मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग १

Submitted by कविता१९७८ on 1 February, 2021 - 12:39

क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन म्हणजे नेमकं काय?? तर माणुस हा पृथ्वीवरचा एकमेव प्राणी आहे की ज्याला विचार करण्याची बुद्धी देवाने दिली आहे. © Copy Right by Kavita Patil आपल्या या विचार करण्यावर सतत आपल्या अनुभवांचा आणि भावनेचा पगडा असतो. जसे एखाद्याला एखाद्या गोष्टीचा वाईट अनुभव आला असेल तर तो त्या गोष्टी टाळतो पुन्हा त्या वाटेला जायच्या भानगडीतच पडत नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या अनुभवांवरुन आपण सकारात्मक किंवा नकारात्मक बनत जातो आणि दु:खी बनतो , निराश होतो.© Copy Right by Kavita Patil सुख — दु:ख हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे. असा कुणीही माणुस नाही ज्याला कधीच कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागला नसेल. आर्थिक असो , शारीरीक असो , मानसिक असो किंवा भावनिक असो प्रत्येकाला या आगीतुन जावेच लागते. यातुनच माणुस आशावादी किंवा निराशावादी बनतो. बर्‍याचदा अपयश आल्यावर काही माणसे मेहनत घेउन यशापर्यंत पोहोचतात पण बर्‍याचदा बर्‍याचजणांना निराशा पचवता येत नाही. पण आपल्याला या निराशेतुन बाहेर पडता येऊ शकतं फक्त त्यासाठी आपल्याला आपली विचार करण्याची पद्धत बदलावी लागते. © Copy Right by Kavita Patil आपण स्वत:च जर आपल्या बाबतीत काही चांगले घडणारच नाही अशी समजुत करुन घेतली तर आपण तीच एनर्जी आकर्षित करतो आणि मग तसंच घडतं. तर मग जर आपण चांगला विचार करुन चांगल्या गोष्टी आकर्षित केल्या तर????

होय. असं घडु शकतं पण ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबुन आहे. त्यासाठी गरज आहे सकारात्मक सुदृढ मनाची. आपलं मन जर सुदृढ असेल तर आपल्या मनात आपोआप सकारात्मक विचार येतील. © Copy Right by Kavita Patil त्यासाठी आपल्याला आत्मविश्वासाचीही तेवढीच गरज आहे. स्वत:ला सांगुन पहा.. होय मला बदलायचंय , मला यशस्वी व्हायचंय , मला सुखी — आनंदी व्हायचंय. आणि त्यासाठीची पहीली पायरी म्हणजे क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन. शब्दश: अर्थ घ्यायचा म्हणजे कल्पक दृश्य पाहणे. म्हणजे नेमकं काय करणे?? तर आपण जसे एखादी गोष्ट करताना ती सकारात्मक रित्या यशस्वी झाली आहे असा विचार करणे. © Copy Right by Kavita Patil म्हणजे जर एखाद्याला त्याचे शिक्षण कुठल्याही अडथळ्याशिवाय पुर्ण व्हावेसे वाटत असेल तर आधी आपल्या मनात सकारात्मक विचार आणुन ते यशस्वीरीत्या पुर्ण झाले आहे हे सतत डोळ्यासमोर पाहत राहणे किंवा हा सकारात्मक विचार मनात सतत आणणे.

(क्रमश:)

पेज लिंक

https://www.facebook.com/Kavita-M-Patil-342749063467349/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला एक समस्या येते. ही समस्या आहे कि नाही माहीत नाही.
उदा. समजा मायबोलीवर एखादा लेख आहे. तो वाचताना सहमत नसेन किंवा असेन, पण उत्तर द्यायचं ठरवताना मी विचारात जाते. इतक्यात काही काम येतं किंवा काही न काही कारणास्तव ते टंकायचं राहून जातं. नंतर थोड्या वेळाने मी तो प्रतिसाद दिलाच आहे असं समजते. हे वाटणं खूप खरं खुरं असतं. कधी कधी मी त्याला उत्तर आलंय का म्हणून चेक करते तेव्हां तिथे माझा प्रतिसाद नसतो. त्या वेळी वाटतं की उडवलेला दिसतो. हे असं बरेचदा झालं आहे.
हे असं विचारात गढून गेल्यानंतर खरं खरं वाटणं असं होतं. पण त्याचा त्रास नाही काही.

बर्‍याचदा काही व्यक्ति व्हाॅटस् अॅप वर लेख काॅपी पेस्ट करतात , म्हणुन प्रत्येक पॅरेग्राफमधे काॅपीराईट देत असते.