मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग ४

Submitted by कविता१९७८ on 2 February, 2021 - 23:47

गेलं वर्षभर या अचानक आलेल्या महामारीमुळे जगभर जनजीवन विस्कळीत झालं. सुरुवातीचे काही दिवस तर भयाण भीतीत गेले. सर्वजण मृत्युच्या सावटाखाली वावरत होते. आपल्यातील काहीजणांवर मृत्युने झडप घातली देखिल. © Copy Right by Kavita Patil खरं पाहीलं तर जो जीव जन्माला आला त्याचा मृत्यु अटळ आहे. प्रत्येकाची जायची वेळ ठरलेली असते निमित्त मात्र वेगवेगळं असतं पण ठरलेल्या वेळेत त्या जीवाला जावंच लागतं. पण आपल्या जवळचं कुणी गेलं तर तो आपल्यासाठी आघातच असतो. घरातील व्यक्ती असेल तर त्यांचं जीवनच बदलुन जातं. जवळच्या व्यक्तिंसाठी हा सर्वात मोठा मानसिक आणि भावनिक आघात असतो. त्या व्यक्तिच्या जाण्याने एक पोकळी निर्माण होते. या महामारी दरम्यान खुप लोक हे जग सोडुन निघुन गेले. या महामारीच्या भयानक सावटाबरोबरच मेलेल्या माणसांच्या जवळच्या व्यक्तिंना हा मानसिक आणि भावनिक धक्का पचवणे खुप कठीण गेले.© Copy Right by Kavita Patil महामारीमुळे आलेली नकारात्मकता आणखी दृढ होउन गेली. त्यातच कोविड पेशंटचे अंत्य दर्शन त्यांच्या घरच्या मंडळींनाही दुरापास्त झाले होते. जीवन क्षणभंगुर वाटु लागले.

वास्तव पाहता मृत्यु ही एक स्थिती आहे. आपला आत्मा अमर असतो. या जगात त्याला शरीर आणि मेंदु मिळालेला असतो त्यामुळे तो आनंद , सुख , वेदना , दु:ख याची अनुभूती करु शकतो आणि मृत्युनंतर शरीर नष्ट झाल्याने त्याच्या सर्व वेदना , दु:खे नष्ट होतात आणि तो या जगातुन दुसर्‍या जगात स्थलांतरीत होतो.© Copy Right by Kavita Patil तिथे शरीर नसल्याने आत्मा हा वेदनारहित होतो. पण आपल्याला त्याच्या जाण्याने अतीव दु:ख होतं कारण आपल्याला गेलेली व्यक्ती नेमकी कुठे गेली किंवा तिचे मृत्युनंतर काय झाले हे माहीत नसते. अशावेळी आपण बर्‍याचदा खुप नकारात्मक विचार करतो. आपल्या मनावर प्रचंड दडपण आलेलं असतं , आपण प्रचंड ताण—तणावाखाली वावरु लागतो. अशा वेळी आपली नकारात्मकता सकारात्मकतेमधे बदलण्याचा सर्वात महत्वाचा पहिला उपाय म्हणजे त्या मृत व्यक्तिला आनंदी , समाधानी आणि शांततेत पाहणे. त्या व्यक्तिला जीवंत असताना ज्या गोष्टी त्याला मिळाल्या नाहीत त्या सर्व मिळाल्या असुन ती व्यक्ती परीपुर्ण , समाधानी , आनंदी आणि शाततेत आहे असे पाहणे. यासाठी दररोज दिवसातुन १५ मिनिटे एका शांत जागी डोळे बंद करुन बसावे. © Copy Right by Kavita Patil आणि पुढील सकारात्मक व्यक्ती शांत , समाधानी आणि आनंदी आहे असे दृश्य डोळ्यासमोर आणत राहावे.

" (त्या व्यक्तिचे नाव) शांत , समाधानी , परीपुर्ण आणि आनंदी असुन तीने / त्याने यशस्वीरीत्या त्याच्या / तिच्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे."

तसेच आपल्याला जर त्या व्यक्तिला काही सांगायचे असेल तर ते ही क्रिएटिव्ह व्हिझ्युअलायझेशनच्या दरम्यान आपण त्या व्यक्तिपर्यंत पोहोचवतोय अशी कल्पना करावी.

थोडयाच दिवसात आपल्याला फरक जाणवु लागतो. © Copy Right by Kavita Patil आपण त्या नकारात्मकतेतुन बाहेर तर येतोच पण आपणही पुन्हा या जगरहाटीच्या चक्रात परत येतो आणि गेलेल्या व्यक्तिबरोबर घालवलेले आनंदी क्षण आठवुन आनंदी राहतो.

(क्रमश:)

पेज लिंक

https://www.facebook.com/Kavita-M-Patil-342749063467349/

भाग — ३

https://www.maayboli.com/node/78022

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults