मांजराच्या अतिसार - जुलाब यावर काही उपाय सुचवाल का ?

Submitted by radhanisha on 8 January, 2021 - 09:59

आमचं 2 महिन्याचं मांजराचं पिल्लू 10 - 12 दिवस आजारी आहे . दिवसातून ( 24 तासात ) 6 - 7 वेळा शी होते आहे . खाल्लेलं काही अंगी लागत नाही .

पातळ पेजेचं पाणी , अगदी थोडासा भात , मीठ साखर पाणी भरवत आहे , त्यामुळे डिहायड्रेशन झालेलं नाही पण बिघडलेलं पोट बरं झालं नाही तर 8 - 15 दिवसाच्या वर काढेल असं वाटत नाही ... हाडाची काडं झाली आहेत 10 - 12 दिवसात ..

मी आशा सोडलीच आहे फक्त शेवटचा प्रयत्न म्हणून औषध विचारत आहे ...

पहिल्यांदा 3 दिवस कुडापीक गोळी घातली दिवसातून 2 वेळ , त्याने फरक पडला नाही . मग डॉक्टरांनी मेट्रोक्झिल नावाचं औषध सांगितलं ते 4 - 5 दिवस घातलं , त्यानेही काही झालं नाही . गेले 4 - 5 दिवस कुटिचारिष्ट दिवसातून 2 वेळा घातलं , काहीही फरक नाही . आता औषध बंद करून आपणच बरं होईल का बघायचं असं ठरलं आहे .... पण ते काहीही प्रयत्न न करता मरणाकडे जाताना उघड्या डोळ्यांनी बघितल्या सारखं वाटतं आहे .... प्रचंड खेळणाऱ्या , उड्या मारणाऱ्या पिल्लाची ही अवस्था झाली आहे ... त्रास होतो आहे .... माझीच चूक झाली असावी .. किंचित तूप घालून मेतकूट भात घातला , तोच बाधला असावा असं वाटतं ... पण या एवढ्या औषधांनी काहीच फरक पडला नाही , त्यामुळे कदाचित वेगळं काही बॅक्टरीअल इन्फेक्शन असेल असंही वाटतं .... योग्य औषध मिळालं तर अजूनही वाचेल असं वाटतं ...

छोट्या पिलाला चालेल असं काही औषध आहे का ? डॉक्टर कडे नेणं अन्य परिस्थितीमुळे शक्य नाही .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधानिशा, तुम्हाला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. कृपया गिल्ट मात्र वाटून घेऊ नका. जग सोडताना मुक्या प्राण्यांच्या कृतज्ञ डोळ्यात आपल्याविषयी अनंत प्रेम साठून राहिलेले असते. ते आठवावे आणि आपणही तितके निरागस प्रेम करण्याचा प्रयत्न करत रहावे.>>>>अनुमोदन .

Pages