हिंदी रिअ‍ॅलिटी शोज (गाणे) - इंडीयन आयडॉल, सारेगमप, सिंगिंग सुपरस्टार इत्यादी सर्व सीझन्स

Submitted by रानभुली on 31 January, 2021 - 10:44
Indian Idol season 12

सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोज बद्दल इथे चर्चा करावी. डान्स शोज साठी वेगळ्या धाग्यावर चर्चा करावी. सध्या सोनी वाहीनीवर इंडीयन आयडॉलचा १२ वा सीझन चालू आहे. झी वाहीनीच्या शो ची वेब ऑडीशन्स संपली आहेत. त्यामुळे तो लवकरच भेटीला येणे अपेक्षित आहे. याशिवाय विविध शोज आता सुरू होतील
या व इतर शोजच्या ज्या सीझन्स वर यापूर्वी चर्चा झालेली नाही त्यातल्या उल्लेखनीय परफॉर्मन्स बद्दलही इथे चर्चा करू शकता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॅकी श्रॉफ एपिसोड धमाल झाला !
काय स्टाइल आहे त्याची, एनर्जी, त्याचा ड्रेसिंग सेन्स, स्क्रीन प्रेझेन्स ..... टु गुड !
मधेच त्यानी धोती मागवली, आपली आपली नेसला, कुर्ता फाडून मोठ्या साइझचा बनवला Biggrin
सगळीच गाणी छान झाली पण अरुणिता आणि सायलीची गाणी फार मस्तं झाली, सवाई सुध्दा चांगला गायला त्याला राजस्थानी लोकगीत मिळाल्यामुळे!
हिमेश इतकी स्तुति करतो तरी सायली मार्क्स बेसिस वर कशी बॉटम मधे जाते कळत नाही !
श्रीषाच्या आधी निहाल, एके पैकी कोणी गेला असता तरी चालल असतं !

जॅकी त्याच्या कामवाल्या मुलीच्या आजी मयत झाल्या म्हणून मावळात त्यांच्या घरी जाऊन जमिनीवर बसला होता. त्याच्या वागणुकीत दिखाऊपणा नाही वाटत. काल अरूणिताला काला टिक्का कुणीच लावला नाही. तिला एकता कपूरने मालिकेत काम द्यायचं आश्वासन दिलंय.

दानिश कित्येक एपिसोडनंतर आवडला. नाहीतर त्याचा घोगरा आवाज काही केल्या आवडून घेता येत नव्हता. फॉलसिटो मध्ये सुसह्य झाला काल.
काल पुन्हा नचिकेतचा परफॉर्मन्स आवडला. गाणी चांगली मिळाली कि कशी जादू होते !
अरूणिताने गाणी निवडली कि तिला तशी दिली जातात हे कळालं नाही, पण तिची गाणी भावखाऊ होती. ती गायली खूप छान. अंजलीने कमाल केली. तिला पुढच्या वेळी पहिल्या दहा मिनिटात संधी मिळायला हवी. तिला घालवण्याचे उद्योग चालू आहेत हे दिसतंय. श्री षा पण चांगली होती. पण दक्षिणेत इंडीयन आयडॉल कुणी बघत नसावेत.

जॅकी खरंच कसला एनर्जेटिक आहे! एकदम धमाल करत होता. कोरस गाणे, नाचणे वगैरे.
गाणी ओके टाइप्स होती मोस्टली, निहाल ला ते लॉकेट आणि ते कूल जॅकेट कशाला Angry पडेल कुठला. नकीच कुणाचा तरी "वरचा हात" आहे त्याच्या डोक्यावर.
सवाईचे गाणे अर्थात भाव खाऊन गेले. काल चक्क शण्मुखप्रियाचे पण गाणे बरे वाटले. आदित्य ने त्यातल्या त्याच्या लहानपणच्या लाइन्स गायल्यामुळे मजा आली Happy

जॅकीचा एपिसोड जितेंद्रच्या एपिसोडपेक्षा मस्त झाला. मजा आली. अरुणिता आणि सायली मस्तच गात आहेत. शण्मुख प्रियाच्या व्हेरिएशन्सचा प्रचंड कंटाळा आलाय. आदित्यने रंगीलामधील ओळी गायल्याने मात्र मजा आली. सिरिषा उगाच लवकर गेली. निहाल, सवाई, दानिशच्या आधी तिचे जाणे पटले नाही. तिला व्होट्स कमी वगैरे थापा वाटतात. अंजलीला शेवटी ठेवत असले तरी ती सुद्धा खूप एकाच टाईपची गाणी गाते, काहीवेळा खूप जास्त क्लासिकल बेस दाखवायला जाते. त्यामुळे जर तोचतोचपणा आलाय तिच्या पर्फॉर्मन्समध्ये.

तोचतोचपणा आलाय तिच्या पर्फॉर्मन्समध्ये. >>>> हो हे खरं आहे.
पण गाणी कोण कोणती गाणार हेही चॅनल ठरवते, हाही एक फॅक्टर आहेच.
काल तिला हाय रामा ये क्या हुआ द्यायला हवं होतं. तिच्या कम्फर्ट बाहेर आहे पण तरी चॅलेन्जिंग आहे ते गाणं.

मुळात बॉटम ५ ठरवणे जजेसच्या मार्क्स वर आहे त्यामुळे बर्यापैकी मॅनिप्युलेट करता येत असावं जरी व्होट्स प्रमाणे रिझल्ट्स देत असतील तरी !
थोडक्यात पवनदीप, दानिश, षण्मुख , अरुणिता हे कधीही बॉटम ५ मधे येणारच नाहीत , पब्लिक व्होट करो किंवा नाही , हे तर स्ट्रेट टॉप ४ आहेत जजेसचे !

सिरीषा चांगली होती त्यामानाने लवकर घालवलं तिला त्यापेक्षा ते निहाल सवाई जायला हवे होते आधी.

थोडक्यात पवनदीप, दानिश, षण्मुख , अरुणिता हे कधीही बॉटम ५ मधे येणारच नाहीत , पब्लिक व्होट करो किंवा नाही , हे तर स्ट्रेट टॉप ४ आहेत जजेसचे >>>> हो नाहीतर काय . हे खरंच कितपत वोटींग होतं आणि त्याचा कितपत विचार केला जातो शंकाच आहे. मला आजकाल हा शो फुल्ली स्क्रिप्टेड वाटतो म्हणजे सगळे जजेसच्या हातात आहे कोणी केव्हा जाणार ते. पवनदीप दानिश अरूणिता यांपैकीच विनर असणार शेवटी. खास करून अरुणिता, ही किती सुंदर आहे. अरे बास की बाबांनो कळलंय सर्वांना ते प्रत्येक भागात हा डायलॉग टाकल्याने वाढतोय का काय यांचा trp ? बाकीच्या कंटेस्टंट मुलींना कसं वाटत असेल असा विचार येतो.

अजय अतुल चा भाग पाहिला काल सोनी लिव्ह वर.. त्यात सगळ्यांचे गाणे नाही आहेत. फक्त नचिकेत च्या गाण्या पर्यन्त च आहेत.!
अंजली, सायली आणि निहाल चे गाणे नाही..
बाकी ह्या भागाच्या वरील पोस्टिना मम..
एक विशेष म्हणजे बासरी वादक आणि xexophone वादक भारी एकदम.! संपूर्ण music ची टीम च जबरदस्त आहे. शब्दच नाहीत वर्णन करायला.!!
आणि एक.. अरूनिता, पवन दीप ला चॅनल प्रमोट करतंय का?
हिमेश म्हटला की.. मै लडकी होता तो तुमसे मोहोबत हो जाती..
त्यावर नेहा म्हणते.. अरू निता के गालो पे लाली आती है आणि शरमाती है..!! हे काय आहे!!

युएसए स्पेशल (उदीत / समीर अंजान / अनु मलिक) एपिसोड छान झाला आजचा. पुन्हा एकदा ९० च्या गाण्यांनी मजा आली.
अनु मलिक कसेही असोत पण जान आणतात कार्यक्रमात. नाटकीपणा वगैरेमुळे करमणूक होते.
नेटक-यांनी झापल्याने आज सर्वांना वाव मिळाला. आज जज्जेस कडून मुक्त हस्ते मौसम बदल दिया झालं. त्याचं लॉजिकच इतके दिवस लक्षात येत नव्हतं.
सायलीकडून शिकण्यासारखी एक गोष्ट - इतके दिवस चांगले गात असताना डावलले जातेय हे दिसत असूनही तिने आपली क्षमता अजून जिद्दीने वाढवत नेली. अरूणिता नक्कीच खूप दर्जेदार गायिका आहे. तिला ड्यु क्रेडीट मिळतंय. पण सायली इतकीही वाईट नाही.
आज दानिशचा आवाज आवडला. निहालला त्याच्या टाईपचं गाणं मिळालं. खुलला गडी. त्याची अरिजितची आणि कुणालची गाण्याची शैली सारखी आहे.
आशीष कुलकर्णी, नचिकेत आणि अंजली तिघांनीही खूप मस्तं गायलं आज. दोघांना मोसम बदल दिया मिळालं.
सवाई भटला पण त्याच्या आवाजाला सूट होऊल असं गाणं मिळालं.
एकूणात चांगलाच झाला एपिसोड.
टॉप परफॉर्मर - पवनदीप

परवाच्या भागात नचिकेत आऊट झाला आणि ते निहाल सवाई अजूनही सेफ आहेत.. omg झालं न्यूज वाचून. क्या कमाल का जजमेंट है बॉस मान गए... त्याच्यासाठी मधे मधे बघत होते आता ते पण नाही बघणार. इस सीझन का इंडियन आयडॉल है ... सवाई Proud

नचिकेत बाद झाला हे वाईट झालं. तो भागही छान झाला होता.
नीतू सिंग ऋषी कपूरच्या गाण्यांनी मजा आणली. काय गाणी आहेत दोघांची !

मूर्खपणा आहे. फारच ऑब्व्हियस करतायत हे लोक. निहाल, सवाई, इवन आशिष सुद्धा गेला असता तर चालले असते.
बाकी त्यांचे टॉप ५ ठरलेच आहेत.
होली आणि जजेस सिंग अलाँग मधे नेहा काय भयंकर बेसुरी गात होती Uhoh

होली आणि जजेस सिंग अलाँग मधे नेहा काय भयंकर बेसुरी गात होती>>> तर काय . ती स्वत: स्पर्धक असतानाचे व्हिडिओ पण आहेत. फार भयाण गायली आहे आणि आज जज आहे आणि चांगल्या लोकांना आऊट करतेय :डोक्यावर हात मारलेली बाहुली:

रेखा स्पेशल इंडिअन आयडॉल अफलातून झाला. सायली आणि अरुणिताची दोन्ही गाणी अप्रतिम झाली. षण्मुख प्रिया “ कैसी पहेली“ गाणार ह्याचाअंदाज होताच, पण तिचा डान्ससुद्धा मस्त झाला. पवनदीप बरोबर ढोलकी वाजवायचा अभिनय रेखाने फार मस्त केला. वन ऑफ द बेस्ट एपिसोड्स नक्कीच म्हणता येईल.

रेखा फार कृत्रिम, डेस्परेट फॉर कॅमेरा अटेन्शन आणि किडिश वाटली !
जितकी ती तिच्या आयकॉनिक मुव्हीज मधे आवडते तितकीच पब्लिक अपिअरन्सेस मधे टु मच ड्रामेबाज वाटते , अर्थात तरी काही आठवणी ऐकायला छान वाटल्या, मॅरीड मॅन बद्दल वन लायनर सुध्दा फन्नी तरी एक्स्पेक्टेड Happy
मला सायली, अरुणिता आणि अंजलीची गाणी आवडली , मुलांमधे कोणीच नाही आवडलं !
पवनदीपच्या फुटेजचा तर जाम कंटाळा आलाय आता , फॉरवर्ड करते मी !
आह होप नेक्स्ट टाइम तरी फेअर एलिमिनेशन करतील , सायली डिझर्व्ह्स टु बि इन टॉप ५ , तिला घालवलं तर सोडीनच मी पहाणे !

काहीच पहायला मिळत नाही. कसाबसा रेखावाला मिळाला युट्युबवर. पहात आहे. काय सुंदर दिसते अजुनही! विशाल भयंकर बारीक झालाय.
पहिल्यांदाच ऐकली सर्वांची गाणी. खरं सांगु? ‘सारेगम’ने लखलखते कलाकार आणून प्रेक्षकांना लाडावून ठेवले आहे त्यामुळे यातले कितीही चांगले असले तरी त्यांच्यापुढे कमीच वाटले. (दोष माझा आहे) Happy . त्यातल्या त्यात आंखोकी मस्ती आवडले.
पिवळा रेशमिय्याला जास्त बोलायला दिले नाही ही कृपा.

यातले कितीही चांगले असले तरी त्यांच्यापुढे कमीच वाटले. (दोष माझा आहे) >> कंसातील वाक्यामुळे हृदयनाथ मंगेशकर बोलताहेत असं वाटलं.

रेखा एपिसोड भन्नाट झाला. एकूण एक परफॉर्मन्स छान झाले. निहाल तारोचा खूपच छान झाला. मला एके आवडतो तो त्याच्या स्टेज प्रेझेन्स साठी. प्रोमो मधे त्याच्याकडून बोलण्यात काही तरी चूक झाली असे दाखवत होते. आशीष असे करणार नाही ही खात्री होती, प्रत्यक्षात तो फुसका बार निघाला.

हेमामालिनी आजही किती टवटवीत दिसतात. त्यांचा चेहरा तजेलदार दिसतो. त्या मानाने रेखा यांच्या चेह-याकडे बघवत नव्हते अनेक दा. तरूण दिसण्याचा अट्टाहास असल्याने असेल कदाचित. सर्जरी केलेली देखील जाणवत होती. आहे तशा आल्या असत्या तर आहे तशा भावल्या असत्या कदाचित. आशा पारेख पण नाहीत का वय स्विकारून वावरत ?

पण त्या धमाल आहेत हे नक्की. या वयाच्या मुलांशी छान संवाद साधला. प्रत्येकाचा सत्कार करण्यासाठी शाल आणली.
या स्टेजला कुणालाही एलिमिनेट करणे हे आव्हान आहे. कुणीही गेलं तरी ओरड होणारच आहे. इथपर्यंत जे पोहोचले ते सगळेच विजेते वाटतात. अर्थात दानिश विजेता होऊ नये. त्याच्याबद्दल कोणतीही नकारार्थी भावना नाही. पण घोगरा आवाज आणि विजेता हे काही पटणार नाही. सवाईसुद्धा विजेता होऊ नये. आशीष आणि दानिश हे संगीतकार म्हणून पुढे येऊ शकतील.

पवनदीप, अरूणिता, सायली, निहाल , शन्मुख प्रिया हे स्पर्धक प्लेबॅक साठी योग्य वाटतात. सायली आणि अरूणिता मधे अरूणिता थोडी उजवी वाटते.

इथे वाचून इंडियन आयडल बघायला सुरवात केली..
खूपच आवडतेय.. सर्वच मस्त आहेत..एक से बढकर एक आहेत.. माझे फेवरेट अरुणिता, षण्मुख प्रिया, सायली, दानिश, आणि निहाल..
पवनदीप पण आवड्तो पण का कुणास ठाऊक.. तो गाणे गाताना,त्यात फिलींग जाणवत नाही..
टॉप ५ मध्ये अरुणिता, षण्मुख प्रिया, सायली, दानिश आणि पवनदीप असतील असं वाटतयं.. बघूया.. विजेता ह्यावेळी मुलगी च असेल असंही वाटतयं..! अरुणिता किंवा षण्मुख प्रिया....
जजेस मध्ये विशाल आणि हिमेश च बरे..नेहा तर प्रत्येक गाण्यात काहीना काही ऑक्टिंग करत असते.. जजींग कधी करते मग.?
आणि बर्याच भागांमध्ये.. डुएट गात आहेत.. कसे काय स्कोर देत आहेत काय माहित..!
नीतु सिंगचा भाग बघितला काल.. सर्व गाणी छान झाली.. छुकर मेरे मनको..ईतकं नाही आवडलं. पण.. अरुणिता आणि पवनदीप चं डुएट.. अपनी आवाज मिला दो मेरी आवाज से.. एकच नं..!!

रेखाच्या एपिसोडमध्ये पवनदीप किती वेळ गात होता, मला वाटलं बाकीचे गाताय कि नाही आज? चक्क बोअर होत होता आणि.
अरुणिताचे दोन्ही गाणे बेस्ट झाले. तीच जिंकली पाहिजे असं वाटतंय. सायली पण मस्त. मुलींचेच चांगले वाटले गाणे सगळ्या मुलांपेक्षा. टॉप ५ मध्ये चारही जणी असल्या तरी चालेल.

मागच्या सिझनचे रोहीत राऊत चे काही क्लिप्स पाहील्या. कमाल गातो तो. एकाही गाण्यात निराश करत नाही. Truly versatile singer. हा का नाही जिंकला देव जाणे.

आत्ताच गेस करतेय कोण काय गाइल.. अरुणिता किंवा सायली चुपकेसे चुपकेसे रात कि चादर तले ??
सवाई /दानिश : रहमानची सुफी गाणी पिया हाजी आली/कुन फाया कुन्/ख्व्वाजा मेरे ख्वाजा ??
आशीष आणि ष्ण्मुखने ऑलरेडी इतकी रेहमानची गाणी गायलीयेत.. कुठली राहिलीयेत आठवायला हवे.. शाकालाका बेबी , हम्मा हम्मा नक्की असेल.. सतरंगी, ओ हमदम सुनियो रे वगैरे ..

पवनदीपला कोरोनाची लागण झालीये अस ऐकलय >>> कोरोना मुळे कदाचित इंडीयन आयडॉल थांबवणार आहेत असं युट्यूबवर म्हणतात.

ए आर रेहमान आणि कल्याणजी आनंदजी लागोपाठ असल्याने हा वीकेण्ड संगीतप्रेमींसाठी मेजवानीचा ठरणार आहे. कदाचित कल्याणजी आनंदजी किंवा रेहमान यांच्यापैकी एक गेस्ट पुढच्या आठवड्यात बोलवता आला असता तर दोन आठवडे छान गेले असते.

रेहमानच्या एपिसोडमधे वेगळाच आशीष कुलकर्णी पहायला मिळाला. रेहमान खूप कमी आणि मोजकं / नेमकं बोलतो. अघळपघळ स्तुती नाही किंवा पाणचट बोलणं नाही. अशांच्या शब्दाशब्दाला किंमत येते. आयडॉलच्या मंचावर सतत नाटकी बोलणं ऐकायची सवय झाल्याने टू द पॉईण्ट वाले असभ्य वाटू शकतात. Proud
मायबोलीवरसुद्धा नेमके आणि मोजके लिहीणारे काही आयडीज आहेत. आणि नेहा कक्कडसारखे अघळ पघळ ( माझ्यासारखे) बडबडे आयडीजही आहेत. Lol

आनंदजींच्या एपिसोड मधे सायलीने लैला मै लैला हे गाणे पूर्ण ताकदीने गायले. करेक्ट आवाज लागलाय तिचा. नाहीतर अनेकदा तिचा आवाज लहान मुलीसारखा येतो. अरूणिता ने दिल चीज क्या है च्या वेळी किंचित जाडसर (बास ) आवाज लावला होता. दोघीतला हा फरक निर्णायक ठरतो.

निहाल ताऱो रेहमानसमोर एक नंबर गायला. एसपीबी ची आठवण करून दिली.
(प्रोमोमधले सगळेच कार्यक्रमात असत नाही. रेखाने विशालच्या टकलावर तबला वाजवलेला पहायला नाही मिळाला)

प्रोमोमधले सगळेच कार्यक्रमात असत नाही. रेखाने विशालच्या टकलावर तबला वाजवलेला पहायला नाही मिळाला).. ........ मी पाहिला. सोनी लिव्ह वर..
आयडॉलच्या मंचावर सतत नाटकी बोलणं ऐकायची सवय झाल्याने ... खरंय. रेखा चे दोन्ही एपिसोड थोडे नाटकी च वाटले.. पवन दीप ने तर किती गाणी गायली.!!

नचिकेत परत येतोय.
षण्मुखाला एखादं क्लासिकल गायला हवं आता .. ती खूप छान गाते.. मला आवडते ही.. पण फक्त एकाच टाईप ची गाणी गातेय.. असं स्पर्धेत चालत का?

Pages