे चांगले आणि सकारात्मक बदल घडवुन आणणे यावर जास्त भर देते आणि लोकांना स्वत:मधे फरकही जाणवतो.

(क्रमश:)

पेज लिंक

https://www.facebook.com/Kavita-M-Patil-342749063467349/

भाग — ५

https://www.maayboli.com/node/78031

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults