मैत्री उपक्रम माहिती आणि आवाहन - २०२१

Submitted by हर्पेन on 14 January, 2021 - 07:31

ह्या धाग्याद्वारे मैत्रीच्या ह्या वर्षातील (२०२१) उपक्रमांविषयक माहिती आणि आवाहन एकाच ठिकाणी संकलित करण्याचा मानस आहे.

'मैत्री' ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था मेळघाटातील अगदी दूरच्या गावांमधे आरोग्य , शिक्षण व शेती याकरता काम करते. स्वयंसेवेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सरकारी मदत न घेता 'मैत्री'चे काम सुरू आहे. प्रत्येक माणसाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि उर्मी असते यावर 'मैत्री'चा दृढ विश्वास आहे आणि म्हणूनच त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि संधी उपलब्ध करून देणे 'मैत्री' आनंदाने करते. शक्यतो मैत्रीच्या उपक्रमांमधे लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घ्यावा ह्यावर 'मैत्री'चा भर आणि कटाक्ष असतो.

'मैत्री'चे काम मुख्यत्वेकरून अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात चालते. तुम्हाला मेळघाटात जाणे शक्य नसेल तर तिथल्या उपक्रमांची आखणी करणे, पुर्वतयारी करणे ई. कामांकरता पुण्यातून मदत करू शकता.
उदा. शैक्षणिक साधने बनवणे, तान्ह्या बाळांसाठी कपडे तयार वा गोळा करणे, ते पिशव्यांमध्ये भरणे, औषधे जमा करणे, धान्य/ शिधा गोळा करणे व पाठवण्याची व्यवस्था करणे इ.

गेल्या अनेक वर्षापासून 'मैत्री' आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भाने देखिल सातत्यपुर्ण कामगिरी करते आहे. त्याकरता त्या त्या वेळी प्रत्यक्ष
गरजेच्या ठिकाणी जाण्याबरोबरच तिथे न जाता करण्याजोगी अनेक कामे असतात त्यातही आपण सहभागी होऊ शकता.

'रद्दीतून सद्दी' ह्या उपक्रमा अंतर्गत तुमच्या सोसायटीमध्ये 'रद्दी संकलन' सुरु करून त्याच्या विक्रीतून आलेले पैसे मैत्रीला मदत म्हणून देऊ शकता. सोसायटीत मोठ्या प्रमाणावर जमणार नसेल तर स्वतःच्या आणि आपापल्या नातेवाएक मित्रमंडळी ह्यांच्या घरातली रद्दी विकून आलेले पैसे मैत्रीला मदत म्हणून देऊ शकता.

विविध कंपन्यामध्ये CSR ला पाठविण्यासाठी मेळघाट विषयीचे प्रस्ताव लिहिणे व त्याचा पाठपुरावा करणे या कामी आम्हाला मदत करू शकता. पुण्यातील ऑफिसमध्ये कार्यालयीन कामात काही वेळेला मदत लागते तेव्हा तुम्ही येऊ शकता.

'मैत्री' बाबत इतर लोकांना सांगून स्वयंसेवक व देणगी मिळवून देण्यासाठी आम्हाला मदत करू शकता.

अशा खूप काही कल्पना आणि मार्ग आमच्यापाशी आहेत आणि आम्हाला खात्री आहे की तुमच्याकडे यापेक्षा कितीतरी अधिक कल्पना असतील. चला तर मग, आपण एकत्र मिळून चांगले काहीतरी घडवूया.

Maitri is registered under the Bombay Public Trusts Act, 1950 on 31st July 1999 (E-2898 / Pune). PAN Number: AAATZ0344C, FCRA Registration Number: 083930473.

Office Address
Flat No. 9, Mahadev Smruti,
Near Bal Shikshan Mandir,
Mayur Colony,
Kothrud, Pune 411038

Telephone Numbers
Office: 9309930010

Website : http://www.maitripune.net
E-mail: maitri1997@gmail.com

मैत्रीच्या मेळघाट व इतर कामांसाठी तुम्ही यथाशक्ती आर्थिक मदत करू शकता.
ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

गेली अनेक वर्षे सुरु असलेली “मैत्री” ची मंगळवारची बैठक करोनाच्या काळात खंडीत झाली. सध्या ही बैठक प्रत्येक मंगळवारी नेहेमीप्रमाणे साडे सहा वाजता पण ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. ही बैठक ४० मिनिटांची असते. या बैठकीत उपस्थितीत राहणार्‍यांनी मैत्रीला 9309930010 वर तसे कळवावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोरोना नंतरच्या परिस्थितीमुळे ताडीवाला रस्ता परिसरातील रोजगार गेलेल्या कुटूंबांना मदत करण्याच्या उपक्रमाकरता किराणा साहित्य देण्यासाठी समाज माध्यमावर आवाहन केलं होतं. मैत्रीचे अनेक मित्र, देणगीदार,संस्था, त्यासाठी लगेच मदत जमा करायला पुढे आले. सोसायट्यांनी घराघरातून पैसे जमवून “ मैत्री”च्या खात्यावर जमा केले. बरेच मित्र प्रत्यक्ष कामात सहभागी होत आहेत. काही किराणा दुकानदारांनी देखील मदत देऊ केली असा अनुभव आहे.

सामानाची बांधाबांध -मोजमाप यासाठी मोठी जागाही आमचे सुह्रद प्रत्येक आपत्कालीन कामासाठी देतात.
या सगळ्यांच्या प्रयत्नातून ताडीवाला रोड भागातल्या एका वस्तीत मोजक्या कुटुंबात हा शिधा जाऊ शकेल याचं समाधान आहे. सर्वांच्या सहभागातून हे काम पुढच्या आठवड्यात पुर्ण होईल.

“दोन पैसे असतील तर एका पैशाची भाकरी आण आणि दुसऱ्या पैशाचे फुल आण. एक जगवेल आणि दुसरे कशासाठी जगायचे ते सांगेल.” असे एक वचन आहे. त्यानुसार ह्या कुटुंबातील मुलांकरता चित्रकलेचे साहीत्य ही देऊ असा विचार पुढे आल्याने त्याकरता चित्रकला वही आणि तेलखडू देणगी स्वरुपात आले आहेत. शिध्यासोबत मुलांकरता म्हणून असे साहित्य देत आहोत. मैत्रीच्या काही लहान मित्रांनी ( मुला- मुलींनी) ते नीट बांधून खोक्यात ठेवण्यासाठी मदत केली.
१.
MaitriFD1.jpg

२.
MaitriFD2.jpg

३.
MaitriFD3.jpg

४.
MaitriFD4.jpg

शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवसात १२ स्वयंसेवकांनी मिळून सगळ्या वस्तुंच्या छोट्या पॅकिंग ना एकत्र करून एकूण २०० किट्स तयार केले. त्यापैकी सव्वाशे किट्स वाटपाकरता ताडीवाला रस्ता परिसर वस्तीकडे पाठ्वण्यात आले.

१.
WhatsApp Image 2021-06-12 at 9.24.12 PM.jpeg

२.
WhatsApp Image 2021-06-13 at 10.18.21 PM.jpeg

३.
WhatsApp Image 2021-06-13 at 10.18.21 PM (2).jpeg

४.
WhatsApp Image 2021-06-13 at 10.18.54 PM.jpeg

शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवसात १२ स्वयंसेवकांनी मिळून सगळ्या वस्तुंच्या छोट्या पॅकिंग ना एकत्र करून एकूण २०० किट्स तयार केले. >>> वाह कौतुकास्पद. ती छोटी मुलंही किती मन लाऊन मदत करतायेत.

तुम्ही दुकानदारालाच किट बनवायला का सांगत नाही? किमतीत काहीच फरक पडत नाही. तुमचा वेळ वाचेल. बहुतेक सर्वच संस्था किट बनवून घेतात.

मागील दोन वर्षापासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सोबत 'मैत्री'चा सामंजस्य करार झालेला आहे. १९ जून रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कुलगुरू डॉ, विलास भालेराव सर आणि कृषी संचालक डॉ.खर्चे सर आणि त्यांच्या टीमने मेळघाट दौरा केला. त्यादरम्यान चिलाटी येथील मेळघाट मित्र कार्यालयालाही भेट दिली.

गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने डोल, बासरी वाजवत आणि दुपट्टा भेट देऊन केले.

ह्यावेळेस डोमी आणि सिमोरी गावातील शेतकऱ्यांना त्या टीम सोबत भेटीची व शेतीविषयी चर्चा करण्याची संधी मिळाली. कुलगुरू सरांनी मार्गदर्शन केले, तसेच शेतीविषयक शेतकऱ्यांना काही आश्वासन दिले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना धान्य साठवण्याचे कोठी, तूर बियाणे, बीजप्रक्रिया साठी चे औषध तसेच फवारणीचे औषधे दिले आहे.

१.
Kulguru Visit 1.jpg

२.
Kulguru Visit 2.jpg

३.
Kulguru Visit 3.jpg

४.
Kulguru Visit 4.jpg

मेळघाटातील “मैत्री” चं प्रशिक्षण-केंद्र चिलाटी ह्या गावात आहे.
नुकतेच त्या गावात कोरोनासाठीचं लसीकरण १००% पूर्ण झालं. अनंत अडचणी आल्या पण त्यावर मात करत तिथल्या मित्रांनी हे काम तडीस नेलं. लवकरच सिमोरी गावातही १००% लसीकरण पुर्ण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र ढगफुटी
२२ जुलै, २०२१
बराच काळ पावसाने ओढ दिल्यानंतर आज महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस बरसला, इतका की राज्यात अनेक नद्या काठ सोडून दुतर्फा वाहू लागल्या. नदीकाठच्या परिसरात यामुळे पूरस्थिती आहे.
मैत्री व परिवर्तनचे स्वयंसेवक परिस्थितीवर लक्ष ठेवून, स्थानिकांच्या संपर्कात राहून नुकसानीचा अंदाज घेत आहेत. जमेल तशी तातडीची मदतही करत आहेत.
चिपळूणजवळ राहणाऱ्या प्रशांत पटवर्धन या मित्राशी बोलणे झाले. चिपळूणचा बराचसा भाग ८-१० फूट पाण्यात आहे. कुठेच वीज नाही. बोर पाण्यात गेल्यामुळे लोकांकडे पिण्याचे पाणी नाही. प्लास्टिक शीट, तयार जेवण, पिण्याचे पाणी या गोष्टींची तातडीने आवश्यकता आहे.
पुराचे पाणी ओसरायला अजून २-३ दिवस लागतील असा अंदाज आहे. त्यानंतर साफसफाईचे मोठे काम आहे - बोर साफ करायला पंप, बिघडलेले, पाण्याखाली असलेले पंप दुरुस्त करायला मॅकेनिक स्वयंसेवक, घरातला, सार्वजनिक ठिकाणचा गाळ काढायला मदत असं भरपूर काम असणार आहे.
परिस्थिती स्पष्ट होत जाईल तशी आम्ही वेळोवेळी माहिती देत जाऊ.
मदत करायची असल्यास जरूर संपर्क साधा..
दूरध्वनी: ९३०९९ ३००१०
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149ONLINE
तुम्हाला परदेशातून मदत पाठवायची असेल तर:
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB
अधिक माहितीसाठी संपर्क करा: maitri1997@gmail.com
किंवा दूरध्वनी: ९३०९९ ३००१० (फक्त लिखीत संदेश)
किंवा भेट द्या: www.maitripune.net

भारतीय NGO ना परदेशातून आर्थीक मदत घ्यायची असल्यास काही नवीन नियमा / कायद्यानुसार स्टे ट बँकेत खाते आवश्यक ठरले आहे, तरी त्यानुसार 'मैत्री'चे जे खाते उघडले आहे त्याचे तपशील खालील प्रमाणे -

तुम्हाला परदेशातून मदत पाठवायची असेल तर:
Name of the beneficiary : MAITRI
Bank : State Bank of India. New Delhi Main Branch. 11 Sansad Marg. New Delhi 110001. India
Beneficiary account number : 40166623586
SWIFT Code :  SBININBB104
IFSC : SBIN0000691
Purpose code : P1303
https://www.instamojo.com/@maitripuneforex/
(Please mention the purpose code as "P1303" in the payment instruction when the transfer is effected)

महाराष्ट्र ढगफुटी

२३ जुलै २०२१

चिपळूण, महाड पाठोपाठ आज सांगली, कोल्हापूर व साताऱ्यातही पूर परिस्थिती आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

अनेकांना मदतकार्यात सहभागी व्हायचंय, पण ही वेळ पूरात अडकलेल्या लोकांना सोडवण्याची आहे. दरडीतून लोकांना वाचविण्याची आहे. हे काम फक्त प्रशिक्षित लोकच करू शकतात. अशा वेळी गर्दी टाळून आपण मदतकार्याची तयारी करायला हवी.

पूर ओसरायला लागला की आपल्याला खूप काम करायची संधी आहे. पुढच्या १५ दिवसात या प्रकारचे काम असणार आहे -

१. लंगर चालवून तयार जेवण देणे
२. पिण्याच्या पाण्याची सोय करणे
३. अंथरायला, झाकायला प्लास्टिक शीट पुरवणे
४. रोजच्या वैयक्तिक लागणाऱ्या आवश्यक गोष्टी - जसे कपडे, साबण इ.  चे किट देणे
५. घर, परिसर जसे की हॉस्पिटल व दवाखाने स्वच्छ करायला मदत करणे
६. तुम्ही अभियंता / इलेक्ट्रिशीयन असाल तर घरोघरी विजेचा पुरवठा सुरळीत करायला / शॅाक बसणार नाही म्हणून यंत्रणा तपासायला मदत करणे
७. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षित करायला (बोर, विहीर, अंडरग्राऊंड पाण्याच्या टाक्या साफ करायला), त्यावरचे पंप, जनरेटर दुरूस्त करायला मदत करणे
८. लोकांचे सांत्वन करणे, त्यांच्याशी बोलणे
९. तुम्ही डॅाक्टर / पॅरॅमेडिक असाल तर  प्राथमिक आरोग्य सेवा देणे
१०. कचऱ्याची विल्हेवाट लावायला मदत करणे

या प्रकारच्या कामात सहभागी व्हायचं असेल तर मैत्रीकडे तुमचं नाव नोंदवा.

जर प्रत्यक्षात काम करायला जाऊ शकत नसाल तर वरील कामासाठी निधी गोळा करायला मदत करा.

अधिक माहितीसाठी संपर्क करा: maitri1997@gmail.com  
किंवा दूरध्वनी: ९३०९९ ३००१० (फक्त लिखीत संदेश)
किंवा भेट द्या: www.maitripune.net

———

Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149ONLINE

———

तुम्हाला परदेशातून मदत पाठवायची असेल तर:
Name of the beneficiary : MAITRI
Bank : State Bank of India. New Delhi Main Branch. 11 Sansad Marg. New Delhi 110001. India
Beneficiary account number : 40166623586
SWIFT Code :  SBININBB104
IFSC : SBIN0000691
Purpose code : P1303
https://www.instamojo.com/@maitripuneforex/
(Please mention the purpose code as "P1303" in the payment instruction when the transfer is effected)

*महाराष्ट्र ढगफुटी*
२५ जुलै, २०२१

***स्वयंसेवक नाव नोंदणी***

“मैत्री” च्या चिपळूण येथील मदतकार्यात सहभागी होण्यासाठी तुमचं नाव लवकर नोंदवा!

चिपळूण येथे मदतकार्यात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवक हवे आहेत.

काम करायची तयारी असलेल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. विशेषकरून डॅाक्टर, इलेकट्रिशियन, पंप / जनरेटर दुरूस्त करणारे टेकनिशियन, समुपदेशक - या व अशा प्रकारचे कौशल्य तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुमचं नाव नोंदवा.

“मैत्री” ची पहिली तुकडी बुधवारी, २८ जुलैला निघेल व त्यानंतर ॲागस्ट महिन्यात दर ४ दिवसांनी पुढची तुकडी निघेल. निघण्यापूर्वी प्रत्येक तुकडीचं orientation होईल.

तुमचं नाव नोंदवण्यासाठी
maitri1997@gmail.com ईमेल करा किंवा या दूरध्वनी ९३०९९ ३००१० वर लिखीत संदेश पाठवा.

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.maitripune.net

*महाराष्ट्र ढगफुटी*

चिपळूणला मदतकार्यासाठी जाणाऱ्या तुकड्यांचे वेळापत्रक -

पहिली बॅच - २८ जुलै ता १ ॲागस्ट
दुसरी बॅच - १ ॲागस्ट ते ५ ॲागस्ट
तिसरी बॅच - ५ ॲागस्ट ते ९ ॲागस्ट
चौथी बॅच - ९ ॲागस्ट ते १३ ॲागस्ट
पाचवी बॅच - १३ ॲागस्ट ते १७ ॲागस्ट

प्रत्येक तुकडीत ५ स्वयंसेवक असतील. निघण्यापूर्वी प्रत्येक तुकडीचं orientation होईल.

तुमचं नाव नोंदवण्यासाठी
maitri1997@gmail.com ईमेल करा किंवा या दूरध्वनी ९३०९९ ३००१० वर लिखीत संदेश पाठवा.

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.maitripune.net

मित्रांनो,

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उद्या चिपळूणला निघणारे तिघेजण आजच्या आपल्या मंगळवारच्या झूम मिटींगला होते. तिथली आजची परिस्थिती, आपले मदतकार्याचे नियोजन व या चमूची तयारी यावर आज चर्चा झाली.

२०१८ ला केरळचा पूर, २०१९ ला सांगली-कोल्हापूर येथील पूर या दोन्ही ठिकाणी मैत्रीने केलेल्या कामाचा अनुभव अजून ताजा आहे. रोजची बदलणारी परिस्थिती, मदत साहित्याचा येणारा ओघ आणि त्यानूसार बदलत असणारी मदतीची गरज हे लक्षात घेऊन आपल्या मदतकामाची आखणी आपण केली आहे.

परिवर्तनचे स्वयंसेवक या कामात सहभागी होऊन महत्वाच्या जबाबदाऱ्या घेत आहेत.

पुढच्या मंगळवारी आपण या मदतकामाचा आढावा घेऊ. त्याचसोबत शाळा सुरू व्हाव्यात म्हणून पाठपुरावा करत असलेल्यांकडून आपण त्यांच्या प्रयत्नांविषयी ऐकू.

भेटूच,

मैत्री

कालच्या 'मंगळवार मीटींग ' नंतर मैत्रीकडून आलेला संदेश

मैत्री-परिवर्तन पूरग्रस्त मदतकार्य
दिवस दुसरा - २९ जुलै, २०२१
मैत्रीचं एक सूत्र आहे - नेमकी गरज ओळखूनच मदत पोचवायची. आजची गरज ही पूरग्रस्तांना स्वच्छता कामात मदत करण्याची आहे.
आपली टीम आज पेठमाप, शंकरवाडी, गोळकोट या भागात गेली होती. इथे १०० एक घरं आहेत. त्यांना प्राथमिक मदत - धान्य, पाणी, कपडे काही दिवसांपुरते तरी मिळाले आहेत. लोक आता आपली घरं साफ करण्यासाठी धडपडत आहेत. घरातली माती व गाळ काढणं, वाचवता येण्याजोग्या वस्तू बाजुला काढून साफ करणं, ओल्या सडलेल्या वस्तू फेकून देणं, त्यात घरात कोरडी जागा शोधणं, स्वयंपाक बनवण्यासाठी शेगडी, गॅस, भांड्यांची व्यवस्था करणं, कपडे व भांडी धुवून वाळवणं अशी अनेक कामं आहेत.
लोक आपापले घर साफ करून कचरा रस्त्यावर, गल्लीच्या टोकाला नेऊन टाकत आहेत. रस्त्यावर काही ठिकाणी १ फूट चिखल आहे. छोट्या गल्ल्यांमधून मदत नेणारे वाहन जाऊ शकत नसल्याने लोक या चिखलातून वाट काढत मदतीपर्यंत जात आहेत.
लोकांना या साफसफाईत आपण मदत करायला हवीये.
या कामात सहभागी होण्यासाठी तुमचं नाव maitri1997@gmail.com ला ईमेल करून नोंदवा अथवा
या दूरध्वनी वर ९३०९९ ३००१० संपर्क करा / लिखीत संदेश पाठवा.
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.maitripune.net
#KonkanFloods #ChiplunFloods #MaitriEmergencies #MaharashtraFloods #ParivartanPune Parivartan Bharat

*चिपळूण मदतकाम*
**तातडीचे**
चिपळूण शहरातल्या पेठमाप भागात पुरातून वाहून आलेली माती काढायला मदत हवीये…
सोबत फावडे, घमेले, खराटे, मॅाप, फिनाईल असं साहित्य घेऊन तुमच्या गाडीने तुम्ही ४-५ जण उद्या निघू शकत असाल तर लगेच या दूरध्वनी वर ९३०९९ ३००१० संपर्क करा.
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.maitripune.net

ह्या हाकेला तातडीने ओ देऊन मुंबईतून १५ जणांचा एक चमू काल चिपळूणला रवाना होता आणि त्यांनी काम सुरुही केलं आहे.

Bhoivasti 1.jpg

अजून एक फोटो

Bhoivasti 2.jpg

“मैत्री-कथा”
संकटकालीन कामाच्या शाळेतील अनुभवगाथा

संकटात असो की रोजच्या जगण्यात
आपण कुणालाच मदत करत नाही, आपण कुणासाठी काही करतो म्हणजे खरंतर आपण स्वत:लाच मदत करत असतो.

“मैत्री” चं आवाहन वाचून ठाण्याहून प्रतिक जाधव त्याच्या मित्रांना घेऊन चिपळूणकडे निघाला. काहीतरी साफसफाईचं काम करायचं आहे म्हणून आवश्यक उपकरणं, काही साहित्य आणि भरपूर चेतना, प्रचंड उत्साह घेऊन १२ जणांची ही टीम चिपळूणात दाखल झाली आणि यशसला भेटली.
प्रतिक आणि त्याच्या मित्रांनी आयुष्यात चिखल पाहिला नसेल. मुरादपूरच्या विक्रांत पाटेकरच्या घरात जेवढा होता तितका तर कधीच नाही. तिथे होता चिखलाचा पूर. आपल्या आजीबरोबर विक्रांत त्या घरात राहतो. त्याला स्वत:ला पाठीचा त्रास असल्यानं घरात शिरलेला तो चिखल आणि त्याचबरोबर पूराच्या पाण्यात खराबलझालेलं सामान याच्या कल्पनेनं घराचं दार उघडायची हिंमत झाली नव्हती.

मात्र प्रतिक आणि त्याच्या मित्रांना त्याने पाहिलं आणि त्याच्या मनात जरा धीर आला. नंतर ज्या तडफेनं त्या सर्वांनी त्याच्या घरातला दोन-तीन फूट उंचीचा चिखलाचा ढीग काढला तसतसा विक्रांत आणि त्याच्या आजीच्या जीवात जीव येऊ लागला. प्रतिकनी नंतर त्याच्यासाठी काही आर्थिक मदतही गोळा केली. त्याच्यापर्यंत पोचवली.

एक घर नुसतं साफ झालं नाही तर पुन्हा उभं राहिलं. घर म्हणजे काही चार भिंती, छप्पर आणि फरशी नाही. “घर” म्हणजे घरातली “माणसं”. प्रतिकच्या मित्रांनी ती माणसं पुन्हा उभी केली. त्यांना नवी आशा दिली. ती आशा देताना स्वत:ही खूप शिकले. त्यांना त्यांच्या घराची आठवण झाली. आपण शहरात रहातो, सुरक्षित असतो म्हणजे किती मोठं आहे ते त्यांना समजलं. स्वत:ची कष्ट करण्याची ताकद समजली. धीर देताना स्वत:ला धीर मिळाल्याचाही त्यांना अनुभव आला. त्यांच्या टीमला एक अविस्मरणीय अनुभव मिळाला.

संकटकालीन प्रसंगात आपण मदतीला जातो ते बाकी कुणाच्या नाही तर स्वत:च्या.

“मैत्री” कडे अशा कितीतरी कथा आहेत. एक एक कथा समाजातील चांगलेपणा पेटवत रहाते. तेच “मैत्री”चं काम. चांगुलपणा जिवंत ठेवणं.
“मैत्री” कुणालाच मदत करत नाही, “मैत्री” स्वत:लाच मदत करायला शिकवते.
“मैत्री” स्वत:शी, “मैत्री” सर्वांशी !

वाह!!! हर्पेन, मैत्री-कथा धागा काढा ना वेगळा. अतिशय चांगले काम करत आहात. त्या धाग्यात किस्से संकलित करा. फार प्रेरणादायी होइल.

खरंच खूप कौतुक सर्वांचं.

माझ्या भाचीचा मुलगाही ज्ञानप्रबोधिनीतर्फे काही दिवस चिपळूणला मदतीला गेला होता.

-चांगल्या कामाचा संसर्ग-
लहान मुलांमधला उत्साह आणि ऊर्जा मुळातच संसर्गजन्य असते, याचा एक सुखद प्रत्यय मैत्री- परिवर्तनच्या टीमला पूरग्रस्त भागात मदतकार्य करताना आला.
आपलं कोकणातलं मदतकार्य संपवून परत निघणारी टीम सवयीनं आसपास पडलेला प्लॅस्टिकचा कचरा पोत्यांमध्ये भरू लागली. त्यांचं काम बघून आधी दोन, मग चार आणि बघता बघता दहा लहान मुलं आमच्या स्वयंसेवकांसोबत सामील झाली. स्वयंसेवक आणि या मुलांनी मिळून तब्बल १२ पोती प्लॅस्टिकचा कचरा उचलला. एखादी गोष्ट डोळ्यांना दिसावी, त्याक्षणी ती पटावी आणि ती कृतीत उतरावी इतक्या सहज हे सगळं घडून आलं. पुण्यातील एक संस्था या सगळ्या प्लास्टिकचं Recycling करणार आहे.
शाळेत मूल्यशिक्षणाच्या वहीत बंदिस्त राहणारा महत्वाचा पाठ या सगळ्यांमध्ये आज खऱ्या अर्थाने रुजला, आणि मैत्री- परिवर्तनाला त्याचं साक्षीदार होता आलं. अशीच मूल्यं आपण सर्वांनी जपली तर कदाचित येत्या काळात नैसर्गिक आपत्ती रोखण्यामध्येसुद्धा मोठी मदत होईल! या चांगल्या कामांचा संसर्ग वेगाने पसरावा हीच इच्छा!

Chiplun Plastic Collection.jpgChiplun Plastic Collection 1.jpg

मा. मुख्यमंत्र्यांना पत्र.

प्रति
श्री. उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
**आत्ताचं शालेय संकट म्हणजे भविष्याचं मोठं नुकसान !!!**
मुख्यमंत्री महोदय,
तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर येणार्‍या नैसर्गिक संकटांना सामोरं जात आहात. करोनाचं संकट सगळ्यात दीर्घ काळा टिकलं. या करोना काळात तुम्ही अनेक वेळेस जनतेला उद्देषून बोललात. राज्य एक कुटुंब व तुम्ही या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख. या नात्याने, “जीव महत्वाचा, बाकी आपण नंतर सगळं सांभाळू” असं सतत सांगत होतात. तुमच्या बोलण्यातली आपुलकी व काळजी कुटुंबप्रमुखाला साजेशी अशीच होती. या संकटातून राज्याची नाव हळूहळू तुम्ही पैलतीराव नेत आहात. मात्र शाळा सुरू करण्याबाबतीत मात्र आपली नाव नुसती गटांगळ्या खाताना दिसतेय.
मार्च २०२० पासून सर्व शाळा बंद आहेत. २०२०-२१ या शालेय वर्षात मुलं एकही दिवस शाळेत गेली नाहीत. २०२१-२२ हे ही वर्ष निम्म संपलं. दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा आपला मानस आहे असं समजतंय. आपण जितका उशीर करू तितकं न भरून निघणारं असं मुलांचं नुकसान आपण करत आहोत याची तुम्हाला कल्पना असेलच. जितके दिवस शाळा बंद, त्याच्या दुप्पट दिवस मुलांना पूर्वपदावर यायला लागणार आहेत हे ही कदाचित तुम्हाला माहित असेल. किंबहुना, बरीच मुले, विशेषकरून दलित, आदिवासी, मजूर, भटके यांची मुले परत शाळेत येणारच नाहीत अशी शक्यता आहे हे ही तुम्ही जाणून असाल.
मेळघाटमधल्या काही मुलांची उदाहरणे तुमच्या नजरेस आणून देतो-
· अभिजीत दिलीप भुसूम, मु. पो. हतरू, तालुका चिखलदरा. टाळेबंदी झाली तेव्हा तो वाशीमच्या इंग्रजी शाळेत ६वीत शिकत होता. त्याला अनेक बक्षिसे मिळाली होती. घरी आल्यापासून तो शेळी चारायला जातो. शाळेत शिकलेलं तो सगळं विसरलाय. शेतावर, जंतलात हिंडा-फिरायची त्याला आता गोडी लागली आहे. परत शाळेत अजिबात जाणार नाही असं म्हणतो.
· सोनी तोताराम कासदेकर, मु. सुमिता, पो. हतरू, तालुका चिखलदरा. २०२१ मध्ये १०वी ला बसली. प्रत्यक्षात परिक्षा झाली असती तर चांगले मार्क पडले असते, असं ती म्हणाते. आता ११वीत प्रवेश घेतलाय पण नेटची कुठलीच सोय नसल्याने वर्गात सहभागी होता येत नाही. पुढचं शिक्षण होऊच शकलं नाही तर आपल्याला लग्न करावं लागेल अशी भिती तिला वाटते.
· निलेश धुर्वे, मु. चिलाटी, पो. हतरू, तालुका चिखलदरा. या वर्षी ७वीत गेला पण शाळा बंद, नेट नाही, कुठलाच अभ्यास होत नाही. आधीच काही येत नव्हतं, आता शाळा सुरू झाल्यास २ इयत्ता पुढे बसायचंय, मग तर आपल्याला काहीच येणार नाही, त्यापेक्षा शाळेतच जायला नको असं त्याला वाटतं.
· मेळघाटमध्ये एकूण ४७ शासकीय व खासगी आश्रमशाळा आहेत. या करोनाकाळात पूर्ण बंद आहेत. या आश्रमशाळांच्या मुलांना नेटची काहीच व्यवस्था नसल्याने यांचं अभ्यासाशी नातंच तुटलंय. मोठ्या मुलींची लग्न लावून दिली जात आहेत तर बरीच मोठी मुलं-मुली आई-वडलांच्या बदली रोजगार हमीच्या कामावर जात आहेत. ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून निसटली आहेत किंवा निसटण्याच्या मार्गावर आहेत.
आदिवासी भागातली ही परिस्थिती, पण राज्यातल्या इतर भागातही, खासकरून शहरी भागातही अनेक समस्या आहेत. नुकतेच दोन सर्व्हेक्षण अहवाल प्रकाशित झाले आहेत, ज्यांचे निष्कर्ष तुमच्यापर्यंत पोचले असतीलच. त्यातला पहिला – Locked Out – Emergency Report on School Education. ऑगस्ट २०२१ मध्ये केलेल्या १ली ते ८वी च्या मुलांच्या या सर्व्हेक्षणातून समोर आलेले प्रमुख निष्कर्श असे –
१. शहरातली २४% तर ग्रामीण भागातली केवळ ८% मुलं नियमितपणे online शिकत आहेत.
२. शहरातली १९% तर ग्रामीण भागातली ३७% मुलं कुठल्याच प्रकारचं शिक्षण सध्या घेत नाहीत.
३. सुमारे ५०% (ग्रामीण व शहरी) मुलांना एक सोपं वाक्य वाचायला दिलं असता त्यांना त्यातले काहीच शब्द वाचता आले पण संपूर्ण वाक्य मात्र वाचता आलं नाही!
४. सुमारे ७५% (ग्रामीण व शहरी) पालकांना वाटतं की त्यांच्या मुलांची वाचन क्षमता कमी झाली आहे, आणि सुमारे ९७% पालकांना वाटतं की शाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात.
हे सर्व्हेक्षण देशातल्या (महाराष्ट्रासकटच्या राज्यांत केलेलं) व अत्यंत छोट्या sample चं असलं तरी शाळा १७ महिने बंद असल्याचे परिणाम समजण्यासाठी पुरेसं आहे.
दुसरा अहवाल आहे अझीम प्रेमजी विद्यापिठाचा, Loss of Learning During the Pandemic हा. टाळेबंदीपूर्वी शिकलेलं मुलं विसरली आहेत, टाळेबंदी दरम्यानच्या काळात असलेला अभ्यासक्रम शिकण्याला अनेक मर्यादा आहेत, एवढेच नाही तर वाचन, बेरीज-वजाबाकी अशा काही मूलभूत क्षमताही मुलं विसरली आहेत असंच या अहवालासाठी केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. महाराष्ट्रात हे सर्व्हेक्षण झालं नाही. पण याचे निष्कर्ष आपल्या राज्यात लागू होणार नाहीत कशावरून??
या दोन्ही अहवालावरुन असंच दिसतं की नुसत्या शाळा सुरू करणं पुरेसं नाही. पुढची २-३ वर्ष मुलांना पूर्वपदावर आणून, झालेलं नुकसान भरून काढत त्यांना वयानुरूप वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करायला मदत करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री महोदय, आपण हे दोन्ही अहवाल वेळ काढून नीट समजून घ्यावेत अशी विनंती आम्ही आपणास करतो.
महाराष्ट्रातल्या अनेक पालकांना, शिक्षकांना नेटने होणारे online शिक्षण अपूरं वाटत असून त्यातून नव्याने निर्माण होणार्‍या समस्या सतावत आहेत. या सगळ्यांनी मुलांचं अधिक नुकसान होऊ नये म्हणून तातडीने शाळा सुरू कराव्यात अशी मतं मांडली आहेत.
मुलांचा जीव वाचावा म्हणून आपण आजपर्यंत शाळा बंद ठेवल्या आहेत. पण हा जीवावरचा धोका खरच वाटतो तेवढा आहे का? आमच्या मते नाही. आणि शाळेत न गेल्यामुळे होणारं नुकसान हे या धोक्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे असं आम्हाला वाटतं. आणि हे आम्ही आकडेवारीनिशी सिद्ध करू शकतो.
आपल्याच शालेय मंत्री सुद्धा हेच म्हणत आहेत, आणि महाराष्ट्र सरकारचा शिक्षण विभाग सुद्धा हेच सांगत आहे.
शाळा सुरू करण्याच्या दिरंगाईमुळे महाराष्ट्राने आजपर्यंत केलेली प्रगती आपण पुसून काढू आणि अधोगतीकडे वाटचाल करायला सुरूवात करू!!!
हे रोखणं, वेळीच दुरुस्त करणं आता केवळ तुमच्याच हातात आहे!

कळावे आपला,
मेळघाट मित्र (मैत्री)

वरील पत्रातील मजकूर पटला असल्यास कृपया तुम्ही पण -
१. मुख्यमंत्र्यांना तुमच्या नावाने वरील पत्र cm@maharashtra.gov.in या ईमेल वर स्वतंत्रपणे आपापल्या नावाने पाठवा.
२. हेच पत्र तुमच्या फेसबुक पानावरून, खाली तुमचं स्वत:चं नाव लिहून शेअर करा.
३. शेअर करताना मुख्यमंत्री तसंच तुमच्या संपर्कातल्या पत्रकार, मित्रमंडळींनाही टॅग करा.
धन्यवाद

__/\__

मुंबई : करोना विषाणू प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. शहरी भागांत आठवी ते १२वीपर्यंत, तर ग्रामीण भागांत पाचवी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले.

https://www.loksatta.com/mumbai/school-from-4th-october-there-is-no-comp...

Pages