मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग २

Submitted by कविता१९७८ on 1 February, 2021 - 22:35

तर क्रिएटिव्ह व्हिझ्युअलायझेशन कसं करावं ? कुणाला याचा फायदा होउ शकतो ? कुठल्या गोष्टी व्हिझ्युअलाइज करायच्या?? हे आपण या भागात पाहुया. बर्‍याच जणांना असं वाटत असतं की आपल्या बाबतीत काही चांगल घडणारच नाही. © Copy Right by Kavita Patil आपण काहीही करु शकत नाही आणि सतत हेच आपल्या मनात असल्याने एक प्रकारची नकारात्मक उर्जा आपणच आपल्या मनात तयार करत असतो पण आपण अगदी याउलट प्रयत्न केला म्हणजे सतत सकारात्मक विचार केला की आपल्य बाबतीत सगळं चांगलच घडतंय , आपण आनंदी आहोत , सुखी आहोत तर आपण सकारात्मक उर्जा निर्माण करु शकतो आणि आपल्या ईच्छा , ध्येये पुर्ण करण्यासाठी योग्य ती पाउले उचलु शकतो.

या ईच्छा, ही ध्येये , उद्दीष्टे ही केवळ भावनात्मक स्तरांवर असु शकतात असे नाही तर आपण आपली शारीरीक , मानसिक आणि अध्यात्मिक ध्येयेही क्रिएटिव्ह व्हिझ्युअलायझेशन द्वारे साध्य करु शकतो. © Copy Right by Kavita Patil थोडक्यात क्रिएटिव्ह व्हिझ्युअलायझेशन करणे म्हणजे दिवास्वप्न पाहणे पण आपल्या ईच्छा आणि ध्येये आपण क्रिएटिव्ह व्हिझ्युअलायझेशनद्वारे पुर्ण करु शकतो आणि त्यासाठीचा लागणारा आत्मविश्वास , सुदृढ आणि सकारात्मक मानसिक आणि शारीरीक आरोग्यही आपण मिळवु शकतो. हे सगळे करण्यासाठी आपल्याला काही सकारात्मक उद्दीष्टे / ध्येये / ईच्छा आपल्याला जशा प्रकारे पुर्ण व्हाव्याश्या वाटत असतील तशा प्रकारे बनवाव्या लागतात आणि सतत आपल्या मनात तसे विचार आणुन या सर्व गोष्टी प्रत्यक्षात पुर्ण झाल्या आहेत अशी कल्पना करावी लागते.

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तिमधे आत्मविश्वासाची कमतरता असेल तर त्या व्यक्तिने "मी आत्मविश्वासु बनलो आहे अथवा बनले आहे" असे सकारात्मक विधान (Affirmation) / उद्दिष्ट ( Intention ) बनवावे आणि ते सतत आपल्या मनात आणि डोळ्यासमोर दिवसभर आपल्याला जेव्हा निवांत वेळ मिळेल तेव्हा पाहत राहावे. © Copy Right by Kavita Patil त्याचबरोबर आत्मविश्वास कमी होण्याची कारणे शोधुन त्यावरही सकारात्मक विधाने बनवुन आपल्याला आपला त्या दिशेने प्रयत्न करता येतात. जसे एखाद्या व्यक्तिला कधी ना कधी कुठल्यातरी गोष्टीमधे अपयश आले असेल किंवा त्या व्यक्तिच्या मनात सतत ती व्यक्ती आयुष्यात काहीच करु शकत नाही असे कुणीतरी ठासवले असेल किंवा एखाद्या मानसिक / भावनिक किंवा शारिरीक आघातामुळे जर ती व्यक्ती आपला आत्मविश्वास गमावुन बसली असेल तर त्या प्रसंगातील नकारात्मकता काढुन तो प्रसंग सकारात्मरीत्या घडला आहे सतत डोळ्यासमोर पाहुन आपण आपल्याला आत्मविश्वास परत मिळवण्यास मदत होते. याची कल्पना करताना आपण जर त्याला अध्यात्माची जोड दिली म्हणजे मेडीटेशन / रेकी आणि तत्सम विद्या तर हे विचार अजुन प्रभावशाली बनतील.

(क्रमश:)

पेज लिंक

https://www.facebook.com/Kavita-M-Patil-342749063467349/

भाग — १

https://www.maayboli.com/node/78000

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.