मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग ३

Submitted by कविता१९७८ on 3 February, 2021 - 08:38

आपल्याला जर सतत आनंदी आणि सुखी राहायचे असेल तर ते आपण सतत क्रिएटिव्ह व्हिझ्युअलायझेशनद्वारे आपल्या डोळ्यासमोर आणु शकतो. प्रत्येकाच्या आनंदाच्या , सुखी राहण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. © Copy Right by Kavita Patil आपल्याला काय मिळाल्याने आपण आनंदी आणि सुखी होउ शकतो त्या प्रमाणे आपण आपल्यासाठी सकारात्मक विधाने बनवु शकतो. जसे मला मनाची शांती हवी आहे आणि त्यामुळे जर मी आनंदी राहणार असेन तर "मला योग्य ती मन:शाती मिळाली आहे आणि मी सतत आनंदी आहे" हे सकारात्मक विधान माझ्या क्रिएटिव्ह व्हिझ्युअलायझेशनसाठी योग्य आहे अजुन यात मी आणखी उद्दीष्ट ही जोडु शकते जसे मला सतत सकारात्मक राहायचे आहे तर मी वरील विधानातच ते जोडु शकते म्हणजे माझे विधान पुढील प्रमाणे बनेल.© Copy Right by Kavita Patil

" मला योग्य ती मानसिक शांती मिळालेली आहे आणि मी सतत आनंदी आणि सकारात्मक बनले आहे."

लक्षात घ्या आपल्या सगळ्या ईच्छा / ध्येये आणि उद्दीष्टे पुर्ण करण्यासाठी आपण मानसिक , भावनिक आणि शारिरीक रीत्या निरोगी आणि सकारात्मक असणे महत्वाचे आहे. एखादी व्यक्ती जर सतत आजारी होत असेल तर तो आजार फक्त शारिरीक नसुन बर्‍याचदा मानसिक आणि भावनिक लेव्हलवरही बिघाड झालेला असतो. © Copy Right by Kavita Patil त्यासाठी पुढील विधान उपयुक्त ठरु शकते.

"मी शारीरिक , मानसिक आणि भावनिक रीत्या सुदृढ आणि निरोगी आहे."

सतत आपण अॅक्टीव्ह असणे , चिंतारहीत आणि आनंदी वातावरण आपण आपल्या डोळ्यासमोर सतत पाहणे आणि आपल्या मेंदुला तश्या सुचना देणे. जोडीला योग्य तो आहार आणि ओषधे घेत राहणे गरजेचे. थोड्याच दिवसात आपल्याला स्वास्थ्यात फरक जाणवायला लागतो. हळुहळु बरे वाटायला लागते.© Copy Right by Kavita Patil औषधे कमी होउन बर्‍याचदा ती बंदही होतात.

आपल्या सर्वांमधे एक काॅमन गोष्ट म्हणजे राग येणे. यासाठी बरीच कारणे असतात. आलेले वाईट अनुभव , सतत मिळणारी वाईट वागणुक , आपल्या मनासारखे न घडल्यामुळे होणारी चिडचिड , असहायता , अपेक्षाभंग आणि या सर्वांमधुन बाहेर पडता न येणे. समोरच्याने वाईट वागणुक दिली की आपला अहंकार दुखावला जातो. आपल्याला संताप येतो , चिडचिड होते मग आपण समोरच्याला कसे दुखवायचे याचा विचार करु लागतो थोडक्यात बदला घेण्याची भावना आपल्या मनात वाढीस लागतो आणि परिणामी आपण आणखी दु:खी होउन बसतो आणि हे सर्वांच्या बाबतीत होतं.© Copy Right by Kavita Patil पण वेळीच जर आपण भानावर आलो तर पुढचे अनर्थ टळु शकतात. यासाठी आपण पुढील वेगवेगळी विधाने बनवु शकतो.

"मी आतापासुन खुप शांत संयमी बनलो / बनले आहे."

किंवा

"मी सतत शांत आणि संयमी असुन सर्वांशी प्रेमाने वागत आहे."

इथे लक्षात घ्या आपण वरील सकारात्मक विधानांमधे कुठलाही नकारात्मक शब्द टाकला नाहीये. © Copy Right by Kavita Patil मला राग येत नाही या वाक्यात राग आहे म्हणजे ती उर्जा आपण सतत घोळवु शकतो म्हणुन त्याजागी मी शांत आहे असे लिहीले म्हणजे आपण शांततेची उर्जा आपण आकर्षित करत आहोत.

(क्रमश:)

पेज लिंक

https://www.facebook.com/Kavita-M-Patil-342749063467349/

भाग — २

https://www.maayboli.com/node/78003

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults