मांजराच्या अतिसार - जुलाब यावर काही उपाय सुचवाल का ?

Submitted by radhanisha on 8 January, 2021 - 09:59

आमचं 2 महिन्याचं मांजराचं पिल्लू 10 - 12 दिवस आजारी आहे . दिवसातून ( 24 तासात ) 6 - 7 वेळा शी होते आहे . खाल्लेलं काही अंगी लागत नाही .

पातळ पेजेचं पाणी , अगदी थोडासा भात , मीठ साखर पाणी भरवत आहे , त्यामुळे डिहायड्रेशन झालेलं नाही पण बिघडलेलं पोट बरं झालं नाही तर 8 - 15 दिवसाच्या वर काढेल असं वाटत नाही ... हाडाची काडं झाली आहेत 10 - 12 दिवसात ..

मी आशा सोडलीच आहे फक्त शेवटचा प्रयत्न म्हणून औषध विचारत आहे ...

पहिल्यांदा 3 दिवस कुडापीक गोळी घातली दिवसातून 2 वेळ , त्याने फरक पडला नाही . मग डॉक्टरांनी मेट्रोक्झिल नावाचं औषध सांगितलं ते 4 - 5 दिवस घातलं , त्यानेही काही झालं नाही . गेले 4 - 5 दिवस कुटिचारिष्ट दिवसातून 2 वेळा घातलं , काहीही फरक नाही . आता औषध बंद करून आपणच बरं होईल का बघायचं असं ठरलं आहे .... पण ते काहीही प्रयत्न न करता मरणाकडे जाताना उघड्या डोळ्यांनी बघितल्या सारखं वाटतं आहे .... प्रचंड खेळणाऱ्या , उड्या मारणाऱ्या पिल्लाची ही अवस्था झाली आहे ... त्रास होतो आहे .... माझीच चूक झाली असावी .. किंचित तूप घालून मेतकूट भात घातला , तोच बाधला असावा असं वाटतं ... पण या एवढ्या औषधांनी काहीच फरक पडला नाही , त्यामुळे कदाचित वेगळं काही बॅक्टरीअल इन्फेक्शन असेल असंही वाटतं .... योग्य औषध मिळालं तर अजूनही वाचेल असं वाटतं ...

छोट्या पिलाला चालेल असं काही औषध आहे का ? डॉक्टर कडे नेणं अन्य परिस्थितीमुळे शक्य नाही .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मांजराच्या जुलाबाबद्दल आहे हे शीर्षकावरून कळलं नाही. माणसाच्या जुलाबाबद्दल वाटले. वेट कडे नेलेलं बरं असं वाटतयं. इथे श्वान व मांजरप्रेमी लोकांसाठी एक धागा आहे तिथे विचारू शकता.
https://www.maayboli.com/node/77227

डॉक्टर कडे न्यायला हवं ,शक्य नाही तर कुणाला तरी बोलवून डॉक्टर कडे पिल्लाला पाठवा.आयव्हीतून औषध जायला हवं,पोटातून देऊन उपयोग नाही.

डॉक्टरकडे नेणेच योग्य आहे.

तोपर्यंत बेल मुरंबा चा पाक देऊन बघा. माझ्या मांजराला उपयोग होतो. 5 ते 6 वेळा पाव किंवा अर्धा चमचा.
पण माझे मांजर मोठे आहे आणि त्याला इतका त्रास झालेला नाही.
So don't take risk.. take the kitten to doctor.

शीर्षकात सुरवातीला मांजरीच्या असं लिहा. म्हणजे पुढे कुणाला धागा शोधायला सोपे जाईल.
प्राण्यांच्या आजारा-खाद्याबद्दल काहीच माहिती नाही.

बॅक्टरीअल इन्फेक्शन असेल किंवा असंच काही तर शीकडे पाय पंजे लागून तोंडाला पुसले गेले की परत त्या जंतुंचं पोटातलं जीवनचक्र चालू राहातं. म्हणजे तो भाग निर्जंतुक करत राहाणे अजून सुरू ठेवल्यास सुधरेल नक्की. मेट्रोझोल वगैरेनी गुण आलाच असणार. पण जंतू दहा जरी राहिले तरी परत वाढत जात असतील.
मांजरांना अंग चाटून साफ ठेवायची सवय त्यामुळे जरा चिकाटी हवी.

पिलाला योग्य उपचार मिळून लवकर बरे वाटूदे.
शीर्षकात सुरवातीला मांजरीच्या असं लिहा. म्हणजे पुढे कुणाला धागा शोधायला सोपे जाईल.>>+१
माणसाच्या जुलाबाबद्दल वाटले.>+१
आधी कॅान्स्टीपेशन वर धागा आला होता. आता कोणाला जुलाब होत आहेत असे वाटून धागा पाहिला.

गॅस्ट्रो तर झाला नाही? व्हेटकडे न्यावंच लागेल. औषध आणि IV शिवाय अवघड आहे.
जुलाब थांबले नाहीत तर 15 दिवसांवर जगणार नाही एवढं माहीत असताना व्हेट कडे न जाण्यासारखी काय मजबुरी असु शकते? पोस्ट रुड वाटली तर वाटु दे. मला राग आला आहे. पेट ठेवायचं तर त्याला घरातील व्यक्तीसारखं प्रेम आणि काळजी द्यायलाच हवी. तुमच्या बाळाला डॉक्टरकडे न नेता घरीच ट्रीटमेंट देत राहिला असतात का? सजीव प्राणी आहे, प्लिज लगेच प्रॉपर ट्रीटमेंट द्या.

गॅस्ट्रो तर झाला नाही? व्हेटकडे न्यावंच लागेल. औषध आणि IV शिवाय अवघड आहे.
जुलाब थांबले नाहीत तर 15 दिवसांवर जगणार नाही एवढं माहीत असताना व्हेट कडे न जाण्यासारखी काय मजबुरी असु शकते? पोस्ट रुड वाटली तर वाटु दे. मला राग आला आहे. पेट ठेवायचं तर त्याला घरातील व्यक्तीसारखं प्रेम आणि काळजी द्यायलाच हवी. तुमच्या बाळाला डॉक्टरकडे न नेता घरीच ट्रीटमेंट देत राहिला असतात का? सजीव प्राणी आहे, प्लिज लगेच प्रॉपर ट्रीटमेंट द्या.

गावचा भाग आहे , व्हेट उपलब्ध नाही .. 25 - 30 किमीवर छोटं शहर आहे , तिथे आहेत .. तेही फिरतीवर असतात , अपॉइंटमेंट मागितली की महिन्याभराने मिळते , तीही पुढेमागे होते . हे सहसा गुरे वगैरे मोठ्या जनावरांचे उपचार करणारे डॉक्टर आहेत , कुत्रा मांजर लहान प्राणी ऍडमिट वगैरे करून घेण्यासारखी इथली परिस्थिती नाही ... ठेवणार कुठे .. ने - आण ... काहीच शक्य नाही ... माझाही जीव तुटतो आहे ...

राधानिशा, मी आधी लिहिलेल्या पोस्टसाठी क्षमा मागते. शहरात राहुन हे असे प्रॉब्लेम्स कल्पनेत सुद्धा येत नाहीत. मी गृहीत धरलं की तुम्ही शहरात रहाता.
मी तुम्हाला माझ्या व्हेटचा नंबर देते. ते फोन आणि मेसेजवर मदत करतात. बऱ्याच NGO साठी पण चार्जेस न घेता खुप वेळ देतात. अतिशय हुशार डॉक्टर आहेत. तुम्ही प्लिज त्यांना (डॉ. सागर भोंगले) फोन करून औषधासाठी कन्सल्ट करा. आणि हो माझ्यासारखा गैरसमज होऊ नये म्हणुन आधी का येऊ शकत नाही त्याची पार्श्वभूमी सांगा.

आणि यासाठी ऑकवर्ड वाटण्याची गरज नाही, मी या आठवड्यात डॉग नेल ट्रीमिंग साठी जाणार आहे, तेव्हा त्यांना फिज पे करेन हे फोनवर सांगा. (रेफरन्स : थिओची आई Happy ) डॉ सागर म्हणचे माऊ नक्की बरी होणार.

आम्ही, गव्हाची पाती ( विटग्रास) आणि गवतीचहाचा रस पाजतो. काही जंत असतील तर पडतात व आराम पडतो.

नाहितर सफरचंदाचा रस. थोडं थोडं , आपलं एलेक्ट्रोलाईटचे पाणी पाजायचे बाटलीने. दूध नका देवू.
भाताची पेज पाजणे. बेल मुरांबा पण चालतो.
शेवटाला बरच नसेल तर डॉक आहेच.

गेलं ते .. तेवढंच आयुष्य म्हणायचं .. नंबर सेव्ह करून ठेवते , परत कधी गरज लागली तर ... धन्यवाद सर्वांना .

अरेरे ! तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका, तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले. ते पिल्लू तितकेच आयुष्य घेऊन आले होते असे समजा. It must be in a better place.

एक छोटीशी गोष्ट आहे. एक (बहुदा) हरणाचे पिल्लू फारच आजारी पडते. एक लहान मुलगी योग्याकडे येते व त्या पिल्लाचे आयुष्य वाढावे म्हणून प्रार्थना करते. योगीही पिल्लाचे आयुष्य वाढावे म्हणून मनोमन देवाची प्रार्थना करतात. त्या रात्री ते पिल्लूच योग्याच्या स्वप्नात येते व म्हणते की माझा हा जन्म इतकाच होता, पुढचा जन्म माणसाचा मिळून मला मुक्ती मिळवायची आहे, तुम्ही का मला अडकवून ठेवताय ?

Sad अर्र ... जेवढ आयुष्य होतं त्यात पिल्लूने तुम्हाला, कुटूंबियांना आनंद दिला, सेवेचे सुख दिले, गोड आठवणी दिल्या ... तेवढाच रूणानुबंध होता म्हणायचं... A big hug to you!

प्रत्यक्ष मृत्यूचं काही दुःख नाही ... भरल्या घरात उपासमार होऊन गेलं , गुटगुटीत पणा उतरून हाडाचा सापळा होऊन.. हे बघायला लावण्यापेक्षा देवाने माझे डोळे मिटले असते तरी चाललं असतं ... मनस्ताप .. असो , ह्या दुःखाचं कसलं कौतुक .... शेजाऱ्यांची 2 वर्षाची मुलगी ब्रेन ट्युमरने आजारी होती , ती पण गेली नेमकी त्याच दिवशी .... भंडाऱ्यातील बाळांची घटना ... त्यांच्या आईवडिलांना काय कमी त्रास झाला असेल .... का हे बघायला लावतो तो हे तोच जाणे .. त्यामानाने माझी अटॅचमेंट कितीतरी कमी होती , 4 - 6 दिवसात विसरेन ... अशी 7 - 8 मरताना पाहिली आहेत आजवर ... मांडीवर घेऊन शेवटचं पाणी पाजण्याचं काम दिलं देवाने , कुठल्या जन्मीचे भोग माझे तोच जाणे ... मुक्ती देत असेल त्या सगळ्यांना अशी आशा आहे ....

वाचून वाईट वाटले. तुम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केलेत. त्याचे आयुष्य तेवढेच होते. फार जास्त मनाला लावून घेऊ नका.
शक्य असेल आणि पटत असेल तर दुसरे अनाथ पिलू पाळा.
त्यात मन रमवा.

वाचुन खूप वाईट वाटले. आमच्या मागच्या कॉलनीत असलेल्या मांजरीने तिचे पिल्लु आमच्या घरी सोडले. पण ती निघुन गेल्यावर २ दिवसात ते पिल्लु गेले. नेमके त्याच वेळी मी व आई पुण्यात होतो. बाबा एकटेच घरी होते. Sad त्यामुळे परत कधी धाडस झाले नाही मांजर अथवा कुत्र्याचे पिल्लु आणण्याचे. जास्त व्यवस्था नसतांनाही तू बरीच काळजी घेतलीस त्याची.

असेच काहीसे आमच्या घरी घडले. एक अतिशय देखणे, राजबिंडे, कॉफी रंगाचे कुत्र्याचे पिल्लू पप्पांना रस्त्यात कुडकुडताना दिसले. त्याला पाळावे असे त्यांच्या मनात आले. आईचा विरोध. नेमके दुसर्‍या दिवशी मोठ्या कुत्र्यांच्या कळवंडीत सापडून पिल्लू जायबंदी झाले. त्याची उस्तवार करण्यात पप्पा आणि आई रंगून गेले. डोक्यावरची मोठी जखम. बिचार्‍याला चाटतादेखिल येईना. हळद, आणखी कसली कसली औषधे लावून झाली. सुरुवातीला सुकत आलेली जखम काही दिवसात पुन्हा मोठी होऊ लागली. प्राण्याच्या डॉक्टरला दोन - तीनदा बोलावूनदेखिल आला नाही. शेवटी तिसर्‍या दिवशी एवढेसे तोंड करून बसले होते. दुध पिणे सोडले. फक्त पप्पांच्या पायापाशी बसून होते. डॉक्टरला दया आली तो आला, उपचार सुरू होते आणि त्याच दिवशी दुपारी ४ च्या सुमारास प्राण सोडला. पप्पा -आई अजून सावरायचे आहेत. त्याचे निरागस डोळे अजून आठवतात म्हणतात.
राधानिशा, तुम्हाला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. कृपया गिल्ट मात्र वाटून घेऊ नका. जग सोडताना मुक्या प्राण्यांच्या कृतज्ञ डोळ्यात आपल्याविषयी अनंत प्रेम साठून राहिलेले असते. ते आठवावे आणि आपणही तितके निरागस प्रेम करण्याचा प्रयत्न करत रहावे.

Pages