मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग ५

Submitted by कविता१९७८ on 5 February, 2021 - 00:31

#गुजगोष्टीस्वलेखन

क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग ५

तर या महामारीच्या सुरुवातीच्या काळात जगभर भीतीचे सावट पसरले होते. सर्वांसाठी हा व्हायरस अगदीच नविन होता आणि मुख्य म्हणजे भराभर पसरणारा होता. काळजी म्हणुन प्रत्येक देशात लाॅकडाउन झाले. जनतेला घ्यावयाच्या खबरदारीच्या सतत जाहीराती सुरु झाल्या. मास्क लावणे , सॅनिटायझरने हात धुणे , बाहेर निघतानाची घ्यावयाची काळजी , बाहेरुन घरात आल्यावर घ्यावयाची काळजी अशा सर्व सुरक्षिततेचे मापदंड पाळले गेले. © Copy Right by Kavita Patil या काळात काही व्यक्ति न घाबरता बाहेर राजरोसपणे फीरत होत्या तर काही खुप जास्त तणावाखाली होत्या. दिवसभर सतत सॅनिटायझर ने हात धुणे , कुणाच्याही सानिध्यात न येणे, पुढे त्यांची ही अतिदक्षता आणि भिती खुप जास्त वाढली आणि अशा व्यक्तिंमधे जास्त प्रमाणात नकारात्मकता आली. बर्‍याच व्यक्ति इतक्या अतिदक्ष नसल्या तरीही लाॅकडाउनमुळे घराबाहेर पडता न आल्याने मानसिक तणावाखाली आल्या , त्यांना आपल्याला सतत कुणीतरी कोंडुन ठेवले आहे असे वाटु लागले. पुर्ण वर्षभर शारीरीक आरोग्याची काळजी घेता घेता बर्‍याचजणांचे मानसिक आरोग्य पणाला लागले.

हे दडपण घालविण्याकरीता सतत सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. कारण या महामारीमुळे जगभरातच असुरक्षिततेची भावना बळावली गेली आहे त्यातुन बाहेर पडणे गरजेचे आहे. © Copy Right by Kavita Patil बर्‍याच जणांचे उपजीवीकीचे साधन गेल्यामुळे सगळे होत्याचे नव्हते झाले त्यामुळे आलेली असहायता यातुनही बाहेर पडणे गरजेचे आहे. तर एखादी व्यक्ति जी सध्या अशा दडपणाखाली वावरत असेल तिने आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण शारीरीक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी आणि आनंदी आहोत असे डोळ्यासमोर आणावे. या बरोबर आपल्या सभोवतालची मंडळी आणी पृथ्वीवरची सर्वच माणसे निरोगी आहेत आणि आपापले जीवन योग्य प्रकारे जगत आहेत अशी कल्पना करावी. यासाठी पुढील सकारात्मक विधान बनवता येईल.

"मी आणि माझ्या सभोवतालची सर्व मंडळी ही निरोगी , आनंदी , सुखी आणि समाधानी आहेत."

बर्‍याचदा एखादा दुर्धर आजार झाला की माणसे कोलमडुन जातात आणि घाबरुनच ती व्यक्ति मृत्युला शरण जाते. © Copy Right By Kavita Patil अशावेळी इच्छाशक्ती आणि सकारात्मकता असणे जास्त महत्वाचे असते. झालेले स्वीकारुन त्यापुढे कसे करता येईल हे व्यवस्थित ठरवुन आल्या प्रसंगाला सामोरे गेले की बर्‍याचदा दुर्धर आजारापासुनही सुटका होते. अशावेळी सतत आपल्यावर योग्य ते उपचार होत आहेत , आपले शरीर त्या उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे आणि आपण रोगमुक्त झालो असुन नेहमीप्रमाणे स्वत:चे जीवन आनंदाने आणि सकारात्मकतेने जगत आहोत असे डोळ्यासमोर पाहत रहावे. तसेच योग्य ते उपचार घेत रहावेतच. यासाठी पुढील सकारात्मक विधान फायदेशीर ठरेल.

"मी निरोगी , धडधाकट असुन नवचैतन्याने माझे जीवन जगत आहे / व्यतित करत आहे."

(क्रमश:)

© Copy Right by Kavita Patil

पेज लिंक

https://www.facebook.com/Kavita-M-Patil-342749063467349/

भाग— ४

https://www.maayboli.com/node/78017

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा स्वभाव थोडा स्वप्नाळू आहे. कर्क राशीचे साईड इफेकट, अजून काय Lol

त्यामुळे प्रत्येक गोष्टीत पुढे अमुक्तमुक होणार याचे स्वप्नरंजन सुरू होते. दुर्दैव हेच की अमुक होईल अशी परिस्थिती असूनही तसे होतच नाही. त्यामुळे अमुक व्हावे अशी जेव्हा तीव्र इच्छा असते तेव्हा मी त्याबद्दल विचार करणे बंद करते कारण असा विचार सुरू केला की ते होतच नाही Sad Sad

दिवास्वप्ने सगळेट पाहतात हो राशीचा काहीच संबंध नाही, मी मिथुन राशी आहे आणि तुम्ही म्हणताय तसं पुढे काय होईल याची स्वप्ने पाहुन पार. पण सकारात्मक स्वप्ने पाहणे नेहमी चांगले.