हिंदी रिअ‍ॅलिटी शोज (गाणे) - इंडीयन आयडॉल, सारेगमप, सिंगिंग सुपरस्टार इत्यादी सर्व सीझन्स

Submitted by रानभुली on 31 January, 2021 - 10:44
Indian Idol season 12

सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोज बद्दल इथे चर्चा करावी. डान्स शोज साठी वेगळ्या धाग्यावर चर्चा करावी. सध्या सोनी वाहीनीवर इंडीयन आयडॉलचा १२ वा सीझन चालू आहे. झी वाहीनीच्या शो ची वेब ऑडीशन्स संपली आहेत. त्यामुळे तो लवकरच भेटीला येणे अपेक्षित आहे. याशिवाय विविध शोज आता सुरू होतील
या व इतर शोजच्या ज्या सीझन्स वर यापूर्वी चर्चा झालेली नाही त्यातल्या उल्लेखनीय परफॉर्मन्स बद्दलही इथे चर्चा करू शकता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वेळचे बहुतेक रिअ‍ॅलिटी शोज खूप जास्त नाटकी आहेत. पण इंडीयन आयडॉल सर्वांचा कळस आहे.
काव्या लिमयेचा आवाज मला आवडला. गातेही छान. काही वेळा प्लेबॅक सिंगरप्रमाणे वाटली. चिराग छान गातो.
नवदीप वडालीची पार्श्वभूमी समजल्यावर त्याचं इथे काय काम असं वाटलं. त्याने इंडीयन आयडॉल मधे येणे म्हणजे दिलीपकुमार, नसीरूद्दीन, कमल हसन सारख्या अभिनेत्यांनी अभिनय सम्राट नामक एखाद्या अभिनयाच्या रिअ‍ॅलिटी शो मधे भाग घेणं.
वडाली ब्रदर्स आणि त्याचे आजोबा यांचं त्यांच्या नावाने घराणं आहे. असा स्पर्धक जर पॉप्युलर व्होट्स मिळाले नाहीत म्हणून बाद झाला तर वाईट होईल. नवदीपवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही. पण या शो ची पात्रता चर्चेला येईल. असा स्पर्धक या शो च्या आवाक्याच्या बाहेरचा आहे.

विनीत सिंगच्या बाबतीत सारखेच इमोशनल होणे वैतागवाडी आहे. त्याच्या बद्दल गेस्ट्स नेहमी चांगले बोलतात. कदाचित सूचना असाव्यात.
पंजाबी पारंपारिक ड्रेस मधे येते ती एक स्पर्धक आणि अनुष्का पात्रा या गुणी आहेत. अशा स्पर्धकांना जज्जेसची कमी मतं मिळाल्यावर इंटरेस्ट संपला.

हल्ली इन्डीयन आयडॉल चा ठराविक फॉर्मॅट झाला आहे. स्पर्धकांचा काहीतरी पर्सनल गुण अवगुण शोधून त्यावर सतत जोक्स, थोडे फ्लर्टिंग, कोणाची तरी इमोशनल साइड. तेच तेच पाहुणे, अधे मधे फिल्म प्रोमोशन्स. पण खरं तर बरेचसे स्पर्धक छान गात आहेत. नवदीप तर अप्रतिम! त्यांच्यासाठी बघते मी अधून मधून, बाकीचे सगळे बकवास फॉरवर्ड करून.

कंटाळवाणा आहे यावेळी हा सीझन. स्पर्धक...आवाज चांगले आहेत पण गाणी फारच रटाळ, भावना शुन्य आवाजात गातात. मोकळ्या आवाजात गात नाहीत. बऱ्याच उडत्या चालीच्या गाण्यांचापण टेम्पो कमी ठेवतात त्यामुळे, गाण्यातली मजाच निघून जाते. आत्ता आठवणारं उदाहरण म्हणजे 'पन्नाकी तमन्ना ' हे गाणं. मस्त उडत्या चालीचं आहे. पण अक्षरशः भजन गायल्या सारखं गातात.
बाकी टिपी तर फॉरवर्डच करते मी.

मैत्रेयी माझे उलट आहे - मी नवदीप चे फॉरवर्ड करतो.. एक नवदीप आणि एक ती 15 वर्षाची मुलगी जी मुलांच्या आवाजात गाऊन नॉइज क्रिएट करते...

स्पर्धकांचा काहीतरी पर्सनल गुण अवगुण शोधून त्यावर सतत जोक्स, थोडे फ्लर्टिंग, कोणाची तरी इमोशनल साइड. तेच तेच पाहुणे, अधे मधे फिल्म प्रोमोशन्स. पण खरं तर बरेचसे स्पर्धक छान गात आहेत. नवदीप तर अप्रतिम! >>>> +१

बऱ्याच उडत्या चालीच्या गाण्यांचापण टेम्पो कमी ठेवतात >> छान निरीक्षण. स्केल पण कमी निवडतात. गेल्या सीझन मधे ऐसा समा हे लताजींचे गाणे खालच्या स्केलमधे ऐकताना मजा नाही आली. रेंज नसेल तर निवडू नयेत अशी गाणी.

रितो रिबाचा विवाद स्क्रीप्टेड वाटला. एखाद्या स्पर्धकाने शो बद्दल वाईट मत मांडले असताना त्याला घेणं, त्याच्याकडून शो चांगला आहे हे वदवून घेणं. त्याने स्वतः बनवलेल्या चालींचं कौतुक करणं आणि थिएटर राऊंड मधे त्याला अशक्य वाटणारं टास्क देऊन तिथल्या तिथे गाणं बनवल्यावर त्याला काढून टाकणे हे रितो रिबाला सहानुभूतमाहितीवून देणारे ठरेल हे मेकर्स ला माहितरितोसेल असे वाटत नाही.
त्यानंतर अवघ्या काही तासातच रितो रिबाचं गशोणं एका म्युझिक कंपनीकडून आलं. लगेचच इंडीयन आयडॉल शो मधे अर्धे गायलेलं गाणंही लागोपाठ आलं. यावरून ती गाणी आधीपासूनच बनलेली असावीत असे वाटले. कदाचित त्या म्युझिक कंपनीचा हा नवा लाँचिंग फंडा असावा. गेल्या सीझनला जेली तामीन ला काढून टाकल्यावर जो विवाद झाला होता त्या आधारे ही स्ट्रॅट्रर्जी वापरली गेली असावी.

Pages