Submitted by रानभुली on 31 January, 2021 - 10:44

सिंगिंग रिअॅलिटी शोज बद्दल इथे चर्चा करावी. डान्स शोज साठी वेगळ्या धाग्यावर चर्चा करावी. सध्या सोनी वाहीनीवर इंडीयन आयडॉलचा १२ वा सीझन चालू आहे. झी वाहीनीच्या शो ची वेब ऑडीशन्स संपली आहेत. त्यामुळे तो लवकरच भेटीला येणे अपेक्षित आहे. याशिवाय विविध शोज आता सुरू होतील
या व इतर शोजच्या ज्या सीझन्स वर यापूर्वी चर्चा झालेली नाही त्यातल्या उल्लेखनीय परफॉर्मन्स बद्दलही इथे चर्चा करू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयडॉल मी आधी बघायचे नाही. पण
आयडॉल मी आधी बघायचे नाही. पण इतक्यात ३-४ वर्षे त्यांनी फॉर्मॅट बदलल्यापासून मजा येतेय बघायला. त्यांचा लाइव्ह ऑर्केस्टृआ मस्त आहे, एक से एक वादक आहेत. कुणीतरी दिग्गज वादक पण बोलवतात कधी कधी, कधी एखादे वेगळे माहित नसलेले वाद्य आणून त्या थीम वरची गाणी घेतात ते आवडतं. गरिबी ड्रामा, फालतू जोक्स फॉरवर्ड करायचे. मनिष पॉल होस्ट होता तेव्हा त्याचे जोक्स खरंच एन्टरटेनिंग वाटायचे. आदित्य नाही आवडत मला. जजेस पैकी विशाल आवडतो. हिमेस रंगीबेरंगी असला तरी आय हॅव टु अॅडमिट , बर्याच वेळा सेन्सिबल बोलतो
नेहा कक्कर मात्र असह्य होते.
हिंदी सारेगम पूर्वी चांगला फॉर्मॅट होता. आता ते ३० जज पॅनल वगैरे आणल्यापासून बोर होते बघायला.
गजेंद्र सिंग सोनीकडे गेले. ते
गजेंद्र सिंग सोनीकडे गेले. ते त्यांचा स्टाफ घेऊनच गेले.
सोनीचे संजय सर झी कडे गेले.
नेहा कक्कर ऑटो ट्युन प्रॉडक्ट
नेहा कक्कर ऑटो ट्युन प्रॉडक्ट आहे, तिच्यापेक्षा सगळ्या गायिका चांगल्या आहेत इथल्या !
नेहा कक्कर ही मिमिक्री
नेहा कक्कर ही मिमिक्री आर्टिस्ट आहे गायिका नाही.
एक प्रश्न नेहमी पडतो की सर्व
एक प्रश्न नेहमी पडतो की सर्व सिंगिंग शोज मध्ये ठरलेली गाणीच का गायली जातात?
प्रत्येक भागासाठी ठरलेली थीम असते ( जसे की लग्न, रेट्रो)
कुमार सानू,उदित नारायण आले की त्यांची ठरलेली गाणी.
ज्यात नेहमीचीच गाणी असतात.
वेगळ्या धाटणीची गाणी फार कमी गायली जातात.
पब्लिक ला काय हवं they know
पब्लिक ला काय हवं they know very well म्हणून तर. सब TRP का मामला है. यामुळेच तर तेच तेच स्पर्धक तेच तेच जज बोर होतंय आता. एवढ्या सवासौ करोड देशवासियांमधे फक्त तेवढे आठ दहा लोकं च इंडियन आयडॉल असतात नेहमी
एक प्रश्न नेहमी पडतो की सर्व
एक प्रश्न नेहमी पडतो की सर्व सिंगिंग शोज मध्ये ठरलेली गाणीच का गायली जातात? >>> त्यांच्याकडे हक्क घेतलेली जी गाणी आहेत तीच शो मधे अलाऊड आहेत. बरीच गाणी त्याचे हक्क न मिळाल्याने वगळतात. गजेंद्र सिंह झी कडे होते तेव्हां त्यांनी झी साठी ब-याच गाण्यांचे हक्क घेऊन ठेवलेत. त्यामुळे इतरांची आणि त्यांची स्वतःची सुद्धा अडचण झाली. ते आता बहुतेक सोनी मधे पण नाहीत.
त्यांच्याकडे हक्क घेतलेली जी
त्यांच्याकडे हक्क घेतलेली जी गाणी आहेत तीच शो मधे अलाऊड आहेत.
>>>
हो,बरोबर हे लक्षातच आले नाही.
पवनदीपच्या बहीणीचा आवाज ऐका
पवनदीपच्या बहीणीचा आवाज ऐका.
https://www.youtube.com/watch?v=TGg30_fBqkE
ही पवनदीप ची बहीण आहे हे कसं
ही पवनदीप ची बहीण आहे हे कसं कळलं? वॉव सुंदर गायलीय!! नंतर पुढे आली का ती?
मी फॉलो करत होते तिला. छोटी
https://www.youtube.com/watch?v=7IRlVx34YyE
ही पवनदीप ची बहीण आहे हे कसं
ही पवनदीप ची बहीण आहे हे कसं कळलं? वॉव सुंदर गायलीय!! नंतर पुढे आली का ती?<<
<<<
तिचे व्हिडिओज युट्युबवर व्हायरल गेले इतक्यात पवनदीप आयडॉल मधे आल्यापासून !
पनदीपने गायलेल तेरे मिट्टीमे मरजावां त्याच्या बहिणीनेही मस्तं गायलाय, खूप लोकांनी शेअर केल होतं , हे पण बघा
https://youtu.be/aIraVwxz3kY
एकदम मिट्टीकि खुशबु म्हणतात तसा आवाज आहे, पुढच्या सिझनला बोलावतील तिलाही
आणि हे बहिण भावांनी एकत्र गाय्लेलं व्हर्जन पण फार मस्तं आहे https://youtu.be/tJRlJHmwkII
आजच्या एपिसोडची लिंक मिळाली
आजच्या एपिसोडची लिंक.
https://www.youtube.com/watch?v=Ri1vlsmiIdA
वर दिलेल्या लिंकवर आता
वर दिलेल्या लिंकवर आता व्हिडीओ उपलब्ध नाही म्हणून पोस्ट एडीट करायला आले होते. माझा मात्र पाहून झाला आजचा एपिसोड.
सर्वांचेच परफॉर्मन्सेस खूप सुंदर झाले. पण अरूणिता, पवनदीप आणि आशिश - षण्मुख यांचे उल्लेखनीय. सर्वात छान अरूणिताचा झाला. यांचे परफॉर्मन्सेस मला एफर्टलेस वाटतात. सायलीचा ही खूप दमदार झाला. पण का कोण जाणे मला ती एफर्टलेस वाटत नाही. खूप रट्टा मारून गायल्यासारखे वाटते ती. कदाचित काही एपिसोडसमधे तसे वाटले असेल. अनुष्काच्या आवाजाचं कौतुक वाटतं. तिने गाणी लताची घ्यावीत. छान वाटतील.
नचिकेतने आज त्याला न्याय देतील अशी गाणी नाहीत निवडली. याचा फटका बसू शकतो. त्याने थोडीशी शास्त्रीय बेस असलेली घ्यावीत. पण पद्मिनी कोल्हापुरे आणि पूनम धिल्लाँ यांच्याच चित्रपटातील घ्यायची असल्याने अडचण झाली असेल.
यातलं कुणी जावं असं वाटत नाही. सायली किंवा नचिकेत यांपैकी कुणीतरी पुढच्या आठवड्यात जाईल ही भीती वाटते . दानिश पण दमदार आहे. पण त्याचा आवाज एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही. असे गायक खूप असतात. तो गेला तर वाईट वाटणार नाही.
मस्तं झाला आजचा एपिसोड , ती
मस्तं झाला आजचा एपिसोड , ती ८० च्या दश्कातली गाणीच मुळात इतकी भारी आहेत, टोटल नॉस्टेलजिआ !
पवनदीप, अरुनिमा, अनुष्का, सायली , श्रीशा यांची गाणी आवडली !
गेले २ एपिसोड नचिकेत अॅव्हरेजच गातोय, गेला तर आश्चर्य वाटणार नाही आणि इतके सगळे मराठी काँटेस्टन्ट्स नकोही असतील कदाचित शो मेकर्सना पण तो अर्जितची गाणी गाणारा सिंगर नचिकेतच्या आधी जायला हवा.
वाइल्ड कार्ड राउंड आणि त्या युवराजची पोटेन्शिअल एंट्री कधी होतेय पहायला हवे !
श्रीशा , सायली , अनुष्का या मुलींना मौसम बदल दिया रेटिंग फार कमी मिळते.
आत्ता पर्यन्त जजेस्स्चे फेवरेट पवनदीप, दानिश्, आशिश , षण्मुखप्रिया, अंजली हे दिसतायेत, कदाचित हेच टॉप ५ असतील !
हो. जज्जेस कडून ज्यांना कमी
हो. जज्जेस कडून ज्यांना कमी मार्क्स मिळतात त्यांचेच पब्लिक व्होटिंग पाहिले जाते. म्हणजे सेफ करणे पहिल्यांदा जज्जेसच्या हातात आहे.
आजची गाणी वेगळीच होती, एक
आजची गाणी वेगळीच होती, एक दोन सोडली तर बाकी एरव्ही फारशी गायली गेल्याचे आठवत नाही रिअॅलिटी शोज मधे. छान वाटले ऐकायला.
बाकी आलेल्या दोन्ही पाहुण्या बोर करत होत्या.
आज हनीसिंग यक्स !!
आज हनीसिंग यक्स !!
पण त्याचं डिप्रेशन, त्यातून बाहेर पडणं यावर बोलला तर ऐकायचंय.
आज अंजलीच्या परफॉर्मन्सची प्रतिक्षा आहे. मला तारोचा आवाज आवडतो.
आशीष आणि षण्मुखचे स्वतंत्र गाणे असेलच. आज तो हा सवाई भट चांगला गायला म्हणे.
अजचा यो यो एपिसोड कालच्या
अजचा यो यो एपिसोड कालच्या सारखा छान नाही झाला, आशिष कुलकर्णी चांगलाच गायला पण ते ‘काला टिका ‘ रेटिंग वगैरे फार झालं दंगा गाण्यांसाठी

आशिष, ष्ण्मुख, दानिश यांना फार हाइप केलं जातय असं वाटतय, चॅनलची व्होटिंग/ टिआरपी गणितं असतील यामागे
दानिश बद्दलचं मत मागे घेते.
दानिश बद्दलचं मत मागे घेते. त्याचा आवाज ८० किंवा ९० च्या गाण्यांना सूट होत नाही. पण कालच्या एपिसोडमधे छा गया. अलिकडे अशा गाण्यात घोगरा किंवा चिरका आवाज सर्रास वापरतात. षण्मुखप्रिया ग्रेटच आहे. अंजली सुपर्ब. आशीष कुलकर्णी रॉक्स !
व्हॅलेंटाइन डे स्पेशल
व्हॅलेंटाइन डे स्पेशल अपेक्षेप्रमाणे रटाळ झाला. नेहा कक्कड आणि तिचा तत्तड बघवत नाहीत. जगात जसं काही हिचं एकटीचंच लग्न झाले आहे आणि जगावेगळे कपल असल्या सारखे करते ती. माझं कौतुक करा, मला लाजू द्या मोड मध्ये असते कायम ती.
त्या मानाने आदित्य आणि श्वेता सहनेबल होते. हिमेश पण बहुतेक चॅनेल ने दिलेल्या सूचना फाट्यावर मारून गाण्यात लक्ष देत होता.
भारती असह्य असते एरव्ही पण या वेळी विशाल ला एकटे पडू न देण्याची तिने काळजी घेतली असे वाटते.
हा आठवडा नाही आवडला, तेच ते
हा आठवडा नाही आवडला, तेच ते बोरिंग गेस्ट्स, पुन्हा नो एलिमिनेशन
दोन्ही दिवस फार खास नव्हते.
दोन्ही दिवस फार खास नव्हते. त्यातल्या त्यात धर्मेन्द्र -आशा पारेख चा भाग चांगला होता. त्यांची इतकी चांगली गाणी असून चॉइस फार चांगला नव्हता.
व्हॅलेन्टाइन डे तर बकवास एपिसोड. कोणी कुठले गाणे म्हटले हेही ५ मिनिटानंतर लक्षात राहू नये. आणि मधले आचरट संवाद तर फा. फॉ.
दोनच लक्षात राहण्यासारख्या गोष्टी :
१. ये कहां आ गये हम - वाईट कारणासाठी लक्षात राहिले. मै और मेरी तनहाई !! बिग बी चे काव्यमय बोलणे त्या दानिश च्या शेळपट आवाजात आणि अंदाजात ????? बिग मिस्टेक! अक्षम्य अपराध. गळा दाबावासा वाटत होता त्याचा.
२. अंजली आणि सवाई चे रश्के कमर - हे एकमेव गाणे छान झाले म्हणून लक्षात राहिले.
ये कहां आ गये हम - वाईट
ये कहां आ गये हम - वाईट कारणासाठी लक्षात राहिले. मै और मेरी तनहाई !! बिग बी चे काव्यमय बोलणे त्या दानिश च्या शेळपट आवाजात आणि अंदाजात ????? बिग मिस्टेक! अक्षम्य अपराध. गळा दाबावासा वाटत होता त्याचा.
<<
खरय, बिग बी चे ते शब्द कोणाच्याच आवाजात ऐकु शकत नाही, फार तर अभिषेक बच्चन म्हणु शकेल सिमिलर आवाज असल्यामुळे, बाकी कोणीही ट्राय सुद्धा करु नये !
मी पाहिलच नाही ते गाणं , ट्रेलर बघूनच पास!
आज मम्मी स्पेशल असल्यामुळे
आज मम्मी स्पेशल असल्यामुळे भरपूर ड्रामा होता, फॉरवर्ड बटन घेऊनच बसा , उगीच फुटेज सगळ्या आयांना !
मला अनुष्काचा ‘लुक्काछुपी बहुत हुई ‘ परफॉर्मन्स आवडला , मस्तं गायली पण पवनदीपने तिच्या गाण्यात साथ देऊन ओव्हरपॉवर केलं ते गाणं, मस्तच गायला, भरपूर क्रेडीट मिळवलं , ए.आर रेहमानची गाणीच वेगळ्याच लेव्हलची आहेत !
सवाई सुध्दा छान गायला.
दानिशला काय असे फायर फाइटरसारखे कपडे दिले होते
ष्णमुखप्रिया बोअर होते आता, घालवा तिला आता !
बरोबर.
बरोबर.
अनुष्काने आज तिच्या आवाजाला न्याय दिला. पण उशीर झाला ही भीती वाटते. सर्वात चांगलं टेक्शचर असून गाण्याची निवड किंवा आत्मविश्वासाचा अभाव किंवा अन्य काही कारणे असतील ती मागे पडलीय.
मनोज मुन्ताशीर हिंदीतले दवणे आहेत का ?
पण उशीर झाला ही भीती वाटते.
पण उशीर झाला ही भीती वाटते.
<<
नाही, ठेवतील तिला , देतायेत आजकाल एक्पोजर तिला.
मला सायली, नचिकेत पैकी कोणीतरी एक लवकरच घालवतील असं वाटतय, टु मेनी मराठी काँटेस्टन्ट्स फॉर देम !
सायली खर तर चांगली गातेय !
प्रथमेश लघाटे वगैरे मंडळी
प्रथमेश लघाटे वगैरे मंडळी असलेला लिटील चँप शो सुरु असताना एक व्यंगचित्र आले होते.त्यात वाक्य होते. नंतर हे आवाज ऐकायला येतीलच असं काही नाही
आणि ते खरंच ठरलं.आर्या आंबेकर अभिनेत्री आणि रोहीत राऊत हे दोघेच आता चमकताहेत.
दानिश आज पुन्हा छान वाटला.
दानिश आज पुन्हा छान वाटला. पण मेलडी मधे मार खातो. आवाज घोगरा आहे. विशाल कडे चांगला स्कोप आहे त्याला.
सायली स्वतःकडून काही व्हॅल्यू अॅडीशन करत नाही. तिला स्टेश शोजची सवय आहे. आहे तसं गाणं हुबेहूब गाणं. अरूणिता, भगवतुल्ला आणि प्रिया या काही न काही छाप सोडतात स्वतःची गाण्यावर. सायलीचं गाणं हे लता आशाचंच राहतं.
तारो पण कोणतंही गाणं स्वतःचं बनवून गातो.
सायली आणि नचिकेत गेले तरी आश्चर्य नाही वाटायचं. या वेळी मात्र मागच्या दोन सीझनप्रमाणे नाही. मागच्या दोन्ही सीझनला सलमान आणि सन्नी हे सर्वात पुढे होते. तसं आता होत नाही. सवाई पण जाऊ शकतो. जायला पाहीजे.
आणि ते खरंच ठरलं.आर्या आंबेकर
आणि ते खरंच ठरलं.आर्या आंबेकर अभिनेत्री आणि रोहीत राऊत हे दोघेच आता चमकताहेत<<
I think Ketaki Mategaokar doing good too!
Pages